नक्की करावं तरी काय... भाग 4.. अंतिम

आपण काहीही केलं तरी पटत नाही त्यांना घरी राहिलो तरी अडचण आणि ऑफिसला गेलो तरी अडचण त्यापेक्षा आपण आपल्या मनाला जे वाटेल ते करूया",..


नक्की करावं तरी काय... भाग 4.. अंतिम 

©️®️शिल्पा सुतार
........

दोन दिवस झाले श्रेया घरी होती, श्रेया ऑफिसला गेल्यानंतर सासूबाईंना त्यांचा त्यांचा आरामाचा वेळ मिळत होता, काम काही नव्हत, आधी पासून श्रेया आवरून जात होती, तो वेळ आता त्यांना मिळत नव्हता, इतर वेळी त्या त्यांच्या टीव्ही सिरियल बघत असत, फोन वर आरामात बोलत असत, आता त्यांना काय करू अस झाल होत, त्या कंटाळल्या, रोज अस श्रेया सोबत बोर होईल, आता वेळ होता तरी त्या भजनाला देवळात जात नव्हता, आता का? इतर वेळी किती बोलतात मला, आता जाव ना यांनी ,

संदीप घरी आला,.. "तुझी सॅलरी नाही झाली का श्रेया?",

"नाही.. का हो ?अजुन हिशोब बाकी आहे, होणार नाही लगेच, पण काय आता मी जॉब सोडला ना, या पुढे माझे पैसे येणार नाही असा हिशोब करा ",..श्रेया

"जरा इकडे ये, बस अशी हे बघ किती खर्च आहे",.. संदीप

"मला काहीही सांगू नका, या पुढे तुम्ही तुमच्या सॅलरीत सगळ व्यवस्थित कराल मला माहिती आहे",.. श्रेया

" काय करतेस तू दिवस भर घरी? ",.. संदीप

" हे अस मी आरामात राहिली नव्हती मी कधी, उगीच धावपळ मागे लावली होती, आज टीव्ही बघितला राहुलचा अभ्यास घेतला आणि तुमच्या साठी संध्याकाळचा चहा नाश्ता रेडी आहे, जेवणाला मस्त पालक पनीर आहे, मजा आहे तुमची, अहो ऐकताय ना",.. श्रेया

" श्रेया थांब जरा हा लोनचा इन्सोलमेंट तुझ्या अकाऊंट वरून जात होता ना ",.. संदीप

" मी केले चेंजेस वेबसाईट वरून तुमच्या अकाऊंट वर टाकल ते, बँकेतून फोन आला होता, कंन्फरमेशन दिल मी, बघा किती महत्वाच काम केल मी आज ",.. श्रेया

संदीप गप्प होता, श्रेया उठून किचन मधे निघून गेली, खूप काम आहे अस बसुन चालणार नाही, अहो हात पाय धुवा, जेवायला बसा,

स्नेहाने क्लास जॉईन केला, ती सकाळी स्वयंपाक घरच आवरून जात होती, मगच उरलेले काम सासुबाई करत होत्या, आता त्यांनी वरकाम धुणीभांडी साठी एक मदतनीस घेतली, छान सुरु झाल त्यांच, आर्या अर्धा वेळ पाळणा घरात होती,

संदीपचा पगार पाहिल्या आठवड्यात संपला, अजून इन्शुरन्सचे पैसे जातील काय कराव, श्रेया त्याच्या एवढा पगार घेत होती ते अचानक कमी झाल, खूप टेंशन मधे होता तो, मित्रां कडून थोडे पैसे उधार घेतले

श्रेया बघत होती, जावू दे बोलतेच यांच्याशी,.. "अहो मी जॉईन करते ऑफिस परत, तुम्ही काळजी करू नका" ,

"तू तर राजीनामा दिला होता ना?" ,.. संदीप

" नाही सुट्टी टाकली होती" ,.. श्रेया

"बर झाल श्रेया चांगली नौकरी सोडू नको" ,.. संदीप खुश होते

" माझ्या काही अटी आहेत या वेळी" ,.. श्रेया

काय? ,

"रोज जेवणावरून कटकट नको",.. श्रेया

ठीक आहे,

" तुम्ही भाजी आणायची",.. श्रेया

ठीक आहे

"माझ्या कामाला तितकाच रिस्पेक्ट द्यायचा, कारण मलाही पगार कमी नाही, नाही तर मी खरच जॉब सोडेन",.. श्रेया

" मान्य.. वाटल तर कामाला ठेव तू कोणाला तरी, तुला मदत होईल ",.. संदीप

" राहुलला मी आता यापुढे शाळा सुटल्यानंतर पाळणा घरात ठेवणार आहे आणि येताना मी त्याला घेऊन येईल, माझ्याही ऑफिसचं काम खूप महत्त्वाचा आहे, हे असं डोक्याला ताण घरचं टेन्शन नको मला, तिकडे ऑफिसचं कामात मन लागत नाही माझ, तुम्ही लोक खूप बोलतात मला आणि संध्याकाळी जर तुम्हाला जेवायला दोन पदार्थ हवे असतील तर किचनमध्ये येऊन मदत करत जा ",.. श्रेया

ठिक आहे

दुसर्‍या दिवशी श्रेयाने राहुलला सोबत घेतलं, आर्याच्या पाळणा घरात त्याला ठेवणार होती ती, तिकडे बोलून घेतल, शाळा सुटल्यावर राहुल आर्या सोबत डायरेक्ट तिकडे जाणार होता,

स्नेहा श्रेया गेट जवळ भेटल्या राहुल आणि आर्याची मैत्री होतीस दोघं एकाच पाळणा घरात आणि एका शाळेत त्यामुळे चिंता नव्हती

" समजा जर मला लवकर यायला जमलं नाही स्नेहा तर तू जरा वेळ राहुलला बघशील का",.. श्रेया

" हो बघेन मी, मला सुद्धा काही अडचण आली तर तू आर्याला बघशील ना ",.. स्नेहा

"हो मी बघेन काहीच हरकत नाही",.. श्रेया

दोघं मुलं सोबत होते, त्यामुळे दोघी आया सुद्धा रिलॅक्स होत्या,

" खर्च तर बराच होईल ग पाळणा घरात आपला",.. स्नेहा

" होऊ दे जे व्हायचं आहे ते आता स्नेहा, आपण कमवतो आहोत, घरच्या मंडळींना सपोर्टच नाही तर काय करणार आपण",.. श्रेया

"आपण काहीही केलं तरी पटत नाही त्यांना घरी राहिलो तरी अडचण आणि ऑफिसला गेलो तरी अडचण त्यापेक्षा आपण आपल्या मनाला जे वाटेल ते करूया",.. स्नेहा

" आपलेच पैसे आहेत आपल्यासाठी खर्च झाले तर काही हरकत नाही, ऍटलिस्ट डोक्याला शांती तरी मिळेल ",.. श्रेया

नोकरी करणाऱ्यांनाही बोलतात नाही करणाऱ्यांनाही बोलतात

श्रेयाला आता ऑफिसमध्ये बरं वाटत होतं, सारखं आपलं मुलगा सासूबाईंकडे आहे ही मनात गिल्टी फिलिंग होती ती दूर झाली, संदीपला ही तिच्या नौकरीच महत्व समजल होत.

सासूबाईंही मी करते म्हणून सगळं होतं हे जे सदोदित बोलत होत्या तोही गैरसमज बंद झाला, जसा जमेल तसा व्यवस्थित स्वयंपाक श्रेया करत होती,

स्नेहाकडे पण आता जरा शांत वातावरण झालं होतं, आर्या आणि स्नेहाला सुद्धा एकमेकींसोबत वेळ मिळत होता, घरचे काम बऱ्याच पैकी कमी झाले होते, सासूबाई सासरे पण स्वतःच्या हाताने वस्तू घेऊन काम करत होते, ते अति अवलंबून झाले होते स्नेहावर ते कमी झालं होत, कॉन्फिडन्स स्नेहा कडे बघून नवरा पण खुश होता.

🎭 Series Post

View all