नियती - एक भयकथा - भाग 31

भयकथा

नियती
भाग -31
©पूनम पिंगळे
अचानक मुक्ती सगळ्यांना दिसू लागली जी दिसत नव्हती ..मध्येच ती दिसत होती गायब होत होती ...जसकाही लाईट चालू बंद होत होती ..ती क्षणार्धात दिसंत होती मधेच अदृश्य ...तिला पाहून वर्षा जोरात ओरडली ....आssssssई... अग तु !आई ये ना ग परत माझ्याकडे... तिचे डोळे भरून आले होते...ती अगदी कावरी बावरी झाली होती ...अचानक इतक्या वर्षांनी आईला समोर पाहून तीच प्रेम उचंबळून आलं होतं ...आता तिला हेमंतने जवळ घेतल होत ...तिची मनस्थिती त्याला समजत होती ..संपतराव एकदा मुक्तीकडे आणि एकदा वर्षाकडे बघत होते ...
संपतराव: आग मुक्ती काय झालंय तुला? अग हे अस का होत आहे तुला? 
मुक्ती : अहो आज ममतेच्या भरात, मी खूप मोठी चूक केली ...आता माझ्या सर्व शक्ती नष्ट होणार ...मी इतके वर्ष जी पण पुजा केली ती सर्व वाया जाणार ..
संपतराव : अग अशी काय चूक केलीस तू ?
मुक्ती : मला गुरुजींनी सांगितलं होतं ...या उपासनेत मी माझ्या कुटुंबातील कोणालाही स्पर्श करायचा नाही ...आणि आज अचानक वर्षाला पाहून माझ्यातल्या आईला रहावल नाही हो ...आणि ही चूक झाली ...ती जोरात गुरुजी ...गुरुजी वाचवा मला ...आत्ता माझ्या माणसांना माझी गरज आहे हो ...माझी चूक झाली ..मला मार्ग दाखवा ...हे कालीमाता आजपर्यंत मी अगदी मनापासून तुझी पूजा केली ग ...माफ कर ग तुझ्या या लेकीला ...माझी माय ...आज वेळ आली आहे ग...इतके वर्ष मी स्वतःला या पिशाच्च योनीत राहुन तुझी मनापासून पूजा केली ग ..पण आजच्या या एका चुकीसाठी मला इतकी मोठी शिक्षा नको देउ ग ...ती रडत होती ...
तिची ही अवस्था पाहून वर्षाला रडू येत होतं ...ती म्हणू लागली : मी यायलाच नको होतं इथे परत ...मी आले आणि ती मंदाकिनी आली... माझी आई तु ..आणि ती रडू लागली ...ती ही रडतच हे कालिमाता मला शिक्षा देग माझ्या आईला माफ कर ...अस म्हणू लागली..मुक्ती सतत गुरुजी आणि कालीमतेचा धावा करत होती ..इतक्यात गुरुजी तिथे प्रकटले ...एका तेजस्वी दिव्य पुंज्यातून ते अवतरले.. सगळे खुश झाले..आता सगळं नीट होईल..अस त्यांना वाटू लागलं
गुरुजी: अग पोरी , काय केलंस तु हे?? किती मोठी चूक केली आहेस तू ..
मुक्ती : गुरुजी एका मायेकडून झालेली चूक आहे हो ही ..काही तरी उपाय सुचवा ..मी भोगेन सर्व शिक्षा..
वर्षा: गुरुजी , माझ्या आईला नाही हो मला शिक्षा व्हायला हवी ..माझ्या आईला बर करा हो ..तिला तिच्या सर्व शक्ति परत मिळूद्यात
गुरुजी : खर आहे वर्षा पोरी तुझं..तुलाच याच प्रायश्चित्त करावं लागणार आहे ..
संपतराव आणि मुक्ती जवळजवळ ओरडतच: म्हणजे ? का ?आणि ते प्रायश्चित्त काय असेल?
गुरुजी: वर्षा बेटी , तुला आता कालिका दरबारात जाऊन त्यांचा त्रिशूल आणावा लागेल ..आणि मातेचा कपाळाचा ओला गंध आणून तुझ्या आईच्या कपाळावर लावावा लागेल ..आणि हो त्यासाठी तुला मातेला प्रसन्न करावं लागेल.
वर्षा: पण मी कस प्रसन्न करणार त्यांना?..आणि मला कुठे जायचं?कुठे आहे तो दरबार?
गुरुजी: हे घे हा ताविज तुझ्या उजव्या हातात बांध आणि कालीमातेच मनापासून स्मरण कर . तुझ्या आईला तिच्या सर्व शक्ती परत मिळुदेत अशी प्रार्थना कर, तू मातेच्या दरबारात पोहोचशील...तो त्रिशुळ आणून तुला तुमच्या अंगणात रोवायचा आहे ...आणि त्याच्यासमोर तुझ्या आईला बसवून ते कुंकु तिच्या कपाळावर लाव . तिच्या सर्व शक्ती तिला परत मिळतील ...आणि त्याच त्रिशूळाने मंदाकिनी आणि तिच्या आईला नष्ट करण्यात आपल्याला मदत होणार आहे ...मी आता जातो ...वर्षा बाळ काळजी घे ग आणि मुक्ती बेटा तुझी तपस्या वाया जाणार नाही ..काळजी  करू नकोस तू ..सगळं काही नीट होईल ..फक्त सगळं पूर्ण श्रद्धेने कर ...आणि तिथून गुरुजी अंतर्धान पावले ...
आता जे काही करायचं ते वर्षांला करायचं होतं..तिने पटकन तो ताविज हातात बांधला आणि प्रार्थना करू लागली ..पण अस झालं की ती प्रार्थना करत असताना तिच्या खांद्यावर हेमंतचा हात होता ..आणि 2 च मिनिटात ते दोघेही कालिका दरबारात पोहोचले..जेव्हा वर्षाने डोळे उघडले तर, तिच्या खांद्यावर हात ठेवलेला हेमंत ही सोबत होता ..आणि समोर काली मातेची मूर्ती होती जी अत्यंत भव्य होती ..
वर्षा : अरे तू कशाला आलास ? 
हेमंत : आग म्या कसा आलों मलाच नाही म्हैत  ...तुला फकस्त खांद्यावर हात ठिवला हुता ग..
वर्षा : अरे देवा मला एकतीलच यायला सांगितलं होतं ..तू व आलास आता यांच्यामुळे आजून काही वाईट नको व्ह्यायला...
हेमंत : मला त्याच वेळी तुझ्या खांद्यावर हात ठीवायची बुद्धी झाली नव्ह ..मंग नक्कीच याच्यामधी कायतरी गोम असलं बघ ...मला न्हाय वाटत काय बी अडचण हुईल..
वर्षा: देव करो अन तसच असावं..बर मी आता देवीला कस खुश करायचं ? मला तर काहीच समजत नाहीये..
हेमंत : म्या तर लै पिक्चर मध्ये पायलय देवाला खुश करायला त्याच्या म्होर नाचत्यात ...त्ये तांडव म्हणत्यात ना त्याला ...
वर्षा : कसा रे तू असा ? अरे बुद्ध ...कसा रे तू असा ? पिक्चर आणि रिअल लाईफ खूप फरक असतो रे ...
हेमंत : पर म्या काय म्हणतु , करून बग तर ...
वर्षा : किती रे भोळा आहेस तू!...नाही रे त्याने काही उपयोग होणार नाही ...थांब मी विचार करते..इतक्यात तिच्या लक्षात आलं खूप वर्षात तिथली साफसफाई झालेली नाहीये ...सगळीकडे जाळ्या ...कोळी ...अगदी मूर्तीवर पण खूप धूळ साचलेली होती ...तिने स्वतःची ओढणी काढली आणि त्याने मूर्तीची धूळ साफ करायला सुरुवात केली .. तिथले विझलेले दिवे लावले ...बाजूलाच पडलेला एक झाडू घेऊन ते मंदिर स्वच्छ केलं ...पण काहीच उपयोग झाला नाही ..हेमंत पण तिला मदत करत होता ..
हेमंत : अग ऐक की माझं, तू इतकी मेहनत करून बी देवी पावली न्हाई, मी मोबाईल मधी लावतो तांडव च मुसिक आणि मग तू आणि मी दोघ बी करू की ते तांडव ...
वर्षा : गप रे, नको ना मस्करी करुस ...ही वेळ मस्करी करायची नाहीये रे...
हेमंत : म्या का मस्करी करीन? आग म्या तर खर बोलतुया...
वर्षा: त्यापेक्षा तुझ्या त्या मोबाइल मध्ये काली मातेची आरती लाव , आपण आरती करूया... पण आधी रेंज आहे का बघ तुझ्या मोबाईलला...
हेमंत : आयला! खरच की बघायला पायजेल न्हाई का? त्याने खिशातला मोबाईल काढला आणि त्याला चक्क रेंज होती अगदी फुल्ल..चमत्कारच हाय की ग ..इथं घरात कधी कधी रेंज नसती आणि इथं या जंगलात रेंज हाय बघ ...थांब मी शोधतु आरती ...
हेमंत मोबाईल मध्ये आरती शोधत असताना वर्षा मूर्तीच्या अगदी जवळ गेली ...तिथे तिला बऱ्याच प्रकारचे विविध हत्यार पडलेली दिसली ...त्यांचे आकार अतिशय विक्षिप्त होते...त्यातलं एक हत्यार तर खुपच वेगळं होत त्याच्या हँडल ला सिंहाची मुद्रा होती आणि त्याच्या डोळ्यात जडलेले हिरे खरे डोळे असल्यासारखे चमकत होते ...जणू तो सिंह त्यातून तिच्याकडे बघत होता... तिने ते हत्यार उचललं आणि तिच्या करंगलीला ते कापलं....त्यातून भळाभळा रक्त वाहू लागलं... आणि ते नकळतपणे देवीच्या पायवर पडलं ...
इतक्यात अचानक वादळ आले ...लावलेले दिवे विझुण पुन्हा पेटू लागले ...आजूबाजूची झाडांची पाने हवेत उडू लागली ...जोरजोरात वटवाघळे ..जंगली श्वापते ओरडू लागली ...आता वर्षा खूप घाबरली आणि पळत जाऊन हेमंतला घट्ट मिठी मारली ...तिच्या हाताची जखम पाहून हेमंतने मोबाईल खिशात ठेऊन स्वतःचा रुमाल खिशातून काढला आणि तिच्या हाताला बांधला 
हेमंत : काय ग ह्ये?काय झालं तुला ?
वर्षा: अरे किती भयानक वातावरण झालंय ..वीजा चमकत आहेत.  किती भयानक आवाज येत आहेत ..मला भीती वाटली खुप
हेमंत : अग व्हय ग ..पर तुझ्या हाताला काय झाल ते ईचारल मी..
वर्षा : अरे ते कापलं मला हाताला .  ती हे बोलत असतानाच जोरात आवाज आला ..बोल मुली काय हवंय तुला ? कधीपासून बघतीये मी .. तू माझं मंदिर, माझी मूर्ती स्वच्छ केलीस जे आजपर्यंत कोणी केलं नाही ...आणि तू तुझ्या रक्ताने माझ्या पायांवर अभिषेक केलास.. बोल मुली काय हवंय तुला ? का आली आहेस तू माझ्याकडे?वर्षाचे डोळे पाण्याने वाहू लागले ...तिला खूप आनंद झाला ...ती मूर्तीसमोर जाऊन गुढग्यावर बसली ...आणि सर्व घटना सांगितली..मला तुझा त्रिशूल आणि कपाळाच कुंकू हवं आहे ग माते...त्या माय लेकींनी आमचं जगणं मुश्कील केलं आहे ...माते आता तूच आम्हाला यातून वाचवू शकतेस ग..माझ्या आईच्या शक्तीपण तिला परत दे ग ...ती आमच्यासाठी इतके वर्ष पिशाच्च बनून राहत आहे ...तुझी उपासना करत आहे  .आज माझ्या प्रेमापोटी तिने तो नियम मोडला ...पण आता तूच एका मातेला वाचवू शकतेस ...
देवी : नक्कीच घेऊन जा तू हे ..तुझी आई माझी सेवा बरेच वर्षे करत आहे ...मी कित्येक शक्ती दिल्या आहेत तिला .आजून एक आता तुम्ही दोघी कधीही जवळ येऊ शकता तुझं आणि तीच मातृत्व कोणीही वेगळं करू शकणार नाही ..नक्कीच सगळं नीट होईल ...आणि देवी मातेची ती प्रचंड मूर्ती अचानक गडगडत लहान झाली ...घे मुली माझ्या कपाळाचा गंध घे ...वर्षाने ते कुंकु एक झाडाच्या पानात घेतलं ...देवीने तो त्रिशूल ही दिला आणि वर्षाच्या कपाळावर हात ठेवून यशस्वी हो असा आशीर्वाद दिला ..पुन्हा एक मोठा गडगडाट झाला आणि मूर्ती पूर्ववत झाली...तिने एकदा हेमंत कडे पाहिलं आणि म्हणाली.. याच खुप प्रेम आहे तुझ्यावर म्हणून तो तुझ्यासोबत इथे येऊ शकला ..नाहीतर तो मधेच मृत्यू पावला असता..याची साथ कधीही सोडू नकोस... हेमंतला समोर जे चालू आहे हे खरं की स्वप्न हेच समजत नव्हतं ...
आता वर्षा लगबगीने हेमंत जवळ आली तिने त्याचा हात हातात घेऊन स्वतःच्या खांद्यावर ठेवला आणि ताविजला नमस्कार करून प्रार्थना केली मला पुन्हा घेऊन चल..अरे हे काय ...ते जातच नव्हते ..आता काय करायचं .. इतक्यात आवाज आला ..मुली तो ताविज उजव्या  हातातून काढ आणि आता डाव्या हातात बांध जाशील तू योग्य जागी ..मग तिने तो ताविज सोडला आणि दुसऱ्या हातात बांधला...क्षणार्धात ते दोघे तिच्या आई समोर पोहोचले..
ती पळतच अंगणात गेली आणि तो त्रिशूल मातीत रोवला ...तिने मुक्तीला आवाज दिले आणि यांच्यासमोर ये अस सांगितल... मुक्तीला खुप यातना होत होत्या ती ओरडतच तिथे आली आणि त्रिशूळला हात जोडून बसली ...वर्षाने ते कुंकू मुक्तीच्या कपाळाला लावलं ..एक मोठा विजांचा गडगडाट झाला ...अचानक पाऊस पडू लागला ..त्यात सगळेजण भिजले...आणि मुक्ती पूर्ववत झाली ...ती आता सगळ्यांना दिसत होती ...वर्षांने पळत येऊन मुक्तीला मिठी मारली, आणि मुक्ती तिचे पटापट पापे घेत सुटली ...दोघी मायलेकीचं प्रेम बघून तिथे सगळ्यांचे डोळे भरून आले..पण अचानक मुक्ती घाबरली आणि तिने वर्षाला दूर लोटले ..
मुक्ती : अग आत्ताच या चुकीचं प्रायश्चित्त घेतलं आणि परत तेच ..आता माझ्या शक्ती पुन्हा जाणार..
वर्षा ; आग आई ..घाबरू नकोस ..कालिमातेने मला वरदान दिलंय की तुझं मातृत्व तुला मिळेल आणि आपण स्पर्श करू शकतो एकमेकांना..
मुक्तीला खूप आनंद झाला आणि तिने पुन्हा वर्षांला जवळ घेतले ...कितीतरी वेळ त्या दोघी अशाच एकमेकिंमध्येच रमल्या होत्या ...आणि अचानक तो ओळखीचा आवाज आला ....
क्रमशः

🎭 Series Post

View all