No. 309

ही एक रहस्यकथा आहे. मला रहस्यकथा जमत नाहीत. त्यामुळे चुकभुल माफ.
#No. 309

( श्रेणी : रहस्यकथा )

" माझ्या कथेचा शेवटचा पार्ट लिहिशील ?"

आपल्या आवडत्या लेखकाचा म्हणजे पार्थचा असा मेसेज आल्यावर तेजश्रीला अवघे आसमंत ठेंगणे झाले. हर्षाच्या भरात तिला काय बोलावे ते सुचेना.

" पण मी लिहू शकेल ?" तेजश्रीने प्रतिप्रश्न केला.

" हो. मी सांगेल तुला कस लिहायचे. पण प्लिज लवकर लिही. माझ्याकडे वेळ खूप कमी आहे. " तिकडून मेसेज आला.

" ठिके. माझ्या काही अटी आहेत. मला तुम्हाला भेटायचे आहे. तुमचे खरे नाव जाणून घ्यायचे आहे. "

" डन. "

" बर माझी एवढी कविता दुरुस्त करून द्या. "

" सॉरी. पण मी नाही करू शकत. तुम्ही स्वतःच स्वतःची कविता दुरुस्त करा. दरवेळी मी नसेल. मी तुम्हाला नियम आधीच सांगितले आहेत. "

" सर , अस का बोलताय ? कुठे जाणारे तुम्ही ?"

" काही प्रवास गूढ राहिले तरच चांगले असतात. तुम्ही प्लिज माझ्या "सजन घर जाना है" कथेचा शेवटचा पार्ट लिहा. "

" हम्म. काय लिहू त्यात ?"

" रमामाधव यांचा विवाह दाखवा. रौनक "सजन घर जाना है " पुस्तक भारतात प्रकाशित करतो दाखवा. आणि "

" आणि ?"

" आणि जगाला पुस्तकाच्या माध्यमातून यशारोहीचे खरे प्रेम समजते हे दाखवा. शेवटचा सिनमध्ये यश आणि आरोही एकमेकांच्या मिठीत प्राण सोडतात तेदेखील दाखवा."

" सर , प्लिज. कथेत दोघांना नका मारू. आपण नातवंडे पण दाखवू शकतो. "

" प्रत्येक कथेचे नशीब असते. या कथेचा प्रवास इथपर्यंतच होता. "

" रमामाधव यांचा एक हॉट सिन दाखवू का ?"

" नको. या नावाला इतिहासात वेगळे स्थान आहे. लेखकांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे "रमा" हे नाव जपले आहे. त्यामुळे फक्त निरागस प्रेम दाखवा. "

" ठिके. पण तुम्ही कधी भेटणार ?"

" सात दिवसांनी. औरंगाबादमध्ये. एशियन हॉस्पिटलमध्ये. रूम नंबर 309. दुपारी 4 वाजता. "

" ओह. थँक्स. सर एक विचारू राग नाही येणार तर ?"

" हम्म. "

" तुम्ही नेहमी सामाजिक कथाच का लिहितात ?"

" तुम्ही नेहमी प्रेमकथाच का लिहितात ?"

" हम्म. मी लिहिते. पण सर हॉस्पिटल का ?"

" मी तिथे काम करतो. "

" तुम्ही तर इंजिनिअर आहात ना. डॉक्टर कसे झालात ?"

" मी इथे बसून लेखनाचे काम करतो म्हणून. "

" हम्म. "

तेजश्री पार्ट लिहायला घेते. खूप रात्र झाल्यामुळे ती तशीच झोपी जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी नऊला तिला जाग येते. ती नोटपॅडवर बघते तर पूर्ण कथा लिहून झालेली असते. तिला रात्री पडलेले एक स्वप्नदेखील आठवते. ती लगेच प्रतिलिपी उघडते.

" सर , काल रात्री एक चमत्कार घडला. माझ्या स्वप्नात वरुण धवन आला. अगदी तुमच्या डीपीत आहे तसा. मला पूर्ण कथा ऐकवून गेला. मी लिहीत गेले. "

" हम्म. कथा पूर्ण झाली ?"

" हो. मी पाठवते. "

" मी सध्या बिझी आहे. तुम्हाला लॉगिन आयडी पासवर्ड देतो. तुम्ही पोस्ट करा. "

" नको सर. "

" प्लिज. इतकीच शेवटची मदत करा. "

" ठिके. पण मला तुमच्यासारखी कविता लिहायला शिकवा. "

" पार्थसारखी कविता लिहू नका. तेजश्रीसारखी कविता लिहा. तुमच्या साहित्यात तुमचे विचार हवेत. त्यात तुम्ही दिसायला हवे. तुमची झलक हवी. "

" पण सर , मला शब्दच सुचत नाहीत. "

" भावना सुचल्या की शब्दही आपोआप सुचतात. "

" हम्म. बर सर. मी भेटायला येत आहे तर तुम्हाला गिफ्ट म्हणून काय आणू ?"

" प्राजक्ताची फुले आणा. "

" सर , अजून एक. तुमच्या एका कथेत नायक कोमात जातो. नायिका दिवसरात्र एक करून हॉस्पिटलची फिस भरते. तर तुम्ही नायक जिवंत करून हॅपी एंडिंग का नाही दाखवली ?"

" कदाचित नायकाला नायिकेची ओढाताण बघवत नसावी. म्हणून त्याने प्राण त्यागले आणि इन्शुरन्सचे पैसे नायिकेला भेटले. "

" हम्म. अजून एक. तुम्ही वाचकांना जुगनू जुगनू का म्हणतात ?"

" असेच प्रेमाने. किंग पोलो हा कॉमेडीयन पण त्याच्या प्रेक्षकांना असेच जुगनू म्हणून हाक मारतो. त्यामुळे मला पण सवय लागली. "

" ठिके. भेटू मग लवकरच. "

" हम्म. "

सात दिवसांनी तेजश्री औरंगाबादला तिच्या आवडत्या लेखकाला भेटायला गेली. पार्थसरांना वरुण धवन आवडतो म्हणून वरुण धवनचे पोस्टर विकत घेतले. प्राजक्ताची फुले दिसली तर ती वेचली. एका कागदावर पार्थचीच सुंदर कविता स्वतःच्या सुंदर हस्ताक्षराने लिहिली.

माझे प्रेम प्राजक्ताची फुले वाटतात
जमिनीच्या नादी ती खाली पडतात
भूमीवर पडून ती धरणी सजवतात
सुगंध मात्र आसमंतात दरवळतात

मी पण तसाच तुझ्या प्रेमात पडलोय
तू दूर तरी मी तुझ्यातच बघ गुंतलोय
शब्दांनी मी हा प्रेमखलिता सजवलाय
जीवनकथेचे चित्र तुझ्या रंगांनी रंगलाय

प्राजक्ताची फुले पडतात दुसऱ्या अंगणात
माझ्या प्रार्थनांचा काफीला तुझ्या रिंगणात
चार त्या पाकळ्या केशरी देठ जोडून ठेवे
चार कवीकल्पना तुझ्या चंद्ररुपाने मज सुचे

प्रेम माझे जरी अस्तित्वात नाही उतरले
नियतीला जरी माझे ते सुख न बघवले
तरी हृदयात तू कायम कोरलेली असशील
कथेचा सुगंध बनून आसंमती दरवळशील !

~ पार्थ ✍️

बरोबर चार वाजता तेजश्री तिथे पोहोचली.

" फायनली आज मी ग्रेट पार्थसरांना भेटणार. त्यांचे नाव जाणून घेणार. " तेजश्री मनातल्या मनात म्हणली.

तीनशे चार ह्या रूमचे दार ती उघडणार तेच नर्सने तिला अडवले.

" कुठे ?" नर्सने रागात विचारले.

" मला कुणालातरी भेटायचे आहे. " तेजश्री म्हणाली.

" इथे कुणीच नाही. " नर्स म्हणाली.

" मला चेक करू द्या. " तेजश्रीने जबरदस्तीच दार उघडले.

तर पूर्ण खोली रिकामी होती.

" एक मुलगा होता ऍडमिट इथे. कोम्यात गेला होता एका कार ऍक्सीडन्टमध्ये. पण त्याने दोन दिवसांपूर्वीच देह त्यागला. चांगलेच झाले. त्याच्या घरच्यांना खर्च झेपत पण नव्हता. " नर्स वाकडे तोंड करत म्हणली.

" हम्म. " तेजश्रीचे हृदय धडधड करू लागले. अनामिक भीती मनात काहूर माजवू लागली.

तिने घाबरतच पार्थला फोन लावला तर तो फोन बंद येत होता. प्रतिलिपी उघडले तर सर्व चॅट गायब होते. तिच्या हातून वरुण धवनचे पोस्टर खाली पडले आणि प्राजक्ताचे फुले त्या पोस्टरवर सांडली गेली.

" तुम्हाला त्या पेशंटचे नाव जाणून घ्यायचे का ?" नर्सने विचारले.

" नाही नको. आयुष्यभर जी गुपिते राहिली ती मृत्यूनंतर उलगडून काय फायदा ?" तेजश्री स्वतःशीच पुटपुटली.

तिने खोलीतले ड्रॉवर अचानक उघडले. जणू आतून हाक आली असावी की ते उघड. तिला एक चिठ्ठी भेटली. ती बाहेर आली. एकेठिकाणी बसली. आता मात्र अश्रूंचा बांध फुटला. जे घडले ते फार विलक्षण होते आणि कल्पनेच्या पलीकडले होते. तेजश्री सोशीओलॉजी शिकली होती. त्यातला एक सिद्धांत तिला आठवू लागला. त्यात असे होते की आपण जेव्हा झोपतो तेव्हा आपली आत्मा देह सोडते. दुसऱ्याच्या स्वप्नात जेव्हा आपण दिसतो तेव्हा आपली आत्मा त्याच्या स्वप्नात प्रवेश करते. जेव्हा पार्थ कोम्यात होता तेव्हा त्याच्या आत्म्याने आपल्या स्वप्नात येऊन सर्व करवून घेतले का ? कारण डीपी वरुण धवनचा होता म्हणून आत्माचा चेहरा देह पण तसाच दिसला का ? आपल्या जुगनूसाठी तो लेखक ती कथामालिका पूर्ण करून गेला होता. घरी कुणालाच ठाऊक नव्हते लेखनाबद्दल म्हणून त्याने आपल्या एका वाचकाला साधन बनवले का ? तेजश्री या विचारात बुडाली. शेवटी रडतच तिने पार्थच्या आयडीने लॉगिन केले. वॉलवर ती लिहू लागली. पार्थच्या वाचकसागरात या दुर्दैवी खबरीची ती पहिली बळी होती.

" पार्थ धवन याचे दुर्दैवी निधन झाले आहे. त्यामुळे यापुढे तो लेखन करणार नाही. " तेजश्रीने थरथरत्या हातांनी पार्थच्या प्रतिलिपीच्या वॉलवर ही पोस्ट टाकली. तिला जाणीव होती की आता लवकरच वाचकांचा भावनिक आक्रोश उफाळून येणार. म्हणून तिने लगेच अँप डिलीट केले.

रडतच तिने ती चिठ्ठी उघडली. त्यात पार्थने स्वतःच्या हातांनी चार ओळी लिहिल्या होत्या.

क्या देखना था और क्या दिखा
शायद किस्मत में वही था लिखा
वारिया वारिया मैं जान वारिआँ
तुट गए पंख और रह गयी उड़ारिया !

~ पार्थ ✍️

समाप्त