निशिगंधा भाग 58

In this Part Nishi Nd Swaraj Go For The Grand Welcome Party Arranged By Mom
निशिगंधा भाग ५८
क्रमश भाग ५७
स्वराज " डोन्ट वरी .. तूला मी तयार करतो म्हटले ना "
निशी “नाही नको मी माझी माझिया होईल तयार.. तू सांग फक्त मला मी काय काय आणि कसे करू ते” आणि निशी अंघोळीला गेली
निशी अंघोळ करून बाथरोब वर बाहेर आली ..
स्वराज ने तोपर्यंत सगळी तयारी करून ठेवली होती ..
पार्टी वेअर ड्रेस . एकसेसरीस , जुलरी , सँडल्स .. मेक अप चे सामान .. ड्रेसिंग टेबल वर बरीच तयारी होती ..
स्वराज " हे सगळे सामान आहे इथे .. तू तयार होऊन जा .. मी माझा मी तयार होतो ठीक आहे " आणि तिच्याकडे लक्ष च नाहीये असे त्याने दाखवले आणि वॉशरूम मध्ये निघाला
निशी ते सगळे बघून घेतले .. बरंच सामान असे होते कि नक्की याचा काय उपयोग करायचाय आणि कसा करायचाय .. हे हि तिला माहित नव्हतं .. आणि सगळे बघूनच गोंधळून गेली...
पटकन धावत जाऊन त्याच्या समोर उभी राहिली
निशी " नाही म्हणजे .. तू थोडी मदत केलीस तर चालेल मला "
स्वराज ला हसायलाच येत होते
स्वराज " नाही .. नको .. मला वेळ नाहीये .. तू . हो तयार .. तुझी तू.. मी कोण आहे ना .. उगाच मध्ये मध्ये लुडबुड कशाला माझि नाही का ?"
निशी " मी असे कुठे म्हटलंय ?"
स्वराज " म्हणायला कशाला पाहिजे .. कळत मला आपोआप .. न सांगता .. नाही नाहीतर तू नेस साड्या .. तुझी सासू घालेल मस्त वेस्टर्न क्लोथ्स तू साडीच घाल .."
निशी " स्वरू .. प्लिज हेल्प मी ना\"? " एकदम गोड आवाजात
इतकी क्युट दिसत होती .. नुकतीच अंघोळ करून आलेली त्यामुळे एक प्रकारचा अरोमा होत्या तिच्या भवताली .. आणि त्यात एवढं क्युट थोबाड करून स्वराज कडे बघून बोलल्यावर कोणाचा निभाव लागेल ..
स्वराज " पुन्हा जर आगाऊ पणा केलास ना तर तुझाच धपाटा तुला देईल .. मग तुला कळेल .. तुला काय वाटले शहाणे .. "आणि तिला दोन्ही हातात उचलेले त्याने … ती शांत होती .. आता तू काय करशील ते सगळे मान्य आहे म्हणून १०० परसेंट सरेंडर ..
तिला आरशा समोर उभे केले त्याने...
स्वराज ने तिच्या हातात एक ड्रेस दिला .. आणि घालायला सांगितला .. निशी काही बोलणार तर त्याने डोळ्यांनीच खुणावले " नको काही बोलूस .. जस्ट वेअर इट "
निशी ने तो ड्रेस घातला .... ब्लॅक ड्रेस .. थाय पासून एक साईडला ओपन कट होता .. शोल्डर एक साईडला होता आणि एक साईडला नव्हताच .. डिझायनर ड्रेस होता .. मध्ये मध्ये सिल्वर वर्क शाईन करत होते .. बॅक खुप डीप होती आणि साईड झिप होता .. जी कि निशी ला ती कशी लावावी काहीच कळत नव्हते .. कुठून कुठून ओपन आहे हा ड्रेस हे बघूनच धडकी भरत होती तिला ..
स्वराज ने तिचे हात वर करायला सांगितले आणि .. तिची साईड झिप लावून दिली .. निशी एक टक त्याच्या डोळ्यांत बघत होती ..
स्वराज ने मागून मिठीत घेऊन तिच्या हातात डायमंड ब्रेसलेट चढवले.. हळू हळू त्याचा हात वर वर सरकवत त्याने तिच्या खांद्या पर्यंत आणला .. त्याचा रेशमी स्पर्श निशी च्या पोटात गोळे आणत होता .. तसेच त्याने तिच्या गळ्यात डायमंड चा नेकलेस घातला .. आणि त्याच्या ओठांचा स्पर्श तिला मानेवर जाणवला .. तिने तर डोळेच मिटले .. आज त्याचा स्पर्श मखमली वाटत होता .. त्याने हलकीच फुंकर घातली कानावर .. आणि कानातले घातले .. आणि तिच्या कानाच्या पाळी वर हलकेच ओठ ठेवले ..
स्वराज " निशी .. कधी जाऊयात हनिमून ला ? "
निशी पटकन उलटी फिरली आणि त्याच्या मिठीत गेली ..
निशी " स्वरू .. या अशा ड्रेस मध्ये मी मॉम डॅड समोर कशी जाऊ ?" तिने मुद्दामून विषय बदलला
कोणाचे काय तर कोणाचे काय ? त्याच्या मनात काय चाललंय ? आणि हिच्या मनात काय चाललंय ?
स्वराज " डोन्ट वरी जान .. मी आहे ना तुझ्या बरोबर .. आणि खूप छान दिसतंय हे .. त्याने तिला आरशा समोर उभे केले .. "
आपण कोणीतरी मिस इंडिया असावे असेच वाटले एक क्षण तिला .. तिला केस मोकळे सोडायला सांगितले .. ते छान सेट केले .. एक साईडला भांग पडल्यामुळे आज वेगळीच सुंदर दिसत होती ..
स्वराज ने तिला वर पासून खाली पहिले .. नुसती लिपस्टिक आणि काजळ लावली होती तिने तरी चेहरा चमकत होता .. ग्लो करत होता .. एक साईडने ओपन शोल्डर .. खूप नाजूक बांधा .. दिसत होता .. लांब सडक स्लिम हात .. बोटांना नेलपेंट लावून दिले त्याने आणि हातची नाजूक बोटं आज खुलून दिसत होती .. थाय पासून ओपन कट .. ती हाताने झाकून घेत होती .. तरी पण थोडा थोडा पाय दिसतच होता .. आणि पायात हिल्स आज तिने पहिल्यांदाच घातलया होत्या .. फार उंच नव्हत्या आणि पॉइंटेट पण नव्हत्या तरी पण साधी चप्पल पेक्षा वेगळे काहीतरी होते.
स्वराज " परफेक्ट .. मस्त दिसतेय .. आता मी तयार होतो .. गिव्ह मी १० मिनिट्स “आणि तो वॉशरूम मध्ये गेला ..
ति हाय हिल्स च्या सॅन्डल वर चालायची प्रॅक्टिस करत बसली .. तोपर्यंत .. स्वराज फ्रेश होऊन छान तयार झाला .. डार्क ब्लॅक शर्ट .. आणि क्रीम पॅन्ट .. बासच .. त्याला हँडसम दिसायला अजून कशाची गरजच नाही .. परम्युम चा फवारा मारून केस सेट केले आणि कोपरा पासून तिचा हात हातात घेऊन तो बाहेर निघाला ..
स्वराज " खुप सुंदर दिसतेय तू .. फक्त जरा कॉन्फिडन्स ने चाल .. सुंदरता अजून वाढेल .. स्माईल प्लिज .. हस ना स्वीटू "
निशी " चालताना पाय किती दिसतोय .. कसे दिसतंय ते "
स्वराज " मस्त दिसतंय .. डोन्ट थिंक टू मच "
निशी " ठीक आहे .. तुला आवडतंय ना नक्की ? हे जास्त महत्वाचे आहे "
स्वराज " हो .. आवडतंय म्हणजे .. मी स्वतः डिझायनर ला बोलून .. डिस्कस करून ड्रेस ऑर्डर केलाय हा "
निशी " रिअली ?? "
स्वराज " म्हणजे काय ? आणि आता असेच वेळ वेगळे ड्रेस नि वॊर्डरॉब भरलंय .. रोज वेग वेगळे ड्रेस ट्राय करायचे "
निशी " हमम .. "
मॉम अँड डॅड .. ऑल रेडी खाली बाहेर वाट बघत होते .. दोघांना हातात हात घेऊन चालत येताना पहिले आणि दोघे खुश झाले ..
करिन " ओह ! गोड ! बोथ आर क्युट टुगेदर "
सुधीर " गॉड ब्लेस देम .. " सुधीर च्या डोळ्यांतून आनंदाश्रु होते
करिन ने सुधीर च्या खांद्यावर हाताने रब केले
सुधीर " हाऊ मच आय एम हैप्पी आय कॅन नॉट से इन वर्ड्स "
करिन "आय कॅन फील इट .. "
करिन " निशी यु लूक फॅब्युलंस इन वेस्टर्न आऊट फिट .. सिम्पली फॅब्युलस .."
निशी " थँक यु मॉम .. "
सुधीर " यु नो व्हॉट निशी .. आपल्या कडे एक म्हण आहे .. जसा देश तसा वेष .. त्या उक्ती प्रमाणे तू या हि ड्रेस मध्ये एकदम छान दिसतेय .. "
स्वराज डोळे वर खाली करून तिला सांगत होता " मी काय म्हणत होतो .. तू खूप छान दिसतेय "
चौघे मॉम च्या कार मध्ये बसले .. मॉम कार चालवत होती .. डॅड पुढे मॉम च्या शेजारी बसले आणि स्वराज आणि निशी मागे बसले .. स्वराज ला तिचा हात हातात घेऊन बसायचे होते पण पुढे मॉम डॅड असल्यामुळे ती काही त्याला दाद देत नव्हती..
उलट डोळयांनीच ती त्याला सांगत होती " गप ना .. पुढे मॉम डॅड आहेत ना "
आणि तो डोळ्यांनीच " सो व्हॉट .. यु आर माय वाईफ "
मूक भांडण चालू होते
एका मोठ्या रेस्टारंट समोर कार थांबली .. चौघे उतरले आणि वेलवेट पार्किंग साठी कार एक जण घेऊन गेला ..
एका मिनी पार्टी हॉल मध्ये आले .. मॉम चे आणि डॅड चे काही खास क्लोज फ्रेंड्स आले होते तिथे ..
मॉम स्टेज वर आली .. सुधीर निशी आणि स्वराज फ्रंट सीट वर बसले
करिन " गुड इव्हनिंग लेडीज अँड जेंटलमन .. व्यिई मीन्स माय हजबंड अँड मी बोथ आर रिअली हैप्पी ..अवर सन स्वराज .. स्वराज कॅन यु प्लिज जॉईन मी ?
तसा स्वराज धावतच मॉम च्या शेजारी येईन उभा राहिला आणि हाताने सगळ्यांना हॅलो करू लागला ..
करिन " अवर सन गॉट मॅरीड बिफोर ३ मन्थस इन इंडिया .इट वॉज इंडियन मॅरेज .. नेक्स्ट वीक व्यिई आर गोइंग टू अरेंज मॅरेज रेस्पेशन बट लेडीज अँड जण्टलमन व्यिई आर हिअर फॉर इंट्रोड्युसिंग अँड वेलकमिंग माय डॉटर इन लॉ .. निशिगंधा
करिन ने निशी ला हाताने कॉल केले .. तशी निशी जागेवर उभी राहिली .. प्रेशर .. प्रेशर होते तिच्या चेहऱ्यावर .. स्वराज पुन्हा खाली आला .. आणि तिच्या हाताला धरून त्याने तिला स्टेज वर नेले ..
करिन " सुधीर .. डू यु वॉन्ट टू से समथिंग अबाऊट निशी "
तसे सुधीर पण स्टेज वर आले " हॅलो एव्हरी वन .. लेट मी इंट्रोड्युस माय डॉटर इन लॉ .... हर नेम इज निशिगंधा .. शी इज डॉटर ऑफ माय चाईल्ड हूड फ्रेंड प्रकाश .. व्यिई ह्याव स्वीट मेमरीज .. .. शी इज डॉटर ऑफ टीचर अँड शी इज कॅरिंग ऑन हर फादर्स लीगसी व्हेरी ग्रेसफुली इन इंडिया.. करिन अँड मी बोथ आर हैप्पी टू वेलकम निशिगंधा " ..
तशा खाली बसलेल्या सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या .. निशी सगळ्यांपुढे हात जोडून नमस्कार करत होती ..
खालून कोणी तरी बोलले " वेलकम निशिगंधा .. से समथिंग .. व्यिई वूड लाईक टू हिअर समथिंग फ्रॉम यु "
आणि खालून पुन्हा टाळ्या वाजल्या
स्वराज ने तिच्या हातात माईक दिला .. निशी त्याच्याच डोळ्यांत बघत होती .. एवढा मोठा आणि एवढं सगळे माझ्यासाठी चाललंय हेच तिच्यासाठी रडायला भरपूर होते .. आणि स्पीच वगैरे तिने तयार केलेलं नव्हते .. पण स्वराज ला तिच्या वर खात्री होती कि मास्टरींन बाई बाजी मारेलच "
निशी ने भरल्या डोळ्यांनी एकदा मॉम आणि डॅड कडे बघितले ..
मॉम आणि डॅड तिला थम्प्स अप दाखवून खाली बसायला गेले .. स्वराज पण जायला निघालाच होता तर तिने त्याचा हात पकडला .. सर्वां समोर .. तिची हि ऍक्शन पाहून सगळे हसले ..
स्वराज ने तीच्या कपाळावर किस केले " यु कॅन डू इट निशी .. डोन्ट वरी "
त्याच्या ह्या ऍक्शन ने तर संगळ्यानी टाळ्याच वाजवल्या
स्वराज " मी आहे इथेच " ठीक आहे " आणि तो बाजूला थांबला

🎭 Series Post

View all