ओ मेरे राजकुमार भाग -१७

Sameer And Maya Finally Meet
समीर रडायला लागल्यावर कोणाला काहीच सुचत नाही. पण सुगंधा धीर करून बोलते, " समीरराव अहो माफ करा. आमची माया खूप बोलली. तुम्हाला बोलण्याची संधी पण नाही दिली तिने. तुम्ही रडू नका आपण सगळे मिळून मायाची समजूत घालू. जरा धीर धरा."
" समीर तुम्हाला खूप दुःख होतंय मी समजू शकतो पण मी आत्ता जे सांगतोयत्याचंवाईटवाटूनघेऊनका.कुठलीही गोष्ट लपवली की ती कधी ना कधी उघड होतेच. मायाला आधीच तुम्ही ही कल्पना द्यायला हवी होती. तुम्ही देशमुख आहात, श्रीमंत आहात मग ही लपवाछपवी कशासाठी?", सुरेश जरा स्पष्टच विचारतात.
" खरं सांगू का काका मला लपवायच काहीच कारण नव्हतं पण मायाचा गैरसमज झाला आणि तिची थोडी मस्करी करावी म्हणून मी हे सगळं केलं अर्थात ऑफिस मध्ये मी एक साधारण कर्मचारी म्हणूनच वावरतो. माझ्या ह्या मस्करी ला जोड म्हणजे ऑफिस मध्येही कोणी तिला काही बोललं नाही पण शेवटी मस्करी ह्या टोकाला जाईल असं वाटलं नाही. मला माया हळू हळू आवडायला लागली. तिची कामाची निष्ठा, पध्दतशीर काम मला आवडत होतं. माझं चुकलं मान्य आहे पण मी काही गैर नाही वागलो का आर्थिक, मानसिक फसवणूक केली. एक मस्करी केली फक्तं. मी माफीही मागितली पण एवढं का मनाला लावून घेते ती. सॉरी पण मी आता इथे नाही थांबू शकत. मॉम चल. काका काकू तुम्ही समजून घेतल्या बद्दल धन्यवाद. परत कोणाची मस्करी करणार नाही मी. माझीच मस्करी होऊन बसली आहे. मायाला सांगा मी परत तिला भेटणार नाही आणि माझं तोंड ही दिसणार नाही तिला. ती ऑफिस ला येऊ शकते बिनधास्त. मी कायमचा बेंगलोर ला जाणार आहे तसही मॉम तिथे आपल्या माणसाची गरज आहे तर कोणी दुसरं पाठवण्यापेक्षा मीच जाईन. तसही मला आता इथे थांबता नाही येणार. माझी शिक्षा मला मिळाली पण माझी साधी बाजू ऐकून नाही घेतली माया ने. काका sorry to say पण जसं खोटं बोलणं चूक आहे तसं समोरच्याच न ऐकून घेणं हे ही चांगलं नाही. पण माया माझं प्रेम आहे. ती कशीही वागली तरी मी तिला आपलंच मानतो. माझं ऐकून घेतलं असतं तर कदाचित आपण सगळे एका नात्यात बांधले गेलो असतो पण नाही! तिने माझं ऐकूनच घेतलं नाही ह्याचा अर्थ ती मला आपलं मानतच नाही किंवा एकदाही मी विश्वासू वाटलो नाही तिला. चला निघुया."
समीर बाहेर निघून जातो. सलील कधी नव्हे तो खूप गंभीर होतो . निता आणि सलील कसाबसा निरोप घेउन निघतात. गाडीत सगळे शांत असतात. कोपऱ्यावर गाडी वळतेच तर समीरला माया दिसते. दोघांची नजरानजर होते पण हया वेळेस समीर तोंड फिरवून घेतो.. माया तडक घरी जाते.
"गेले वाटतं. बरं झालं. उगाच कशाला यायचं ते पण स्वतःच्या आई बाबांना घेउन लाज कशी नाही वाटत? आई बाबांना तरी त्याचा खोटारडेपणा सहन करायला लावायचा नाही. शी!"
माया सुगंधा आणि सुरेश कडे पाहते पण दोघेही गप्पच असतात.
" काय बोलला मी गेल्यावर? मी चुकलो, माझी चूक झाली, मला असं नको करायला हवं होतं हेच ना.. का अजून काही?"
ह्या तिच्या प्रश्नावर दोघंही गप्पच असतात.
"मला आता रोज ह्या माणसाला ऑफिस मध्ये बघावं लागणार. त्यापेक्षा मी राजीनामा देते."
आता मात्र तिच्या बडबडीला सुगंधा कंटाळली.
" कशाला तुला चौकशा हव्या? तुझ्या बाजूने हा विषय संपला आहे ना? तसंही तुला नोकरी सोडायची गरज नाही. ते गेले कायमचे बेंगलोर ला. तुला त्यांचं तोंड बघायचं नाही ना? झालं ना तुझ्या मनासारखं? काय ग इतकं काय वाईट केलं त्यांनी? त्यांनी सांगितलं की चूक झाली पण गुन्हा नाही ना? इतका श्रीमंत माणूस त्याला काय कमी आहे? जर तुला आधीच माहित असतं की तो मालक आहे त्या कंपनी चा तर हे असं वागली असतीस का?"
"हो आई. कोणीही असो मी असंच वागले असते."
"मग ठीक. ह्या पुढे समीरचा विषय बंद. तु अजिबात बोलायचं नाही ह्या बद्दल पुढे आणि हो नोकरीचा राजीनामा देच आता. म्हणजे ते मोकळे होतील बिचारे. काय ते वडील आणि काय ती पोरगी. नको तिथे ह्यांची तत्व उफाळून येतात" सुगंधा बडबड करत आत जाते.
" माया , तु अगदीच चुकलीस असं मी नाही म्हणणार पण समीर मला सच्चा वाटला. हो त्याचं चुकलं जरूर पण तो वाईट नाही. इतकं समजणं पुरेसं असतं. तत्वांना मुरड घालणं मलाही नाही पटत पण काही कारणामुळे त्यांना नाही सांगता आलं तुला म्हणून सरसकट वाईट नाहीत ना ते! तु एकदा विचार करून बघायला हवा होतास. तुला आयुष्यात लग्न करशील तेव्हा चांगली मुलं भेटतील पण असा लाखात एक मिळेल का? हे माहीत नाही. असो निर्णय तुझा आहे त्यात मी मधे पडणार नाही." सुरेश सुद्धा असं बोलून आपल्या खोलीत निघून जातात. आता मात्र माया ला काय करू, बोलू सुचत नव्हतं. आपण चुकलो की बरोबर ह्या विचारात अडकून बराच वेळ ती बाहेरच बसते. तीन चार दिवसांनी ऑफिस मध्ये राजीनामा द्यायचा हा विचार पक्का करून जाते. ऑफिस नेहमी प्रमाणे चालू असतं.. आता राजीनामा द्यायचा म्हणजे समीर किंवा सलील ह्यांचा केबिन मध्ये जावे लागणार हे नक्की. हळूच समोर ती समीर च्या केबिन कडे बघते तर केबिन रिकामी असते मग तिला आठवतं की समीर बंगलोर ला गेला आहे. शेवटी ती रिसेप्शनिस्ट कडे राजीनामा ठेवते आणि सरांना द्यायला सांगून तिथून निघते. आपल्याच विचारात असताना खाली येऊन थांबते. रिक्षा साठी इकडे तिकडे पाहणार तेवढ्यात तिच्या समोर मर्सिडीज येऊन थांबते. त्यातून समीर उतरतो. हातात भरपूर फुलं असलेला गुच्छ असतो. एक मिनिट सुद्धा न दवडता मायाच्या समोर जाऊन उभा राहतो.
"माया, मला माफ कर. तुला त्रास द्यायचा नव्हता पण मी हे लपवलं कारण कदाचित तू माझ्या मोठ्या स्टेटस मुळे नकार दिलास मला तर? हा विचार मी करत होतो आणि त्यातून हे सगळं घडलं. पण तू मला हळू हळू उमगत गेलीस आणि मला खात्री पटली की मी खरं सांगितलं तरी तू मला हो म्हणशील पण माझ्या बाबांनी सगळी वाटच लावली. मला बोलायची एकही संधी तू दिली नाहीस म्हणून हे आता मी असं सगळं करतोय. तुझा स्वप्नातला राजकुमार म्हणून नाही पण समीर म्हणून मला स्विकारशील? काय म्हणजे आत्ता इथे बाग नाही आणू शकत मी पण ही फुलं घे आणि हो एक मिनिट ते मी….. मी तुझी हनुवटी पकडू का म्हणजे चालेल का तुला? ते तुझ्या स्वप्नात येतं ना…तसं…"
माया दोन मिनिटं शांत त्याचा कडे बघते आणि आता मात्र तिला हसू आवरत नाही. पटकन त्याला मिठी मारून दोघांमधलं अंतर संपवून टाकते. वरून ऑफिस मधून सलील, नीता, सुगंधा आणि सुरेश पाहत असतात. वर अचानक ढग भरून येतात आणि सरी कोसळायला लागतात. आज मायाला पाऊस आवडत असतो कारण तिच्या स्वप्नातला राजकुमार तिच्या बरोबर असतो.

कथा समाप्त!

© स्वराली सौरभ कर्वे

🎭 Series Post

View all