निवांत क्षण हा हवाच...भाग 2

Nivant kshn Ha hawach
निवांत क्षण हा हवाच...भाग 2


“हॅलो निलू अग सगळ्या मैत्रिणींनी ठरवलंय की उद्या शॉपिंग आणि पिक्चरला जाऊया तू येणार ना?” पलीकडून आवाज आला.


“नाही ग शैला, माझं नाही जमत. सकाळी मुलांचं, नवऱ्याचं करण्यात वेळ जातो, मग बाकीचे काम आवरेपर्यंत दुपार होते. त्यांनतर मुलांची यायची वेळ असते. मला नाही जमणार ग, तुम्ही सगळ्या जा ना  मस्त एन्जॉय करा.” निलू पटापट बोलून गेली.


“ये काय ग निलू , तुझं नेहमीचं असतं, काय घर घर करत असतेस? रोज तू सगळ्यांना वेळ देतेस ना? मग एक दिवस तू स्वतःला देऊ शकत नाही का? आपल्या वयातल्या बाया मस्त बाहेर हिंडतात, फिरतात, मस्त एन्जॉय करतात. आणि आपण अगदी ओल्ड झालोत.” शैला चिडून बोलली.


“शैला चिडु नकोस ग.” निलू

“तू गप्प बस, मला सांग आपलं लग्न झालं म्हणजे आपल्या सगळ्या इच्छा आकांक्षा संपल्या का? आपल्याला बाहेर फिरण्याचा अधिकार नाही का? आपल्याला नटण्याचा अधिकार नाही का?” शैला समोर बोलणार तोच निलू ओरडली.
 
“शैला स्टॉप. मी यातल्या कोणत्याच गोष्टीला नकार देत नाही आहे पण.”

“हा पण तुझ्या आयुष्यातून जात नाही ना, हाच तर मोठा प्रॉब्लेम आहे. निलू तुझा शेड्युल बिझी असतो माहीत आहे मला. अग पण त्यातला थोडा वेळ आपण आपल्यासाठी काढायला नको का? आपल्यालाही निवांत क्षण नको का?  मला माहित आहे तुझा सकाळचा चहा देखील झालेला नाही आहे. बर असू दे, तू विचार कर आणि मला कळव, मी तुझ्या कॉलची वाट बघते.” शैलाने फोन ठेवला.
 
आताचाही चहा थंड झाला. निलू तोच चहा घटाघट प्यायली आणि कामाला लागली. आवरेपर्यंत दुपार झाली.

निलूच्या डोक्यात शैलाचे वाक्य गिरट्या घालत होते. तिला स्वस्थ बसवेना. जुना अल्बम काढला त्यातल्या फोटो बघू लागली. बघता बघता विचार मनात डोकावून गेला.

'खरच किती बदल झाला माझ्यात? आधीची मी आणि आताची मी यात बराच फरक पडलेला आहे. आधीचा तो निखळ हसरा चेहरा त्यावरच हसू कामाच्या व्यापात कुठेतरी हरवल आहे.'

क्रमशः

🎭 Series Post

View all