नियती - एक भयकथा - भाग 16

एक भयकथा

नियती 
भाग 16
सकाळी सकाळीच घराबाहेर पडलो जाताना मनात खूप काही चालू होतं .मंदाकिनी कशी असेल ? काल जे मला मध्ये मध्ये दिसत होतं ते खरं आहे का? मी आणि मुक्ती कधीच जवळ येणार नाही का?असे असंख्य विचार इतक्यात माझं लक्ष गाडीला असणाऱ्या आरश्याकडे गेलं ..अरे बापरे मला मुक्तीच्या जागी मंदाकिनी दिसत होती ..मी एकदा आरश्याकडे आणि एकदा बाजूला बघात होतो ..बाजूला तर भक्तीच होती पण आरश्यात? अरे हे काय होत होत माझ्याबरोबर.. मला आता वेड लागेल की काय असच वाटत होतं.. मुक्तीला पण यातलं काहीच सांगू शकत नव्हतो..काय करू काही समजत नव्हतं ..मी हळूच मुक्तीचा हात हातात घेतला आणि तिच्या डोक्याला डोकं लावलं आणि प्रेमाने तिला बोललो ए समोर आरश्यात बघ ना आपली जोडी कशी छान दिसत आहे ..तो मंगळ पण असेच म्हणेल आणि आपल्याला काही करणार नाही बघ ..
तीने पण आरश्यात पाहिले ...हे खरंच भयानक होत मला तर मंदाकिनीच दिसत होती ..आणि ती फक्त लाजली म्हणजे अर्थातच तिला ती स्वतः दिसत होती काय होत आहे हे सगळं? याला म्हणतात तोंड दाबून मुक्क्यांचा मारा ..मला तर आता अस वाटत होतं ही म्हण माझ्यासाठीच बनली आहे ..मी ना कोणाला काही सांगू शकत होतो...ना काही उपाय करू शकत होतो..
अचानक डोक्यात एक कल्पना आली ...माझ्याकडे हॉस्पिटलच्या एका डॉक्टर चा नंबर होता तसा तो माझा मित्रच होता..मी त्याला फोन करून विचारायच ठरवलं पण मुक्ती समोर मी तिला कॉल करूच शकत नव्हतो.. मग मी ड्रायव्हर ला गाडी बाजूला घ्यायला सांगितलं ...
मुक्ती : का हो काय झालं?
मी: अग निसर्गाचा कॉल
ड्रायव्हर: साहेब पुढे चांगलं हॉटेल आहे आपण तिथेच थांबुया की ..मग जेवता पण येईल..
मी: ते तर  आपण थांबुच रे पण आत्ता पण थांबव
ड्रायव्हर: अस म्हणताय का? बरं थांबतो  .तस तर मला पण जायचय..
मी: हिला एकटीला सोडून नाही जायचं आधी तू जाऊन ये मग मी जातो
ड्रायव्हर: नाही नाही मी जाईन हॉटेलमध्ये गेल्यावर..
मी : बर
आणि त्याने गाडी थांबवली..मी भर्रकन खाली उतरलो आणि जरा झाडांमध्ये गेलो ..पटकन फोन काढला..पण छे मोबाईलला रेंजच नव्हती ..मग काय आपलं कार्य उरकून मी गाडीत आलो ...अरे हे काय दोघेपण गाडीत नाही ...आणि ड्रायव्हर च्या सीट वर मंदाकिनी??मी तर आता खूप घाबरलो ओरडू लागलो ..आग ए बाई तू इथं काय करतेस?ती काहीच बोलत नव्हती फक्त माझ्याकडे बघून हसत होती ..मी चिडलो : ए बाई काय चालवलं आहेस तू सगळीकडे नुसतं मध्ये मध्ये ? हे दोघे कुठे गेले ? आणि तू काय करतेस इथे ..इतक्यात मला हसायचा आवाज आला ..मुक्ती आणि लाला दोघे हसत होते मला , आपापल्या जागेवर बसून ..मी ओशाळलो.. खाली मान घालून मुकाट्याने जागेवर बसलो .. मुक्ती आजूनपण हसत होती..आणि लाला तर काय, त्याच हसू थांबतच नव्हतं
मुक्ती : काय हो काय झालं तुम्हाला अस? बिचाऱ्या लाला वर असे का ओरडले ? ते पण त्याला बाई बोलले तुम्ही? हे सगळं ती मला चिडवत बोलत होती आणि इथे मला काही समजत नव्हतं तिला उत्तर घ्यायच्या मनस्थिती मध्ये मी नव्हतो ..,काय होत हे? भास? की खर? मी खरच वेडा होणार अस दिसत आहे ..ही बाई मला वेडाच बनवून सोडणार आता ..इतक्यात मुक्तीने मला खांद्याला धरून हलवलं 
मुक्ती : ,तुम्ही ठीक आहात ना? किती घाम आलाय तुम्हाला? अहो काही होतंय का तुम्हाला? ए लाला AC फुल्ल कर रे ..बॅगेतून रुमाल काढून तिने माझा घाम पुसला..ती खूप काळजीने माझ्याकडे बघत होती . कदाचित तिला वाटत होतं मला वेडाचे झटके येतात की काय? आणि या वेद्यसोबत आपलं लग्न झालय की काय? गाडीत अचानक शांतता झाली आणि लाला ने रेडिओ चालू केला..गं लागलं तू जहाँ जहाँ चलेगा मेरा साया साथ होगा...आता माझं डोकं ठणकल ..
मी : ए बंद करा तो रेडिओ..थोडं शांत बसुदेत मला . लालाने घाबरून पटकन रेडिओ बंद केला..मी मागे डोकं टेकवून झोपूनच गेलो ..आणि गाडी थांबली ..हॉटेल आलं होतं ..एक छानच हॉटेल होत ते ..हॉटेल विश्राम ..चला आता इथे तरी थोडा आराम करू असा विचार मनात आला ..देवा हे काय ? समोर दरवाजातच ही बाई उभी  ...आजून कोण ? मंडकीनीच ओ.. मी पुन्हा गाडीत बसलो 
मुक्ती : अहो चला ना..परत का आत गेलात?
मी: तुम्ही व्हा पुढे मी येतोच
मुक्ती : नाही तुम्हाला सोडून मी नाही जाणार ..चला बर आधी  .मग काय निघालो मी ..आणि आता ती बया गायब होती ..

©पूनम पिंगळे
क्रमशः

🎭 Series Post

View all