नवऱ्याची काय जबाबदारी

Nvryachi Jbabdari

 नवऱ्याची काय जबाबदारी!! 


फोन वर नेहमीप्रमाणे प्रगतीचा आवाज ऐकून बाबा सुन्न झाले..

हॅलो, प्रगती तू काही एक काळजी करू नकोस मी तुझा बाप आहे खंबीर तुझ्यासाठी अजून ही, मी देत जाईल तुला हवे तितके पैसे, मला मागत जा तू ..


नाही बाबा,पण ही तर त्यांची जबाबदारी आहे ना, आता माझा खर्च, माझ्या गरजा त्यांनी उचलायला हव्यात..तुम्ही का द्यावेत पैसे माझ्या खर्चाला..ह्यामुळे आता ते मला पैसे ही देत नाहीत..


अग नको देऊ दे,मी करेन तुला पाहिजे तो खर्च, तुझा बाप असताना कशाला त्याच्या पुढे लाचार होतेस...तसे ही तू मला काही जड नाही आणि नव्हतीस..


बाबा त्यांची आता एक सवय लक्षात येते माझ्या, जेव्हा कधी ही मला काही घ्यायचे असेल तर,ते मुद्दाम म्हणतात माझे पैसे संपले आहेत,पगार झाला नाही...म्हणजे मी पुन्हा मागायचे नाही..
आणि ते मिळाले नाही तर शेवटी ते तुम्ही घेऊनच देणार हे कळले आहे..म्हणजे मी जरा ही रडले, उदास झाले ते तुम्हाला सहाजीकच आहे बघवत नाही..आणि मग तुम्ही ते मला घेऊन देत जातात..त्यामुळे ते मला मुद्दाम पैसे देत नसावेत..


अग खरे तर तू त्याच्या कडून तुझ्या महिन्याच्या खर्चासाठी घ्यायला हवे,पण तुला ते जमत नाही..आणि मग तो देत नाही म्हणून आईकडे सहज बोलून गेलीस तरी आई मात्र तुझे हाल होत आहेत,तुझी कुचंबणा होत आहे,आणि तिला घर खर्चाला त्याच्या पुढे हात पसरावे लागत आहे म्हणून माझ्याकडे तुला लागेल ते देण्याचा हट्ट करते...खरे तर मला तुला पैसे द्यायला हरकत वाटत नाही..पण शेवटी किती दिवस असे तू सहन करणार आहेस...एकदा त्याला ह्या विषयावर स्पष्ट पणे बोलायला हवे...आणि ते तूच बोलायला शिकले पाहिजेच.. कारण त्याला मोठी नौकरी तर आहेच, त्यात तुझा खर्च तू निभावून घेत आहेस..तुझा पगार थोडा का असेना..पण घर खर्चासाठी त्याने तुला पैसे हे दिलेच पाहिजे..तुला जर वाटले काही तुला घ्यायचे आहे तर तो ही खर्च त्याने नवरा म्हणून करायला हवा...पण त्यात आई बाबा म्हणून आम्ही तुमच्या मधात पडणे योग्य नाही..तुला तुझ्यासाठी आता स्टॅण्ड घ्यायला हवा..

प्रगतीचा नवरा मोठा अधिकारी होता,पण सासर कडून न मागता मिळत आहे म्हंटल्यावर त्यांचे प्रगीतसोबत वागणे बदलले होते, त्याने घर खर्चात हात जणू काढूनच घेतला होता...कारण सोपे होते..बायको रडली तर सासरे एक वडील म्हणून तिला दर महिन्याला पैसे पोहचते करत होते..त्यांच्या किरण्यात ह्याचे ही घर चालत होते...आई वडिलांचे प्रेम आहे आणि त्यांनी लेकीला दिले तर कुठे गैर आहे..असे म्हणून म्हणून त्याला घेण्याची, मागण्याची सवय लागली होती..आपला सासरच्या संपत्तीवर हक्कच असणार आहे मग त्या हक्काने उसने पैसे घेणे चालू झाले,पण घेतलेले पैसे मात्र परत केले जात नव्हते...प्रकरण खूप गंभीर होत चालले होते...त्याचा पगार कुठे जातो ह्याचे ही गणित तिला बायको म्हणून कळायला हवे होते पण तो सांगत नसत...उसने पैसे परत देण्यावरून ही वाद होऊ लागले होते..त्यात आपल्या लेकींच्या संसारात वाद नको म्हणून ते ही तोंड दाबून सगळे सहन करत होते...

म्हणून जरी लेकीचा हक्क असला तरी ,जाव्याच्या हक्क नसतो..त्याने उठसुठ सासरी येऊन सासऱ्याच्या पैस्यावर हक्क न दाखवत व्यवहार पूर्ण नाते जपावे...आणि बायकोला आपले कर्तव्य आणि जबाबदारी समजावे... ती अजून ही माहेरची जबाबदारी समजून चालणारे जावई फुकटे होऊन रहातात...फुकट मिळते म्हणून कायम घेतच रहातात..

प्रगतीने ठरवले होते बाबांकडून आपल्या नवऱ्याने घेतलेले पैसे परत दिल्याशिवाय बाबांकडून कोणत्या ही प्रकारची मदत मी घेणार नाही आणि यांना ही घेऊ देणार नाही...जोपर्यंत नवरा पैसे परत करत नाही तोपर्यंत ती बाबांच्या घरची पायरी ही चढणार नाही..

त्याच्या बाबांच्या कानावर ही गोष्ट जाताच त्यांचा स्वाभिमान दुखावला गेला, आम्ही असे संस्कार दिले नव्हते की सुने समोर मान खाली घालावी लागेल...मुलाले कर्तव्य निभावणे गरजेचे होते पण अजून ही सुनेला वडिलांची मदत घ्यावी लागत होती ह्या अधिकारी नवऱ्याचा संसार चालवायला ही शरमेची बाब होती...

त्याच्या बाबांना तर वाईट वाटले ,परंतु आईला ही आपल्या मुलाची लाज वाटली, सोबत त्यांचे जावई आले होते, त्यांना आपल्या मेव्हणे असे कर्तबगार समजत होतो ते असे अवलीय आहे हे आज कळले...बहिणीला ही अपमान वाटला... दादाबद्दल किती काय काय कौतुक करून सासरी सांगत होती ते आज प्रत्यक्षात पाहिले, म्हणजे सासरी कोणापुढे ही बोलण्याची सोय उरली नव्हती...


ह्या झाल्या प्रकाराने जावई ही स्वतःला गुन्हेगार समजू लागला होता,त्याने प्रगतीची माफी मागितली आणि आजचे आज सर्व उसने घेतलेले पैसे परत केले...