नव्याने सुरुवात करू भाग 2
©️®️शिल्पा सुतार
.........
.........
त्यांच पूर्वी एकत्र कुटुंब होत. घरात सासू, सासरे, नणंद होती. दोन मुल झाल्यावर नणंदेच लग्न झाल. तो पर्यंत या माय लेकीने मला किती त्रास दिला. प्रत्येक गोष्टीत नुसत आपल हे अस हव, तस हव. एक गोष्ट कधी मनाप्रमाणे करू दिली नाही. आता दोन वर्षा पुर्वी सासू सासरे वारले. नणंद परदेशात आहे. ती काही दर वर्षी येत नाही.
या लोकांच करत करत माझ पूर्ण तारुण्य निघून गेल. राजेश नेहमी आई बाबांच्या कलाने घ्यायचे. मी म्हणजे कोणी नाही. ते जे म्हणतील ते ऐकायच सांगतील तसच करायच. नाहीतर सगळे मिळून माझ्या वर हल्ला करायचे. खूप बोलायचे. मी कायम घाबरून असायची.
प्रेम, एकमेकांची ओढ, सुंदर भावना अश्या काही नाही. सगळ आपल निभावून न्यायच. मनातल्या इच्छा मनात राहिल्या. काय करणार.
आता बाकी कोणी नाही तर राजेश ही अस करायला लागले होते . प्रत्येक गोष्टीत रोकटोक. तिला कंटाळा आला होता . मला कधी कोणी समजून घेणार नाही का?
जावू दे. आता ठरवल ना त्रास करून घ्यायचा नाही. कोणी काहीही बोललं तरी मी माझी मस्त राहणार.
तिने पाव भाजी केली. मुल खुश होते. सगळे जेवायला बसले.
"आई खूप छान झाली पाव भाजी." श्रेया, आशिष खुश होते. दोघ बोलत होते.
राजेश गुपचूप जेवत होते.
"काय झालं बाबा तुम्हाला नाही आवडली का पाव भाजी? आवडली असेल तर कधी तरी बोलायला हरकत नाही की छान झाली आहे अस. आईला बर वाटेल." श्रेया बोलली.
" पाव खाल्ल्याने मला त्रास होतो हे माहिती आहे रमाला. तरी तुम्ही लोक पावभाजी करतात. " त्यांची बडबड सुरू होती.
रमाचा मूड गेला. तिने रागाने हॉट पाॅट त्यांच्या समोर ठेवला. त्यात गरम गरम मुगाची खिचडी होती.
तो ओशाळला.
" मला वाटल दुसरा वाढा घ्याल म्हणून आधी वाढली नाही." रमा बोलली.
" बाबा घ्या आता. तुम्ही आजकाल खूप चिडचिड करतात. आईला लक्ष्यात असत तुम्हाला काय हव ते." श्रेया बोलली.
"जावू दे श्रेया आजच आहे का हे? चांगल्या शब्दात बोलण माहिती आहे का या लोकांना. गोड बोलून काम होतात. पण नाही. जो पर्यंत दोन चार वाकडे वाक्य बोलणार नाही तो पर्यंत याना जेवण पचणार नाही. आज नाही पूर्वी पासून हेच आहे. दुसर्याच मन कधी जाणलं यांनी." रमा नेहमी प्रमाणे चिडली होती. पूर्वीच काढत होती.
राजेश गप्प होते.
" आई पुरे आता. शांत हो. " श्रेया परत मधे बोलली.
रमा छान जेवली. आता हल्ली ती कोणती गोष्ट मनाला लावून घेत नव्हती. आता या पुढे आनंदात रहायच. तिने ठरवल.
ती पूर्वी खूप त्रास करून घेत होती . पण या लोकांना काही फरक पडत नाही. उलट तिची तब्येत खराब होत होती.
तरी तिला समजत नव्हत. चान्स मिळाली की राजेशला खूप बोलून घेत होती. ती तीच कर्तव्य करत होती. त्यांची काळजी घेत होती. पण काही ऐकुन घेत नव्हती.
त्यामुळे त्यांच्यात नेहमी वाद होत असत . त्याचा तिला त्रास व्हायचा. पण दोघ शांततेत घेत नव्हते. तेच त्यांना समजत नव्हत.
तिने जेवण झाल्यावर सगळं आवरल. जरा वेळ ती मुलांशी बोलत बसली. थोड्या वेळाने रूम मधे आली.
राजेश तिच्या कडे बघत होते. "रमा इकडे ये. तू ती सिरियल नको बघत जावू."
" का काय प्रॉब्लेम आहे?" ती तयार होती या प्रश्नासाठी.
"पुस्तक वाच त्या पेक्षा."
"वाचते मी. दुपारी वाचन करते."
" रात्री पण वाचन करायच. टीव्ही वर बातम्या बघत जा. त्या सिरियल मधे काहीही दाखवता. मग तू तस शिकते माझ्याशी भांडते. " राजेश मोठ्याने बोलत होते.
" काहीही. तुम्ही ना गैरसमज करून घेतला आहे. सगळे सीन असे नसतात आणि मला करमणुकीला दुसर साधन नाही. काय करणार? मी तुमच ऐकणार नाही. मी टीव्ही बघणार. " रमा हट्टाला पेटली.
" अग त्या वेळी स्वयंपाक करत जा. "
" होतो माझा लगेच. काय वेळ लागतो. " रमा बोलली.
" तुझा का हट्ट आहे सिरियल बघायला मला समजत नाही."
" कारण घरात बाकीच्यांना माझ्या साठी वेळ नाही. मग मी माझ माझ रुटीन ठरवल आहे. मला छान वाटत. मला माझ माझ राहू द्या .उगीच हे कर ते कर करू नका. नेहमी मी जे करते त्याच्या वेगळ तुम्ही सांगता . फक्त मी केल ते बदलायच असत तुम्हाला. तुमच ते बरोबर माझ ते चुकीच. दोन शब्द कधी प्रेमाचे मिळत नाही या माणसा कडून. "
" रमा अग अस नाही. मी काय म्हणतो आहे. "
" काही बोलू नका तुमच्याशी बोलल की चिडचिड होते माझी. " तिने झोपून घेतल.
रमाशी बोलण्यात काही अर्थ नाही. चांगल्या गोष्टी हिला समजत नाही. राजेश ही झोपले.