निशिगंधा भाग ८९

Story Of A Girl Who Wants To Run School
नाशिगंधा भाग ८९

क्रमश : भाग ८८
स्वराज तिला बघूनच गळपटला .. "अरे यार .. कसली गोड दिसतेय माझि बायको .. असे वाटतंय शंकरपाळ्या बरोबर हिला पण खाऊन टाकावे .."
स्वराज ने येऊन तिला मिठीतच घेतले .. "काय मॅडम .. आम्ही आता निघणार आहे २ तासांत .. काय ऍडव्हान्स मध्ये पुढील सहा महिन्यांची कमाई करून जायची सोय आहे का आज ? का फक्त खाऊच घेऊन जायचाय मी "
निशी हसतच " आता खाऊ च घेऊन जा .. बाकीचे काय झालयं कि भरपूर UK ला .. "
स्वराज " अरे ए .. ते UK ला बॅकलॉग क्लिअर केला ना मी ऍडव्हान्स पुढचा मागतोय.. आणि एक सांगू का बायको .. असल्या गोष्टी कधी भरपूर होत नसतात मॅडम .. कितीही झाल्या तरी कमीच वाटतात " आणि तिथेच किचन रोमान्स सुरु झाला त्याचा ..
निशी “स्वरू .. अरे थांब ना .. थोडेच राहिलय काम माझे .. हे झाले कि जेवायला वाढते .. मग निघायचंय ना आपल्याला एअरपोर्ट ला "
स्वराज " नाही ... तू नको येउ आता एअरपोर्ट ला मला इथूनच बाय कर.. आराम कर आता .. काल पासून किती काम करतेय तू.. "
निशी " पुन्हा कधी दिसशील या डोळ्यांना .. " असे म्हणत तिनेच त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवला .. डोळे भरून आले होते तिचे .. तो पण एकदम शांतच झाला .. दोघे एकमेकांना भरभरून पाहून घेत होते .. डोळ्यांत साठवून घेत होते एकमेकांना .. कधी कधी बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते .. डोळ्यांत बघितले कि कळून जाते .. तसे दोघे एकमेकांशी डोळ्यांनी बोलत होते ..
भावना ओथंबून वाहत होत्या .. खास करून असा इतका एकत्र टाइम घालवल्या नंतर दुरावा सहन करणे मुश्कीलच काम आहे ..डोळ्यांतूनच दोघे एकमेकांना मनाची .. शरीराची हालत सांगत होते .. जसे कि एक जन्म नाही सात जन्माचे साथी आहेत ..
दोघे एकदम आतुर झाले होते .. एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करत होते .. तू फक्त माझा/माझी आहेस .... हे दाखवून देत होते.
नैनो कीजो बात नैना जाने है
सपनो के राज़ नैनो जाने है
नैनो कीजो बात नैना जाने है
सपनो के राज़ रैना जाने है

दिल की बातें धड़कन जाने है
जिसपे गुज़री वो कल जाने है

हम दीवाने हो गये है आपके
हम तो बस इतना जाने है

तू मेरा है सनम तू मेरा हम दम
तेरे संग जीना अब सातों जनम(जनम)
तू मेरा है सनम तू मेरा हम दम
तेरे संग जीना अब सातों जनम(जनम)

नज़रे ये आपकी करने लगी होशियारिया
कही करे दे ना ये मेरे लिए दुश्वरिया

हुसन की बात तो हुसन ही जाने है
रूप के राज़ तो रूप ही जाने है

सही गलत तो दर्पण जाने है
जिसपे गुज़री वो कल जाने है

हम दीवाने हो गये है आपके
हम तो बस इतना जाने है

तू मेरा है सनम तू मेरा हम दम
तेरे संग जीना अब सातों जानम

तू मेरा है सनम तू मेरा हम दम
तेरे संग जीना अब सातों जानम

कतरा कतरा मुझमे तू
दरिया सा बनने लगा
सांसो कि चलने का तू
जरिया तू बनने लगा

बिरहा आग तो तडपण जाने हैं
नैना क्यू बरसे सावन जाने है
क्यू जोगी हो जोगन जाने हैं
जिसपे गुजरे हो तन जाने है

हम दीवाने हो गये है आपके
हम तो बस इतना जाने है

तू मेरा है सनम तू मेरा हम दम
तेरे संग जीना अब सातों जानम

निशी " स्वरू .. उठ .. जेवून घे .. तुला निघायला लागेल १ तासात "
स्वरू तिला मिठीत घेऊन झोपला होता ... " हमम ... " आणि अजून तिला घट्ट ओढून घेतली त्याने मिठीत
किचन मधून बेडरूम मध्ये कधी आणि कसे गेले त्यांनाच माहित
स्वराज " निशी .. या वेळी जरा सांभाळून घे मला .. मला सहा महिने हलताच नाही येणार .. जमलं तर मला भेटायला ये "
निशी " मी ट्राय करेन... नाही जमलं तर रागावू नकोस .. "
स्वराज " नाही ग रागवणार .. मी असेच बोललो .. निशी .. पुन्हा तेच सांगतोय .. हे सहा महिने मला तुझी साथ हवीय .. तुझी स्वतःची काळजी घेशील .. आणि मी जरी कॉल केला नाही केला तरी उगाच गैरसमज करून नको घेऊस .. प्लिज .. हे सहा महिने मलासांभाळून घे .. मी खूप बिझी असणार आहे .. मी मॉम डॅड ला पण सांगून आलोय कि आपपल्या तब्बेतीची काळजी घ्या .. मला काळजी वाटेल असे वागू नका.. आता तुला हि तेच सांगतोय .. मला टेन्शन येईल असे काही करू नकोस प्लिज .. हे काम झाले ना कि मी इकडूनच काम करणार आहे थोडे दिवस .. मी तशी सेटिंग लावेल.. पण हे सहा महिने खूप महत्वाचे आहेत माझ्या या प्रोजेक्ट साठी "
निशी " हमम .. ठीक आहे .. तुला जमलं तरच कॉल कर ,, अगदी रोज नाही केलास तरी .. निदान ३ दिवसातून किंवा मग शनिवार रविवारी तरी कर "
स्वराज " बहुदा तसेच होईल .. शनिवार .. रविवारचा वेळ मिळेल "
निशी " ठीक आहे .. तुला जमेल तेव्हा कर .. पण तब्बेतीची काळजी घे .. जसे आम्हांला सांगतोस ना तेच तुला मी सांगेन "
स्वराज " हो .. आणि मी जरी बारीक झालो तरी काही फरक पडणार नाही .. थोडा जाड झालोय तुझ्या लाडाने .. किती काय काय करून खायला घातलंय तू मला "
निशी " असाच मस्त दिसतोस .. एकदम गब्बू गब्बू .. आपल्या चिकूचे पण गाल असेच पाहिजेत मला गब्बू गब्बू " आणि तिने त्याचे गाल दोन्ही हाताने ओढले
स्वराज " अजिबात नाही .. आपल्या चिकूचे गाल .. तुझ्या सारखे पाहिजेत .. मऊ मऊ ..सुपर सॉफ्ट .. आणि त्याने तिच्या गालावर त्याचे गाल घासले "
पुन्हा चिकू बुचकळ्यात पडला हो .. हे दोघे फ़ारच आठवण काढतात राव माझी .. नक्की माझी एन्ट्री मी कधी घ्यायचीय ... आणि माझे गाल कोणासारखे असावेत हे मला ठरवू दे कि "
निशी " स्वरू .. तुझ्यामुळे माझे स्वप्न सत्यात उतरत आहे .. तुला सांगते आता पर्यन्त मी असे म्हणायची कि शिक्षण असेल तर पैशांची काय गरज .. लाथ मारू तिथून पाणी काढू शकेन मी .. पण तुला सांगते .. सरस्वती जितकी महत्वाची आहे ना तितकीच लक्ष्मी पण महत्वाची आहे .. दोन्ही मिळवण्यासाठी माणसाने प्रयत्न केले पाहिजेत ..
स्वराज " आज काय एकदम वेगळेच बोलतेय तू ?"
निशी " तुला सांगु.. शाळेसाठी जागेचा प्रश्न मोठा होता .. आज जर तुझ्या लक्ष्मी ची साथ नसती मिळाली तर अजून माझे स्वप्न कोसो दूर राहिले असते .. आणि झालेच असते तर कुठेतरी लांब झाले असते आणि कदाचित एक दोन वर्षां नंतर मुलं शाळा लांब आहे म्हणून यायची थांबली असती .. पण आज चित्र वेगळे आहे आणि याचे सगळे क्रेडिट तुला आहे .. तुला सांगू डॅड मला काल म्हणले " तू या घरची लक्ष्मी आहेस .. माझी आई बाबांना नेहमी सांगायची .. कि मुलीच्या अंगावर एक तरी दागिना घाला .. ती पण लक्ष्मी चे रूप असते .. आणि बाबा म्हणायचे .. माझि मुलगी सरस्वती चे रूप होईल .. "
स्वराज " हमम .. मी एक सांगू का .. सरस्वती आणि लक्ष्मी हि देवींची रूप आहेत .. दोघी एकत्र नांदत नाहीत असे लोक म्हणतात पण त्या जर एकत्र नांदल्या तर स्वर्ग म्हणजे काय हे या धरती वरच कळेल "
निशी " हमम .. खर बोलतोय तू .. आणि मी आता तुझ्यामुळे तुझ्या बरोबर स्वर्ग सुखात आहे "
स्वराज " हमम .. आणि मी पण .. खरं सांगू अजून एक .. प्रेम हा एक धागा आहे जो सर्वांना एकत्र बांधून ठेवतो .. तुला माझ्या बरोबर मला तुझ्या बरोबर असलो कि जगातली सगळी सुखं देवाने माझ्या पायात घातली असे वाटते कारण दोघांत खूप प्रेम आहे .. "
निशी " आणि स्वरू .. आपण लहान पणा पासून एकत्र आहोत ..आता बघ ना रणजित आणि नंदा प्रेम करतात पण त्यांना एकत्र येता येत नाहीये "
स्वराज " येतील ते पण येतील .. प्रत्येकाच्या वाट्याचे दुःख वेगळे असते .. आणि सुख पण वेगळे असते .. तुझ्या वाट्याचे दुःख तुझे आता भोगून झालेय .. माझ्या वाट्याचे दुःख मी पण भोगलोय .. आत आपला सुखाचा चॅप्टर सुरु आहे .. आणि खरं सांगू का .. हे असे वेगळे राहणे सोप्पे नाहीये .. हि पण एक परीक्षा आहे .. पण आपण दोघे अस्सल खिलाडी आहोत .. कठीण परिस्थितीला आपण सामोरे जातोय तेही आनंदाने आणि जिद्दीने "
निशी " हो रे .. हे माझ्या लक्षांत आलेच नाही .. "
कितीही नाही म्हटले तरी निशी त्याला सोडायला एअरपोर्ट ला गेलीच .. जो पर्यंत तो दिसतोय तोपर्यंत थांबून राहिली .. मग खिन्न विषिन्न मनाने घरात आली .. तेवढा तर परिणाम आपल्यावर होणार आहे हे दोघांनाही माहित होते कारण तो हि काही खास खुश नव्हता .. उलट प्रेशर मध्ये होता कि .. सहा चे नऊ महिने झाले तर कसे करायचं .. दोघांच्याही पुढे डोंगरा एवढी कामं होती त्यामुळे दोघेही दुःख करत बसले नाहीत आणि कामाला लागले.
दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता त्याचा फोन आला .. मी सुखरूप पोहचलो .. थोडा आराम करून दुपार नंतर ऑफिस ला जाईल "
निशी " ओके .. ठीक आहे .. झोप ... आणि .. "
स्वराज " आणि काय ?"
निशी " काही नाही .. काळजी घे .. आय लव्ह यु "
स्वराज " लव्ह यु टू ... टेक केअर "
-------------------------
इकडे रणजित नंदा दोघे मिळून शाळा त्यांचा अभ्यास करून सांभाळत होते .. निशी सकाळी शाळा आणि दुपारी सरकारी कामं करत होती .. स्वराज ने स्वतःला जे कामात झोकून दिले कि बघायलाच नको .. दिवस रात्र काम करायचा .. दिवसा बाहेर रात्री लॅपटॉप वर रिपोर्ट्स करत बसायचा ..फक्त रविवारी तिला कॉल करायचा .. शनिवारी सुद्धा अन ऑफिशिअल क्लाएंट मिटिंग असायच्या ..
१ महिन्या नंतर
ज्या क्लाएंट चा हा प्रोजेक्ट होता त्याचा मुलगा रिचर्ड स्वराज चाचांगला मित्र झाला होता .. स्वराज ला जर्मन चांगले यायचे .. दोघे जर्मनी भाषेत बोलायचे .. नाही म्हटले तर त्याचा एकाकी पण थोडा रिचर्ड मुळे कमी झाला होता .. खाणे पिणे बाहेरच करायचा ... निशिला त्याची आणि त्याला निशिची खूप आठवण यायची .. एक दोनदा तर फोन वर ती रडली सुद्धा होती ..
स्वराज " यार निशी .. तू रडू नको ना .. "
निशी " स्वरू .. तू कसा आहेस ?"
स्वराज " मी ठीक आहे ग .. पण कामाचा डोंगर आहे .. उद्या फ्रँकफर्ट ला जातोय .. तिकडेच ४ दिवस रहावे लागणार आहे .. माझ्या बरोबर रिचर्ड पण आहे .. ते जाऊदे .. तू रडते का ?"
निशी " स्वरू .."
स्वराज " हा बोल ना "
निशी बरयाच वेळाने " नाही .. काही नाही .. तू काळजी घे .. "
स्वराज " बोलायचंय का काही तुला ? सांगायचंय का ?"
निशी ".. स्वरू ... "
स्वराज " एक मिनिट हा निशी .. माझा ऑफिस चा फोन वाजतोय .. डेव्हिड इज कॉलिंग .. आय ह्याव टू टेक धिस कॉल .. मी कॉल करतो तुला उद्या "
उद्या म्हणजे त्याचा कॉल रविवारी आला तर यायचा .. २ महिने झाले तिचं आणि त्याचे नीट बोलणेच झाले नाही .. कदाचित तिला त्याला काही सांगायचं होतं .. पण त्याला ऐकायला वेळच नव्हता..

🎭 Series Post

View all