निशिगंधा भाग 94

Story Of A Girl Who Wants Run School
निशिगंधा भाग ९४
क्रमश : भाग ९३
निशी काहीच बोलली नाही
स्वराज " आपण निघतोय UK ला आता .. बस झाले इंडिया .. शाळा बांधून देण्याची जवाबदारी माझी .. त्यासाठी तू इथे थांबायची गरज नाहीये .. "
निशी " स्वरू .. आता जरा झोप तू .. डोळे बघ किती खोल गेलेत .. मला बोलतोस .. पण तुझी काय अवस्था करून घेतलीय तू "
स्वराज "तुला काय माहित एक नवऱ्याची अवस्था ज्याची बायको कुठल्या तरी आड गावात एकटी राहते तेव्हा त्याला किती काळज्या असतील .. तिकडे मॉम डॅड .. इकडे तू .. मरणाचे काम होते डोक्यावर ते वेगळेच "
निशी " प्रोजेक्ट ची काय सिचवेशन आहे "
स्वराज " दिवसरात्र लिटरलि एक केलंय .. का तर मला लवकर मोकळे होयच होते त्यातून .."
निशी " म्हणजे ?"
स्वराज " प्रोजेक्ट मिळालाय .. आता राजेश आणि त्याच्या बरोबर ५ एम्प्लॉयी सगळे जण त्या प्रोजेक्ट वर काम करतील .. राजेश विल लीड द प्रोग्रॅम .. अँड इ विल बी सायलेंट ओब्झरवर.. म्हणजे आता मी UK तुन पण काम पाहू शकेल "
निशी एकदम खुश झाली
निशी " काँग्रेचुलेशन मिस्टर स्वराज .. यु आर ग्रेट .. सहा महिन्याचे काम तुम्ही ३ महिन्यातच केलेय "
स्वराज " म्हणूनच UK ला न जाता इकडे आलेलो .. म्हटले तुला घेऊन UK ला जाईन .. पण इकडे सगळाच उजेड पाडलाय तुम्ही .. फक्त तीन महिने पण नाही ना नीट राहू शकलिस "
निशी " स्वरू .. बास ना आता .. किती चिडतो " आणि तिच्या डोळ्यांतून पाणी आले ..
तेवढ्यात नर्स आत आली तिची सलाईन संपलीय का ते बघायला .. नर्स ने तिला डोळे पुसताना पाहिले
नर्स " काही त्रास होतोय का ?"
निशी " हो .. माझा पाय खूप दुखतोय .. "
नर्स " ठीक आहे एक पेन किलर च इंजेक्शन देते सलाईन मधून .. "
निशी " ठीक आहे "
नर्स " तुम्ही कोण आहेत पेशन्ट चे ?" स्वराज कडे बघून
स्वराज " कोण वाटतोय ?" तो आज इतका सटकला होता .. मनात " नॉन्सेन्स question विचारते .. बावळट "
नर्स " एवढे चिडताय म्हणजे नवराच असावेत ..जरा बाहेर या .. बोलायचंय तुमच्याशी "
स्वराज बाहेर आला
स्वराज "बोला "
नर्स " त्या आजारी आहेत .. शिवाय तीन महिने प्रेग्नंट आहेत .. पायाची जखम खोल आहे .. त्यामुळे कदाचित रात्री ताप भरेल .. तुम्ही त्यांची शारीरिक व्याधी कमी नाही करू शकत ..ती त्यांची त्यांनाच सहन करावी लागणार आहे .. मानसिक त्रास न देता आधार देता आला तर बघा .. बाकी तुम्ही तर शिकले सवरलेले दिसताय .. बायको आहे .. शम्भर चुका करतात बायका .. पण त्या मागची कारण कोण बघत नाही .. कारण काय असते सांगू .. नवऱ्या वरच प्रेम "
स्वराज ची गोड शब्दात कान उघडणीच केली होती त्या नर्स ने .. आणि स्वराज च्या डोळ्यांतून पाणी आले .. तिच्या समोर .. स्वराज ने चक्क त्या नर्स ला मिठी मारली " सॉरी .. जरा मीच .. अस्वस्थ आहे ..काय बोलू आता "
तशी ती नर्स " अहो .. काय करताय ? काय वेड लागलंय का तुम्हांला ?"
स्वराज " तुम्ही सिस्टर आहेत ना .. मग सिस्टर म्हणजे बहीणच झाली ना "
तशी ती नर्स त्याच्याकडे बघत निघून गेली
स्वराज ने डोळ्यांतले पाणी पुसले .. आणि मनात विचार करू लागला .. काही झाले तरी आता चीड चीड करून काही फायदा नाहीये.. सध्या निशी ची तब्बेत ठीक असणे जास्त महत्वाचे आहे .. तिने बिना टेन्शन राहणे गरजेचे आहे .. आफ्टर ऑल आय एम गोइंग टू बी फादर .. मला आता माझे पेशन्स वाढवावे लागतील .. निशी ला योग्य वेळ आली कि तिची चूक दाखवून देता येईल .. पण ती हि वेळ नाहीये .. ती पण बिचारी एकटी काय काय बघेल .. असा विचार करतच होता कि आतून निशी ने आवाज दिला
स्वराज पटकन धावतच आत आला " काही हवंय का तुला ? पाणी .. पाणी देऊ का ?"
निशी " हे बघ स्वराज .. मी असे वागले त्याला माझि काही कारणे आहेत .. तुला कदाचित ती चुकीची वाटतील.. ती असे बोलत होती तर स्वराज तिच्या शेजारी बेड वर बसला .. तिच्या डोक्यावरून त्याने हात फिरवला .. तशी निशी चेहरा दुसरीकडे करून जोर जोरात रडायला लागली आणि रडतच " सॉरी .. "
स्वराज " यार .. सॉरी नको ना बोलूस .. मला नाही आवडत तू मला सॉरी बोललेलं .. तू . रडू नको ना प्लिज "
निशी चे डोळे त्याने पुसले .. निशी ने पटकन त्याच्या मांडीवर डोके ठेवले .. " "स्वरू .. मला सोडून नको जाऊस आता .. मला नाही एकटीला रहायचं .. बहुदा माझ्याच्यानं नाही होत आता इथले काम .. मी हरलेय आता... मी थकलेय .. "
स्वराज " अरे नको आता निगेटिव्ह विचार करुस .. एवढ्या कठीण प्रसंगांना मोठ्या निकराने एकटीने लढा देतेस तू .. मी आलो कि कमजोर पडतेस उगाच च .. मी नसलो कि झाशीची राणी सारखे राहतेस आणि मी आलो कि एकदम बाबांची सोनुली बनून जातेस "
निशी " ते मला माहित नाही .. मला तुला दुखवायचं नव्हतं .. तुला मी लगेच सांगायला फोन केलाही होता .. तूच आठव गेल्या दोन महिन्यात आपण किती आणि कसे बोललोय .. मी एकदा रडले पण होते फोनवर .. मला तेव्हाच सांगायचं होते तुला .. पण तू इतका बिझी होतास .. कि नाही सांगवलं मला .. आणि तू ला कळलं असते तर तुझा ड्रीम प्रोजेक्ट सोडून आला असतास कि नाही .. सांग बरं "
स्वराज " हो .. सगळे तुझे बरोबर आहे .. आता रडणे थांबावं .. एकदम शांत हो बघू .."
निशी " तू .. तू .. खुश आहेस ना .. चिकू साठी .. ??"
स्वराज " म्हणजे काय आय एम सुपर एक्ससायटेड "
बोलता बोलता तो तिला थोपटत होता आणि नर्स ने इंजेक्शन दिल्यामुळे तिला झोप लागली . मिटलेल्या डोळ्यांत पण पाणी होते.. स्वराजने डोळे पुसले आणि तिथेच त्याच बेड वर तिच्या शेजारी आडवा पडला .. तो हि इतका दमला होता .. कि तिथेच तिच्या जवळ त्यालाही झोप लागली ..
हरी भाऊ आणि राधाक्का डबा घेऊन आले तर दोघेही गाढ झोपले होते .. हरी भाऊंनी डबा तिथेच ठेवला .. नर्स ला सांगून सलाईन स्लो केली .. आणि लिटरली दार लावून .. दोघांच्या अंगावर पांघरून टाकून निघून गेले ..
तीन महिन्यांनी दोघेही शांत झोपले होते .. गाढ ..
दुसऱ्या दिवशी सकाळी स्वराज तिला छान मिठीत घेऊन झोपला होता .. सगळी टेंशन्स , राग कुठेतरी गायब होता .. निशी त्याला उठून पाहत होती .. शांत झोपला होता .. एखाद्या लहान मुलासारखा .. निरागस वाटत होता .. तिच्याही नकळत तिने त्याच्या केसांमधून हात फिरवला आणि म्हणाली " गुड बॉय "
तशी स्वरजची झोप चाळवली
स्वराज “आय एम नॉट चिकू .. आय एम हिज/ऑर हर्स फादर .. डोन्ट फरगेट "
तशी निशी खुद्कन हसली
निशी " स्वरू .. चल उठ .. आपण घरी नाहीये .. हॉस्पिटल मध्ये आहोत .. चल उठ ना .. आणि मला घरी जायचंय .. जा ना तू खाली डिस्चार्ज च बघ .. " आणि ती पटकन उठायला गेली आणि उभी राहिली .. तिच्या लक्षातच नाही राहीलं कि पायाला खोल जखम आहे .. पाय खाली टेकला आणि जोरात ओरडली " आई ग .. " आणि पायातून पुन्हा रक्त वाहू लागले ..
स्वराज पटकन उठला आणि तिला हाताला धरून त्याने बसवले " काय यार निशू .. का असे करतेस ?"
स्वराज ने पटकन नर्स ला बोलावले .. आणि ड्रेसिंग करून घेतले ..
निशी चे लक्ष त्याच्याकडेच होते .. नुकताच झोपून उठला होता .. केस विस्कटलेले .. कालचे च शर्ट इन चे आउट झाले होते .. एकदम क्युट दिसत होता .. आणि त्याच्या डोळ्यांत तिच्या साठी काळजी दिसत होती
नर्स गेल्यावर " काय तू मूर्ख .. अशी कशी ग ? किती लागलय पायाला .. " पुन्हा चिडचिड सुरु झाली आणि निशी ला त्याची ती चिडचिड गोड वाटत होती ..निशी गालातल्या गालात हसली
स्वराज " हसते काय नालायक !! फटके दिले पाहिजेत तुला ? " म्हणतच तिला उचलून घेतले त्याने " चला वॉशरूम ला जायचंय ना तुला "
निशी खुणेनेच म्हणाली " हो .. "
स्वराज " तुझा पाय बरा झाला ना कि बघतोच तुला "
निशी " स्वरू .. आय लव्ह यु "
स्वराज तसा हसला " लव्ह यु टू ..चिकू "
निशी " झाले का आता .. आता सगळे प्रेम फक्त चिकू साठी .. हो ना "
स्वराज " मग काय ? चिकू माझे ऐकेल .. तू तर काहीच ऐकत नाहीस . "
निशी " बघ हा .. जास्त नखरे केलेस ना तर पिकू , मिकी , माऊ चे बिल पास होणार नाही " आणि हसायला लागली
स्वराज " तुझा पाय चांगला होऊ दे मग सांगतो चिकू चा डॅडू काय काय करू शकतो ते "
आणि दोघे हसायला लागले ..
मग तिकडून डिस्चार्ज घेऊन तिला शहरात घेऊन गेला .. तिकडच्या हॉस्पिटल ला जाऊन त्यांनी सोनोग्राफी करून घेतली .. स्वराज ला वाटले कि UK सारखंच इकडे लगेच कळेल कि बेबी बॉय आहे का बेबी गर्ल पण इकडे तसे झालेच नाही .. डॉक्टरांनी बेबी दाखवला पण जेण्डर नाही सांगितला .. स्वराज तणतणच बाहेर आला
स्वराज " अरे काय यार ? इथले डॉक्टर ? माझंच बेबी माझ्या पासून लपवतात .. "
निशी " अरे स्वरू .. इकडे नाही चालत सांगून .. मुलगी आहे म्हटले कि लगेच अबॉर्शन करतात म्हणून नाही सांगत भारतात "
स्वराज " तेच तर सांगतो .. विचारांनी बुरसटलेली लोक आहेत ..म्हणून तर प्रॉब्लेम आहे.. चल आपण UK ला जाऊ .. तिकडे पार्टी करु .. अंश असेल तर ब्लू डेकोरेशन आणि गंधाली असेल तर पिंक .. मस्त थीम ठेवू .. चल आता दोन दिवसात निघू आपण "
निशी एकदम शांतच .. आता ह्याला कसे सांगू कि आता नाही यायचय मला
स्वराज तिच्या पोटातला छोटा बेबी बघून इतका एक्ससाईट झाला होता कि बस शहरातून घरी येऊ पर्यंत नुसता बोलत होता .. आपण असे करू .. आपण तसे करू .. तिकडे असे आहे .. तिकडे तसे आहे .. मॉम घरी थांबेल तुझ्या बरोबर .. जुलीन ला २४ तास घरात ठेवून घेऊ .. वगैरे वगैरे किती स्वप्न बघत होता तो .. बापरे ..
तिला असे झाले होते ..त्याला कसे मनवू कि चिकू ची डिलिव्हरी इकडेच करू म्हणून अशा विचारात ती गाडीत शांत होती.

🎭 Series Post

View all