नियती - एक भयकथा - भाग 14

एक भयकथा

नियती 
भाग 14
मी घाबरून उठलो आणि हाताच्या मेहेंदी कडे लक्ष गेलं ..आणि मला आठवलं अरे आज माझं लग्न आहे..मी खुश होऊन उठलो ..पण मग मंदाकिनी आठवली आणि परत बेडवर बसलो ..इतक्यात दरवाज्यावर टकटक झाली ..माझ्यातर पोटातच गोळा आला ..कोण आलं असेल? मंदाकिनी? तिला समजलं काय माझं लग्न आहे ते? 
इतक्यात बाहेरून बाबांचा आवाज- अरे पोरा उठतोस ना ? अरे निघायचंय आपल्याला ..
मी : आतूनच - हो बाबा उठलोय बाथरूममध्ये आहे ..येतोच थोड्यावेळात बाहेर 
बाबा : बर बर आवर आणि ये लवकर बाहेर ..अरे ते दागिने घाल बरका तुझे सगळे ..
मी : ओरडून - हो बाबा घालतो ..  आता उठून आवरायला हवं होतं ..मी पटकन दात घासले ..मस्त उटण्याने अंघोळ केली आज ..हो आम्ही राजघराण्यातील ना आमच्या बाथरूममध्ये नेहमीच उटणं , अत्तर, ठेवलेले असतात,साबण पण कित्येक तऱ्हेचे, बरेचशे इंपोर्टेड असतात. अंघोळीच्या पाण्यात अत्तर घातलं आणि मस्त फ्रेश झालो..मग माझा आवडीचा मोती आणि मरून कलरचा जयपुरी  काढलाआणि घातला ..मनात आलं आज आई असती तर ..आणि डोळ्यात नकळतपणे आलेले ते अश्रू पुसले ..माझे जे पण दागिने होते सगळे घातले ..बाबांनी म्हणायला नको हे का नाही घातलं ते नाही घातलं ..म्हणून तयारीतच बाहेर आलो ..आता 6 वाजले होते ..गाडी आणि ड्रायव्हर तयार होते . आमचे 2-3नोकर आणि आम्ही दोघे तेच आमचं वऱ्हाड ..
मी बाहेर आल्यावर बाबांकडे पाहिलं त्याना मी आवरलेलं आवडलं हे त्यांच्या डोळ्यांनी सांगितल ..त्यांच्या भरल्या डोळयांनी मला हे पण दाखवलं की त्यांना ही आईची कमतरता भासत होती ..आज आयुष्यात समजायला लागल्यापासून पहिल्यांदाच मी त्यांना कडकडून मिठी मारली ..आम्ही दोघे फक्त डोळ्यांनीच बोलत होतो ..आमच्या घरी आमच्याशिवाय आमचं अस कोणीच नव्हतं ..बाकी नोकर चाकर भरपूर 
मी : आज या करारी माणसाला प्रथमच रडताना पाहिलं होतं मी , बाबा..कसा दिसतोय मी ?
बाबा : अरे एकदम रुबाबदार दिसतोस तू . चल आता निघुया ..
मी : हो बाबा ..आणि आम्ही गाडीत बसून निघालो, मला मध्ये मध्ये सारख वाटत होतं मंदाकिनी माझ्या बाजूला बसून मला एकटक बघत आहे ..मी खूप घाबरत होतो ..आम्ही आता मुक्तीच्या घरी पोहोचलो ...बापरे एक दिवसात इतकी मस्त तयारी ? सगळीकडे लाईट्स लावले होते, फुलांच्या माळा, रस्त्यावर लाल रंगाच्या पयघड्या घातल्या होत्या ..आमचा आत प्रवेश होताच फुलांची उधळण चालू झाली ..गुलाबजल, अत्तरच्या पाण्याचे फवारे ...आहाहा मन प्रसन्न झाले होते ...
मला कपड्यांचा खूप शौक खरतर ..आज खूप वाईट वाटत होत की माझं लग्न आणि मी आपले घरातलेच कपडे घालून आलोय ...मी विचार करतच होतो तर समोरून माझे भावी सासरे आले त्यांच्या मागोमाग खूप सारी नोकर मंडळी होती..आमच्यासाठी शाही नाश्ता आला होता ..मी हात धुण्यासाठी उठू लागलो तर सासऱ्यांनी म्हणजे गौतमरावांनी मला अडवलं .
गौतमराव : अहो अहो कुठे निघालात?  बस हो ..
आणि पाठीमागून एक नोकर हातात गुलाबजल आणि हात धुण्यासाठी liquid soap घेऊन आला आणि दुसरा नोकर खांद्यावर नॅपकिन आणि एक मोठं भांड घेऊन खाली वाकून उभा राहिला ..वाह वाह खूप मस्त वाटत होतं सगळं ..हातावर सोप आणि पाणी घालून आमचे हात धुतले ..आमचा नाश्ता झाला ..गौतमरावांनी एका नोकराला आवाज दिला तर तो हातात कसलीशी मोठी बॅग घेऊन आला ..
गौतमराव : या माझ्या मागे आपण ..आम्ही दोघे आणि तो नोकर बॅग घेऊन निघालो ..बापरे काय आलिशान रूम होती ही ..मध्यभागी एका टेबलावर खूप सारी फळे, चाकू, ड्रायफ्रूट ठेवले होते ..वेगवेगळ्या प्रकारचे सरबत होते ..बाजूलाच दुसऱ्या टेबलावर वेगवेगळ्या प्रकारचे परफ्यूम , अत्तर होते ..हा तर माझा विकपॉइंट होता ..मी पहिला अत्तराकडे गेलो आणि वास घेऊ लागलो 
गौतमराव: या बाबू चल ती बॅग उघड ..आणि त्यातून खुपसारे कपडे त्याने काढले ..बाबांना 3ड्रेस दिले घ्या हे तुमच्यासाठी बघा बर आहे का मापात ..तस आमचा बाबू मापात चुकत नाही ..नुसता नजरेनेच माप घेतो बघा ..(आम्ही दोघे गोंधळून त्यांना पाहू लागलो..याने कधी माप घेतलं आमचं? आमच्या मनातली शंका त्यांनी ओळखली) अहो तुम्ही कल आले तेव्हा हहोत ना त्याने पाहिलं होतं तुम्हाला ..आमचे सगळ्याचे कपडे तोच बघतो..
मी : अच्छा ! एकदम बरोबर बसले हो बाबांना कपडे ( मनातल्या मनात- आता माझा नंबर बघूया काय दिवे लावलेत याने.).आणि मला माझे कपडे दिले वाह अप्रतिमच ..मी घातले तर एकदम बरोबर बसले ..मी आता मनातल्या मनात हवेत उडत होतो..त्यावर बरेचसे हिरे मोती, जडलेले होते ..
गौतमराव : जावई बापू त्यावर सगळे खरे रत्न जोडलेत बरका . सांभाळून घाला 
मी : काय इतके सगळे खरे आहेत 
गौतमराव: हो ते मोती पण खरे आहेत.. मी तर वेडाच होईल आता ,अस वाटत होत मला ..अरे हा थाट काही औरच होता . मी मस्त आनंद घेत होतो ..मला अचानक अस वाटलं मंदाकिनी पंख्यावर बसून मला बघत आहे ..मी घाबरलो पण लगेच सावरलो. 
आता मी आणि बाबा मस्त तयार झालो ..तिथे एक लहान मुलगा आला ..त्याने सांगितलं तुम्हाला बोलवल आहे ..
मी : मला? कोणी बर ?
छोटा : मुक्ती ताईंनी बोलावलंय 
मी : आले तुझ्या ताईला शांग आता रोज बोलायचंच आहे 
छोटा : चला ना ..नाहीतर मग ताई कट्टी करेल आपल्या दोघांशी
मी बाबांकडे पाहिलं . त्यांनी डोळ्यांनीच जा रे अस खुनवल ,जा रे..मग काय मी लगेचच निघालोकी. तिची रूम ..अहो रम कसली एक one bhk फ्लॅटच म्हणा ना ..तिथे ही तयार होऊन बसली होती . तिच्या मैत्रिणी तिला आवरायला मदत करत होत्या . मला पाहताच ती लाजली..तिने तुला सगळ्यांना बाहेर जायला सांगितलं ..सगळ्या हसत हसत गेल्या ,आणि जाता जाता माझ्याकडे हसत पहात गेल्या..मी स्वतःला पाहिलं . काही जोकर दिसतोय का ..पण नाही सगळ नीट होत . मग या का हसत होत्या? मग त्या गेल्या ..
आता खोलित ती आणि मी आम्ही दोघेच होतो
मी : बोला काय बोलायचं होत?
ती : अहो जाहो नका हो करू ..मी तुमची होणारी बायको ना ? मग
मी : बर , बोल ना मुक्ती ..काय बोलायचं आहे तुला 
ती : मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय
मी : आग सांगना , म्हणून तर आलोय ना इथे ..सगळ्यांना चुकवत .. बोलना
ती : पण तुंम्ही लग्न मोडताल मग . आणि मग माझ्याशी कोणीच लग्न करणार नाही. 
मी : आग अस का बोलतेस 
ती : तुम्हाला नवल नाही का वाटलं ? कालच तुम्ही पाहिलं आणि आजच आपलं लग्न ...माझं लग्न खरतर होतच नव्हतं 
मी : गोंधळून - का बरं ? सगळं इतकं छान असून?
ती : मला खूप कडक मंगळ आहे..लग्नानंतर एकतर मी नाहीतर नवरा जाणार ..आम्ही प्रत्येकाला पत्रिका द्यायचो आणि नकार यायचा . तुम्हाला काही कळायच्या आत लग्न करीन अस माझ्या वडिलांनी ठरवलं म्ह्णूनच आज लगेच लग्न 
मी : आग पण अस का? जीवाला तर तुझ्या पण धोका आहे की ..
ती : खूप वर्ष झाले खूप स्थळ आली तुम्ही माझ्या वडिलांना खूप आवडला त्यामुळे त्यांनी हा सगळा उद्योग केला..
मी : म्हणजे माझा बकराच बनवला की तुम्ही 
ती : नाही तस नाही आपण लग्नानंतर जवळच यायचं नाही मग आपल्याला काहीच होणार नाही  
मी : अच्छा म्हणजे नावाचे नवरा बायको का ? अहो पण इतकी सुंदर बायको समोर असताना मला धीर धरवेल का?
ती : थोडावेळ द्या मी आमच्या गुरुजींच्या कडून काहीतरी उपाय काढेन फक्त तेवढा वेळ द्या 
मी : त्यापेक्षा मी हे लग्नच करत नाहीना ..इतकं कोणी सांगितलंय करायला? मला मिळेल की दुसरी बायको 
ती : पण मला नाहीना मिळणार कोणी ..बर ठीक आहे जावा तुम्ही ..आणि ती मटकन पलंगावर बसली ..तिच्या दोन्ही डोळ्यातले नळ जोरात वाहू लागले ..आणि मी पघळलो..
मी : बर ठीक आहे ..चला ..बकरा स्वतःच हलाल व्हायला तयार आहे ..
ती : अस अभद्र नका बोलू ..मी तुम्हाला काहीही होऊ देणार नाही.
मइ : अच्छा तुम्ही अत्ता खूपच शद्ध बोललात हो ..बघूया काय होईल ते होईल चला ..निघतो मी ..माझे बाबा शोधत असतील मला आणि एकदम धक्क्यातच मी तिथून निघालो मला अचानक जोरजोरात कोणाच्या तरी हसण्याचा आवाज आला ..अगदी मंडकीनीसारखा.. मी इकडे तिकडे पाहिल कोणीच नव्हतं ..
इतक्यात आवाज आला: मला शोधतोस? ,अरे नाही सापडणार तुला ..आणि भोग तू तुझ्या करणीची फळ ...आणि आवाज दूर गेला..कोण होती ती ? मंदाकिनी?? नाही ती तर हॉस्पिटलमध्ये आहे मग कोण होती ??

©पूनम पिंगळे
क्रमशः

🎭 Series Post

View all