Login

नकळत मन

नकळत प्रीतीत मन गुंतले हे सांगणारी कविता
नकळत मन (षडाक्षरी)

नकळत मन
तुझ्यात गुंतले
कधी, कुठे, कसे
मला न कळले

स्पंदने हृदयाची
हृदयाशी जुळली
प्रीतीची सतार
छेडूनी रे गेली

मन धडकते
घेता तुझे नाव
जाणून घे ना तू
मनातील भाव

जिथे तिथे होई
मला तुझे भास
लागे मला तुझ्या
भेटीची रे आस

भेटशील जेव्हा
मारू खूप गप्पा
मोकळे करीन
आठवांचा कप्पा

भेटल्यावर तू
जाऊ नको दूर
लागेल मनाला
पुन्हा हूरहूर