ज्ञानु

हा लेख मी माझ्या भावासारख्या मित्राविषयी लिहिला आहे.

*ज्ञानु* 
     महाराजा सयाजीराव गायकवाड महाविदयालयात बी.ए मराठी च्या दुसरया वर्षात शिकत असताना माझी एका मुलाशी ओळख झाली.त्याचे नाव होते ज्ञानेश्वर शंकर पवार.मी त्याला लाडाने ज्ञानु म्हणायचो.ज्ञानु हा माझा बी.ए च्या दितीय वर्षातला खुप जवळचा अणि जिवलग मित्र.तो राहायला मुळचा दहिवाळ हया गावचा.त्याची घरची आर्थिक परिस्थिती गरिबीची.पण त्याच्या मनात शिकण्याची खुप आवड होती.त्यामुळे तो सर्व परिस्थितीवर मात करुन शिक्षण करत होता.ज्ञानुचे राहणीमान हे एकदम साधे होते.तो इतर मुलांप्रमाणे खुप हायफाय नाही राहायचा.तो एक साधी राहणीमान अणि उच्च विचारसरणी बाळगणारा व्यक्ती होता.अणि तो माझ्याशी अहिराणी मध्येच बोलायचा त्यामुळे त्याच्यासोबत बोलुन,त्याच्यासोबत राहुन,माझे पण अहिराणी चांगले पक्के होऊन गेले होते.ज्ञानेश्वर हा शिकायला माझ्या वर्गातच होता.त्याचा पण मराठी हाच विषय स्पेशल होता.तेव्हा आम्हाला शिकवायला प्राध्यापक गजानन भामरे अणि प्राध्यापक विनोद गोरवाडकर हे होते.तेव्हा आम्ही वर्गात तीन जणच नियमित वर्गात तासिकेला असायचो मी,ज्ञानु,अणि अजून एक मुलगा होता त्याचे नाव समाधान शिंपी असे होते.जो तेव्हा एक कवी म्हणुन महाराजा सयाजीराव गायकवाड महाविदयालयात प्रसिदध होता.अणि तो ही माझा चांगलाच मित्र होता.पण तेव्हा वर्गात ज्ञानु हा माझा अत्यंत जवळचा अणि जिवलग मित्र होता.
      बी.ए च्या दुसरया वर्षात शिकत असताना आम्हाला एस वन हया विषयाला शिकवायला प्राध्यापक गजानन भामरे हे होते.तेव्हा एस वन हया विषयाला आम्हाला नाटक अणि कादंबरी होती.नटसम्राट हे वि.वा शिरवाडकरांचे नाटक तेव्हा आम्हाला सुरुवातीला अभ्यासक्रमात होते.ज्ञानुला नटसम्राट नाटक खुप आवडायचे.अणि मलाही.म्हणुन कधी कधी तो प्राध्यापक विनोद गोरवाडकर यांनाच शिरवाडकर म्हणायचा.तेव्हा प्राध्यापक विनोद गोरवाडकर त्याला प्रेमाने सांगायचे.बाळ मी शिरवाडकर नाही रे.मी विनोद गोरवाडकर आहे.तेव्हा मी त्याला विचारायचो का रे तु प्राध्यापक विनोद गोरवाडकर यांना शिरवाडकर का म्हणतो?तेव्हा तो मला म्हणायचा.अरे प्राध्यापक गजानन भामरे आपल्याला ते नटसम्राट नाटक शिकवता त्याचे लेखक वि.वा शिरवाडकर आहे.तेच नाव माझ्या तोंडात राहुन जाते.म्हणुन कधी कधी मी त्यांनाच शिरवाडकर बोलुन बसतो.
    ज्ञानुला नटसम्राट नाटक एवढे आवडायचे की त्याचे पुर्ण कथानक त्याच्या तोंडपाठ झाले होते.कोणत्याही क्षणी त्याची परिक्षा घेतली तरी तो त्या परिक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळवेल इतके ते नाटक त्याच्या तोंडपाठ झाले होते.तो मला नाटकाचे पुर्ण कथानक तोंडी सांगुन दयायचा.इतके ते नाटक त्याला आवडायचे.अणि नटसम्राट नाटक मलाही खुपच आवडायचे.त्यामुळे त्या नाटकाचा विषय जरी निघाला तर त्याच्यावर आमची खुप चर्चा चालायची.नाटकाचा विषय,आशय काय आहे?.त्यात लेखकाने काय सांगितले आहे?.त्या नाटकातुन कोणत्या गोष्टीवर प्रकाश टाकण्यात आला आहे?.हया सर्व गोष्टींवर आमची खुप चर्चा चालायची.
     अशाप्रकारे आमचे महाविदयालयाचे दिवस खुप आनंदात अणि मजेत पार पडत होते.पण अचानक ज्ञानुने महाविदयालयात नियमित येणे बंदच करुन टाकले.अणि ज्ञानु हा तेव्हा मोबाईल पण वापरायचा नाही.त्यामुळे मला त्याच्याशी संपर्क साधायला पण काही मार्ग नव्हता.की तो महाविदयालयात का येत नाहीये?असे काय झाले की त्याने अचानक महाविदयालयात येणेच अचानक बंद करून टाकले.अणि मग एक दोन हप्त्यांनी अचानक एकेदिवशी तासिकेला ज्ञानु आला.माझ्या मनात खुपच प्रश्न होते की एवढी अभ्यासाची आवड असणारा माझा मित्र अचानक महाविदयालयाला दांडया का मारु राहिला?तासिकेला का येत नाहीये? काय झाले तरी काय असेल? त्याच्या घरी तर काही समस्या नसेल ना? किंवा तो आजारी वगैरे तर पडला नसेल ना?काय झाले तरी काय असेल?हाच प्रश्न सारखा माझ्या मनात घोळत होता.
    त्यामुळे तो तासिकेला आला त्यादिवशी माझे तासिकेलाही मन लागले नाही.कधी एकदा बाहेर जातो अणि त्याला विचारतो की नेमके झाले तरी काय?की त्याने अचानक महाविदयालयात तासिकेला येणेच बंद केले?.हाच विचार मनात चालू होता.म्हणुन त्यादिवशी माझे तासिकेतही अजिबात मन लागले नाही.मग तासिका संपल्यानंतर जेव्हा आम्ही बाहेर निघालो मी त्याच्यावर प्रश्नांचा भडिमारच सुरू केला.कुठे होतास इतके दिवस?महाविदयालयात का येत नव्हता?काय झाले तरी काय?असा प्रश्नांचा भडिमारच मी सुरू केला.
    मग ज्ञानु मला सांगायला लागला अरे योग्या रोज महाविदयालयात नियमित तासिकेला यायला माझ्याकडे बसचे भाडे भरायला पैसे नसता रे.मलाही वाटते नियमित महाविदयालयात तासिकेला यावे.पण पैसे नसतात त्यामुळे नाइलाज असतो माझा.मला त्याची ही व्यथा ऐकुन खुप वाईट वाटले.ज्ञानु हा खुप हुशार मुलगा होता.पण परिस्थितीमुळे तो नियमित तासिकेला येऊ नाही शकायचा.अणि कधी कधी त्याचे कपडे पण फाटकेच घातलेले मला दिसायचे.मला त्याच्याकडे पाहिल्यावर खुपच वाईट वाटायचे.त्याची खुप कीव पण यायची मला.अणि त्याच्या पाहिलेल्या हया परिस्थितीतुन मला हे पण शिकायला मिळाले की परिस्थिती,गरीबी माणसाला किती मनाविरुदध वागायला लावत असते.किती लाचार करते.
       अशाप्रकारे ज्ञानु हा महाविदयालयात तासिकेला कधी एक महिन्यातुन तर कधी हप्त्यातुन एकदा असा अधुनमधुन यायचा.मग एकेदिवशी मीच त्याला बोललो की ज्ञानु असे किती दिवस चालायचे.अणि अशा पदधतीने शिक्षण करशील तर पदवी तर तुला मिळुन जाईल.पण आपल्या साहित्य क्षेत्राचे ज्ञान कुठुन मिळणार तुला?असा तर तु फक्त नावाला पदवी मिळवशील आपल्या क्षेत्राचे ज्ञान तुला कसे मिळणार?त्यावर ज्ञानु मला म्हणाला तू म्हणतो ते एकदम बरोबर आहे योग्या.पण काय करणार नाइलाज आहे माझा.त्यामुळे मी फक्त एवढ वर्ष करणार आहे.त्यानंतर मी महाविदयालय सोडतो आहे.अणि मग त्यानंतर बी.ए च्या दुसरया वर्षाच्या परिक्षा झाल्यानंतर त्याने महाविदयालय सोडुन दिले.अणि त्यानंतर त्याची अणि माझी कधी भेट सुदधा झाली नाही.
        मग एकेदिवशी मी एम ए च्या पहिल्या वर्षात शिकत असताना मोची काँर्नरजवळुन घरी जात असताना एक मुलगा मला दुरून हात देताना दिसला.मला काही ओळखु आले नाही की तो कोण आहे?मी पुन्हा माझा माझा चालायला लागलो.मग तो स्वता माझ्या जवळ आल्यावर पाहतो तर काय?तो ज्ञानु होता.मग तो मला बोलायला लागला काय योग्या मी तुला एवढा हात देतो आहे.तरी तु पुढे चालू राहिला.मग मी म्हणालो मी ओळखल नाही रे ज्ञानु तुला.मग मी त्याला विचारले की तु इकडे कसा? मग तो सांगायला लागला मार्केट मध्ये आलो होतो थोडे काम होते.त्याचबरोबर एका दवाखान्याचा पत्ता पण शोधतो आहे मी पण सापडत नाहीये.
   मग तो म्हणायला लागला पण योग्या तु मला विसरला यार. मग मी म्हणालो असे का म्हणतो आहे?मग तो म्हणायला लागला मी एवढा तुला हात देत होतो तरी तु मला ओळखल नाही.मग मी म्हणालो माफ कर मी थोडा माझ्या माझ्या विचारात होतो.म्हणुन लक्ष नाही गेले.अणि शिवाय दोन वर्ष झाले आपली भेट पण नाही त्यामुळे थोडासा विसर पडणे हे साहजिकच आहे.
    मग तो म्हणाला तु विसरला असशील मी नाही विसरलो.तु शंभर जणांमध्ये उभा राहिला तरी मी तुला दुरून ओळखुन घेईल की हा माझा भाऊ योग्या आहे.अणि तो मला म्हणाला की मी ज्याला माझ्या मनात जागा दिली त्याला कधीच विसरत नाही.अणि तु तर भाऊ आहे माझा तुला कसा विसरेल मी?
        असा होता माझा मित्र ज्ञानु.हुशार,मेहनती,चाणाक्ष बुदधीचा.पण परिस्थितीमुळे त्याला शिक्षण अर्धवटच सोडावे लागले.मला नेहमी भावाचा दर्जा देणारा.सख्या भावाप्रमाणे माझ्याशी सर्व सुख-दुख वाटुन घेणारा.माझा महाराजा सयाजीराव गायकवाड महाविदयालयातील एक अत्यंत जुना अणि जिवलग मित्र जो माझा मित्र कमी अणि भाऊच जास्त होता.