नियती - एक भयकथा - भाग 8

ही एक भयकथा आहे

#नियती 
भाग8
सगळ्यांनी राजेशाही नाश्ता केला ..संभा तर भलताच खुश होता रोज पोहे उपिट खाणारा आज मस्त इडली, बासुंदी, डोसा, आणि खूप काही पदार्थ नाश्त्याला खात होता ..सगळ्या पदार्थांचा मस्त घमघमाट सुटला होता सगळे गोड पदार्थ साजूक तुपात केले होते ...संभाने पुरेपूर ताव मारला ..
हेमंतला मात्र काही खाल्लं जात नव्हतं ते स्वप्न तो रात्रीचा प्रसंग ..त्याला काहीच सुधारत नव्हतं ..
वर्षा : अरे हेमंत तू तर काही खातच नाहीयेस
हेमंत : मला भूकच न्हाय बघा..काय झालया काय म्हाइत न्हाई पर कायबी खावंसं वाटना झालंय..
संपतराव : आग तू काय मागे लगतीस त्याच्या ..आग त्यांनी इतकं जेवण तरी कधी पाहिलं असेल काय? ते पाहूनच पोट भरलं असलं त्याच ..तू घे तुझं खाऊन ..त्याला वाटलं तर तो खाईलच की..
वर्षा : अहो पण पप्पा तो सकाळ पासून काहीतरी बेचैन दिसत आहे ..काय झालंय त्याला काही समजतच नाहीये ..आणि आता नीट जेवत पण नाहीये तो ..सांगत पण नाही काय झालंय आणि मग एकदम मार्मिकपणे - तो मघाशी मला मंदाकिनी बोलला..
संपतराव : (त्यांना आता घाम फुटला होता स्वतःला सावरत की कोणाला कळू नये)काय ? तू आणि मंदाकिनी?? हाहा ..काय डोक्या सोबत आता डोळ्यावर पण परिणाम झालाय की काय ह्याच्या..बघ ग वर्षा तुला आजूनपण वेळ आहे विचार कर ..या अश्या माणसासोबत लग्न करायचं का तुला? आज याला तू मंदाकिनी वाटली उद्या माधुरी दीक्षित वाटशील ..मला तर काही याची लक्षण ठीक दिसत नाहीत ...बर घ्या आता सगळे नीट नाश्ता करून ..आणि वर्षा तुझा नाश्ता झाला की जरा माझ्या रूममध्ये ये महत्वाचे काम आहे ..
वर्षा : (तिला समजलं काय काम आहे ते )..हो पप्पा लगेच येते.
संपतराव : आग नाश्ता करून मग ये ..घाई नाही . ठीक आहे ..मी जातो..कितीजरी लपवायचा प्रयत्न केला तरी त्यांच्या डोळ्यातील भीती आणि कपाळावरील घामाने हेमांतला काहीतरी गौडबंगाल आहे हे समजलच होत ...
आता त्याने पण भराभर थोडस खाल्लं ..
वर्षा : तू कसलं टेन्शन घेतल आहेस हेमंत ..प्लीज काही विचार करू नकोस ..तुला काहीतरी स्वप्न पडलं असेल ..प्लिज आनंदी रहा ..माझं खूप प्रेम आहेरे तुझ्यावर ..बर तू खाऊन घे मी आलेच आणि ती संपतरावांच्या रूमकडे निघाली ..
हेमंत : हो ग मी ठीक आहे..तू काळजी करू नकोस जा तुला पप्पानी बोलावलंय ना? त्याने तिला जाऊन दिल आणि ती रूममध्ये जाताच पटकन दरवाजात कान देऊन उभा राहिला ..संभाला काहिच माहीत नव्हत ..तो पण पटकन त्याच्या मागोमाग आला . संभाने हातवारे करतच त्याला विचारलं काय रे तू असा का ऐकतोस चोरून?हेमांतने त्याला गप्प बस अस खुणावले..
आता तो दाराला कान देऊन नीट ऐकू लागला
वर्षा : पप्पा हेमंतला मंदाकिनी कशी माहीत झाली ? आणि तों मला का मंदाकिनी बोलला? 
संपतराव काहीच बोलत नव्हते ते पूर्ण खोलीत नुसतेच येरझऱ्या
घालत होते ..
वर्षा : पप्पा बोलाना काहीतरी ..माझ्या हेमांतला तर काही होणार नाही ना 
संपतराव : चल ग अश्या फाटक्या मानसला ती काहीच करणार नाही ..आग ..आग म्हूणून तर मी गप्प आहे..नाहीतर तो घरात तरी येऊ शकला असता का ग..एकतर तुझं त्याच्यावर प्रेम आणि तो फाटका , दरिद्री मुलगा आणि नियमाप्रमाणे तुला श्रीमंत नाही तर गरीबच मुलाशी लग्न करायचे आहे ..,नाहीतर ती मंदाकिनी तुम्हाला सुखाने जगूच देणार नाही..
वर्षा : म्हणजे ? म्हणजे मी नाही समजले ? तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? नीट सांगा ना मला...एकतर इतकी वर्ष तुम्ही मला या वाड्यापासून स्वतःपासून दूर ठेवलत का? मंदाकिनी हे नाव मी खूप लहान असताना जेव्हा आई होती माझी या घरात तेव्हा ऐकलं होतं..,कोण पप्पा ही ? ती का येते आपल्याकडे? का धोका आहे आपल्याला ? सांगा ना प्लिज पप्पा सांगा ..
हे सगळं संभाषण ऐकून हेमांतच्या पायाखालची जमीनच सरकली : अरे बापरे ..म्हणून ती रात्री बोलली काय इतकं खोट बोललास ? आणि तुझायकडे लग्नानंतर बघते थांब ..अरे बापरे ..म्हणजे माझं आता काही खर नाही 
संभा खुळ्यासारखा बघत होता : मालक ओ मालक ..आव्ह अस काय करायला लागलात ? अहो काय ऐकलय तुम्ही? 
हेमंतने पुन्हा त्याला रागात बघून गप्प बसायला सांगितलं 
संभा : अव्हो म्या गप बसतोय की पर मला सांगा तर तुम्ही अस का करतायसा ?
हेमंत : एकदम चोरट्या आवाजात : संभा इथ माझ्या जीवन मरणाचा प्रश्न हाय ..मला कसलेबी प्रश्न ईचारु नगस ..मी जे करतोय ते मला करून दे ठीक हाय का ?
संभा : एकदम नाराजीच्या सुरात: अहो मालक एक डाव सांगा तर काय करताय ? ,मंग म्या बस्तुय की गप
हेमंत ; अरे संभ्या ही येल न्हाय तुला नंतर समद संगतु पर तू आता गप बैस 
संभा एकदम मुलासारख बारीक तोंड करून बाजूला जाऊन बसला आणि हेमंतने पुन्हा दरवाजाला कांन लावले..
©पूनम पिंगळे

क्रमशः

🎭 Series Post

View all