नियती - एक भयकथा - भाग 17

Horror

नियती 
भाग17
मग मुक्तीने माझा हात हातात घेतला आणि जवळजवळ ओढतच हॉटेलमध्ये घेऊन गेली ..हॉटेल खूप छान होत ...लाला आल्या आल्या फ्रेश व्ह्यायला गेला आता मी आणि मुक्ती एक छान कोपरा पाहून त्या टेबलावर बसलो 
मी : आग तुला पण फ्रेश व्हायचं असेल ना? जा तु जाऊन ये
मुक्ती : नाही ..तुम्हाला एकट्याला सोडून नाही जाणार ..थांबा लाला येउद्यात मग जाते मी
मी तिच्याकडे रोखुन  पाहिलं तिला काय मी खरच वेडा वाटत होतो की काय? मला आता खुप कसतरी वाटत होतं ..ही मंदाकिनी मला वेड लावूनच सोडणार होती वाटत..इतक्यात लाला आला..आणि मुक्ती लगबगीने उठली 
मुक्ती : लाला यांच्यावर लक्ष ठेवरे मी आलेच आणि काय खायचंय तुला ते पण बघ..आणि वॉशरूमकडे गेली ..इकडे माझी वाट लागली होती मंदाकिनी मला लालाच्या बाजूला बसलेली दिसत होती ..ती नजर रोखून मला बघत होती आणि खूप भयानक हसत होती 
मी : आग ए अस हसू नकोस वेडी बोलतील लोक तुला..का त्रास देतीयेस मला? जा ना बाई ..मी हे मंदाकीनीला बोलत होतो, पण बाकीच्यांना ते मी खुर्चीला बोलत होतो..अस वाटत होतं..लाला खूप विचित्र नजरेने मला बघत होता त्याने मोबाईल हातात घेतला आणि मी तो खेचून घेतला..तो जास्तच घाबरला..
मी: काय रे आता काय फोन करणार मि वेडा आहे हे सांगणार काय? चमचा कुठला..
लाला:नाही मी ताईंना फोन करत होतो ..लवकर या म्हणून 
मी : गप रे ..तुन सारखा मध्ये मध्ये ..बघ बरका गप बस नाहीतर तुझं खर नाही इतक्यात मुक्ती आली 
मुक्ती : हे काय?  ऑर्डर नाहीका दिली काही? अरे लाला तुला काय सांगितलं होतं मी ..बर आता तुम्हीच बघा मेनुकार्ड आणि ठरवा ..
मी आजूनपण त्या खुर्चीकडे  एकटक बघत होतो..आणि लाला माझ्याकडे बोट दाखवून मुक्तीला हातवारे करून माझ्या डोक्यावर परिणाम झालाय हे सांगत होता..मुक्तीने माझ्या खांद्यावर हात ठेवला मी दचकलो
मुक्ती : अहो  काय झालं ? इतके का घाबरला?
मी : कपाळाचा घाम पुसत - न न नाही ग ..मी , मी कुठे घाबरलो? 
मुक्ती : बर काय खायचंय बघा बर ..
मी: अग तू मागावना तू मागवशील ते खाईल ग मी..बायको आहेस तू माझी ..
मग मुक्तीने लालाकडे पाहिलं तसा लाला पटकन म्हणाला : ताई मला इथला डोसा आणि इडली सांबार खूप आवडत मला तेच मागवा मुक्तीने होकारार्थी मान हलवली आणि सगळ्यांसाठी तीच ऑर्डर दिली..लवकरच खाऊन आंम्ही निघालो ।.इतकावेळ कोणीच कोणाशी बोललं नाही ..माझी तर अवस्था इतकी खराब होती की बिल आलं आणि ते भरायची पण शुद्ध नव्हती मला ..,मी जसा काही संमोहित झालो होतो..खाताना चहा पिताना पण त्या खुर्चीतल्या मंदाकिनीलाच बघत होतो.मग काय बिल मुक्तीनेच भरले आणि मी भारावलेल्या अवस्थेत त्यांच्या मागोमाग निघालो ..
मुक्तीच्या चेहऱ्यावर काळजी आणि लाला घाबरलेला दिसत होता ..मुक्तीने माझा हात धरून मला गाडीत बसवलं ..पण ती खूप अस्वस्थ झाली होती ...आणि ही मंदाकिनी मला तिच्याशी बोलूच देत नव्हती ..
आजून एक तासभर असाच गेला आणि आश्रमात पोहोचलो ..मंदाकिनी गायब झाली ...आणि मी अगदी नॉर्मल झालो ..मी मुक्तीच्या खांद्यावर हात ठेवला ..ती आधी दचकली आणि मी ज्या पद्धतीने तिला पाहिलं ती लाजली.
मुक्ती : इश्श हे काय? आपण पोहोचलोय गुरुजींकडे ..चला उतरा आता गाडीतून ..
मी : हो ग खूपच प्रसन्न वाटत आहे मला इथे..आणि दोघे गुरुजींच्या कक्षाकडे गेले ..खूपच भव्य होत हे सगळं अगदी मनाला शांतता देणार...
आम्ही गुरुजींच्या जवळ गेलो आणि ते जोरात ओरडले : थांब पुढे येऊ नकोस ..तुझी हिम्मत कशी झाली इथपर्यंत यायची ? चालायला लाग इथून
मी आपला दचकून : न नाही ..म..म..माझी बायको आहे मुक्ती तिने आणलय सोबत 
गुरुजी : मी तुला नाही..तिला बोलतोय..
मी आणि मुक्ती एकदमच बोललो: ती ती कोण?
©पूनम पिंगळे

क्रमशः

🎭 Series Post

View all