नियती - एक भयकथा - भाग 12

Horror

नियती
भाग 12
खबर मिळताच मी मंदाकिनीच्या घरी गेलो ..तर अस समजलं खुप पिला होता तो रात्री ..आणि बाहेर गेला होता तर कुठल्यातरी दगडावर डोकं आपटून मृत्यू झाला त्याचा ...अस मला तिच्या शेजाऱ्यांनी सांगितलं ..मी आत गेलो घरात सगळे शेजारी होते,  मला पाहताच ती पळतच माझ्याकडे आली ..आणि माझ्या खांद्यावर डोकं ठेऊन रडू लागली ..आता माझं कस होणार ? माझ्या बाळाचं काय होणार ...,मला हे सगळं अनपेक्षित होत ..तिच्या आशा वागण्यामुळे मी जरा घाबरलो ..मग मी तीच डोकं बाजूला केलं 
मी : ताई होईल सगळं नीट   तुमचं आणि तुमच्या बळाचपन सगळं नीट होईल ..काळजी करू नका ..
मंदाकिनी : एकदम रागात - काय ताई?? अरे अस का बोलत आहेस आपण लग्न करूया माझ्या मुलाला तुझं नाव दे...(मी तर पूर्ण घामाघूम झालो होतो , आता या बाईला कस आवरायचं ? जर घरी समजेल तर वडील जीवच घेतील माझा ..मी तिच्यापासून जितकं लांब उभं रहाता येईल तेवढा रहायचा प्रयत्न करत होतो ..पण ती पण परत आजून जवळ येत होती ) मला खूप गरज आहे तुझ्या आधाराची. आणि हळूच माझ्या कानात - हे सगळं आपल्यासाठी केलं मी आता मला अंतर देऊ नकोस ( मला दरदरून घाम फुटला, मी जोरात ओरडलो काय म्हणजे तू? तर तिने फक्त डोळ्याच्या पापण्या बंद करून उघडल्या आणि हो असा इशारा मला समजला ...म्हणजे हिने मारलं होत त्याला..बापरे ही इतकी भयंकर आहे ...)
मी : ताई मी येतो आता , काळजी घ्या ...
ती : काय हे थांबना ..अस मला सोडून कुठे जातोस ( सगळे आमच्याकडे वेड्यासारखे बघत होते .. आणि माझी तर वाटच लागलेली होती ..तिने माझ्या खांद्यावर ठेवलेला हाथ मी जोरात झटकला आणि निघालो
ती : अस मला सोडून जाऊ नको ..परिणाम खुप वाईट होतील याचे 
मी : मनातल्या मनात- तुझे परिणाम आणि तू ..बस बाई मी तर चाललो आणि मी निघून घरी आलो ...सगळेजण माझ्याकडे जणूकाही एखादा एलियन पहिल्यासारखे बघत होते ...हे सगळं काय आहे??हे प्रश्नचिन्ह मला सगळ्यांच्या डोळ्यात ,चेहऱ्यावर दिसत होतं..त्यांना कोणालाही न जुमानता मी घरी गेलो ..आणि स्वतःच्या रूममध्ये जाऊन दरवाजा लावून बसलो ...मला खूप टेन्शन आलं होतं ...मी तोंडावर उशी पकडून जोर जोरात ओरडून घेतलं, मला जे बोलायचं ते बोलून घेतलं ..तिला शिव्या घालून घेतल्या..आता मला थोडं बर वाटलं..आज त्या म्हणीचा खरा अर्थ समजला तोंड दाबून बुक्क्यांचा मार....
इतक्यात दरवाजावर टकटक झाली आणि बघतो तर दरवाजात बाबा उभे मला आता अस वाटत होत की मी कधीपन  चक्कर येऊन खाली पडेल ..नक्कीच याना कोणीतरी सगळं सांगितलं असणार ..आणि खरच मी बेशुद्ध झालो ..बाबांनीच मला धरलं , बेडवर झोपवलं , आणि तोंडावर पाणी मारलं ..मी शुद्धीवर आलो
बाबा : का रे काय झालं तुला? तब्येत बरी नाही का तुझी?
त्यांच्या या प्रश्नाने मी निर्धास्त झालो ..म्हणजे यांना आजून काही समजलेलं नाही ..वाह देवच पावला की 
मी : हो बाबा आज जरा कसतरी होत आहे ..
बाबा : हसत हसत - अरे! कसतरी म्हणजे रे ? तू काय पोरगी आहे काय ? हे असे कसतरी वैगरे आजार बायकांना होतात आपल्याला नव्हे ..चल मस्त दूध घे कस भारी वाटेल बघ 
मी : नको बाबां मी झोपतो थोडावेळ  बर वाटेल मला ..
बाबा : बघ बरका! नक्की ना?
मइ : हो बाबा नक्की ..जा तुम्ही 
बाबा : कायरे  सारख जा जा..मी जे बोलण्यासाठी आलोय ते तर बोलुदे मला ..
मी : हो बोला ना बाबा..काय हो
बाबा : पोरा बघता बघता मोठा झालास तू आता..अरे एक खूप छान स्थळ चालून आलंय तुझ्यासाठी ..मुलगी खूप सुंदर आहे बघ ..याआपल्या घरासाठी अगदी योग्य आहे..तशी बाजूच्या गावच्या सावकाराची मुलगी आहे मुक्ती नाव आहे बघ तिचं.. उद्या बघायला जायचय आपल्याला ..
मी: अहो बाबां मी आजून तयार नाही हो लग्नाला ..आजूनतर काहि कमवत पण नाही मी ..
बाबा : अरे वेड्या हे सगळ तुझंच तर आहे ...आपल्याकडे कोणाला कमवायची गरज नसते ..आपल्याकडे लक्ष्मीच चालत येते ..उद्या  दुपारी 1वाजता जाऊ आपण त्यांनी जेवायलाच बोलवलं आहे आपल्याला ..
मी : काय बोलणार हो बोललो ..मला आता मंदाकिनी ची भीती वाटत होती ..तिने तिच्या नवऱ्याला मारलं होत ...आता मला तिच्यासोबत रहायची आजिबात ईच्छा नव्हती..तिचा काय भरोसा उद्या मला पण मारेल ....मी मनात खुशच झालो होतो ..कारण मला माझी बायको भेटणार होती ..रात्री जेवण करून मी माझ्या रुममध्ये गेलो . आणि घाबरलोच समोर मंदाकिनी बसली होती ..डोळे सुजलेले ..केस विस्कटलेले.. ती माझीच वाट बघत बसली होती ..मला प्रश्न असा होता ही आत आली कशी ? मी घाबरतच आत गेलो आणि आधी दरवाजा लावून त्याला कडी लावली ..
मी : तू ..तू इथे कशी आलीस 
ती: अरे गाबरतोस काय तू मला? वेड्या प्रेम आहे माझं तुझ्यावर ..मला काय आले मी बरोबर तुझ्या या खिडकीतून..
मी: आग पण तू तर आई होणारेस ना मग कशी चढलीस वर ..
ती : अरे बाळाला बापाला आणि मला माझ्या नवऱ्याला भेटायचं होत ..त्यात काय ..जमलं सगळं ..मला नाजूक नको समजूस  तू त्या माझ्या नवऱ्याला पण बघ कसा स्वर्गात पाठवलाय..
मी : हिम्मत करून- पण तू त्यांना कस आणि का मारलस ग?
ती: अरे त्यादिवशी त्याने तुला आणि मला बघीतल , तू गेला निघून आणि तो मला खूप मारायला लागला त्याची एक लाथ माझ्या पोटावर लागली ..खूप त्रास व्हायला लागला मला..मी रागात बाजूला पडलेला वरवंटा हाणला डोक्यात त्याच्या 
मी : आग पण तो तर गल्लीत दगडावर पडून मेला ना ?
तशी मंदाकिनी जोरात हसू लागली .."ते बघून मी पुन्हा खूपच घाबरलो ..
ती : अरे त्याला वरवंट्यानी  मारून मी ओढत बाहेर नेलं आणि एक दगडावर  पुन्हा डोकं आपटवल ...आणि खेळ खल्लास  ..आणि ती पुन्हा हसू लागली ...
मी : आग बाई तू जा तुझ्या घरीं..आपण उद्या बोलू ..तुला जर बाबांनी पाहिलंना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल ..मी कसा आणि काय सांगणार त्यांना ? 
ती : मला खूप भूक लागलीये रे काही खाल्लं नाही मी सकाळपासून ते दे काहीतरी मग मी जाते ..
मी : बर इथेच थांब बाहेर येऊ नकोस..मी किचन मधून 2 केली आणि पपई तिला दिली ..तिने ते खाल्लं . पण तीच पोट काही बजराल नव्हतं ..ती भाजी भाकरीचा आग्रह करू लागली ..मी एका कागदात भाकरी आणि कांदा, मिरचीचा ठेचा घेतला पण आता मला ती नको होती..मी त्या जेवणात जवळच पडलेलं बेगॉन टाकलं ..मरेल तरी एकदाची ..आणि तिला देऊन घरी जेव सांगितलं..नशीब ऐकलं तिने ..हातात जेवण देताच एखाद्या  मकडासारखी उडी मारून ती खिडकीतून गेली ..आता मी मनात खूप खुश होतो ..ती तिच्या घरीजाऊन ते खाऊन..
मग हिमुक्ती कशी असेल ..मी काय करेल  अशी स्वप्नन बघत मी झोपलो ..

©पूनम पिंगळे
क्रमशः

🎭 Series Post

View all