नियती - एक भयकथा - भाग 6

ही एक भयकथा आहे

नियती 
भाग 6
संभा तर इतका जेवला की त्याला उठवतच नव्हतं ..सगळे त्याला हसायला लागला जेऊन सगळे आपापल्या रूम मध्ये गेले ...12वाजता हेमांतला अचानक जाग आली त्याला बाथरूममध्ये लाईट लागलेली दिसली ..तो तिकडे गेला तर अरे लाईट बंद ..हेमंत एकदम गोंधळला ..कदाचित झोपेत अस वाटलं मला असा विचार करून तो पुन्हा झोपला ...आता त्याला कोणतरी त्याच्या बेडवर बसून एकटक त्याला बघत आहे असं वाटू लागलं ...त्याने किलकिले डोळे करून पाहिलं तर वर्षा तिथे बसली होती ती त्याला एकटक बघत होती 
हेमंत : अरे वर्षा इतक्या रातच्याला इथं काय करतीय तू ? आग तुझ्या त्या बापानी पायल ना तर जीव घिल माझा ...आन म्या तसा त्यातला न्हाय ..आपलं लगीन झाल्यावरच बाकी सगळं 
वर्षा जोरजोराने हसायला लागली ...हेमंत तिच्याकडे घाबरून पहायला लागला - अग ए तू अशी काय हसायला लागलीये ? जा तू झोप बाई 
वर्षा : (तिचे डोळे वेगळेच दिसत होते ..केस मोकळे होते ...तिचा हसायचाआवाज पण वेगळाच येत होता ..एकदम भयंकर..आता मात्र हेमंत ची घाबरगुंडी उडाली होती ..,) मी झोपणार नाही ( एकदम भयानक आणि वेगळ्याच आवाजात ती बोलत होती)
हेमंत : उसनं अवसान आणून बोलला आग पण रात्र झालीये ..रात्री झोपावं माणसानं ..आराम करावा 
वर्षा : मी माणूस नाही 
हेमंत : उसनं हसत अर हो तू तर बाई नाही का ? मी माणूस ..बर जा बाई जा तुझ्या खोलीत जाऊन झोप
वर्षा : खूप जोरात हसू लागली- काय रे इतकं मोठं खोट बोललास ? आता तुझं एकदा लग्न होऊदेत मग सोडत नाही बघ तुला 
हेमंत : आग वर्षा म्या बी  नाही सोडणार तुला लग्न झाल्यावर ..आग पण अत्ता तू जा इथन . तुझ्या पाया पडतु पण जा ग ..माझी शानी बाय ती ..जा जा बर
वर्षा : तुला सावध करायला आलीये ..या वर्षाशी लग्न करशील तर खूप मोठ्या संकटात सापडशील ..पळून जा ..नाहीतर माझ्याशी गाठ आहे
हेमंत : अग वर्षा तुला होतया तरी काय ग ? आग तूच माझी वर्षा ना मंग ..अस काय खुळ्यागत बोलतीया ? या बाई तुला माझी मस्करी करायचीय ना उदयाला कर ..जा बाई आता मला झोपून दे ..आणि तुबी झोप . आपण उदयाला बोलूंहा
वर्षा :मी वर्षा नाही
हेमंत : तिच्याकडे बघत - या बये तुला ते येड्यांचा आजार हाय काय? ते कसलं स्पीट का स्प्लिट पेरसोनलिटी का काय म्हणत्यात ते?बर मला सांग तू वर्षा न्हाईस मंग कोण हायस..?
वर्षा: मी मंदाकिनी
हेमंत : हसत आयला मंदाकिनी? , ती राम 'तेरी गंगा मैली वाली काय? बाबव आणि तू अशी येगली का दिसतीयास मग?
वर्षा : अरे नीट ऐक तर ..किती तोंड चालवशील बिन कामच..ती मी नाही ..,मी या ताजमहालाची मालकीण राणी मंदाकिनी
हेमंत : बर बर समजलं ..आता झोपतु मी मंदाकिनी बाई आपण उंडया बोलूया नक्की...
वर्षा : ठीक आहे झोप तू ..भेटू उद्या ..आणि ती तिथून निघून गेली ..
हेमंत स्वतःला चिमटे काढून बघत होता त्याला समजतच नव्हतं जे घडलं ते खरं होत की स्वप्न ..चिमटा जोरात बसला आणि तो ओरडला हे सगळं ...आता मात्र 
.चिमटा तर खरा बसला म्हणजे खर खर live घडत होतं ..हेमंत कसातरी झोपला ..आता आपण सकाळी याचा सोक्षमोक्ष लावूया या विचारातच त्याला झोप लागली ..आणि काय? ,,

©पूनम पिंगळे

🎭 Series Post

View all