नियती भाग 18

Horror

नियती 
भाग18
आता मुक्ती आणि मी पुरते घाबरलो होतो मागे पुढे घाबरून बघत होतो ...तर गुरुजी तिथे खूप लांब नजर लावून बोलत होते ...इतक्यात तिथून लांबून हसायचं आवाज आला 
मंदाकिनी : खूप भयानक हसत होती - अरे देवाच्या भक्ता तू काय करणार रे मला ? अरे या दोघांना सोडणार नाही मी ...हे एक झाले तर ती मरणार ना ...हाहाहह मग मी यांना एकत्र करणार आणि मग संपतराव माझाच ...काय करशील तू बोल रे बोल ..
गुरुजी खूप चिडले होते त्यांचे डोळे लाल लाल झाले होते..ते रागाने थरथर कापत होते ..त्यांचा तेजाने झळकणारा चेहरा आता तप्त ज्वालामुखी सारखा झाला होता ...डोळे जणू आगच ओतत होते ..त्यांचा रुद्रावतार बघून सगळेच घाबरले होते..त्यांनी रागातच लोट्यातल पाणी कसला तरी अंगारा त्या दिशेने फेकला ...चल चलती हो इथुन ..तुला कस वठणीवर आणायचं मला चांगलं माहीत आहे ..तू आधी इथून निघून जा ...मला शरण आलेल्या माझ्या भक्तांना कस वाचवायचे मला माहित आहे तू तीच काहीच वाईट करू शकणार नाहीस ...आणि आवाज बंद झाला ..
पण आम्ही घाबरलेलेच होतो ..,ती काय करणार हे बोलली होती आम्हाला आणि त्यामुळे खूप जास्त टेन्शन आलं होतं आम्हाला ..आमच्या मागेच लाला उभा होता ..तो तर डोळे मोठे करून आणि आ वासूनच बघत होता हा सगळा प्रकार..मग मुक्तीने गुरुजींच्या पायावर डोकं ठेवलं 
मुक्ती : गुरुजी आता तुम्हीच काय तो मार्ग दाखवा ..माझं सौभाग्य वाचवा कोण आहे ती ? तिच्यापासून आमचं रक्षण करा ..मला हे सगळं माहीतच नव्हतं मी तर माझ्या मंगल दोषावर  उपायांसाठी आसनी तुमचा आशीर्वाद घ्यायला आले होते ...मला मार्ग दाखवा गुरुजी ..तुम्ही म्हणाल ते करेन मी..
गुरुजी : ती उगाच नाही आली इथे..काय हो नवरदेव बरोबर ना? सांगा तुमचे प्रताप तुमचया बायकोला ..(मी एकदम मान खाली घातली ..मला काय बोलावं हेच समजत नव्हतं ..)अग त्या पोरीला यानी फसवलंय...तिच्या भावनांशी खेळलाय हा ..ती सध्या अर्ध पिशाच्च आहे ..ती याच्याच मूळे.. तीच शरीर तिकडे हॉस्पिटलमध्ये आहे ..आणि आत्मा असा बाहेर फिरत आहे ..
मी : एकदम न राहवून - म्हणजे? काय असत हे अर्धपिशाच्च?म्हणजे ती मेली ना . आणि हे तीच भूत ना ?
गुरुजी : नाही ती ना मेली ना जीवंत ...मधेच आहे दोन्हीच्या  .आणि तिला काळीं जादू माहीत आहे .  त्याच्याच आधारावर ती हे सगळं काही करत आहे ..पूर्ण पिशाच्च किंवा पूर्ण मनुष्याचा बंदोबस्त करता येतो ..पण ही जरा अवघड आहे . पण मी माझे पूर्ण प्रयत्न करणार पोरी ..तू काळजी करू नकोस ..फक्त तू आणि तुझा नवरा दोघाना मी काही गोष्टी करायला सांगेल त्या कराव्या लागतील ..जर त्यात चूक झाली तर मी काय देव सुद्धा तुमची मदत करू शकणार नाही ..जर कबूल असेल तर संगतो नाहीतर या तुम्ही दोघे 
मुक्ती : गुरुजी ..आजपर्यंत तुमचा कोणता शब्द टाळलाय का मी? मग हा तर माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे ..सांगा तुम्ही आम्ही करू सगळं..
गुरुजी अचानक इकडे तिकडे पाहू लागले। आणि उभे राहून रागात पाहू लागले..जोरात ओरडले काय ग ए परत आलीस तू आणि पुन्हा तो अंगारा काहीतरी मंत्र म्हणून दरवाज्याच्या दिशेने फेकला त्याअंगाऱ्यातून एक आकृती तयार झाली ..होय ती मंदाकिणीच होती .खूप चिडलेली दिसत होती ती ...
ती रागाने ओरडली : हो आत्ता जाते इथून ..अरे म्हाताऱ्या तू काय वाचवणार यांना ? आधी स्वतःला वाचव, ती अदृश्य झाली..
मी , मुक्ती आणि लाला डोळे फाडून घडलेला प्रकार पहात होतो ....आम्हाला हे खरं आहे की एखादं स्वप्न हेच समजत नव्हतं
गुरुजी : पोरांनो आता पुढे सगळं तुम्हालाच करायचं आहे. मी फक्त वाटाड्या आहे मार्ग दाखवणार पण शेवटी सगळं तुम्हालाच करावं लागणार आहे   त्या काळ्या जादूने ती खूप शक्तिशाली झाली आहे..कदाचित मी पण अपुरा पडेल तिला थांबवायला..पण तुमचं प्रेमच वाचवेल यातून तुम्हाला..
आता मी काय सांगतो ते नीट ऐका आणि तसच करा ..दोघांच्या कानात त्यांनी काहीतरी सांगितले ..आणि आता त्यांचे चेहरे थोडे विजयी दिसत होते..गुरुजींनी दोन धागे दिलेते दोघांना एकमेकांना बांधायला सांगितले बांधताना म्हणायला सांगितले ,"मी तुझा आहे तू माझी .कोणी जरी आलं तरी असेच राहू आपण नेहमी एकमेकांचे..कोणी जरी आलं तरी काही करू शकणार नाही आपलं..आणि मग त्यांनी असेच हात पकडून गुरुजींचे आशीर्वाद घेतले .आणि आम्ही निघालो

@पूनम पिंगळे
क्रमशः

🎭 Series Post

View all