नियती - एक भयकथा - भाग 9

भयकथा

नियती
भाग 9
हेमंत कांन देऊन ऐकू लागला आणि काही समजत नसताना संभा उगाचच त्याला खेटून उभा राहिला 
संपतराव : अग पोरी तू इतकी पण घाबरू नकोस ग तुझा बाप जिवंत आहे आजून ..तू एकुलती एक मुलगी आहेस माझी ...तुझी आई तर धसक्यानेच गेली आणि नंतर मला पण लग्न करावंसं वाटलं नाही ..त्यामुळे तुला बहीण भावंड नाहीत. आणि तुला घाबरायचं काहीच कारण नाही, वेळ आली तर मी सांगेन तुला सगळं ..
वर्षा - अहो पप्पा आजून वेळ नाही आली अस कास म्हणता तुम्ही? आज माझ्या प्रेमावर ..माझ्या हेमंतवर संकट आहे हो ..ते काही नाही मला सगळं माहितीच हवंय ..
संपतराव : हे बघ मी आत्तातरी तुला काहीच सांगणार नाहीये ..आणि इथे तुला फक्त काही सूचना देण्यासाठी बोलवलं आहे मी..
वर्षा : सूचना? कसल्या सूचना ?? नाही नाही ते काही नाही तुम्ही आत्ताच्या आत्ता मला सांगा सगळं ..मी आता मोठी झाली आहे ..आणि माझ्या आयुष्यातील सर्व रहस्य मला माहित हवीतच.. इतकी वर्षे मी काही विचारलं का तुम्हाला ? नाहीना ? मग? पण आज मात्र मला ते सगळ माहीत हवं आहे ..
संपतराव : उगाच हट्टाला येऊ नकोस, हे तुला माहीत असणे तुझ्यासाठी योग्य नाही ..तेव्हा मी सांगतो तेवढं फक्त ऐक आणि कर , पुढे जास्त काही बोलू नकोस..मी बाप आहे तुझा तुला माझ्यावर भरोसा आहे की नाही तव सांग आधी मला ..
वर्षा आता अगदी रडवेली झाली होती ..तिने संपतरावांच्या गळ्यात हात घातले आणि रडू लागली ...अरे हे काय ती रडता रडता अचानक हसू लागली ...आणि बोलली : संपत अरे बोल की तिला जे तुझ्या ओठांवर होत आत्ता ..अरे तू जे केलंस बरीच वर्ष झेलल मी तुला ..पण आता पुरे झाला तुझा खेळ ..तुला काय वाटलरे तेव्हा गप्प बसले तशी मी आत्ता पण बसेल काय? आज बघ तुझ्या दैवानेच तुझा कसा खेळ चालवला आहे..हाहाहा . जे नको व्हायला म्हणून तू इतकी वर्षे काळजी घेतलीस , आता तेच होणार ..आणि, आणि तू काहीच करू शकणार नाहीस ..प्रत्येकाची वेळ येते ..आज माझी वेळ आहे बदला घेण्याची .तुझी वेळ आता संपली ..कसा माझ्या कचाट्यात सापडलास तू आणि तुझी लेक ..हाहा हाहा आता कोणालाच सोडणार नाही मी 
संपतराव पुरतेच गोंधळले होते ..अचानक वर्षा मंदाकिनी सारखी का बोलत आहे ? आणि आजून तरी घरात अस काहीच घडलं नव्हतं की ती घरात येऊ शकेल ..हिला तर आमच्या गुरुजींनी वचनात बांधलं होत ..त्यामुळे ती या महालात असूनपन कोणाचं काहीच वाकड करू शकली नव्हती ..पण आता हे काय चालू आहे ?माझं तर डोकच काम करत नाहीये ..
संपतराव : वर्षा ए वर्षा काय होतंय तुला आग तू अशी का वागत आहेस? मी सांगितलं ना तुला टेन्शन घायची काहीच गरज नाहीये 
वर्षा : अस कस आता तुम्हा सगल्यांचीच टेन्शन घायची वेळ आली आहे ..तयार राहा रे ...
संपतराव : वर्षा वर्ष भानावर ये..तू काय बरळत आहेस पोरी ??
वर्षा : मी वर्षा नाही ...हाहाहह, मी मंदाकिनी आहे ,मंदाकिनी, काय रे विसरलास संपत तू मला ? अरे इतक्या लवकर कसा रे? तुला काय वाटलं मी तशीच राहील ? बांधलेली ? हाहा ततुझ्या जावयाने मोकळं केलं मला कल रात्री ..आणि त्यात पुरेपूर साथ दिली तुझ्या पोरींनी ...हाहा...आता माझ्यापासून तुम्ही कोणीच वाचणार नाहीं ...तयार रहा मी आलीये ..हो मी ..मी मंदाकिनी आलीये . आणि वर्षा  सोफ्यावर आदळली गेली ...संपतरावांनी कसबस तिला खाली पडण्यापासून वाचवलं ..ते जिवाच्या आकांताने ओरडू लागले : परमेश्वरा काय गुन्हा झाला रे ? ही बाई कशी काय सुटली ? 
इकडे बाहेर कान लावून थांबलेला हेमंत भीतीने थरथर कापू लागला होता..तो विचार करत होता . या बाईला मी आणि वर्षांनी कधी आणि कुठं शापातून बाहेर काढलं ..च्यायला डोसक्याच दही झालंय राव..काय र संभा म्या कधी सोडवली हिला? 
संभा : हिला कोणाला ? आन कुठून सोडली,?
हेमांतने वैतागून त्याच्या डोक्यात टप्पू दिला .."काही नाही बाबा ..इतक्यात त्याला त्याच्या हातातला समोसा दिसला हेमंत म्हणाला तू निस्ता खात राहा.. चल जातु मी
संभा : आव्ह मालक पर कुठं चाललासा म्हणायचं?
हेमंत : (चिडून)जतो  मसनात आणि तो निघून गेला ..
संभा: मालकांना काय झालंय समजना काय बी बोलत हायत.
©पूनम पिंगळे 
क्रमशः

🎭 Series Post

View all