निशिगंधा भाग 95

Story Of A Girl Who Wants To Run School


निशिगंधा भाग ९५
क्रमश " भाग ९४
दोघे घरी आले तर नंदा ने दोघांसाठी जेवण आणि चहा बनवून दिला .
स्वराज " नंदा .. थँक यु .. रणजित कसा आहे ?"
नंदा " हा आहे आता बरा .. रिकव्हर होतोय .. "
स्वराज " उद्या मी आणि निशी जाईल त्याला भेटायला "
नंदा " हो चालेल .. "
स्वराज " ते .. तुझ्या मैत्रिणीला उद्या बोलावं .. मी बोलून घेईन "
नंदा " हो ठीक आहे चालेल "
नंदा पण खूप दमली होती .. सकाळी शाळा .. मग रणजित कडे गेली .. तिकडून आल्यावर निशी आणि स्वराज साठी रात्रीचे जेवण बनवले ..
नंदा " निशी .. आता थोडा आराम कर... मी रात्री ताट वाढून द्यायला येईन .. मी आता जाते घरी " आणि नंदा निघून गेली
स्वराज सोनिग्राफी चा कागद हात घेऊन बाहेर बसला होता .. सारखे सारखे वाचत होता .. त्या सोनिग्राफी मध्ये बाळाचे नाक .. कान .. जे त्याला स्क्रीन वर दाखवले होते ते त्या काळ्या फिल्म मध्ये शोधत होता ..
निशी आत मध्ये बेड वर आडवी पडली होती
निशी आतून " स्वरू .. मॉम डॅड ला अजून सांगितले नाहीये .. तू कॉल करून सांग ना "
स्वराज " हो .. मी कॉल केला होता कालच .. मी सांगितलंय .. दोघेही खूप खुश आहेत .. तुझ्याशी बोलायचंय त्यांना .. थोडा आराम कर मग लावून देतो फोन "
निशी " हमम .. " आवाज जड झाला होता तिचा
स्वराज तिथेच फाईल ठेवून आत आला तर निशी रडत होती
स्वराज " काय ग .. काही त्रास होतोय का ? "
निशी " नाही .. थोडे थकली आहे .. बाकी काही नाही "
स्वराज "आता फक्त अराम करायचा .. फक्त खायचं .. प्यायचं आणि झोपायचं .. आणि गोळ्या औषध घ्यायची .. ठीक आहे .. डोन्ट टेक टेन्शन .. मी आहे ना सगळे ठीक करतो "
निशी " मला आज आई पाहिजे होती .. असे वाटतंय आज .. " आणि तिला जो हुंदका भरला कि पुढे बोलवलंच नाही
एका मुलीला जेव्हा ती आई बनणार असते तेव्हा सर्वात जास्त तिच्या आईची आठवण येते .. आई मी आई होणार आहे .. आईच्या मांडीवर डोके ठेवून झोपावे असे वाटत होते ..
स्वराज ला एकदम वाईट वाटले .. निशी मनातून आता काय फील करतेय ह्याचा विचार मी करायला पाहिजे होता
स्वराज तिच्या शेजारी बसला .. तिचे डोके काल सारखे त्याच्या मांडीवर ठेवून घेतले त्याने
स्वराज " निशी .. मी आहे ना .. तुझ्या साठी .. आणि तू माझ्या साठी .. काही काळजी करू नकोस .. सर्व ठीक होईल .. "
निशी च्या डोळयांतून अश्रू ओघळला
निशी " स्वरू .. मी निष्काळजी नाहीये .. पण मला कोणी सांगायला पण नाहीये कि असे कर .. असे नको करुस .. माझे काही चुकलं तर .. "
स्वराज " नाही चुकणार .. तू एवढी हुशार आहेस .. चुकेल कशाला?"
निशी " तू चिडला नाहीयेस ना माझ्यावर .. चिडू नकोस प्लिज "
स्वराज " शु... आता झोप बघू जरा वेळ .. यु नीड रेस्ट .. मी नाही चिडलोय .. आणि मी काल चिडलो होतो तरी तुझी काळजी वाटत होती म्हणून चिडलो ना "
निशी " हमम .. "
तिला लिटरली कुशीत घेऊन थापटून त्याने झोपवलं .. तिला तर त्याच्या प्रेमाच्या उबे मध्ये झोप लागली .. पण स्वराज खूप गाढ विचारात गेला होता ..
त्याचा मनात विचार पक्का होत गेला कि हिला इथून UK ला घेऊन जाण्यातच भलाई आहे .. तिकडेच ती जास्त सुखी राहील
--------------------------------
मामा मामी विश्वास .. विशाखा सगळेच घरात होते आज .. रणजित पण बरा होत होता आणि घरातील दुःखाचे सावट कमी होत होते
तेवढयात रत्नमाला चहा घेऊन बाहेर आली .. सगळ्यांना एकेक करून चहाचा कप तिने दिला .. विश्वास ने कप हातात घेतला पण तिच्याकडे बघितले पण नाही .. आणि हे रणजित ने बघितले ..
रणजित समोर बेड वर आडवा होता .. विशाखा ने चहा बशीत ओतला आणि रणजित ला चहा पाजायला जात होती तर
रणजित " कप दे माझ्या हातात .. एक हात चांगला आहे माझा .. मी पिईन "
विशाखा " ठीक आहे "
रणजित " मामा मला काही बोलायचंय ?"
मामा " हा बोल ना ?"
रणजित " आई आणि रत्ना तुम्ही दोघी पण या इकडे बाहेर "
तशा या दोघी पण आल्या बाहेर आणि तिथे बसल्या
रणजित " आई .. तू रत्ना ची काळजी करू नकोस .. रत्ना ला मी खूप शिकवणार आहे .. ती तिच्या पायावर उभी झाली कि मगच मी तिचं लग्न लावून देईल .. तशीही रत्ना आणि विशाखा अजून दोघीही लहान आहेत .. "
आत्या " लहान कसली रे ? आता पुढल्या महिन्यात साखरपुडा करायचाय तिचा .. तशी रत्ना लाजली .. आणि तसेच काहीसे एक्सप्रेशन विशाखाच्या चेहऱ्यावर यायला पाहिजे होते पण आले नाहीत .. कारण तिला कुठंतरी नंदा विषयी जाणवत होते
रणजित " रत्नमाला .. मी काय सांगतोय ते ऐकशील का ? तू .. खूप शिकशील का ? सध्या हा लग्नाचा विषय थांबवू आपण "
मामा " बरं झाला हा विषय काढलास रणजित .. मला बोलायचेच होते या विषयी .. "
आत्या " दादा .. तुला काय वाटतं .. पोरांची लग्न कधी करावीत ?"
मामा " विश्वास .. विश्वास ला त्याच्या ऑफिस मधली एक मुलगी आहे तिच्याशी लग्न करायचंय .. आणि हे रत्ना ला माहित असणे गरजेचे आहे "
आत्या रडायलाच लागली " विश्वास .. हे काय ऐकतेय मी .. अरे तू तरी असा नको वागायला पाहिजे होतास .. रत्ना चा जरा तरी विचार करायचा होतास .. दादा .. काय होईल आता माझ्या लेकरांचे .. रत्ना .. कसले नशीब लिहून आणलंय काय माहित ? "
विशाखा " आत्या .. अग काय करतेय ? रडतेस कशाला ? ऐकून तर घे ना ते काय बोलतायत "
आत्या " रणजित .. मला काही माहित नाही तुझा प्लास्टर काढल्या काढल्या तुझा आणि विशाखा चा साखरपुडा करून घेऊ. मला बाकी काही माहित नाही .. "
रत्ना पण रडत उठली घरा बाहेर पडली " आई मी सविता कडे जाऊन येते .." आणि तरा तरा घरातून बाहेर पडली
रणजित " आई .. रत्ना ला आपण दुसरा मुलगा शोधू .. तू नको टेन्शन घेऊस "
आत्या " अरे मुलगा तर मिळेल रे पण त्यांच्या मागण्या कोण आणि कसे पूर्ण करणार आहोत आपण ?"
रणजित " होईल ना .. आ ता मला नोकरी लागलीय ना .. तुझी अजून २ वर्ष नोकरी आहे .... होईल काही तरी तोपर्यंत .. विश्वास चे प्रेम नाहीये ना तिच्यावर तर मग का आपण त्याला फोर्सफुली लग्न करायला लावायचे नाही का ?"
आत्या " मग काय करायचं ? तिला आयुष्यभर घरात बसवून ठेवायचं का ?"
तेवढ्यात विशाखा बोलली
विशाखा " बाबा .. मला पण सांगायचंय एक .. "
मामा " बोल ना "
विशाखा " मला असे वाटते जसा रणजित म्हणलं तसा मी पण खूप लहान आहे .. अजून शिक्षण होयचंय .. जसे दादा ( विश्वास चे)ऑफिस मध्ये कोणावर तरी प्रेम आहे तसेच रणजित वर सुद्धा कोणाचं तरी खूप प्रेम आहे .. मला वाटतं हि दोन्ही लग्न थांबवूया .. आणि दादा चे त्याच्या पसंतीने लग्न लावून देउया .. तसेच रणजित आणि त्याच्या वर प्रेम करणाऱ्या मुलीचे लग्न लावून द्या .. रत्ना आणि मी अजून शिकू .. शहरात जाऊ .. बाबा .. ऐका ना .. मला पुण्याच्या कॉलेज ला ऍडमिशन घेऊन द्या ना "
मामा " रणजित काय म्हणणं आहे तुझे ?"
रणजित ने एकदा आई कडे बघितले
रणजित " आई हे पण खर आहे .. नंदा चे माझ्यावर प्रेम आहे .. आणि मला पण ती आवडते पण अजून पर्यंत तिला असे काही वचन वगैरे दिले नाहीये.. "
मामा " खरं सांगू रणजित .. नंदा मुलगी चांगली आहे .. मी बघतोय हॉस्पिटल ला असल्या पासून तीने खूप केलंय तुझ्यासाठी .. "
आत्या " पण आपल्या विशाखाचं काय ? रत्ना च काय ?
मामा " विशाखा आणि रत्ना शिकायला जातील पुण्याला .. मी खर्च उचलेना रत्नाच्या शिक्षणाचा .. सध्या मुलांची लग्न लावून देऊ "
तेवढयात नंदा भावाच्या गाडीवर बसून आलीच ..
तिला बघून रणजित च्या चेहऱ्यावर एकदम गोड हसू आले ..
नंदा घरात आली .. रणजित न झोपता बसला होता हे बघून ती एकदम नाराज झाली .. बॅग तिथेच दारात टाकून
नंदा " रणजित .. अरे हे काय ? झोपायचंस ना थोडं .. चल मागे सरक बघू .. "
रणजित गप पणे मागे सरकला .. आणि झोपला
मामी " नंदा .. शाळेत गेली नाहीस का आज ?\"
नंदा " गेलेले ना शाळेत .. सकाळी शाळेत गेले .. मग कॉलेज ला गेले .. असाइनमेंट सबमिट केल्या .. मग घरी गेले .. माझी मैत्रीण निशिची तब्बेत बरी नाहीये ना .. मग तिच्यासाठी जेवण बनवले .. आणि इकडे आले "
आत्या " नंदा तुझ्या वडिलांना भेटायला कधी येऊ ?"
नंदा " का ? का ? काय झाले ? म्हणजे बाबांना का ? "
आत्या " तुला या घरची सुनबाई बनायचंय ना ? मग .. भेटायला पाहिजे ना त्यांना "
तशी नंदा ने एक मिनिट रणजित कडे बघितले आणि किचन मध्ये धावत गेली ..
किचन च्या दाराला टेकून उभी राहिली .. श्वास भरून आलेला आणि डोळ्यांत अश्रू होते .. आनंद .. किती तो आंनद झाला होता .... पण सगळे तिथे असल्या मुळे तिला खूप लाज वाटत होती .. पण दोन एक मिनिटांनी तिला विशाखा आठवली आणि तिचा सगळा आनंद विरून गेला .. निशी म्हणाली तशी विशाखाच्या सुखात आपण मधेच आलो नाही ना आणि त्या विचाराने धावत बाहेर आली
नंदा " पण .. विशाखा ... तिचं काय ?.. माझ्या मुळे विशाखाचे स्वप्न मोडेल ना .. "
विश्वास " विशाखा शिकायला पुण्यात जाणार आहे .. तिला आत्ता लग्न नाही करायचेय "
विश्वास " आत्या .. रत्ना कुठे आहे ? ती .. ठीक असेल ना ?"
आत्या " रत्ना ला थोडा वेळ जाईल यातून बाहेर पडायला .. पण मी समजावेनं तिला "
मामी " ठीक आहे .. सर्वांच्या मना सारखे होणे गरजेचे आहे .. आपल्या पोरी आहेत चांगल्या त्यांना नक्की चांगला नवरा भेटेल "
नंदा " म्हणजे ? रत्ना चे लग्न पण थांबवताय का ?"
रणजित " हो .. विश्वास ला त्याच्या ऑफिस मधल्या मुलीशी लग्न करायचंय "
नंदा " ओह !! "
रणजित " विशाखा .. माझ्या मुळे तुझ्या भावना दुखावल्या असतील तर खरंच सॉरी "
नंदा " विशाखा .. रणजित ला माझ्या झोळीत टाकल्या बद्दल तुझे किती धन्यवाद मा नू असे झालंय म्हणत तिने विशाखाला घट्ट मिठी मारली
विशाखा " नंदा .. आय मिन आता तुला वाहिनी म्हणावे लागेल मला " तशी नंदा रडता रडता हसली
आणि तिकडे रणजित पण गालातल्या गालात हसला

🎭 Series Post

View all