दोष ना कुणाचा (भाग२)

दोष कुणाचा


दोष ना कुणाचा (भाग २)

आठ दिवस मीपण अजयला वाट पहायला लावली. काहीच बोलले नाही. त्यावेळी काही मोबाईल नव्हते, त्यामुळे मेसेज वगैरे काही प्रश्नच नव्हता. मी त्याला पत्र लिहिले.
" प्रिय अजू

खरचं रागवले आहे मी तुझ्यावर. तुला कळतं होते ना, मी तुझ्याकडे चोरून बघते, माझ्या नजरेत तुला दिसलेच असेल माझे प्रेम, तरी तू मला वैजूबद्दल विचारलेस? Not fair. किती वाट बघत होते मी तुझ्या विचारण्याची? मी पण तुझ्यात इंटरेस्टेड आहे हे सांगायलाच हवे का? तू ओळखलेच होतेस ना? वेडू तुझ्याशिवाय दुसरे कोणी नाही रे माझ्या मनात. तू आवडतोस मला. आणि कसे सांगू? मला नाही येत. बस. आता सांगितले. तू मला आवडतोस.
चल. भेटूच लवकर. बाय. "

मी ते पत्र त्याच्या ऑफिसमध्ये नेऊन दिले. त्याला ते नंतर मिळाले, कारण तो ऑफिसमध्ये नव्हता. तो पत्र वाचून लगेचच घरी आला, पण आई आप्पा घरी होते. त्याला काहीच बोलता आले नाही. तो फक्त " उद्या साखरशाळा आहे " एवढेच सांगून निघून गेला. कोणती साखरशाळा? आता कशी असेल? एवढ्यात वैजू ही आला, म्हणाला, " उद्या साखरशाळा आहे, मी येतो तुला घ्यायला. " दुसऱ्या दिवशी वैजू बरोबर मी गेले, पण तिथे माझा अजय नव्हता, मला काही समजले नाही. वैजू मला घेऊन एका हाॅटेल मध्ये गेला, आणि विचारले, " सायली माझे प्रेम आहे तुझ्यावर, लग्न करशील माझ्याशी? त्यादिवशी अजय समोर मी काही बोलू शकलो नाही, पण आता विचारतो. "
" नाही, मी कधीच त्यादृष्टीने तुझ्याकडे बघितले नाही. माझे अजय वर प्रेम आहे. मला अजयला भेटायचे आहे. " इतकेच बोलून सायली तिथून निघाली आणि थेट अजयच्या ऑफिसमध्ये गेली. तिला बघताच अजयचा पार्टनर बाहेर निघून गेला. अजय तिच्याकडे बघून हसला आणि म्हणाला, " तू इथे कशी काय? " सायली ला आश्चर्य वाटले.
" काल तूच म्हणालास ना आज साखरशाळा आहे, मग चल जाऊया. " सायली.

अजय हसला, म्हणाला, " साखरशाळा कशी असेल आत्ता? मला तुला भेटायचे होते. पण तू इथे आलीस ते बरं झाले. " अजयने ऑफिसचे दार लावून घेतले, सायली त्याला पाठमोरी होती. अजयने मागून तिला मिठीत घेतले आणि तिचे केस बाजूला करून तिच्या कानात म्हणाला, "I Love you, " सायली लाजली. आणि पटकन बाजूला झाली. आपला चेहरा तिने हाताने झाकून घेतला. अजय म्हणाला " चल बाहेर जाऊ. मस्त काॅफी घेऊ. "
" नको मला तुझ्याशी काहीतरी बोलायचे आहे. आत्ताच थोड्यावेळापुर्वी काही घडले ते तुला सांगायचे आहे. "
" बरं, पण इथे नको, ऑफिसमध्ये सारख कुणीतरी येत असते. " अजय म्हणाला. सायली आणि अजय अजयच्या एम80 वरून थोडे लांब फिरायला गेले. जाताना सायलीने काल वैजू घरी आल्यापासून आता वैजू ने तिला विचारले तिथपर्यंत सगळे काही सांगितले. " मला वाटले नव्हते वैजूच्या मनात असे काही असेल. मी त्याला स्पष्ट सांगितले, माझ्या मनात असे काही नाही. माझे अजयवर प्रेम आहे."
सायली म्हणाली.
" आश्चर्य आहे. परवा तर मी त्याला सांगितले तेव्हा काही बोलला नाही. हं. पण त्याला तुझ्याबद्दल वाटते हे त्याच्या वागण्यातून समजत होते. " अजय.

" पण मला नाही वाटत काही. तुझा आहे ना विश्वास माझ्यावर. " सायली अजयला म्हणाली.
" यस डियर, अग म्हणून तर मी तुला विचारले ना. आता आपण याच विषयावर बोलणार आहोत का? आपल्या विषयी बोलायचे का? " सायली हसली. अजयने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला " या आठवड्यात मी घरी गेलो की आई पपांशी बोलतो. आपल्या लग्नाविषयी तूही घरी बोल. तसा आमच्या घरी काही प्राॅब्लेम नाही, पण तुमच्या घरी बघ. " सायली हसली. तिने हलकेच आपले ओठ त्याच्या हातावर टेकवले.


क्रमशः

सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे
मिरज

🎭 Series Post

View all