नियती - एक भयकथा - भाग 29

भयकथा

#नियती 
#भाग 29
©पूनम पिंगळे
तो आवाज ऐकून मी समजून गेलो हे सगळं मंदाकिनीने केलं आहे...मी जोरात ओरडलो : डॉक्टर माझी मुक्ती गेली रे ...ह्या.. ह्या..मंदाकिनीने तिला हवं ते केलंच रे ..आता मी काय करू ..
मंदाकिनी : काळजी करू नकोस मी आहे ना ...तुला तुझ्या पैशाचा खूप रुबाब होता ना ..तू खूप श्रीमंत म्हणून गरीब मुलींना  गैरपणे वागवत होतास ..आता बघतेच तुझ्या घरात कस कोण सुखी होतय ते आता मीच तुझी मुक्ती होणार ...हो मीच तुझी मुक्ती ...आणि अचानक रक्तबंबाळ मुक्ती उठून हसत माझ्या जवळ आली ..बाजूलाच वर्षा बेटा तू उभी होतीस ..तू खूप घाबरून गेली होतीस ...आणि अस अचानक मुक्ती उठून आली म्हणून तू पळतच आई आई अस ओरडत तिच्याकडे धाव घेतलीस आणि जनाक्काने तुला पटकन पकडलं ...
मंदाकिनी : ये बाळ ये माझ्याजवळ ये ...
डॉक्टर : नाही वर्षा ..बेटा ती तुझी आई नाही ...अजिबात जवळ जाऊ नकोस 
मंदाकिनी : ए डॉक्टरड्या तू तुझं बघ ना ...जा ना घरी तुझ्या लेकीची आणि बायकोची बस की काळजी करत ...तुला काय रे लई पुळका येतोय या संपतचा ..याच्या घरात मी कोणालाही सुखी होऊन देणार नाही..जर तुला पण दुःखी व्हायचं असेल तर बिनधास्त कर मदत याची ...
डॉक्टर मागे निघून गेला ...मला खुप वाईट वाटलं की अशावेळी डॉक्टरने पण माझी साथ सोडली ..पण पुन्हा विचार केला ..कदाचित मी पण हेच केलं असत ...ती आता माझ्या वर्षाकडे चालली होती...मी पटकन तिला उचललं आणि देवघरात जाऊन बसलो ...तिथे गुरुजींचा अंगारा होताच आणि माझ्या हातात अजूनही तो धागा होताच ...म्हणजे ती अजूनही आमचं काही वाकड करू शकणार नव्हती ..मी वर्षाला घट्ट छातीशी कवटाळून बसलो होतो पण हे काय  बाहेरून जोरजोरात जनाक्काचा आवाज येऊ लागला ...
जनाक्का: आग सटवे माझ्या सोन्यासारख्या सुनेचा जीव घेतलास तू ..आता माझ्या नातीच्या आणि पोराच्या जीवाच्या माग लागलीस तू ..तुला मी अस कधीच करू देणार नाही ...खरतर मंदाकिनी आता माझ्या मागोमाग मंदिराकडे यायला निघाली होती ..  आणि माझ्या काळजीपोटी माझी माय मध्ये आली होती ...आता जनाक्का आहे तिथेच वाकडी वाकडी होऊ लागली होती ..तिची केस कुणीतरी धरून तिला भिंतीवर आपटत होत ...तिच्या डोक्यातून ,नाकातून, रक्त वाहू लागले होते ...पण ही काही हार मानायला तयार नव्हती ...तिने अचानक हनुमान चाळीसा  म्हणायला सुरुवात केली,"जय हनुमान ग्यान गुणसागर जय कपिस तिहू लोग उजागर... त्याबरोबर ती मागे मागे जाऊ लागली आणि जोरात ओरडू लागली : ए म्हतारे बंद कर हे ...आजिबात म्हणू नकोस तू हे ...ए थेरडे ..पण जनाक्का ते म्हणतच राहिली ..
मी हे सगळं मंदिराच्या खिडकीतुन पहात होतो ...,जनाक्काची अवस्था मला पहावत नव्हती ..पण मी वर्षाला सोडून पण बाहेर जाऊ शकत नव्हतो ..इकडे जनाक्का चाळीसा म्हणतच होती आता मंदाकिनी ची ताकत कमी होत होती इतक्यात तिथे गावचे पुजारी त्यांचा मुलगा आणि डॉक्टर आले ...डॉक्टर च्या बाबतीत माझा गैरसमज झाला होता तर ..त्याने पुजारी आणि त्यांच्या मुलाला तिथे आणलं होतं.  आल्या आल्या पुजारी काहीतरी मंत्र उच्चार करत होते ..मधेच दादा ते होमकुंड मांड इथे ...अस म्हणत पुन्हा मंत्रोच्चार चालू होता ...तो दादा तसा लहानच होता मला वाटत वर्षा पेक्षा 5-6वर्षांनी मोठा असावा ...पण खूपच हुशार होता तो ..पुजारी सांगत होते ते तो अगदी भराभर करत होता ...त्याच व्यक्तिमत्व एकदम भारदस्त होत ...त्याचे काम करता करता मंत्रोच्चार सुरूच होते ...
इतक्यात जोरात हवा वाहू लागली ..जणूकाही वादळच आलं होतं मोठं ...त्यातून आवाज आला मंदा चल इथून नाहीतर ही लोक सोडायची नाहीत आपल्याला... त्या मुक्तीच्या शरिरा सोबतच चल ...चल लवकर ... मातीच्या लोटात कोणालाच काहीच दिसत नव्हतं ...आता मंदाकिनी तिकडे धावू लागली ...आणि दादाने तिला घट्ट पकडून तिच्या कानात ते मंत्र उच्चरायला सुरुवात केली ...ती तडफडु लागली होती ..त्या हवेच्या लोटातून एक हात बाहेर आला आणि लांब लांब होत मंदाकिनी जवळ आला ..त्या हाताने दादाला धक्के मारायला सुरुवात केली ..पण पिळदार शरीराचा दादा तिला तशीच झुंज देत होता.. काहीवेळात दादाने तो हात इतक्या जोरात खेचला की मंदाकिनीची आई त्याच्या समोर खेचून आली ...आता त्याने तिला आजून घट्ट धरून ठेवले ...पुजारी ही आपल्या मंत्रांचे उच्चारण करतच होते.. त्यांनी उच्चार करतच एक मोठं कुंकवाच वर्तुळ काढलं आणि त्यात शक्तीहीन झालेल्या मंदाकिनीला धरून बसवलं ...दादाने पण खेचत तिच्या आईला तिथेच बसवलं .. आज पुन्हा त्यांचं दहन होणार होत 
दोघांचे मंत्र असे काही एक सुरात चालू होते की ऐकणारा मंत्रमुग्ध होत होता ...आम्ही कोणीच काहीच बोलत नव्हतो ...आता मीही मंदिराच्या बाहेर आलो होतो ..वर्षा घाबरून जनाक्का कडे गेली होती ...वर्षा तिच्या जखमांना पाहून तुला तिनी मारलं ना ? आपण तिला मारुह अस बोलत होती .. आणि तश्यातही जनाक्काने तिला छातीशी घट्ट धरले होते ..आता त्या दोघीही अगदीच शक्तीहीन झाल्या होत्या ..मंदाकिनी जोरात ओरडत होती ...संपत तुझ्या मुलीला शरीरसुखाचा आनंद कधीही घेऊ देणार नाही ..जोपर्यंत ती त्यापासून दूर असेल मी तिला काहीही करणार नाही ...पण जर तिने ते घ्यायचा प्रयत्न केला तर मी तिला सोडणार नाही ...आणि तू ती रे पुजाऱ्याच्या पोरा ..तुझ पण वैवाहिक जीवन कधीच सुखी राहणार नाही  ..तुझी बायको जास्त काळ तुझ्या सोबत राहणार नाही...त्यांच्याकडे दुर्लक्ष करत पुजारी कमंडलूतले पाणी हाताने शिंपडत होते आणि दादा कुंकू ...काही क्षणात त्या दोघींनी पेट घेतला ...माझी मुक्ती तिच्यासोबतच जळून गेली ...त्यांची राख पुजाऱ्याने एक मडक्यात भरली आणि त्यातली अस्थी जी मुक्तीची होती ती दुसऱ्या मडक्यात भरली ...मुक्तीची अस्थी मला देऊन तो दुसरा मंडका घेऊन ते निघून गेले  .
मी धावतच गेलो आणि डॉक्टरच्या पायात पडलो  ..डॉक्टरने मला उठवले आणि घट्ट मिठीत घेतले ...
डॉक्टर : सांभाळ स्वतःला ...तुला आता वर्षाची पण कळजी घ्यायची आहे ...मुक्ती ची आईची जबाबदारी पण तुलाच घ्यायची आहे ...आम्ही दोघेही खूप रडलो ...मुक्तीच्या अस्थी हातात घेऊन खूप रडलो ...
जनाक्का माझ्या जवळ आली: पोरा उद्याच या अस्थी पाण्यात सोडून ये ...मुक्तीला शांती मिळायला पाहिजे रे ...
मी: हो ग जनाक्का... जातो मी उद्या ...आणि आईच्या गळ्यात पडावं तसा मी तिच्या गळ्यात पडून खूप रडलो त्या मायने पण तिच्या जखमा विसरून मला आधार दिला ...माझ्या डोक्यावरून हात फिरवून मला शांत केलं ...डॉक्टरने मला बाजूला करून जनाक्काला तपासलं ..भरपूर मार लागला होता तिला ...त्यांनी तिची मलमपट्टी करून, एक इंजेक्शन दिल ...गोळ्या दिल्या आणि आता जावा आराम करा थोडावेळ अस सांगितलं...
आता खूपच रात्र झाली होती ..डॉक्टर माझ्याच सोबत राहिला ...सकाळी लवकर उठून आम्ही आंघोळ,नाश्ता केला आणि डॉक्टरच्याच गाडीतुन जाऊन अस्थीविसर्जन करून आलो..येताना मला तिचा भास होतच होता ..मला खूप भीती वाटत होती ...मला तिचे ते शब्द आठवत होते जे ती मोठमोठ्याने ओरडून बोलली होती ..,मी मनावर दगड ठेऊन वर्षाला दूर देशात शिक्षणासाठी पाठवले ..सोबत जनाक्काला पण पाठवले ..गेल्याच वर्षी ती आम्हाला सोडून गेली ...इतके दिवस जनाक्काने वर्षाला इथे येण्यापासून दूर ठेवले होते ..पण।ती गेल्यावर वर्षा बाळ तू इकडे आलीस ..आणि हे सगळं ..
मी : वर्षा आता मला एक सांग काय केलं का कल तुम्ही दोघांनी ? कारण ती बोलत आहे की तुम्ही तिचा मार्ग मोकळा केला आणि आता ती तुम्हाला सोडणार नाही ..मला दोघे अगदी निःसंकोचपणे सांगा काय झालंय का तुमच्यामध्ये ?
वर्षा आणि हेमंत घाबरून एकमेकांना पाहू लागले ...नजर खूप काही सांगत होती ...पण..
क्रमशः

🎭 Series Post

View all