नियती - एक भयकथा - भाग 4

ही एक भयकथा आहे ..काय वर्षा खरच प्रेमात पडलीये का?

नियती भाग 4
इतक्यात वर्षा हेमंत जवळ आली आणि तिने त्याचा हात पकडला 
वर्षा : पप्पा तुम्हाला जर मी हवी असेल तर तुम्हाला याला पण माझा नवरा म्हणून कबूल करावंच लागेल..इकडे संभाची हलत खराब झाली होती आता काय मालकांची खेर नाही हा म्हतारा काही सोडणार नाही आम्हाला ..
संपतराव : आग तुला काय झालंय काय लाज लज्जा सगळं सोडून दिल आहेस काय तू? इतक्या प्रतिष्ठित घराण्यातील मुलगी तू आणि अस वागतेस ..चल इकडे ये आधी सोड त्याचा हात ...जर तुला त्याला जिवंत पहायच असेल तर आधी त्याचा हात सोड 
वर्षा : ठीक आहे , मग मला पण मारा तुम्ही ...मला पण नाही जगायचं ...याला बघताक्षणी प्रेमात पडले मी याच्या ...तुम्हाला काय कमी दिसत आहे याच्यात मला तर काही समजत नाही ...पण माझ्या मनाने यालाच माझा नवरा मानलं आहे आणि आता इतर कोणालाही मी ते स्थान देऊ शकत नाही 
संभा : मनातल्या मनात मेलो मेलो आता आम्ही तिघबी मेलो ..अग ए वर्षा बाई तुला ग कधी इतका लळा लागला आंमच्या मालकाचा..चमायला समदच अवघड झालया.. आता आम्हांस्नी कोण वाचवलं बर ?
संपतराव : ठीक आहे, जा ..तू पण चलती हो ..तुझी पण गरज नाही आम्हाला ..आणि पाठमोरे उभे राहिले ..
हे सगळं काय चाललंय ते सगळं संभा आणि हेमांतला तर स्वप्नात असल्यासारखच वाटायला लागलं होतं 
हेमंत : मनातच : हे समद खर हाय का सपान? ती बाजारात भेटली काय ? मी बोललो काय? हिनी घरी आणलं काय ? आन हिला प्रेम कव्हा झालं? कायतरी घोटाळा हाय नक्की ..मी काय इतका भारी बी न्हाई दिसायला आन बघताच प्रेमात पडली म्हण माझ्या..
हेमंतने मागे संभाकडे एकदम वेगळ्याच नजरेने बघितले आणि संभाला काय ते समजले ..
संभा : वर्षा ताई एकदा पुण्यादा इचार करा ..अव्हो नंतर पास्तावताल वो तुमि 
वर्षा : म्हणजे ? मी नाही समजले ?
संभा : मगाशी तुम्ही इतकं काय काय बोलला आन मग मी बी खोट बोललो ..
वर्षा : काय खोट ? यांचं माझ्यावर प्रेम नाही का ? अस असेल तर मी जीवच देईन आता
संभा : अव्हो तेच तर खर ..बाकी समद खोट बगा ..,आमी दोघ दोस्त हाय ..सोबतीनं आलो होतो बाजाराला ..ह्याला तुमी लई आवडल्या..आन मग पुढचं तुमाला म्हाइत हायच की? ती गाडी माझ्या मालकाची ह्याची न्हवं..
वर्षा : अरे ठीक आहे . त्याने मला काहीही फरक पडत नाही ..हेमंत तू माझ्या मनात बसला आहेस रे . अगदी एका क्षणात एका नजरेत ..आपण तुझ्या झोपडीत पण राहू काय असेल ते खाऊ . मला येतो रे स्वयंपाक बनवता . मी बनवेंन तू जे आणशील ना ते बनवून खाऊ आपण , एकवेळ उपाशी राहू . पण आता तूच माझा नवरा होणार 
हेमंत आणि संभा डोळे फाडून आ करून तिच्याकडे बघत होते ..इकडे संपतराव डोक्याला हात लावून मटकन खुर्चीत बसले ..
संपतराव : अग कार्टे..कुठल्या पापाची शिक्षा देतीयेस मला ? आग हा असा फटका माणूस . त्याच्या बरोबर राहणार तू? राजकुमारी तू आमची आणि आता कसले ग हे भिकेचे डोहाळे लागलेत तूला ?
वर्षा : पप्पा ..प्रेम असच असत ..ते माणूस, वय, पैसे  बघून होत नाही ते असच होत
संपतराव : हो का ग ? आणि तुला कितीवेळा झालंय अस प्रेम ? म्हणून तू इतकं सांगत आहेस ?
वर्षा : छे हो ! ते काय अस सारख सारख नाही होत..एकदाच...फक्त एकदाच होत..
संपतराव : आई जगदंबे उचल ग मला उचल ..माझी एकुलती एक मुलगी ही ..तिचे असले उद्योग बघण्यासाठी मला जीवंत का ठेवलस ग तू ..आजून जास्त बघण्यापेक्षा उचल मला तू लगेच..
वर्षा : नाही हो पप्पा,  आजून भरपूर वेळ आहे तुमच्याकडे ..तुम्हाला नातवंड, पतवंड बघायची आहेत ...मग जाणार तुम्ही ..
संभा आणि हेमंत समोर जे चालू आहे ते गुपचूप बघत आणि ऐकत होते ...सध्या ते त्या फ्रेममध्ये कुठेच बसत नव्हते ..बाप लेकीचं हे नातं खरच किती अतूट आहे हे समजत होत ..अस दिसत होतं की वर्षाला 100% खात्री होतीच , संपतराव तिला जाऊ देणार नाही आणि हेमंत तिचाच होणार ..आणि संपतराव त्यांच्या मताशी काही ठाम वाटत नव्हते ..जर तस असत तर एखादा शिपाई बोलवून केव्हाच घराबाहेर घालवल असत..
वर्षा : चल हेमंत , संभा चल रे ..नको मला हा माणूस बाप म्हणून ..असता न माझा खरा बाप तर ..तर माझी आवड समजून घेतली असती .अस माझ्या प्रेमाला नाव नसती ठेवली ..
इतकावेळ तावातावाने बोलणारे संपतराव अचानक एखाद्या लहानमुलासारखे रडू लागले - आग पोरी तुझ्याशिवाय या म्हाताऱ्याला कोण आहे ग ? तू आहेस तर सगळं माझं ग ..पळतच वर्षा त्यांच्या जवळ जाऊन गळ्यात पडली 
वर्षा : रडत रडत - माहीत आहे ना माझ्याशिवय नाही राहू शकत मग का भांडता हो पप्पा सारखे ? 
आता संभा आणि हेमंत एकमेकांना वेड्यासारखे बघत होते ...समोर एखादा मेलोड्रामा चालू असल्यासारखे वाटत होते   हेमंतने स्वतःलाच एक जोरात चिमटा काढला आणि ओरडला..आई ग 
वर्षा : काय झालं हेमंत ? तू ठीक आहेस ना?
हेमंत : अग तुमचं इतकं प्रेम  बघून रडायला आलं बग ..किती ते प्रेम तुमचं ..तू इथंच रहा सुखानी . आपण नको लग्न करायला ..तुझं वडील एकदम एकट पडतील मग 
वर्षा : अरे आपण इथेच रहायचं आता ..तसपन तुला घर नाहीना मग   
अरे देवा आता हे तर अजूनच अवघड झालं कि हेमंत आणि संभा दोघे एकमेकांना बघू लागले..
©पुनम पिंगळे
क्रमशः

🎭 Series Post

View all