निशिगंधा भा 15

Story Of A Girl Who Wants To Run School


निशिगंध भाग १५
क्रमश: भाग १४
दार उघडून दोघे घरात गेले तर जाळी जळमटे वगैरे नव्हती कारण मित्राने घेर बेसिक साफ करून ठेवले होते ..
निशीं ने साडीचा पदर खोचला आणि कामाला लागायची तयारी केली
तेवढयात पिंट्या धावत आला
पिंट्या " स्वऱ्या आलास का ? कसा आहेस ? " म्हणे पर्यंत दोघांनी एकमेकांना घट्ट मिठीत घेतले ..
पिंट्या निशी कडे बघून " नमस्कार वाहिनी .. मी स्वराज चा लहान पणीचा मित्र पिंट्या .. इथे शेजारीच राहतो "
निशी एकदम हडबडली .. कसे रिऍक्ट करू ते तिला केळे ना "
स्वराज " अरे तू लग्न केलेस कि नाही ?"
पिंट्या " मग काय .. मागे राहतो कि काय ? तीन तीन पोरं आहेत मला .. तेवढयात एक नागडे पिलू धावत आलेच त्याच्या बाबांच्या मागे .. पिंट्या ने त्याला उचलून घेतले " नालायका .. चड्डी कुठाय तुझी ?"
बबलू " बिजली ती मग काढली "
पिंट्या " अरे वहिनीला घेऊन आधी घरी ये .. चहा पाणी करा मग बघू काय करायचं ते "
आणि पिंट्या निघून गेला
निशी " अरे तू त्याला सांग ना .. मी बायको नाहीये तुझी ते .. तो सारखा वाहिनी वाहिनी करतोय ते "
स्वराज " अग हो पण सांगू काय ? हेच कळे ना मला ... अशी गावात मैत्रीण कशी कोण आणेल ?"
निशी " मी नाही येत .. मी इथेच थांबते .. तू जा .. हा विचार आधी का नाही केलास .. मी शाळेतल्या पोरांना बरोबर घेतले असते .. "
स्वराज " नाही .. मग तर त्याने आपल्याला आई बापच बनवून टाकले असते .. काय सांगू तूच सांग "
निशी " सांग माझि लहान पणी ची मैत्रीण आहे "
स्वराज " ठीक आहे .. सांगतो
दोघे चालत पिंट्याच्या घरी आले दोघे बाहेर असलेल्या चटई वर बसले ..
पिंट्याची मोठी मुलगी पाणी घेऊन आली .. पाणी दिलें आणि आधी स्वराज ला नमस्कार केला तिने " नमस्कार काका " आणि मग निशी ला नमस्कार केला आणि " नमस्कार काकी "
काकी म्हटल्यावर स्वराज ला ठसकाच लागला पाणी पिता पिता .. आणि निशी रागाने त्याच्या कडे बघत होती आणि डोळ्याने त्याला खुणवत होती .. " सांग ना .. पटकन "
स्वराज " पिंट्या .. हि निशिगंधा .. माझी मैत्रीण आहे .. मी तीच्याच घरीच उतरलोय .. फार पूर्वी पासूनचे संबंध आहेत .. माझे बाबा आणि हिचे बाबा मित्र होते "
पिंट्या " अरे म्हणजे हि निशी आहे का ?" मला वाटलंच कि हिला मी कुठे तरी बघितलंय .. लहान पणी तुला खूप आवडायची ना "
स्वराज ला पुन्हा ठसका लागला .. निशी तर तिथून उठलीच आणि आत मध्ये गेली
स्वराज मनात " च्यायला काय अख्या गावभर दिलेली का मी .. माझ्या पहिल्या प्रेमाची कबुली " आणि हसला
पिंट्या " अरे .. मग कधी करताय लग्न ? आता तर कसली सुदंर दिसतेय .. तुला शोभतेय एकदम .. तेव्हा जरा गब्दुल होती नाही का ?"
स्वराज हसायला लागला
स्वराज " ते जाऊ दे रे .. आता काय मी लहान नाहीये .. तेव्हाच काही राहिलच नाही "
पिंट्या " असे कसे .. काही नसते तर ती तुझ्या बरोबर आणि तू तिच्या बरोबर आला नसतास "
स्वराज " अरे पिंट्या .. तू त्या लक्ष्मी शी लग्न केलेस का ?" बदलायचा शिताफीने प्रयत्न
पिंट्या " नाय ना रे .. तिचा बाप खडूस निघाला .. एवढं मोठं माझे शेत आहे तरी त्याला ते कमीच वाटत होते .. "
स्वराज " जाऊ दे .. मग काय नाव आहे माझ्या वाहिनीचे .. "
पिंट्या " ते तुला रेशमा आठवतेय का ?"
स्वराज " नाही रे .. आता काही फारसे आठवत नाही मला "
पिंट्या " अरे त्या तुमच्या शेताच्या पलीकडे रहायची नाही का ? "
स्वराज " तिच्याशी केलेस का ?"
पिंट्या " नाही रे .. "
स्वराज " मग कोण .. नाव सांग ना साल्या .. उगाच कोडी घालत बसलाय "
पिंट्या " रेश्माच्या लहान बहिणीशी लग्न झाले माझे "
स्वराज " नाव काय पण ?"
पिंट्या " शारदा .. "
स्वराज " अरे वाह नाव छान आहे .. बोलवं कि बाहेर वहिनीला "
पिंट्या " अरे नाही येणार ती बाहेर .. जरा लाजवट आहे "
स्वराज " बरं .. ठीक आहे .. मी निघतो .. जरा घरा कडे बघतो .. मग बोलू आपण "
पिंट्या " घर माणूस लावून साफ करून ठेवलंय .. जमीन पण पाणी मारून धोपटून समान करून ठेवलीय .. आता शेणाने सारवले कि एकदम झकास होईल .. मी शारदा ला पाठवतो .. शरदा सारवून देईल पटापट "
स्वराज " ते निशी ला बोलावं बाहेर .. आम्ही जातो घरी "
पिंट्या ने पोरगी जवळ निरोप पाठवून तिला बाहेर बोलावली
इकडे शारदा ने काम सुरु पण केले .. शेणाने बाहेर अंगण सारवायला घेतले ..
कोण तरी साडी नेसलेली बाई अंगण सारवतेय हे तर दिसले ..
पिंट्या " एक काम करू .. ह्या दोघी बायका .. काम करतील घरात आपण दोघे गावात एक फेरफटका मारून येऊ
स्वराज " अरे नाही नको , निशी ला एकटीला सोडून लगेच नको जायला .. थोडे कामाचं बघू मग संध्याकाळी जाऊ सगळ्यांना भेटायला "
पिंट्या " हमम... तिला नाही आवडणार म्हणून चाललंय सगळं .. "
स्वराज लाल होत चालला होता .. डोक्यावर उन्ह होतेच पण अजून पण काहीतरी कारण होते कि गाल आपोआप लाल झाले होते
तेवढ्यात निशी " स्वराज ... अरे उन्हात नको ना थांबूस .. तुला ऊन सहन होत नाही .. " असे बोलत तिने सगळ्यांना लिंबू सरबत दिले
शारदा आणि पिंट्या त्यांची गम्मत पहात होती .. शारदा उगाचच लाजत होती .. नक्की ह्या दोघांचे नाते काय आहे हे तिला कळतच नव्हते पण ती त्याला नावाने हाक काय मारते .. त्याची काळजी काय घेते .. नवरा नाहीये .. होणारी बायको नाहीये .. तरी पण हक्काने वागतात ..
स्वराज ने गाडीतून सामान उतरवले .. आणि गाडीत काहीतरी उपसू लागला .. एव्हाना सगळ्या बॅगा उलथा पालथं करून झाल्या होत्या .. निशी आता मध्ये घर शेणाने सारवत होती .. मधली खोली शारदा सारवत होती
स्वराज वैतागून " निशु .. यार माझी बरमुडा भरली नाहीस का तू ?"
निशू " नाही .. मी तुला भरायला सांगितली होती ती "
स्वराज " काय यार ? आता इतक्या गर्मीत हि जीन्स घालून बसू का ?"
निशी " अरे .. मी तुला सांगितले होते कि तेवढी तुझी हाफ पॅन्ट घे .. विसरलास कसा काय ?"
बेचैनी .. उन्हाची बेचैनी ... आली होती त्याला आणि आता बहुदा भूक पण लागली असावी .. अंगावरचे कपडे सहन होई नात
पिंट्या कडे पॅन्ट आहे का बघायला गेला
थोड्या वेळाने आला पुन्हा स्वतःच्या घरी आणि बाहेरूनच .. अजून आत गेला नव्हता कारण शेणाचा वास येत होता .. आणि सारवलेलं सुकल पण नव्हतं
स्वराज बाहेरूनच आनंदात आवाज देत होता
स्वराज " निशू . बाहेर ये ना .. हे बघ .. "
निशी चा अवतार काही खास बघण्यासारखा नव्हता .. साडी आणि पदर वर खोचलेला .. वेणीचा अंबाडा बांधला होता .. कपाळा पासून गालावर घाम येत होता आणि दोन्ही हात शेणाने माखलेले होते .. पण हा इतका अधीरपणे का हाक मारतोय म्हणून ती पटकन बाहेर आली
तर स्वराज ने पिंट्याचे धोतर नेसले होते आणि सॅंडो बनियान घालून तिच्या समोर उभा होता .. त्याला असा इंडो वेस्टर्न अवतारात बघून निशी खूप हसू लागली ..
स्वराज " अरे हसते काय ? इट्स कुल "
ती इतकी हसू लागली कि शेणाने माखलेला हात चुकून तिच्या चेहऱ्याला लागला .. आणि असा लागला कि मिशीच उठल्या सारखा वाटत होता .. तिला असे बघून तो जोरात हसू लागला .. आणि दोघे एकमेकांना बघून हसू लागले
पुढील दहा मिनिटे काम राहिले बाजूला दोघे जोर जोरात हसत होते ..
स्वराज ला त्या शेणाचा वास आणि तिच्या अंगाला लागलेलं शेण सहन होत नव्हतं .. ती हसत हसत बाहेर आलेलीच होती .. पुढेच पाय धुण्यासाठी ड्रम भरून ठेवला होता .. स्वराज ने काही विचार न करता त्या ड्रम मधले पाणी बादलीत घेतेले आणि तिच्या अंगावर फेकले
स्वराज " क्लीन युअर फेस .. यु आर सिंकिंग "
निशी " स्वराज .. काय बावळट .. भिजवतो कशाला .. "
स्वराज " अरे आटप ना हे शेणातले काम .. मला वासाने कसे तरी होतंय .. तुला काय वाटत नाही .. त्यात हात घालायला .. "
निशी " ए ... किती सुंदर दिसतंय आत मध्ये डोकावून बघितलेस तरी का ? आता किती छान वाटतंय घर .. "
स्वराज " वासाचं काय ? असे म्हणत ती हात धुवायला गेली तर त्याने अख्खा ड्रम तिच्या वर बाहेर ओतला ..
अचानक आलेल्या पाण्याने तिचा जीव गुदमरला ..
निशी " स्वऱ्या ... नालायका .. आता तू गेलास .. "
आणि तिने खालची चिखल झालेली माती उचलली आणि त्याच्या तोंडाला फासली .. आणि ओल्या साडीत तिला पळता पण येत नव्हते तरी त्याच्या मागे चिखल घेऊन लागली होती आणि तो टणाटण उद्या मारत होता ..
स्वराज " सॉरी .. प्लिज .. नको ना .. याक .. त्या चिखलात पण शेणाचा वास येतोय .. "
निशी " तू का पाणी ओतलेस अंगावर मग .. "
होळी नाही पण शिमगा तर नक्कीच सुरु झाला होता .. किती आरडा ओरड करत होते दोघे ... शारदा मागच्या दाराने सटकली आणि तिच्या घरात जाऊन बसली
बऱ्याच वेळाने दोघे घराच्या पायरीवर बसले
स्वराज " जा .. ना .. अंघोळ करून ये ... अरे यार खूप वास येतोय तुझ्या अंगाला त्या शेणाचा "
निशी " अरे गाढवा .. माझ्या अंगाला नाही .. आताच घर सारवलंय ना घर त्यामुळे आता हा वास दोन दिवस येतच राहणार .. सवय कर त्या वासाची .. "
स्वराज " अरे ए ..तू काय माझा उद्धार करायचा ठरवलं आहेस का ? नालायक काय .. गाढव काय .. आणि काय ..स्वऱ्या काय ? कोणी ऐकलं तर काय म्हणेल ?"
निशी " काय म्हणेल ? आता तू आहेस च तसा त्याला मी तरी काय करणार " आणि त्याला जीभ बाहेर काढून त्याला तोंड वाकडं करून चिडवून पळू लागली

🎭 Series Post

View all