नियती
भाग13
मी सकाळी वाट बघत होतो की बातमी मिळेल ही मंदाकिनी मरण पावलीये अशी ..पण छे काहीच नाही ..मग मी विचार केला आपणच जाऊन पाहून यावं ..पटापट आवरलं नाश्ता केला आणि चप्पल घालून निघालो इतक्यात बाबांनी हटकल .
बाबा : काय रे आता कुठे निघालास?
मी : असाच जरा काम आठवलं
बाबा : अरे विसरलास का आपल्याला मुलगी पाहायला जायचय ना?
मी : हो पण ते 1 वाजता ना ? आताशी 11वाजलेत..
बाबा : अरे आधी निघावं लागेल जेवणाआधी पहायचा कार्यक्रम होणार ..आणि आपल्याला पोहचायला 1 तास लागेल म्हणजे आता अर्ध्या तासात निघायला हवं ..
मी : नाईलाजाने- ठीक आहे बाबा ( मन काही ऐकत नव्हतं पण वडीलापुढे जान शक्यच नव्हतं)
मी तसाच आत गेलो मग एक मस्त ड्रेस काढला इस्त्री केली..सवयीप्रमाणे भसाभस सेंट मारला आणि बाहेर आलो ..बाबांनी माझ्याकडे वरपासून खालपर्यंत नजर मारली ..मी एकदम खाली मान घातली ..
बाबा: अरे तो सोन्याचा गोफ घालकी गळ्यात ..त्यांना समजू दे की आपण काय आहोत ते ..कसा राजबिंडा लेक आहे आमचा ..अभिमान वाटतो गड्या तुझा मला ..शोभतोस बघ आमचा मुलगा ..जा पटकन जाऊन तो गोफ आणि हातातलं कड घालून ये..
मी : हो बाबा ..आलोच मी आत जाऊन ते सगळं घातलं सोबत सगळ्याच बोटात अंगठ्या पण घातल्या आता मी मंदाकीनील विसरून गेलो होतो , मला वेध लागले होते ते फक्त मुक्तीला बघायचे ..बाहेर आलो तर ड्रायव्हर आणि गाडी तयार ..बाबा गाडीत बसले होते ..मी पण बसलो आणि आम्ही निघालो ..जाताना मला मंदाकीनीच्या दारात गर्दी दिसली मी मनातल्या मनात बोललो वाह पीडा गेली ...आणि निश्चिन्त मनाने मुक्तीला बघायला निघालो ..मुक्तीला बघायला निघालो आणि या बयेपासून पण मुक्ती मिळाली असा विचार करून स्वतःशीच हसलो ..
थोड्याच वेळात आम्ही मुक्तीच्या घराजवळ पोहोचलो
बाबा : पोरा घर आलं बरका ..तसे मोठे लोक आहेत आपल्यापेक्षा तेव्हा बोलताना ..कुठलीही हालचाल करताना नीट विचार कर ..
मी : हो बाबा तुम्ही काळजी करू नका
त्यांचं घर खरच खूपच सुंदर होत बाहेर खूप साऱ्या गाड्या लागल्या होत्या दोन अगदी बंदूकधारी गार्ड होते मी विचारात पडलो नक्की कोणाच्या घरी आलोय की एखाद्या खजिन्यात किंवा बँकेत ..आणि माझं मलाच हसू आलं
आम्ही दरवाजा जवळ गेलो तर त्या गार्डने आमची सगळी माहिती विचारली मग एक वही काढून त्यात पाहिलं आणि आम्हाला आत जायला परवानगी मिळाली ..बापरे इतकी सुरक्षा व्यवस्था? मी तर खुप खुश झालो ..आवडलं आपल्याला ..त्या गार्डने दरवाजा उघडला आत मध्ये एक आलिशान सजवलेली घोडागाडी होती ..ती मस्त हार- फुलांनी सजवलेली होती. आम्ही त्यात बसून निघालो माझं लक्ष आजूबाजूला होत ..मला खूप भारी वाटत होतं हे सगळं ...आत खूप सुंदर दृश्य होत ..सुंदर बाग सजवलेली होती..एक बाजूला फळांची बाग होती तर एका बाजूला भाजीपाला.. तिथे काही लोक तोडणी काही पेरणी करत होते .बापरे म्हणजे यांचं स्वतःच इतकं मोठं शेत पण होत ...तेही आतच वाह मस्तच की अस वाटत होतं कोणत्या तरी गावात आलोय मी ...थोडक्यात काय तर यांनी स्वतःच वेगळं गावच तयार केलं होतं की आत ..
साधारण 10 मिनिट लागले आम्हाला त्यांच्या घराजवळ पोहोचायला ..घरात गेल्याबरोबर केशर लस्सी दिली आम्हाला , काय अप्रतिम चव होती वाह ..,मग बरेचसे स्नॅक्स होते ..आमचा थोडा फराळ झाला आणि ती आली , मी तर वेडाच झालो पाहून तिला ..गोरी गोरेपान , कमनीय बांधा, अगदी नीट नेसलेली लाल जरद साडी..गुलाबी नाजूक ओठांवर एक अलगद हास्य अगदी मोहक ..डोळे अगदी बोलके आणि सागरासारखे निळे निळे..ही खरी खुरी होती की एखादी बाहुली ?? मी तर आ करून तिला बघतच बसलो..आमची नजरानजर झाली..आणि ती लाजली ...बस मला उत्तर मिळालं, मी तिला पसंत आहे हे..
मग आम्ही जेवलो ..जेवताना ती समोरच बसली होती माझ्या..आणि जेवण्यापेक्षा जास्त आम्ही एकमेकांनाच पाहत होतो ...इतक्यात बाबांनी मला सांगितलं चल जेव पोरा ..जर सगळं नीट झालं तर रोजच अस बघाल एकमेकांना ..आत्ता जेवणाकडे लक्ष दे नीट ...आणि मी ओशाळलो.. हो बाबा ..तिचे पण गोरे गोरे गाल लाजेने लाल झाले होते ..थोडक्यात आग दोनो बाजू बराबर लगी थी ..मला न विचारताच बाबांनी होकार कळवला लगेच ..त्यांना समजलं होतच आमची पसंती झाली आहे ..
मग आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो ..जाताना मुक्ती हळूच जवळ आली आणि माझ्या खाली असणाऱ्या हातात एक चिट्ठी दिली आणि आता मला ती चिट्ठी वाचायची उत्सुकता लागली होती ..पण सगळ्यांच्यासमोर ते शक्य नव्हतं ...आम्ही गाडीत बसलो आणि मी बाबांची नजर चुकवून गुपचूप चिठ्ठी उघडली ..अगदी मोत्यासारखं अक्षर होत तिचं ..
मी वाचू लागलो- नमस्कार ! मला तुम्ही खूप अवडलात..तुमचं हास्य आणि डोळे खूप छान आहेत.जर मी तुम्हाला आवडले असेल तर मला तुम्हाला काही सांगायचंय..आपण कुठे आणि कधी भेटु शकतो? किंवा बोलू शकतो ? मी तर हवेतच तरंगत होतो ..पण प्रश्न पडला आता हिला काय सांगायचंय बर ..तो विचार चालू असतानाच मी वेशिजवळ पोहोचलो आणि मला मंदाकिनी आठवली..मेली काय ही खरच..??की नाही मेली ??पण सकाळी तिच्या दारात गर्दी होती म्हणजे नक्कीच मेली ..
आम्ही घरी पोहोचलो ..मी फ्रेश झालो आणि पायीच तिच्याघरी आलो ..गाडी असली की सगळे बघतात मग त्यापेक्षा पायी गेलेलं बर ..दारावर टकटक केली ..आणि लक्षात आलं दाराला कुलूप ..मनात खूप खुश होतो मी ..तीच कांम तमाम झालं म्हणजे ..मग बाजूच्या घरात विचारलं तर समजलं ही बया जीवंत होती आणि तिच्या पोटातील मूल गेलं होतं ..ती हॉस्पिटलमध्ये होती..आणि सुखरूप होती ..मी मनात बोललो अरे ही बाई आहे की कोण वाचली कशी
मी तिथून लगेच हॉस्पिटलमध्ये गेलो मंदाकिनी बेडवर शांत झोपली होती ना ती रडत होती ना काही बोलत होती ..मी तिच्याजवळ गेलो मला पाहून ती हसली..
ती : काय रे असा सूड घेतलास होय? तुझ्या विश्वासावर मी ते सगळं खाल्लं , माझ्या नवऱ्याला मारलं..तुझ्यावर खूप विश्वास होता रे माझा आणि तू ...तू तर आपल्या बाळाला पण मारलस किती उलट्या काळजाचा आहेस रे तू ...त्या निष्पाप जीवाचा बळी घेतलास ..काहीच कस वाटलं नाही रे तुला? तिचे डोळे आता अचानक खूप लाल लाल झाले होते ..अस वाटत होतं कुठल्याही क्षणी ती माझा गळा दाबेल...माझी तर पुरती वाट लागली होती तरी उसनं अवसान आणत मी तिच्याशी बोलू लागलो
मी: अग वेडी आहेस का तू? मी का आपल्या बाळाला मारू ? आग तस असत तर तुला भेटायला तरी आलो असतो का ? तुझ्या घरी तुला भेटायला गेलो तर बाजूच्या बाईने ती इथे आहेस सांगितलं आणि मी लगेच आलो ..तू काळजी करू नकोस मी आहेना ..
ती : तू आहेस म्हणूनच काळजी आहे मला ...तूच ..तूच तो ..तू माझा काधीपन घात करशील तुझा काय भरवसा..पण लक्षात ठेव ...तू जर माझ्याशी लग्न केलं नाहीस ना तर मी तुला इतर कोणाचाही होऊ देणार नाही ...आज तू ज्या धनवान पोरीला पाहून आलास ना तिला तुझी कधीच होऊ देणार नाही मी ..तुला काय वाटलं मला काही माहीत नाही?
आता मात्र माझे हातपाय थरथर कापायला लागले ...इतक्या भरभक्कम नवऱ्याला हिने मारलं होत .ते पण एकटीने ... काल पण मकडासारखी माझ्या घरात खिडकीतून आली होती आणि जतानापण तशीच उड्या मारत गेली होती ..हिला विष दिल तर ही नाही हिच्या पोटातील बाळ गेलं..मी सकाळी मुक्तीला बघायला गेलो होतो हे हिला कस समजलं? ही नक्की मनुष्य आहे ना की?
मी विचार करत असताना ती माझ्याकडे बघून हसायला लागली ...हो हो मनुष्यच आहे मी.. आई शप्पथ आता तर मला वेडच लागायचं राहील होत ..मी काय विचार करतोय हे पण समजतंय हिला ..मी खूप घाबरलो आणि ठरवलं आता काही विचार न करता घरी पळतो
ती : काय रे घाबरलास? हो जा पळ घरी आत्ता ..पण दवाखान्यातून आल्यावर आधी तुला माझ्याशी लग्न करायच आहे..काय?
मी : मनात आग बाई माझे बाबा जीव घेतील माझा ..जर मी फक्त तुझ्याशी लग्न करायचं म्हटलं तरी ..
ती : आणि जर तू लग्न नाही ना केलंस तर मी तुझ्या अख्या खानदानाला मारेल
मी : मनात न बोलता सरळ चल मी जातो आता ..तू हो।लवकर बरी
ती : हो ते तर मी होणारच बरी ..तू तुझी काळजी कर
मी तिथून सटकलो आणि तडक घर गाठलं..मी पूर्ण घामाघूम झालो होतो ...गेल्या गेल्या बाबा समोर आले
बाबा : काय रे आल्या आल्या कुठे गेला होतास ? आणि इतका का भिजलास तू? पोहायला गेला होतास काय?
मी माझ्या कपड्यांकडे पाहिलं खरच की मी पूर्ण भिजलेला होतो..
मी: नाही ..म्हणजे हो म्हणजे पडलो पाण्यात..
बाबा : असा कसा पडला
मी : ते पाणी होत तिथे चालताना पडलो ..मी जरा अंघोळ करतो
बाबा : अरे थांब ..आत्ताच मुलीकडून फोन आला होता ..उद्याच लग्नाचा मुहूर्त आहे.. म्हणें पुढे वर्षभर मुहूर्त नाही .
मी जागेवर उडालोच - काय उद्या ? काहीही ककाय बाबा ? शक्य तरी आहे का?
बाबा : अरे त्यांनी तयारी केली पण उद्या आपल्याला सकळी 7 ला जायचय ..त्यांनी पूर्ण तयारी केली आहे
मी : अहो बाबा..आपले कपडे..बाकी सगळं
बाबा : अरे त्यांनी ते पण केलंय .
मी तर आता स्वप्नात आहे असच मला वाटत होतं ..तिकडे त्या मंदाकिनी ने दिलेले शॉक आणि आता हे बाबांचे शॉक..
बाबा : काय विचार करतोस रे
मी: काही नाही असच..
बाबा : अरे आता विचार नाही करायचा तयारी करायची त्यांनी मेहेंदी साठी पण एक मुलगी पाठवली आहे येईल रात्री ..चल जेऊन घे आता
मी इतका टेन्शन मध्ये होतो ..आता हे पण मंडकीनीला समजणार मग ती काय करेल? माहीत नाही उद्या काय होणार आहे? मग मी जेवलो आणि ती मेहेंदी काढणारी मुलगी आली ..तिने तासाभरात दोन्ही हातावर मेहेंदी काढली आणि गेली ..,मी झोपलो आणि मंदाकिनी आली माझ्या हाताची मेहेंदी तिने पुसली
मंदाकिनी: लग्न करणार तू त्या श्रीमंत मुलीशी ..बघतेच कस करतोस लग्न आणि मी जागा झालो ..मी घामात अक्षरशः अंघोळ केली होती .आता सकाळ झाली होती ..आणि ते स्वप्न होत..
©पूनम पिंगळे
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा