निशिगंधा भाग 9

Story Of A Girl Who Wants To Run School


निशिगंध भाग ९
क्रमश : भाग ८
प्रार्थना झाली आणि पहिलाच तास गणिताचा होता .. तर निशी मुलांकडून पाढे म्हणून घेत होती
"बे एके बे .. बे दुणे चार " आधी ती सांगायची आणि मुले तिच्या मागे म्हणायची ..
पाढे म्हणून झाले .. आता ती एकेक गणित समजावून सांगत होती ,.. तर इकडे लॅपटॉप वर त्याने एक सिनेमा लावून टाकला आणि सगळ्यांना म्हणाला " चला मुलांनो आज अभ्यासाला सुट्टी .. आज आपण सगळ्यांनी सिनेमा बघायचा "
तशी सगळी मुले धावत धावत पडवीत बसली आणि लॅपटॉप च्या स्क्रीन कडे बघू लागली
निशी " काय हे ? हि अभ्यासाची वेळ आहे ? का असे करतोय ?"
स्वराज " मला तुझ्या हातचा चहा हवाय .. तू चहा कर ना प्लिज .. तोपर्यंत तुझे स्टुडंट्स सिनेमा बघतील "
थोड्या वेळाने तिच्या लक्षात आले कि तो सिनेमा नाहीये तर सूर्य मंडल कसे चालते आणि प्रत्येक ग्रहा बद्दल ची माहिती ऍनिमेटेड होते .. आणि ते हिंदीत होते त्यामुळे सर्व मुलांना चंद्र सूर्य असा बघायला खूप छान वाटतं होते आणि ते समजत पण होते
तोपर्यंत गरम गरम आल्याचा चहा घेऊन आली त्याच्या साठी
एकेक झुरका मारत तो चहा पित होता " अहाहा .. अहाहा .. मस्तच ... एकदम आईच्या हातची चव आहे तुझ्या हाताला .. काल तू जश्या भाकऱ्या करत होतीस ना तशीच माझी आई पण आम्हाला दोघांना गरम गरम भाकरी करून वाढायची .. काल तुला बघताना आईची आठवण आली .. असे म्हणताना जरासा त्याच आवाज कापरा झाला
निशी " इट्स ओके रे ..आता बाबांची काळजी घे .. मी बघ ..ना आई .. ना बाबा .. कसे काढले असतील दिवस ...नशीब कि गावातली माणसे खूप चांगली आहेत .. मला खूप सपोर्ट करतात .. आणि खरंतर या शाळेने मला आधार दिला .. मला दिशा दिली .. नाहीतर एकटी ने मी जगूच शकले नसते .. माणसाला काहीतरी एम असले पाहिजे .. म्हणजे त्याची आपोआप प्रगती होते .. बघ मी या शाळेच्या ओढीने आता काय काय करते "
स्वराज " हमम ... चल .. निघतो मी .. तुझि शाळा चालू दे .. "
निशी " का रे ? तू बोअर झालास का ?"
स्वराज " नाहीतर काय ? तुला दुसरा कोणता विषयच माहित नाही .. फिरून फिरून तिथेच येतेस "
निशी " सॉरी ... आता नाही शाळा पूराण लावणार .. ठीक आहे "
स्वराज " मी इथे राहायला आलो तर मी कोणत्या रूम मध्ये राहणार ती रूम दाखव मला मी तिकडे जाऊन झोपतो "
निशी " ठीक आहे .. पण या मुलांच्या गोंधळात झोप येईल का तुला ?"
स्वराज " आता सवय करावीच लागेल मला .. घरातच शाळा आहे म्हटल्यावर काय करणार ?"
आणि हसायला लागला
निशी ने दाखवलेल्या रूम मध्ये जाऊन तिथल्या लोखंडी बेड वर पडला ..
बाहेर शाळेतील मुले असल्यामुळे खरोखर पक्षांचा किलबिलाट असतो ना तसाच लहान मुलांनाच वेगळा किलबिलाट होता .. स्वराज ला पक्षी तर पक्षी आणि आता हि निशिगंधाची मुलं किलबिलाट करत असल्यामुळे झोपणे शक्यच नव्हते ..
निशी ने मुलांना त्यांच्या जागेवर बसवून पुन्हा फळ्यावर शिकवायला सुरुवात केली होती मग लॅपटॉप आत घेऊन आला आणि काम करायला सुरुवात केली ..
मध्ये मध्ये त्याचे लक्ष निशी वर होते .. फळ्यावर लिहता लिहता आपोआप तिचा हात मागे तिच्या वेणीला ती लावायची आणि वेणीच्या खालच्या झुपक्या शी खेळत खेळात मुलांना शिकवायची ..
मुलांवर बारीक लक्ष असायचं .. खूप छान त्यांना समजून शिकवायची म्हणतात ना ज्याला जे काम आवडतं ते काम करताना त्याला जगाचं भान राहत नाही अश्या पद्धतीने ते काम करत होती .. मुलांचे निरागस प्रश्न पण खूप छान पद्धतीने हॅन्डल करत होती .. ना चिडचिड .. शांतपणे आपले काम चालू ठेवायची . तितकीच हाडाची शिक्षिका आहे हे त्याला प्रकर्षाने जाणवले.
तिचे निरीक्षण करत करता तो त्याचे ऑफिस चे काम करू लागला .. मध्ये मध्ये एक्सेल शीट , मध्ये मध्ये PPT , मध्ये मध्ये मेल्स चेक करणे वगैरे असे चाललेले होते त्याचे ..
त्याच इमेल्स मिळाल्यावर लगेच क्लाएंट पण काम वाढवू लागले .. आणि त्याचे काम वाढतच गेले .. शेवटी एक दोन इंटरनॅशनल कॉल करून त्याला क्लाएंट ला सांगावे लागले कि मी आऊट ऑफ कंट्री आहे .. आलो कि मिटिंग ला येईल .. काही अर्जंट असेल तर डॅड ला मेल करा .. माझ्या अबसेन्स मध्ये ते हॅन्डल करतील
बोल बोलता १२ वाजले आणि सगळी मुले आपापल्या घरात गेली ..
निशी ने हातपाय धुतले आणि जेवणाला लागली .. तोपर्यंत हरी भाऊंनी नोकर तर्फे स्वराज चे सामान इकडे पाठवून दिले
आज निशी ने मस्त चवळीची आमटी , लाल माठाची पालेभाजी , भात आणि गरमा गरम भाकरी असा मेनु केला
निशी " स्वराज , चल जेवून घे "
स्वराज लॅपटॉप कडे बघतच काहीतरी टाईप करत होता .. काहीतरी कामात असावा
स्वराज " वन मिनिट डार्लिंग .. "
निशी ला कसेतरीच वाटले .. "डार्लिंग काय.. काहीही बोलतो "
बाहेरच्या देशात इट्स नॉर्मल वर्ड .. पण आपल्याकडे तेवढा सर्रास वापरत नाहीत .. त्यात निशी गावात लहानाची मोठी झालेली .. त्यात एका शिक्षकाची मुलगी , त्यात ती स्वतः शिक्षिका हे सगळे बघता तिला तो शब्द खटकला आणि ती त्याच्याशी न बोलता पुन्हा किचन मध्ये आली
स्वराज चे मेल टाकून झाल आणि तो जेवायला म्हणून लॅपटॉप शट डाऊन केला आणि जेवायला आला
निशी ने त्याला जेवायला वाढले आणि स्वतःला पण घेतले कारण जेवण झाले कि तिला आज विठ्ठल काकांच्या शेतात जायचे होते
स्वराज " सिरियसली यार तू ना सेम आई सारखे जेवण बनवते .. आई सेम अशीच आमटी बनवायची .. तुला सांगतो लहानपणी मला हि आमटी खुप आवडायची .. आता मी किती वर्षांनी खातोय .. अहाहा .. आत्मा तृप्त झाला माझा "
निशी काहीच बोलली नाही
स्वराज " आज बाबा पाहिजे होते इथे त्यांनी तुला बक्षीस दिले असते .. एकदा एक इंडियन भेटला आम्हाला तिकडे आणि त्यांनी मोड आलेल्या वालाचं बिरडं खायला दिले .. बाबांनी जवळ जवळ १० वर्षांनी ते बिरडं खाल्ले होते तर त्यांनी आनंदात त्यांना मोठ बक्षीस दिले "
निशी " हो काका असेच आहेत .. दिलदार…मला आठवतंय ना .. मी लहान पणी तुमच्या कडे आले ले ना तेव्हा मी रांगोळी काढली म्हणून त्यांनी मला परकर पोलका नवीन घेतला होता .. इतकि आवडली होती त्यांना "
स्वराज " त्यांनी रांगोळी साठी तुला ड्रेस नाही घेतला काय ? त्यांना तू आवडलीस ना म्हणून घेतला " आणि हसायला लागला
स्वराज " लहान पणी कसली क्युट होतीस ग तू .. मला अजून आठवतंय .. ब्राऊन कलरचा तुझा पारकर पोलका .. दोन जाड वेण्या , आणि एक तरी फुल डोक्यात असायचेच .. आणि नाक .. नाक कसं छोटुसे होते .. मला प्रश्न पडायचा हि श्वास घेते तरी कशी एवढ्याश्या नाकपुड्यातून .. "
निशी जराशी हसली .. स्वतःची तारीफ ऐकल्यावर जसे हावभाव असतात ना तसे भाव आले तिच्या चेहयावर
स्वराज " आणि तुला आठवतंय का ? ते शेतातली मजा "
निशी " काय ? कोणती रे ? आता खूप वर्ष झाली ना .. आणि त शी मी लहान होते मला फार आठवत नाही "
स्वराज " अग त्या आंब्याच्या झाडाला आईच्या साडीचा झोपाळा लावला होता .. त्या झोक्यावर बसायचीस आणि मला म्हणायचीस स्वऱ्या अजून उंच .. अजून उंच .. किती मोठे झोके दिले तरी समाधानच नसायचं तुझे .. मग मी म्हणायचो " अग आता काय ढगात जातेस कि काय ?" तर मला म्हणायचीस " ढगात नाही रे .. उंच आकाशात जायचंय मला .. "
निशी " हो ... आणि ते आठवतंय का .. मला पाडवलस म्हणून काकांनी तुला उन्हात ओणवे उभे केले होते .. तर तू किती रडला होतास .. आणि मग शिक्षा झाल्यावर मला परत मुद्दामून पाडलं होतंस .. "
स्वराज " ए काही पण काय .. तेव्हा तू तुझि पडली होतीस .. मी तसा त्रास देणारा कधीच नव्हतो .. उलट मी तुला उचललं होते "
निशी " असेल मग .. मला नीटसं आठवत नाहीये "
स्वराज " बरं ऐक ना .. मला गावच्या घरी जायचंय .. येशील का तू माझ्या बरोबर ? एकटा जाऊन काय करू ?तू बरोबर असलीस तर मज्जा येईल "
निशी " सकाळी जाऊन संध्याकाळी परत यायचं असेल तर मी येते "
स्वराज " अरे .. मला एक रात्र तर राहू दे माझ्या लहानपणी च्या घरी .. रमू दे जरा मला माझ्या बाल पणात .. त्याही पेक्षा आता मी गेलो कि परत कसलं येतोय आईच्या खूप आठवणी आहेत ग तिथे "
निशी " ठीक आहे .. पण रात्री राहणार कसे तिकडे .. इतके वर्ष घर बंद आहे ते .. आपण झोपू नाही शकणार .. काहीच नाही करू शकणार तिथे "
स्वराज " त्याची काळजी करू नकोस तू .. मी आलरेडी माझा मित्र आहे ना त्याला कळवलंय .. तो माणसं लावून घर बऱ्यापैकी साफ करून ठेवणार आहे .. आणि आपल्या ला कुठे जास्त राहायचंय .. एक रात्र काढायचीय "
निशी " ठीक आहे .. मग शुक्रवारी शाळा झाली कि जाऊ .. शनिवार रविवार शाळेला सुट्टी "
निशी चे जेवण झाले .. ती उठली आणि भांडी भरून ठेवली ..
निशी " ऐक ना .. मी निघते .. मला उशीर होईल ... हि घराची चावी आहे .. तुला जर बाहेर जायचं असेल तर तू कुलूप लावून जा .. मी माझ्या कडे एक चावी घेतलीय .. तू अराम कर मी निघते "
स्वराज " यार .. मी आधीच पकलोय इकडे येऊन .. मी आलोय तुझ्या साठी तर तुझ्याशी नीट बोलायला पण मिळत नाही .. किती काम करतेस तू .. आता तर जेवलीस ना .. आता भर उन्हाची कुणीकडे चाललीय "
निशी " अरे आज त्या विठ्ठल काकांच्या शेतात जाऊन पोती भरायचं काम आहे .. पोती नीट शिवली कि नाही .. वजन बरोबर आहे कि नाही .. आणि टोटल किती पोती आहेत हे काम आहे .. "
निशी निघतच होती तर
स्वराज " थांब ना मी पण येतो तुझ्या बरोबर .. दोघे मिळून काम करू "
निशी " नको रे .. तुला उन्हाळा सहन नाही होणार .. तिकडे तर पंखा पण नसतो "
स्वराज " मी एक काम करतो .. मी तुझ्या बरोबर येतो .. मला कंटाळा आला तर येईन निघून . आता बऱ्या पैकी रस्ते माहित झालेत मला "
निशी " आवरशील का मग पटकन .. मला उशीर होतोय रे .. संध्याकाळी लवकर काळोख होतो हल्ली .. शेतात सायकल ने जाता येत नाही .. चालत जावे लागते अर्धी वाट "
स्वराज ने कसे बसे ताटातले संपवले हातावर पाणी घेतले आणि निघाला तिच्या बरोबर
दोघे भराभर चालत शेतात पोहचले ..

🎭 Series Post

View all