नियती - एक भयकथा - भाग 25

हॉरर

नियती 
भाग 25
आम्ही सगळे विचारात पडलो होतो कोणाला बघून मुक्ती अशी बेशुद्ध झाली ? कोण ?कोण असेल ती? आम्ही तिची शुद्धीवर यायची वाट बघत होतो ..कोणअसेल बर?मंदाकिनी? ती परत आली की काय? नाही ते कसं शक्य आहे ? मग अस घाबरण्यासारखं काय दिसलं तिला ?
जनाक्का नेहमीप्रमाणे डॉक्टरांना घेऊन आली ..डॉक्टरांनी तिला तपासलं...तिचं ब्लडप्रेशर वाढलं होत ..
डॉक्टर : काही टेन्शन आहे का घरात? काही भांडण बिंडण झालंय का? कशाचं टेन्शन आलय हिला? ...
मी : अहो डॉक्टर काहीच समजलं नाही, तिला पाहिलं म्हणत बेशुद्ध पडली ..आता कोणाला पाहिलं काही समजत नाहीये
डॉक्टर : कोणाला पाहिलं हिने ? मंदाकिनी? ती तर नाहीना आली ? पण ते कसं शक्य आहे? बोलता बोलताच डॉक्टरला दरदरून घाम फुटला मी देतो ती औषधे वेळेवर द्या ..चला निघतो मी ..पण जर ती खरच आली असतील तर? खरच खूप मोठा प्रॉब्लेम आहे ..संपत आपल्याला काळजी घ्यायला हवी सगळ्यांची .  तुम्ही सगळे काळजी घ्या..इतक्यात मुक्ती शुध्दीवर आली ...
मुक्ती :अरे डॉक्टर तुम्ही कसे काय आलात?आणि हे काय अहो तुम्ही आणि जनाक्का असे का थांबलात इथे? 
डॉक्टर: मुक्ती आता कस वाटत आहे तुला? 
मुक्ती: मी छानच आहे !..मला काय धाड भरलीये तेव्हा ? 
आम्ही सगळे गोंधळून गेलो होतो तिच्या या उत्तराने..
मी : मुक्ती आग तू मघाशी कोणाला पाहिलस? तू का ग घाबरलीस?
मुक्ती : हसत ..काहीही काय बोलताय ..मी कधी घाबरले तेव्हा ? आणि कोण दिसणार मला ?? मला तर तुम्हीच घाबरलेले दिसताय.. आणि ती हसू लागली ..बर डॉक्टर आज कस काय येन केलंत? जनाक्का तुम्ही अश्या उभ्या का? अहो जावा की चहा आणि काहीतरी खायला आना की डॉक्टरांना..आणि अचानक तिने पोटाला हात लावला ..सगळे घाबरले के झालं ...
मुक्ती : मला किती भूक लागलीये बापरे ...डॉक्टर सॉरी पण मी जाते आता जरा जेवते, तुम्ही आणि संपत बसा बोलत ..आणि ती निघून गेली सुध्दा ..
डॉक्टर : संपत अस कस रे? ही तर सगळंच विसरून गेली? आता समजणार कस कोण आलं होतं? आपल्याला आता काळजी घ्यावी लागेल ..मी पूजारीना भेटतो ..बघतो काय म्हणतायेत ते.मी पूर्ण पणे  शॉकमध्ये होतो ..मी काही न बोलता फक्त मान हलवली ..डॉक्टरांनी माझ्या खांद्यावर थोपटत ,चल येतो रे मी ...अस म्हणत ते गेले..
मी खूपच विचारात पडलो होतो ..मग म्हटलं चला जरा शेतावर जाऊन यावं...म्हणून मी शेतात गेलो ..पदोपदी कोणीतरी मागे येतंय अस जाणवत होतं..कोणीतरी मध्ये मध्ये खांद्याला स्पर्श करत आहे असं भासत होत.. काहीच समजत नव्हतं...शेतातले कामगार आता घरी निघत होते ...सगळे मला येतो जी म्हणून गेले ...मी आमच्या विहिरीजवळ आलो ..हो तिचं विहीर जिथे मी आणि मंदाकिनी प्रथम भेटलो होतो ..आणि जिथे मी माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक केली होती..इतक्यात कोणीतरी माझ्या खांद्यावर हात ठेवला ..मी घाबरलो ...घाबरतच मागे पाहिलं तर धोंडू दादा ..आमचा शेताचा राखणदार..
धोंडू : काय झालं मालक? आज इथ कसकाय? तुम्हांस्नी पाणी पायजेल का ? आन्तु जी..
मी : नाही नाही ..खूप दिवस झाले शेतावर आलो नव्हतो ...म्हणून आलो होतो आज..कस काय चालू आहे सगळं ?
धोंडू : समद लई भारी चाललंय ..शेतात पीक बी लई जोमात हाय.... पर कालच्याला...अस बोलून तो थांबला ...काहीतरी न सांगताच तो निघाला ..
मी : थांब धोंडू ..कालच्याला काय झालं? काय न बोलताच चालला तू?
धोंडू : काय बी नाय जी. असाच आपलं ..
मी : धोंडू आता सांगशील का?
धोंडू : काल ...म्हंजी ..काय न्हाय वो तुम्ही नगा इचार करू..आम्ही करू समद नीट..
मी : काय झालंय? काय नीट करणार तू? धोंडू मला सांग बर नीट 
धोंडू : काल दुपारच्याला गंगी, आपली खुरपणी करती न्हवं ती, इथं विहिरीजवळ आली व्हती पाणी प्याया... आन त्या झाडाच्या माग तिला हसायचा आवाज आला ..तव्हा ती तिथं गेली ...पर कुणीच नव्हतं तिथं..तिला वाटलं भास झाला जणू ..ती परत आली आणि पाणी प्याया लागली तर कुणीतरी तिला हिरीत खेचाय लागल व्हत ....ती लै जोरात ओरडाय लागली आणि आम्ही समद आलो इथं तव्हा ती जवळजवळ हिरीत पडणारच होती, आम्ही समद्यानी तिला वढीत बाहेर आणली ..तिचं अंग निस्त तव्यागत गरम झालं व्हत..पर आम्ही तरीबी तिला वढली... आणि तिच्या घरी नेलं...लई ताप हाय कालापासन तिला.. वैद्य बुवांनी दिलंय औषध बघू काय हुतय...
मी: अरे अस कस होईल? कोण तिला विहिरीत ओढले बर? आणि हे इतकं घडलं आणि मला सांगितलं नाही तुम्ही? 
धोंडू : जी तुमच्या माग लै व्याप अस्तुया मग त्यात आमचं ह्ये गाणं कुठं वो ...म्हणून नाय सांगितलं वो
मी : मला घेऊन चला घरी तिच्या..कुठे राहते ती?
धोंडू : अव्ह कशापायी? आम्ही करतू समद नीट ..
मी : नक्की ना ? की येऊ मी ? चला 
धोंडू: नाही जी होईल समद नीट ..चला येतू मी आता 
मी: बर या ..चालेल ..आणि काही लागलं तर सांगा नक्की ..संकोच करू नका 
धोंडू : नाय जी ...काय लागणार न्हाय पर लागलं तर नक्की सांगतु तुमास्नी..बर आता येतू मी ..तो गेला मी तिथेच बसून विचार करत होतो ..कोण असेल गंगी ला विहिरीत ओढणार? काय झालं असेल नक्की? ..आणि इतक्यात मला आवाज आला .. शुsssक शुsssक..मी आजूबाजूला पाहिलं तर कोणीच नाही ..मी खूप घाबरलो ...इकडे तिकडे पाहू लागलो ...त्यात आता अंधार पडला होता ..सगळीकडे नुसता अंधारच अंधार होता ...मला दरदरून घाम आला होता..आता मला पैंजण आणि कोणाचा तरी हसण्याचा आवाज आला.. मी आवाजाच्या दिशेने निघालो ..कोणीच दिसलं नाही ..पण मी पण त्या विहिरीजवळ आलो होतो ..,हे लक्षात येताच मी तर खूप घाबरलो ...तिथून निघायचा प्रयत्न करू लागलो पण हे काय मला तिथून हलताच येईना ...एक थंड स्पर्श मला माझ्या हाताला जाणवला पण दिसत कोणीच नव्हतं..
मी : क...क..कोण...कोण आहे इथे? समोर या ...माझ्याशी बोला ..काय हवंय ? काय हवंय काय तुम्हाला ..
तर फक्त हसायचं आवाज आला ...अगदी मंजुळ आवाज म्हणजे ही कोणी स्त्री होती ...पण कोण होती? काय...काय ही ती ..ती होती का? पण ती कशी येईल? नाहीं नाही ते शक्य नाही ..अस मी स्वतःशीच बोलतहोतो... इतक्यात मागून आवाज आला माझ्या कानात ...तोच तो ओळखीचा श्वास ...आणि आवाज ..का रे ? का नाही शक्य ? मीच मीच आहे ती ..तुला काय वाटलं गेले मी ? हाहा अरे इतकं सोपं नाही मला घालवणं  ..तुझ्या सात पिढ्यांना सुखाने जगू देणार नाही मी ...तू माझा विश्वासघात केलास आता मी काय करते ते बघ...
मी तिला सतत माफी मागत होतो पण ती काही ऐकतच नव्हती ...म्हणजे आज मुक्तीला हीच दिसली होती आता मला वर्षा बाळ तुझिपण खूप काळजी वाटू लागली होती ...
तिने मला सांगितलं तुझ्या वंशात कोणालाच शरीरसुख घेऊ देणार नाही ...ज्या शरीराला तू भुललास आणि माझा फायदा घेऊन तू मला दूर लोटलस... तेच सुख तुम्हा कोणालाही घेऊ देणार नाही मी ..ती निघून गेली ..मी अगदी विच्छिन्न मनाने घरी आलो ..,वर्षा बेटा तू अंगणात खेळत होतीस मी तुला पटकन जवळ घेतलं आणि तुझे पापे घेतले ..तू रागात स्वतःला सोडवून पळालीस..मी घरात जाऊन कपडे बदलले आणि डॉक्टरला फोन केला..खूप वेळा फोन करूनही त्यांनी उचलला नाही .. मला वाटलं झोपले असतील ...मी विचार केला आता उद्या सकाळी बोलूया त्यांच्याशी ...
सकाळी लवकर सगळं आटोपून मी डॉक्टर कडे गेलो तर त्यांचा ड्रायव्हर बाहेरच होता   घराबाहेर खूप गर्दी झाली होती ...काय झालं होतं आत? अचानक इतकी गर्दी ? 

©पूनम पिंगळे
क्रमशः

🎭 Series Post

View all