Login

ओ मेरे राजकुमार (भाग १०)

Love story

समीरला समजतं की मायाला पाऊस आवडत नाही. पण त्याला तर खूप आवडत असतो. तो गप्प बसतो.. त्याला पाऊस आवडतो हे कळलं तर माया त्याला भाव पण देणार नाही असं त्याला वाटतं…
“माया झालं का काम तुझं? निघुया का?”
“हो . मी कॅब बुक करते.”
“एवढ्या उशिरा कॅब ने? वेडी आहेस का? ते काही नाही मी सोडतो तुला..”
“मला सवय आहे जायची.. ९ तर वाजले आहेत.. हा काही उशीर नाही मुंबई साठी तरी..”
“तरी सुद्धा मी सोडणार. आज एक चांगला मित्र म्हणून तू माझं ऐकायचं आहेस.. ऑफिस ची वेळ संपली. अहो जाहो संपलं..”
माया समीरकडे थोडं प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे बघत होती.. समीरला समजतं आणि तो जीभ चावतो..
“अरे राहिलंच… फ्रेंड्स?????”
माया विचार करायचं नाटक करते आणि हात पुढे करते..
“फ्रेंड्स….”
दोघंही गोड हसतात..
“ठरलं आता हे..” समीर बोलतो आणि त्याचा केबिन मध्ये आवरायला जातो.. माया ही तिची बॅग भरायला घेते.. दोघंही मनातून खूप खुश असतात.. समीरने आपल्या प्रेमाची कबुली तर आईला दिली असते आणि मायाला मनातून कुठेतरी समीर आवडत असतो.
दोघंही गाडीत बसतात.. 
“माया, तुम्ही खारघर लाच राहता का? म्हणजे मूळ खारघर चे का?”
“हो. म्हणजे मी लहानपणापासून खारघर मधेच वाढले.. बाबा रत्नागिरीचे.. इथे कामाला आले.”
“वाव.. रत्नागिरी.. तुमचं घर आहे का?”
“हो आहे..”
“मला जायचं आहे एकदा.. म्हणजे आम्ही जातो पण काय हॉटेल वर.. असं घरात नाही राहिलो कधी तिकडे.”
“ओके.”
माया पुढे काहीच बोलत नाही मग समीरचा उत्साह संपतो..(मनात) चांगला प्रयत्न होता समीर.. लगे रहो…
समीर आता थोडा धीटपणे मायाकडे बघत असतो..
तेवढ्यात गाडी अडकत अडकत थांबते… समीर गाडी चालू करायचा प्रयत्न करतो पण होत नाही.. 
“काय झालं गाडीला?? अशी कशी बंद पडली??”
समीर गाडीच्या बाहेर येतो आणि काय प्रोब्लेम झाला ते बघायला लागतो.. तेवढ्यात माया सुगंधाला फोन करते..
“आई, मला उशीर होईल थोडा यायला.. मला आमचे समीर सर घरी सोडणार आहेत पण त्यांची गाडी बंद पडली आहे.. मी आता कॅब करून येईन कदाचित.. तुम्ही जेऊन घ्या..”
फोन ठेऊन ती समीर जवळ जाते..
“समीर मी कॅब बुक करू का?? खूप उशीर झाला आहे.. गॅरेज पण नसेल आत्ता चालू.. मी जाते घरी आता तुम्ही कसं सोडणार मला?”
“थांब काही गरज नाही.” बाजूला जाऊन कोणालातरी कॉल करतो आणि परत येतो..
“काय झालं. इथे कशाला थांबायचं आता?”
समीर इकडे तिकडे पाहतो.. “चल तिकडे बघ कॉफी शॉप आहे. मस्त कॉफी पिऊ.”
“मला घरी जायचं आहे..”
“अगं चल ग तुला मी सोडेन. घाबरु नकोस तू सेफ आहेस माझ्या बरोबर.” समीर मिश्किल हसतो.
दोघंही कॉफी शॉप मध्ये जातात.. कॉफी ऑर्डर करतात..
“माया एक विचारू का? म्हणजे तुला चालणार असेल तर!”
“ह्म्मम आता दुसरा काही ऑप्शन आहे का? विचार.”
“ तुला खरंच पाऊस आवडत नाही? म्हणजे किती छान असतो पाऊस.. त्याचा धरतीला पहिला स्पर्श, मातीत मिसळून उधळलेला सुगंध, अहाहा काय वेगळीच मजा असते.. सोबत गरमा गरम कॉफी, ही अशी(हातातलं मग दाखवून), कांदा भजी आणि आपलं पाहिलं प्रेम..” समीर हळूच एक चोरटी नजर मायाकडे टाकतो. मायाला ते समजत नाही.
“शी कांदा भजी ,कॉफी हे काय कधीही खाऊ शकतो. पाऊसच कशाला हवा.. आणि प्रेम मिळवायला पाऊस लागत नाही. ते असलं की आपोआप मिळतच.” माया फोन मध्ये काहीतरी करत बोलत होती.
(समीर स्वतःशी) माया तुला लवकरच पाऊसही आवडेल आणि मी सुद्धा.. 
तेवढ्यात समीरला फोन येतो..
“हो सेव्हन कॅफे जवळ या. मी तिथेच आहे बाहेर.” फोन ठेऊन ,” माया चल घरी सोडतो तुला..”
माया विचार करते की ह्याने गाडी दुरुस्त करून घेतली की काय.. पण तेवढ्यात त्यांचा समोर एक गाडी उभी राहते..
“दादा ही गाडी आणली.. कुठे जायचं आहे?”
“काका मी जाईन तुम्ही त्या बंद गाडीच बघा. दुरुस्तीला टाका आणि तुम्ही घरी जा.”
मायाला कळत नाही हे काय चाललं आहे. 
“ही कोणाची गाडी?”
“माझी.. मी आमच्या ड्रायव्हर काकांना फोन करून दुसरी गाडी बोलावून घेतली..”
“समीर तू नक्की कोण आहेस? सॉरी टू आस्क पण गाड्या, ड्रायव्हर म्हणजे तू खानदानी श्रीमंत आहेस का? मग तू ऑफिस मध्ये एक एम्प्लॉइ म्हणून काम करतो आहेस? का वेगळं काही कारण आहे?”
आता समीर गोंधळून जातो. “अगं ही गाडी माझ्या बाबांची आहे. माझी गाडी मला त्यांनीच गिफ्ट केली आहे.. का मी अशी महागडी गाडी घेऊ नये का? आम्ही लोन वर घेतली आहे..”
समीर वेळ मारून नेतो.. माया ला हे पटत नाही पण ती जास्त खोलात शिरत नाही कारण तिला घरी जायला उशीर होत असतो.. दोघंही गाडीत बसतात.
“माया अगं मी खरंच गाडीचे हफ्ते भरतो. माझ्या बाबांची कमाई आहे तेवढी की ते असं काही घेऊ शकतात पण मला जॉब करून माझ्या मेहनतीचं घ्यायला आवडतं.. तू गैरसमज करून घेऊ नकोस ह..”
समीरच्या बोलण्यावर तिला विश्वास ठेवावा अस वाटतं.. समीर गाडी सुरू करतो. थोडं अंतर जातात तर गाडीसमोर अचानक एक बाई येते. फाटकी साडी, पिंजलेले केस, हातात गाठोड.. समीर जोरात ब्रेक मारतो. गाडी थांबवून दोघं खाली उतरतात.. त्या बाईला लागलं नसतं पण ती वेड्यासारखं वागत असते.. समीर त्या बाईला धीर देतो. पाणी पाजून गाडीत बसवतो.
“समीर तू ह्या बाईंना गाडीत का घेतो आहेस? पोलिसांना कॉल कर.”
“माया नको. मी अश्या बऱ्याच जणी पाहिल्या आहेत त्याचं कोणीच भलं करत नाही. तू गाडीत बस मी तुला सोडतो आणि मग ह्यांना आश्रमात घेऊन जाणार आहे. तुला कॉर्नर ला सोडेन..”
समीर मायाला कॉर्नर ला सोडून जातो सुद्धा. मायाला समीर डिस्टर्ब असल्याचं जाणवतं. त्यामुळे ती जास्त काही विचारत नाही.
समीर त्या बाईंना आश्रमात घेऊन जातो. घरी आल्यावर नीताला सगळी माहिती देतो.. सगळं आवरून आपल्या खोलीत गेल्यावर त्याला आठवतं की मायाला त्याने घरापर्यंत न सोडता मधेच सोडलं. ती काय विचार करत असेल आपल्याबद्दल?? आधीच संशयी, त्यात मी तिच्याशी मस्करी म्हणून खोटं बोललो आहे, त्यात अजून ह्याची भर… माझं प्रेम कसं व्यक्त करु मी मायाजवळ??
……………………………………………………………………………..
माया घरी तिच्या खोलीत असते.. समीरच वागणं तिला अनपेक्षित असतं. त्या बाईला केलेली मदत, त्याचं आपुलकीने वागणं, ऑफिस मधल्या स्टाफ शी मिळून मिसळून वागणं ह्यामुळे आता मायाला त्याचं कौतुक वाटत असतं. त्यात त्याची कामाबद्दलची जिद्द, स्वतः कमावून वस्तू घेणं ह्या गोष्टींमुळे तर आपली हिरोईन हिरोला एकदम ग्रेट च समजायला लागली आहे..
स्वप्नातही आज मायाने परत समीरला पाहिले आहे..
आता समीर मायाला कसं सांगणार? माया ही हळू हळू समीर मध्ये गुंतत जाणार? का वेगळंच काही तरी घडणार?? 
क्रमशः
(मी पहिल्यांदा कथामालिका लिहीत आहे. कथा पूर्ण काल्पनिक आहे तरी चूकभूल माफ असावी. तुम्हाला ही कथा आवडली तर लाईक करा, कमेंट करा. नाही आवडली तरी कमेंट करा. तुमच्या कमेंट मुळे लिहायला हुरूप येतो)

© स्वराली सौरभ कर्वे

🎭 Series Post

View all