नियती - एक भयकथा - भाग 27

Horror

नियती 
भाग 27
©पूनम पिंगळे
हातातलं धागा काढताच मंदाकिनीने पाहिलं ती खूप खुश झाली ...आणि ती पटकन माझ्या जवळ आली..तिने माझा गळा दाबायला सुरुवात केली . .मी खूप घाबरलो ..माझा श्वास गुदमरू लागला ...मला अस वाटलं आता सगळे सुटतील मी गेल्यावर ...इतक्यात मुक्तीच माझ्याकडे लक्ष गेलं ..तिने येऊन मला एकदम छातीजवळ घेतल आणि तिने जोरजोरात डॉक्टरांना आवाज द्यायला सुरुवात केली ...नुकताच माझा ऑक्सिजन काढला होता ...मुक्तीने मला जवळ घेताच मंदाकिनी एखादा करंट बसल्याप्रमाणे लांब फेकली गेली ...कारण मुक्तीच्या हातात तो धागा अजूनही होता ना ..
मुक्तीचा आवाज ऐकून एक नर्स धावतच तिथे आली तिने मला ऑक्सिजन लावला काहीतरी इंजेक्शन दिल..आणि माझा अडकलेला श्वासमोकळा झाला ...आता मला बरे वाटू लागले होते ..पण मला राग येत होता खूप ..कारण अजून कोणाचीच सुटका झाली नव्हती ..जर तिने माझा जीव घेतला असता तर निदान बाकीचे सगळे सुखी झाले असते ...
इतक्यात समोरून डॉक्टर आणि नर्स आले ..डॉक्टरांनी माझे रिपोर्ट्स पाहिले ...बाकी सगळे रिपोर्ट्स चांगले होते ..मग अस अचानक का झालं ? डॉक्टर विचार करत होते ..मुक्तीने पाहिलं माझ्या हातात धागा नाही आहे ..तिने खाली शोधा शोध केली आणि तिला तो धागा सापडला ...तिने अगदी लगबगीने माझ्या हातात बांधला आणि अगदी अर्थपूर्ण नजरेने डॉक्टरांकडे पाहिलं ...डॉक्टरांना समजलं काय गडबड झाली असेल ...माझ्या भावना मिश्र होत्या ..मी वाचलो याचा आनंद आणि आजून सगळे तिच्या तावडीतून नाही सुटले याच दुःख ..
डॉक्टर: काय संपत कसा आहेस आता तू? अरे 9 दिवस मस्त आराम केलास तू? चला आता लागा कामाला... मुक्ती आज याला डिस्चार्ज देतों बरका...
मुक्ती : हो डॉक्टर ...आज घेऊन जाईन यांना घरी ...
मी : अहो डॉक्टर ..पण इतके नऊ दिवस मी का होतो इथे ? आणि मला तर अस वाटत आहे मी आत्ताच आलो इथे ..बर मग मी घरी कधी जाऊ? आणि मला झालं तरी काय?
डॉक्टर : मला तुझ्याशी यावर  बोलायचंय .. आपण बोलूया  या विषया संध्याकाळी ..काय मुक्ती चालेल ना? आत्ता याला घेऊन जा ...मस्त बेत करा आज जेवणाचा  ..मी येतो संध्याकाळी जेवायलाच ...मग बोलेन निवांत ..काय चालेल ना दोघांना? 
मी : अहो म्हणजे काय ? तुम्ही तर कधीही येऊ शकता..ते घर तुमचं पण आहेच की...,
मुक्ती : हो डॉक्टर.. नक्कीच मी बनवेंण आज मस्त बेत ..या नक्की तुम्ही ..बर आत्ता लगेच घेऊन जाऊ का यांना? 
डॉक्टर : काही फॉर्मलिटीज आहेत डिस्चार्ज च्या त्या करून निघा तुम्ही ...,माझ्या ड्रायव्हर ला सांगतो मी ..तो सोडेल घरी तुम्हाला..
मी : तुमचा  ड्रायव्हर? म्हणजे तो आहे आजून? 
डॉक्टर : अरे म्हणजे काय? तो कुठे जाणार? काहीही काय रे?
मी : हो ..ठीक आहे ..आपण बोलूया संध्याकाळी... खूप गोंधळून गेलोय मी..निवांतपणे सगळंच सविस्तर बोलावं लागेल मला ..या तुम्ही घरी मग बोलू आपण.. 
डॉक्टरांनी तिथल्या नर्स ला माझी डिस्चार्ज ची व्यवस्था करायला सांगितलं...आणि नंतर ड्रायव्हर सोबत आम्हाला घरी पाठवायची व्यवस्था करायला सांगितलं ..साधारण तासाभरात सगळं आवरून आम्ही निघालो ...त्या ड्रायव्हर ला बघून मला खूप भीती वाटत होती ..सतत झालेला घटनाक्रम माझ्या डोळ्यासमोर येत होता ..ते ड्रायव्हर चे भयानक डोळे..बदललेला आवाज ..शेवटी न राहवून मी त्याला विचारलंच
मी : काय रे तूच 9 दिवसांपूर्वी ..डॉक्टरच्या घरी भेटला होतास काय  मला ..
ड्राइवर : नाही हो ..मी तर गावाला गेलो होतो परत येऊन 3 च दिवस झालेत हो ..ते त्या रात्री तुम्हाला सोडून मी लगेच गावाला गेलो होतो ..
मी : अस होय ...बर बर 
मुक्ती माझ्याकडे विचित्रपणे बघत होती ...माझा असा प्रश्न तिला गोंधळून टाकणारा होता ..आम्हाला घरी सोडून तो गेला ..गेल्या गेल्या जनाक्का लगबगीने भाकरीचा तुकडा आणि पाणी घेऊन आली ..माझी मायच जणू ती ..,तोंडातल्या तोंडात पुटपुटत तिने ती भाकरी आणि पाणी 3 वेळा माझ्यावरून ओवळली आणि टाकून आली ..ये पोरा आत ये . आता कसा हाय रे तू? कुणाची नजर लागली पोराला माझ्या काय समाजना ग बाई ..आता तू आराम कर अग पोरी काय पथ्यपाणी हाय का याला?म्हणजे मला तस जेवण  बनवायला ग .
मुक्ती : नाही काही पथ्यं नाही ..तुम्हाला हवं ते सगळं बिनधास्त खायला घाला तुमच्या लाडक्याला!अस म्हणत मुक्ती मला पकडून घेऊन गेली आणि मग काहीतरी आठवलं म्हणून परत मागे गेलो  ..जनाक्काला सांगितलं, आज डॉक्टर जेवायला येणार आहेत मस्त बेत करा काहीतरी    
जनाक्का: हो जी . .करते की मस्त बेत  . अस बोलत ती तिथून गेली सुद्धा ... जनाक्काने मस्त बेत केला होता सगळ्या घरात नुसता घमघमाट सुटला होता ..आज मी पण खूप दिवसांनी  मस्त जेवणार होतो ..मला अस वाटत होतं की मी खूप वर्षां पासुन उपाशी आहे... थोड्याच वेळात डॉक्टर आले , आल्या आल्या त्यांनी विचारलं मुक्ती कुठे आहे? 
मी : डॉक्टर अहो पेशंट मी आहे की मुक्ती?
डॉक्टर : मी काय सांगतो ते नीट ऐक.. आता आपल्याला मुक्ती कडेही खूप लक्ष द्यावे लागेल, कारण मंदाकिनी एक तर तिला मारेला किंवा तुला ...मला सांग त्या दिवशी तू असा माझ्या घरात येऊन बेशुद्ध का पडला ? त्याच्या आधी काय घडलं होतं सगळं सविस्तर सांग मला..पण आपण जेवल्यानंतर बसूया निवांत ..म्हणजे जनाक्का वैगेरे आपल्यामुळे ताटकळत नको बसायला..
मी : हो खर आहे हे ...चला आपण जेऊन घेऊ या..मग निवांत बसू बोलत ...आणि आम्ही जेवायला गेलों 

क्रमशः

🎭 Series Post

View all