नियती - एक भयकथा - भाग 26

भयकथा

#नियती
#भाग 26
©पूनम पिंगळे
डॉक्टरच्या घराबाहेरच्या गर्दीने मी खूप गोंधळलो आणि घाबरलो होतो  ....काय झालं होतं नक्की ? मी खूप टेन्शन मध्ये ड्रायव्हर ला विचारलं 
मी : काय रे ? ही गर्दी कसली? डॉक्टर कुठे आहेत? 
ड्रायव्हर ; काहीच समजत नाय हो ..रात्री घरी येऊन जेवले मग शांत झोपले ..आणि मला झोपताना बोलले आपल्याला सकाळी लवकर  बाहेर जायचय 7 वाजता तयार रहा.मी आपला 7 वाजता आलो 8 वाजले तरी कोणी बाहेर नाही आलं तर मी बेल वाजवली...कोणीच दरवाजा उघडला नाही ...मी साहेबांच्या मोबाईलवर फोन केला...कोणी उचललाच नाही ...मला काहीतरी विचित्र वाटलं मग मी बाजूच्या घरातून काही लोकांना घेऊन आलो आणि आम्ही दरवाजा तोडला तर डॉक्टर त्यांची बायको आणि छोटी बेबी ....(त्याला आता रडू आवरत नव्हतं.)..रडतच तो बोलू लागला ..अहो छोटी बेबी पण...
मी : अरे काय झालंय सांग रे माझा जीव नको असा टांगूस ...सांग लवकर ..सगळे बरे आहेत ना ?बोल रे तू..
ड्रायव्हर: साहेब सगळ्यांच्या माना मोडून उलट्या फिरवल्या आहेत..डोळ्यातुन रक्त येत आहे....वहिनी साहेबांच्या तर बांगड्या फोडून त्या काचा डॉक्टरांच्या तोंडात आणि डोळ्यात घातल्या आहेत ...छोटी बेबी ला पण सोडलं नाहीये ..कोणी केलंय काही कळत नाही बघा ...देवमाणूस आमचे डॉक्टर आणि अस कोणी? आणि का करावं ?काहीच समजत नाही ...इतकं पशवीपणे कोणी मारलं असेल सगळ्यांना ? कोणी म्हणत भुताटकी ..कोणी म्हणत त्यांचं भांडण झाले असेल घरात ..हे पाहिल्याबरोबर मी पोलिसांना फोन केला ..पण आजून कोणी आलं नाही आता 1 तास होऊन गेलाय...तर त्या बाजूच्यानी सगळं गाव गोळा केलय बघा इथे...मला तर त्यांची अवस्था पाहिल्यापासून वेड लागेल की काय अस वाटत आहे...आणि लोक खुशाल बघत बसलेत त्यांना..
मी: अरे पण अस या लोकांनी पुढे जायला नको होतं..अशाने पुरावे नष्ट होणार ना रे तिथले ...
ड्रायव्हर: अहो साहेब हे इतके लोक मी एकटा..हे लोक माझं ऐकतील अस वाटत का हो तुम्हाला ...म्हणून मी आपला येऊन इथे उभा राहिलोय... आता पोलिस येतीलच अस वाटत आहे ...
मी पोलिसांना फोन केला आणि लवकर यायला सांगितलं ..तर ते चक्क म्हणाले आम्हाला फोन आलाच नाही कोणाचा...आम्ही आलोच ताबडतोब... मी तर आता पुरताच गोंधळलो होतो ..आता हा ड्रायव्हर का बरं खोट बोलत होता माझ्याशी? मी फोन झाल्यावर त्यांच्या पाठमोऱ्या खांद्यावर हात ठेवला  ..आणि बोलायलाच लागलो तर हे काय? त्याचे डोळे बदलले होते ... कोणीतरी लाल रक्ताचे गोळे बसवल्यासारखे त्याचे डोळे दिसत होते ...तो काळाकुट्ट आणि त्याचे सफेद दात विचकावीत माझ्याकडे बघून भयाण हसत होता..
मी : ए काय रे ? काय झालं तुला अचानक? अत्ता तर बरा होतास तू..
ड्रायव्हर : काय म्हणाले पोलिस ?कधी येतायत?आणि तो जोरात हसू लागला ...
मी एकदम गोंधळलो.. याला काय झालं असं ? आणि त्याचा आवाज बदलला ..अरे मी आहे मी ..ओळखलं नाहीस मका तू? मी मंदाकिनी...मी तर चक्कर येऊन पडणारच होतो ..इतक्यात तिथे पोलीस आले आणि त्यांनी मला पकडलं ..
पोलिस : काय ओ साहेब काय झालं? कोणाचा खुण झालाय? 
मी त्यांना घराकडे बोट दाखवलं अरे देवा तिथे तर कोणीच नव्हते ..माझ्या समोरचा ड्रायव्हर पण गायब होता ...मी वेड्यासारखा पळत डॉक्टरच्या घरात गेलो तर ते मस्त जेवत होते ...टीव्ही चालू होता आणि त्यावर चालू असणाऱ्या गाण्यावर त्यांची छोटी परी नाचत होती...पोलिस माझ्या मागोमाग आले..त्यांनी विचारलं बोला साहेब कोणाचा खून झालाय?कुठे आहे डेड बॉडी? 
मी वेगळ्याच शॉक मध्ये होतो आणि आता मी चक्कर येऊन खाली कोसळलो ..पुढे काय झालं मला काहीच माहीत नाही ..जेव्हा मला शुद्ध आली मी डॉक्टरच्याच  हॉस्पिटलमध्ये होतो ..हाताला सलाईन होते..बाजूला व्हेंटिलेटर लावलेलं होत ....मुक्ती पण आली होती तिथे ...सगळे काहीतरी बडबड करत होते..खूप टेन्शन मध्ये दिसत होते ..मी स्वतःच्या अंगावर हात फिरवुन पहिला की मी जीवंत तर आहे ना? हे सगळे इतके का टेन्शन मध्ये आहेत? मी मुक्तीला आवाज देत होतो ..डॉक्टरला बोलावत होतो पण त्यांना माझा आवाज जात नव्हता ..आता हे काय होत होत माझ्यासोबत? माझा आवाज का कोणाला जात नव्हता ? माझं लक्ष बाजूला गेले तर तिथे मंदाकिनी आणि तिची आई बसल्या होत्या ...म्हणजे मी तिच्या आईला ओळखत नव्हतो पण तिला साथ तीच देणारी नक्की तीच असणार ना,...तिच्याबाजूला अस दुसरं कोण बसणार ना ..
मी चिडून मंदाकीनीला : काय ग ए बाई ..आग मला मारून तरी टाक.. का असा छळ करतेस तू?ते काय होत सगळं जे सकाळी झालं ?
मंदाकिनी ; हसतच कोणती सकाळ रे..आजची का? अरे 9 दिवस झाले तू बेशुद्ध आहेस आज तर जागा झाला आहेस..पण तुझा आवाज आणि शुध्दीवर आला आहेस हे आम्ही त्यांना समजूचं देणार नाही ..मी तर तुला माझ्यासोबत नेणार आहे ना ..वाटलं होतं मेला असशील तू ..आणि येशील माझ्या बरोबर कसलं काय तू तर आजून जीवंतच.. आता तुला मारून घेऊन जाणार मी..अस वाटलं होत तुला मारावे पण तुझ्या हातात तो धागा आहे ना त्यामुळे तुझ्या जवळ नाही येता आलं आम्हाला ..पण तुला बोलू नाही देणार आम्ही कोणाशीच... आता तुला कस मारायचं हा धागा कसा काढायचा तुझ्या हातातून तेच ठरवतोय आम्ही दोघी..
मी : ए बाई ...आजून किती छळणार मला आणि माझ्या माणसांना ? तू घेना जीव माझा ..हा धागा काढतो मीच थांब...अरे देवा माझा हात तर बांधलेला होता ..कदाचित सलाईन हलत असावी म्हणून असेल ..मी त्या दोघींना बोललो हात सोडा माझे मी धागा खोलतो 
दोघी हसायला लागल्या ...अरे मूर्खा मग आम्ही तुला मारलं पण असत की केव्हाच ...आम्ही तुला हात नाही लावू शकत..त्या धाग्यामुळे ...
मी : बर मग अस करा माझा आवाज त्यांना जाउद्यात मग ते माझे हात सोडतील 
मंदाकिनी : अरे ते बांधले पण अमच्यामुळेच आहेत 
मी : म्हणजे मी नाही समजलो
मंदाकिनी : आम्ही तुला मारण्यासाठी तुझ्या आजूबाजूला हे जे मशीन आहेत सलाईन स्टँड आहे त्याला हलवत होतो आणि त्यामुळे तुझे हात हलत होते ..मग त्यांना भीती वाटली आणि त्यांनी तुझे हात बांधून ठेवले..
मी : अच्छा अस झालं होय.. मग आता मला त्यांच्याशी बोलुद्या मग ते हात सोडतील माझा ..कारण मी आता शुध्दीवर आलो ना...तेव्हा मी बेशुद्ध होतो ..
मंदाकीनीने काहीतरी विचार करून हवेत हात फिरवला आणि माझा आवाज डॉक्टरला गेला..डॉक्टर धावतच आले ...त्यांनी माझे हात सोडले ...नर्सला बोलावलं आणि काहीतरी इंजेक्शन दिल.....आता सगळे खुश झाले होते ...मुक्ती तर रडतच माझ्या जवळ आली होती...तिच्या हातात पण तसाच धागा होता ... 
मी : काय ग मला काय झालंय? आणि हा धागा कशाला बांधलास माझ्या हातात ?तुझ्या पण हातात आहे ...ऐक ना माझ्या हातातला हा धागा काढ ना.. मलाखूप uneasy होतय ग..
मुक्ती : नाही ..नका काढू  .तुमच्या संरक्षणासाठी आहे तो...ऐका माझं ..आज एकतर 9 दिवसांनी तुम्हाला बघत आहे बोलताना ...तुम्हाला काय झालं तर माझं काय होईल वर्षा काय करेल ?
मी मनात : आग मी गेलो की सगळं नीट होईल ...तीच लक्ष नसताना मी पटकन तो धागा हातातून काढला आणि मंडकीनीने पाहिले ....
क्रमशः

🎭 Series Post

View all