( मागच्या भागात आपण बघितले – अक्षताच लग्न ठरत आता पुढे ......)
अक्षता च आदित्य बरोबर लग्न ठरत, आदित्य अक्षता ला बोलतो आपण दोघे बाहेर भेटून एकमेकांना जाणून घेवूया ती हो बोलते. ठरल्याप्रमाणे दोघे एक दिवसासाठी माथेरानला फिरायला जातात. आदित्य चा स्वभाव खूप दिलखुलास, जॉली, काळजी करणारा अशा स्वभावाचा तो असतो, सारखं मस्करी करणे अक्षता ला हसवणे हे त्याच चालूच असत. अक्षता खूप खुश असते.
रात्री आठ वाजेपर्यंत दोघे परत येतात. आदित्य अक्षता ला तिच्या घरी सोडायला येतो. तिची आई त्याला जेवूनच जा असा आग्रह करते आणि तो थांबायला तयार होतो. आदित्य अगदी आस्थेने तिच्या दोन बहिणींची चौकशी करतो , आई - बाबांशी अगदी मुलाप्रमाणे वागतो, घरात पहिल्यापासूनच वावरतोय असा वागत असतो अगदी. सर्वाना त्याचा स्वभाव खूप आवडतो..... आई तर अगदी देवाचे आभार मानते कि देवा तुझ्या कृपेने माझ्या मुलीच्या नशिबात उशिरा का होईना पण सुख आलं आहे असं बोलून देवाच्या पाया पडते.
दहा दिवसांनी साखरपुडा असतो, घरात लगबग सुरु होते. साखरपुडा अक्षता च्या घरी असतो...दोन दिवस अक्षता सुट्टी घेते आणि मग घरातल्या सगळ्यांसाठी खरेदी केली जाते. बघता बघता साखरपुड्याचा दिवस उजाडतो... आदित्यकडची मंडळी पाच वाजता घरी येतात. अक्षता खूप सुंदर दिसत असते. साखरपुडा खूप छान पद्धतीने पार पडतो.
पुढच्या महिन्यात लग्न असत त्याची तयारी सुरु होते. लग्नाला आठवडा राहिला असताना अक्षता सुट्टी घेते, हळद लावली जाते, मेहंदी चा प्रोग्राम होतो. लग्नाचा दिवस उजाडतो, अक्षता हॉलवर जाताना आई – बाबांना मिठी मारून खूप रडते. सर्व हॉल वर पोचतात. नवग्रह, कन्यादान होत. लग्न अगदी छान पार पडत. अक्षता – आदित्य दोघे हि छान दिसत असतात. अक्षता सुर्वे ची आता सौ. अक्षता आदित्य जोशी होते.
संध्याकाळी अक्षता ची पाठवणी ची वेळ होते. बहिणी, आई – बाबा तिला मिठी मारून रडत असतात. आदित्य त्यांना बोलतो अहो तुम्ही म्हणाल तेव्हा अक्षता तुम्हाला भेटायला येत जाईल, एक तासाच्या अंतरावर च घर आहे. तिची काही काळजी करू नका. अक्षता ची पाठवणी केली जाते. अक्षताचा नवीन घरात गृहप्रवेश होतो.
आदित्य अक्षता चा नावं आदिती ठेवतो. आदित्य ची आदिती अस तो बोलल्यावर सगळे हसतात. सगळ्यांना नावं खूप आवडत. अक्षता ला पण नावं आवडत. सासू आणि नणंद बोलतात आम्हीं आदितीच बोलणार हा तुला आजपासून , अक्षता लाजते. दुसर्या दिवशी पूजा होते, हळद उतरणी होते त्या नंतर नवीन जोडपं चार दिवसांसाठी महाबळेश्वर ला फिरून येत.
अक्षता च्या नवीन संसाराला सुरवात होते. सासू खूप च प्रेमळ असते, ती सकाळी शाळेत जाण्याआधी अक्षता ला तिघांचे टिफिन करायला मदत करत असे. अक्षता आणि आदित्य एकत्रच नऊ वाजता निघत असत. तिची सासू शाळेत नोकरीला असल्यामुळे सकाळी सात वाजता घरातून निघत असे. त्या नंतर अक्षता घरची सर्व कामे वैगेरे आवरून आदित्य बरोबर ऑफिस ला जायला निघत असे.
अक्षता – आदित्य चा संसार अगदी सुंदर चाललेला असतो, अशीच तीन वर्ष निघून जातात आणि अक्षता ला बाळाची चाहूल लागते. घरातले सर्व खूप खुश होतात.
( पुढच्या भागात आपण बघणार आहोत – अक्षताच्या बाळाच्या येण्याने घरी आलेला आनंद.....)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा