नियती - एक भयकथा - भाग 11

Horror

नियती 
भाग 11
हेमांतने कसबस स्वतःला सावरलं आणि तो भेदरलेल्या नजरेने संपतराव आणि वर्षा कडे पाहू लागला ..5 मिनिट सगळे एकदम शांत होते ..कोणीच काहीच बोलत नव्हतं ...आणि अचानक 
हेमंत : वर्षा माझं लई परेम आहे बग तुझ्याव पर मला ह्ये काय प्रकरण हाय ना ते समद म्हाइत पायजेल बग ..मला आत्ताच्या आता समद सांगा कोण हाय ही मंदाकिनी? आन कशापायी मारणार ती?आग ए बाई बोल ना ग?
वर्षा : हेमंत सगळं ठीक होईल नको टेन्शन घेऊस पप्पा करतील सगळं नीट ..हो ना हो पप्पा? 
संपतराव : वर्षा आज मी तुम्हा दोघाना ही घटना सांगतोच ...नियती ग बाकी काय? मी वाईट केलं त्याच फळ मला मिळत आहे ..पण त्यात तुम्ही विनाकारण पिसले जात आहात.तुझी आई पण अशीच गेली ग मला सोडून ...
वर्षा : पप्पा तुम्ही चूक करणं शक्यच नाही ...आजपर्यंत कितीतरी मोठं मोठे निर्णय योग्य पणे घेताना पाहिलय मी तुम्हाला ..तुम्ही अस का बोलताय?
संपतराव : आग पोरी तेव्हा मी तरुण होतो ...तरुणपण सळसळत होत ग अंगात त्यात बापाचा रग्गड पैसा ..जे पाहिजे ते मिळायचं हातात ...सगळं अस खेळण्यासारखं वाटायचं बघ ..मला शिकायला मुंबईत ठेवलं होतं   पैश्याच्या जोरावर खुप काही करत होतो मी तिथे ..मुली, दारू, अग लाज वाटते आज सांगायला पण या पैश्याच्या नादात माझ्या शिक्षिकेला पण नाही सोडलं मी ..खूप सुंदर होती ती बाई आमची सगळी पोर नुसती बघत बसायची तिला ..मग काय लागली पैंज आणि पैश्याच्या मागे ती आली माझ्या जवळ ..मग माझा विश्वास आजूनच बसला की पैसा म्हणजे सगळं काही ..हवं ते मिळत यांनी ..अशातच माझं शिक्षण पूर्ण झालं आणि मी गावी आलो ..शरीर आणि मनाला घाणेरडी सवय लागली होती बाई आणि बाटली ..पण आपल्या गावात मला काही ते जमेना ..
सगळ्याच मुली  आधीच दिसायला खूप उजेड पडलेल्या ...आणि वर खूपच सोज्वळ. आता माझं मन आणि शरीर दोन्ही मला स्वस्थ बसू देत नव्हतं... अशातच ती आली ...जणू स्वर्गातली अप्सराच.. अग काय तीच वर्णन करू डाळिंबासारखे ओठ ..दुधासारखी गोरीपान , आग चंद्रावर तरी डाग आहेत पण तिच्या गालावरच्या तिला शिवाय तिच्यावर कुठलाच डाग नव्हता ..होय ती च ती मंदाकिनी... घाऱ्या घाऱ्या डोळ्याची, गोऱ्या गोऱ्या रंगाची, नाजूक बांध्याची नार..
मी आपले नोकर दाजीबा कडे गेलो आणि विचारलं ही कोण? आधी कधी पाहिलं नांही हिला
दाजीबा : अहो छोटं मालक ही त्या नाम्या माळ्याची पोरगी आन तुम्हाला कशी महित असलं ? तुम्ही व्हते का तरी गावात? 
मी: अस होय! तरीच तरीच..बरोबर की हो एकदम ..मग मी स्वतःच्या खोलीत गेलो आणि झोपून तिची स्वप्न पाहू लागलो. मला ती हवीच होती..अगदी माझी जीवनसाथी म्हणून पण चालेल अशीच होती ती ...मला तर जणू तीच वेडच लागलं होतं ..जिथे जावं तिथं तीच दिसत होती ..आता मी मोक्याच्या शोधात होतो आणि तो मला मिळाला...
घरात खूपच गरम होत होत मुंबईतील Ac ची सवय पण गावात आजून तरी AC नव्हते ...मग बसलो शेतात जाऊन ...आपल्या विहिरीच्या जवळ काहीतरी हालचाल जाणवली मी घाबरलो कोणी जनावर तर नाही ना आलं विहिरीला ..जंगल भाग जवळच होताना तिथे खूपदा लांडगे , कोल्हे यायचे ..त्यामुळे मी दबक्या पावलांनी हातात बाजूचा मोठा बांबू घेऊन निघालो ..आणि काहीतरी माझ्याकडे येतंय अस समजलं मी हातात बांबू घेऊन तयार होतो बाजूच्या झाडांमुळे नीटस दिसत नव्हतं ..तिथे हालचाल झाली आणि मी बांबू मारला..तर एकदम मुलीचा आवाज आईग मेले मी ..कोणीतरी मारलं मला ..आई ग आणि ती बेशुद्ध पडली ..
होय मंदाकिनी होती ती ...विहिरीवर अंघोळ करायला आली होती .आमच्या शेतात 4 विहिरी होत्या ..पाण्यानं तुडुंब भरलेल्या.. ही विहीर झाडांनी वेढलेली होती त्यामुळे कोणी जास्त यायचं नाही ईथे  .त्यामुळे ती तिथेच यायची अंघोळीसाठी... तर ती बेशुद्ध झाली आणि सरळ नाझ्या अंगावर पडली ..तिच्या अंगावर फक्त परकर होता तो तिने वरपासून बांधला होता आंघोळीसाठी ..मला तर हेच हवं होतं ..मी संधीचा पुरेपूर फायदा घेतला ..ती बेशुद्ध असतानाच मी माझा कार्यभाग उरकला आणि नंतर तिच्या तोंडावर पाणी मारल..तिला शुद्ध आली ..पण तिला खूप वेदना होत होत्या बांबू तिच्या मांडीवर जोरात बसला होता . आणि तिला अजूनही काहीतरी वेगळाच त्रास जाणवला..
मंदाकिनी : कोण तुम्ही? इथे काय करताय ? आणि तुम्ही माझ्यासोबत काय केलं मला खर सांगा ? तो बांबू ..तो पण तुम्हीच मारला ना मला ? 
मी ': आग होहो शांत हो ..किती बोलशील तू ? हो मीच मारला बांबू मला वाटलं जनावर आलंय ..आता मला काय माहीत माझी स्वप्नसुंदरी इथे आंघोळीसाठी आली आहे..माहीत असत तर अस कस केलं असत मी ?
मंदाकिनी : तुम्ही माझ्यासोबत?? आणि ती रडू लागली 
मी : आग अशी रडू नकोस ..तू मला पहिल्या नजरेतच आवडलीस तूच माझी राणी होणार बघ ..माझ्या क्रिकेट टीम ची आई होणार तू..मी लग्न करणार तुझ्यासोबत . फक्त मला थोडा वेळ दे ..मला संगळ्यांची परवानगी घ्यावी लागेल ..मग रीतसर मागणी घालतो बघ तुला..ती खूप खुश झाली ..तीला नीट उठता येत नव्हतं ..मी तिला आधार देऊन उठवलं तिच्या अंगावर पाणी घालून ..मी अंघोळ घातली तिला ..ती खूप लाजत होती ..लाजून लाजू नुसती टोमॅटो झाली होती ती ..मग मी तिला कपडे घालायला मदत केली आणि तीच समान आणि तिला उचलून निघालो 
मंदाकिनी : इश्श! हे काय मला खाली सोडा..मी चालेल हळू हळू ..उगाच माझं ओझं का घेताय उचलून 
मी : बोलबच्चंन टाकला . आग कसलं ओझं ..फुलासारखी हलकी आहेस तू ..जेव्हाकी तिला उचलून माझ्या पाठीत चमक भरली होती ..आता तिने तिचे दोन्ही हात माझ्या गळ्यात गुंफले आणि स्वतःच तोंड लपवून लाजली ..मी मनात खुश होतो ..माझं रोजच काम झालं होतं ..तिला दवाखान्याच्या बाहेर सोडून मी घरी आलो..तिच्या हातात काही पैसे दिले औषधासाठी..
ती: एवढे पैसे? कशाला?
मी : आग औषधाला ग ..
ती : नाही ,इतके नाही लागणार
मी: ठेव तुलाच (तिच्या डोळ्यातली पैश्याची लालूच स्पष्ट दिसत होती मग काय माझं काम झालंच होत)
आता आम्ही रोज भेटायचो ..तिने आता लग्नासाठीं माझ्यामागे तगादा लावला होता ..मी काही तिच्याशी लग्न करू शकणार नव्हतो . मोठा अडसर होता तो की बाबांना विचारणार कोण ? 
मग मीच एक चांगला स्थळ नाम्याला सुचवलं आणि सांगितलं अरे तरुण पोरींना अस इतके दिवस बिन लग्नाचं ठेवू नये ..उरकून टाक ..मी करतो सगळी मदत तुला ..नाम्यापन खुश झाला ..ती तर मला रोज भेटायला येतच होती आणि हे लग्नमोड काहीही करून म्हणत होती ..बिचारीला माहीतच नव्हतं माझा गेम ..
मिचतर लग्न ठरवलं होतं तीच अस कस मोडू देईल. मी तिला सांगितलं तू लग्न कर आपण नंतर करू काहीतरी . मी आहे ना मग विश्वास ठेव माझ्यावर ..मुलगा बाजूच्याच गावातला होता ..त्याचा आगा पिछा कोणी नव्हतं ..आणि  त्याला पण पैसे देऊनच या लग्नाला मी तयार केलं होतं..
लग्नाच्या पहिल्याच रात्री मंदाकिनी हातात दांडूक घेऊन बसली होती 
ती : ए माझ्या जवळ यायचं नाही ..मला हात तर अजिबात लावायचा नाही ..मी दुसऱ्याची अमानत आहे ..तुझी नाही,  काय समजलास
तो : आग पण तू तर माझी बायको ना मग ?
ती : ते विसरायचं ..मी नाही ती ..झोपा जावा दुसऱ्या खोलीत ..तो बिचारा तसाच गेला आणि दुसऱ्या खोलीत झोपला ...आता हे रोजचंच झालं होतं तो दुसऱ्या खोलीत गेला की मी तिच्याजवळ.. अशातच तिला दिवस राहिले ..आता ती ऐकतच नव्हती ..सगळं प्रकरण आता गळ्याशी आलं होतं ..मी तिला स्पष्ट नकार दिला हे मूल माझं नाही ..ती ओरडू लागली रडू लागली ..तो आवाज ऐकून म्हाद्या तिचा नवरा आला 
तो : मालक तुम्ही इथं? आणि ही का ओरडतीये? काय  झालंय ? मग तिने सगळकाही त्याला सांगितलं ...तो मटकन खालीच बसला  .काय ग हे ? अग माझ्या आयुष्याचा इस्कोट केलास तू? कुठं फेडशील ही पाप
ती : पाप नाही माझं प्रेम आहे हे..आणि त्याच्या नावापुढे या संपतरावांच नावच लागणार मीच राणी होणार याची ..
मी सगळं वैतागून बघत होतो ..मला काहीच सुचत नव्हतं ..,काहीही न बोलता मी तिथून निघून घरी आलो..आणि सकाळी म्हाद्या गेला अशी खबर मिळाली..हे अस कस झालं? 

©पूनम पिंगळे

🎭 Series Post

View all