रंगला नियतीचा घात

Niyti Cha Ghat



रागिणी खूप दिवसांनी आज त्याच्या घरी जाणार होती.. तिला खरे तर जायचे नव्हतेच तिथे..पण त्याने बोलावले आणि तिला त्याचे आमंत्रण टाळता आले नाही.. तिला जाणवत होते ,कसले आमंत्रण ते तो तर एक बहाणा होता..तिला आता आपल्या घरी बोलावून एक बाकी कसर काढण्याची...

ती ही तयार झालीच होती मनातून पुन्हा त्याच्या घरी जायला..एक सामना पुन्हा रंगवायला तिला आवडणार होते... तिला ही काही खास आकर्षण नव्हते त्याच्या बद्दल मनात.. पण त्याचे घर तिला बघायचे होते..बायको बिना ते घर कसे वाटते...कारण त्याने घरी कोणी नसताना तिला बोलावले होते.. अगदी त्याचे म्हतारे आई बाबा ही नव्हते..तसाच त्याचा मुलगा ही शाळेत होता.. जणू त्याला काय वाटले आणि त्याने तिला बोलावून घेतले होते...

बायकोची कमी भासत होती त्याला असा काही प्रकार नव्हता पण ते आकर्षण तिचे त्याला खुणावत होते... आधी ही एकदा ती येऊन गेली होती...त्यानंतर कित्येक दिवसांनी आता ती जाणार होती...

पुन्हा ती नको त्या नात्यासाठी मुद्दाम सजनार होती, त्याच त्या लाल रंगाचा साडीत ती नेहमी मोहक दिसत असत तर ती जेव्हा ही त्याच्या सोबत असत तेव्हा तेव्हा ती ,त्याने खास तिला पहिल्या भेटीत ती साडी गिफ्ट केली होती ..ती मग मुद्दाम ती साडी नेसत असत...त्यात तिच्यावर त्याच्या प्रेमाची मोकळेपणाने बरसात होत होती...तो बेभान होऊन तिच्या सौंदर्यात बुडून जात असत...


त्याने तिला त्यांच्या नात्याची अनमोल आठवण म्हणून ही साडी दिली होती... फार काही महाग नव्हती ती पण त्याने दिली म्हणजे ती खास होती..आणि तिने ती नसली म्हणजे ती अमूल्य झाली होती..तिचे भाव लाखाच्या साडीला ही फिके करत होते... त्यात त्या दोघांचे असीम प्रेम सामावलेले होते ..

साडीची किंमत गौण होती पण तिच्यासाठी खूप काही होती ती लाल साडी..अगदी तिला ही साडी नेसल्यावर चिर तरुण आणि सुंदर असल्या सारखे वाटत होते... त्याला ही असेच वाटत ,की तिच्या इतकी दुसरी कोणतीच स्त्री सुंदर नाही ,तीच माझी मोहिनी ,तीच सखी, संगिनी...बाकी कधी कोणी मला भुलवू शकणार नाही...

ती आज त्याच त्याने दिलेल्या साडीत नखशिखांत तयार होणार होती ,तिला जरी असे आवडणारे नव्हते तरी त्याला आवडत होते तिचे असे सजने ,आणि तिच्या खास रूपातील दिसणे.. म्हणून स्वतःला काय आवडते हे गौण असावे, फक्त त्याला काय आवडेल ह्याची मनापासून बडदास्त ठेवली की मग तो आपलाच आणि मग तो कायमस्वरूपी आपल्याच प्रेमाच्या बंधनात बांधला जाणार हे नक्की...

तिने नेहमीप्रमाणे त्याला कुठे येऊ ,का येऊ, कशी येऊ ,काय काम आहे हे विचारणे आज ही योग्य नाही समजले.. तो म्हणाला ये तर मी जावे... तो म्हणाला नको तर मी ही नाही विचारावे का नको..

त्याने आठवणीतल्या काही नको त्या गोष्टी बाहेर काढून ठेवल्या होत्या ,त्याला आता त्या नको होत्या.. तिची आठवण ही नको..अश्या त्या आठवणीत ती असते..ती असली की ती आठवते आणि ती आठवली की तिला मिस करणे अशक्य होते.. तिला विसरता येत नाही, ना तिच्या सोबत बोलल्या शिवाय रहाता येत नाही.. कधी काळी तिने खूप साथ दिली होती..खूप भरभरुन प्रेम दिले होते... मला खूप सावरले होते... ती होती म्हणून तर बायको गेल्यानंतर वाकडे पाऊल पडले नाही...

ती तशी चांगली होती, तिचा ही माझ्यावर हक्क होताच ना ,तिला ही माझे प्रेम हवे होतेच ना, ते लग्न न करताच मी तिला दिले आणि तिने ही काही न बोलता ते विना लग्नाचे देत गेली..जगाची पर्वा न करता...फक्त प्रेमासाठी आणि प्रेमापोटी..त्यात हव्यास नव्हता.. ना पैस्याची गोडी... तिला मनमित हवा होता... निखळ प्रेम करणारा... तिला मान सन्मान देऊ पाहणारा...पण हे सगळे दोघांकडून होत होते.. पण लग्नासाठी ना ती आग्रही होती ना तो ते करू शकत होता..

दोघे ही प्रेमात अकंठ बुडालेले होते, त्यात दोघे ही दुःखी ,सम दुःखी होते... दोघांचे ही संगी सोबती एका कार अपघातात मरण पावले होते.. ते ही एकाच वेळी एकाच ठिकाणी..एकाच अपघातात..
मग त्यांची भेट त्या हॉस्पिटलमध्ये मध्ये . त्यात तिचे नवीन लग्न झाले होते आणि ते हनिमून ला जाण्यासाठी निघाले होते तर तो आणि त्याची बायको देवदर्शनासाठी जात असताना त्यांच्या गाड्या एक मेकांना धडकून त्याची बायको आणि हीचा नवरा दोघे जबर जखमी झाले होते..

त्यांना जवळच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले होते, तर इकडे बाळ आणि बाबा बचावले होते तर रागिणी खूप जखमी झाली होती..तिची शुद्ध हरपली होती..रक्ताच्या थारोळ्यात पडली होती...विक्रांत ने कसे बसे बायकोला बाहेर काढले होते.. तर समोर ज्या गाडीला धडक बसली त्या गाडीतून प्रशांत ला बाहेर काढले होते.. तर तिकडे रागिणी दगडावर डोके आपटून पडलेली दिसली होती..ती काही हालचाल करत नव्हती.. मग प्रशांत ला ही स्ट्रेचर वर पाठवून त्याने रागिणीला आपल्या हाताने उलचलले होते.. ती वाचावी म्हणून तिला शुद्धी वर आणण्याचा तो प्रयत्न करत होता...

इथे ह्या अवस्थे त त्याची आणि तिचे जणू नशीब जुळले होते... त्याला तिला वाचवावे कसे हा प्रश्न पडला होता, त्याने तिला त्याच्या बायकोच्या बाजूला ठेवून तिला ही दवाखान्यात पाठवले आणि तो तुरंत त्यांच्या मागे गेला.. त्याची धडपड आता दोघींसाठी ही होती, बाळ त्याच्या गाडीच्या मागच्या सीट वर ठेवून तो ,त्याला पुढे मांडीवर घेऊन गाडी चालवत होता..

तो हॉस्पिटलमध्ये पोहचताच त्याच्या बायकोची आवस्था खूप बिकट आहे असे सांगण्यात आले.. तसा तो धावत आत गेला,तिला कोणत्या वार्ड मध्ये ठेवले ते शोध घेऊ लागला.. ती सापडताच तिच्या जवळ गेला, काहीच हालचाल दिसत नव्हती, ना श्वास जाणवत होता..

इकडे त्याने तिला अतिदक्षता विभागात हलवण्यास सांगितले होते.. तसे डॉक्टरांनी अमलात आणले आणि लवकर सगळ्या हलचाली सुरू झाल्या, पोलिस केस नोंदवली..पोलीस आले ,जबाब घेतला... तसे त्यांनी विक्रांत यांचा जबाब घेतला आणि त्यांनाच त्या दुसऱ्या कार मधील जखमी कडे घेऊन जाण्यास कळविले..

तिकडे रागिणी अजून सुद्धा शुद्धीवर आली नव्हती, त्याने तिचे हाल पाहून तिच्यावर ही अतिदक्षता मध्ये इलाज सुरू करण्यास सांगितले.. तिचा हात हातात घेऊन तिची नस तपासात त्याने तिला low bp असल्याचे सांगितले.. आणि तसे इलाज करण्यासाठी कळवले..

त्याने तर आता निर्णय घेतला दोघीना एकाच ठिकाणी ठेवावे जेणे करून त्यांची ही काळजी तो घेऊ शकेल...आणि बाळाला एका नर्स कडे देऊन झोपी लावले..

इकडे रागिनी पूर्वपदावर आली होती, तिला काही दिसत नव्हते..तसे तिला आपण कुठे आहोत हे ही कळत नव्हते..प्रशांत कुठे ,तो दिसत नव्हता.. त्याला काय झाले हे ही समजत नव्हते.. ती चाचपडत उठली तशी ती पडली आणि विक्रांत ने तिला सावरले..तिला हा आधार जणू प्रशांत सारखा वाटला... कुठे होतास तू..तुला काही झाले तर नाही ना..म्हणत विक्रांतला हात लावत होती..

त्याला ही हा स्पर्श जणू नवखा होता.. त्याला वाटले तिला लगेच सोडून द्यावे ,पण तिला सावरले होते यासाठी की ती पडू नये ,मग मधात का ,कसे सोडू, ती तर तिचा नवरा शोधते आणि ती मला तो समजते..तिला कुठे माहीत आहे की तो मी नाही..

त्याने तिला खाली बसवले.. आणि तिला बसवून तो तिच्या नवऱ्याचे हाल बघण्यासाठी जातो, तर समजते त्याने आत्ताच प्राण सोडले होते..

इकडे त्याच्या बायकोने ही प्राण सोडले होते.. ती तर त्याच्या वाटे कडे नजर लावून बसली होती आणि तशी तिची ज्योत मावळली होती..

ह्या अपघातात दोघांचे आधार आणि प्रेम हरपले होती.. काय ही नियतीची जोड म्हणावी..काय तिच्या मनात असावे देव जाणे



त्या अपघातात मरण पावलेल्या त्यांच्या संगी सोबतीच्या सोपस्कार आणि अंत्यसंस्कार च्या वेळी होत होती..पण तिला काही माहीत नव्हते..
त्यानेच दोन्ही संस्कार केले होते..


तसे दोघे प्रेमाच्या माणसांना गमावून अधुरे अधुरे झाले होते... तिला ह्या परक्या शहरात त्याचाच आधार होता...कारण तिचे घरचे कोणीच नव्हते, तर सासरचे येऊन गेले ,पण तिला परत सोबत घेऊन गेले नाहीत..कारण त्यांच्या लेखी तिनेच नवऱ्याला खाल्ले, ती अपशकुणी ठरली होती..म्हणून सासरचे दार तिला परत यायला बंद झाले होते..

ज्या शहरात ती होती ते शहर नवखे होते.. ह्या अपघातात विक्रांत ने तिला आधार दिला होता,नौकरी दिली होती...त्याच्याच ऑफिस मध्ये.. तो आणि ती रोज हळूहळू जवळ येत होते.. प्रेम जे हरवले ते एकमेकांत शोधत होते..

त्याला तिच्या मध्ये त्याची संगिनी दिसत होती तर तिला तिचा प्रशांत ...तिची पोकळी रागिणी दूर करत होती ,तर त्याची पोकळी तो दूर करत होता.. असे करता करता.. हद्द सुटली आणि ते मनाने जवळ आले...तिने बायकोची कमी पूर्ण केली आणि त्याने त्याची...

प्रेमाला मोहर फुटला ,आणि जीव एकमेकांत गुंतले ,असे की सुटू नये पण सोडावे लागणार होते.. ती काही दिवस बाळासाठी ही घरी येऊ लागली होती.. त्याच निमित्ताने त्याच्या आयुष्यात ही येऊन त्याला सावरू लागली होती..

पण त्यांचे अधुरे पण पूर्ण करता करता समाजाच्या नियमात आडकाठी निर्माण करत होते... आणि आता प्रेमाची बदनामी होत होती..म्हणून तिने हे घर सोडायचा निर्णय घेतला आणि त्याने तिला सोडण्याचा निर्णय घेतला..

घरात तिच्या आठवणी ज्या होत्या त्या आज तिला परत करून तिला सोडणार होता...

तिला कायमस्वरूपी एका बंधनातून मुक्त करून नव्या बंधनात बांधणार होता... तो तिची वाट बघत होता... त्याने तिला फोन केला..

"रागिणी तू घरी न येता डायरेक्ट कोर्टात ये, आपण लग्न करणार आहोत...मग कोणी आपल्याला कधी वेगळे करण्याचा खोचक प्रयत्न करणार नाही ,अन ना मी ही तुला सोडून देण्याचा विचार ही मनात आणणार नाही "

ती तशीच काही न विचारता कोर्टात येते...

तो तिची वाट बघत असतो

तिला सोबत घेऊन चार चायघांसमोर तिला आपली संगिनी मानत ,आपल्या घरी मानाने घेऊन जातो...

©®anuradha andhale palve