निशिगंधा भाग ८८

Story Of A girl Who Wants To Run School


निशिगंधा ८८
क्रमश : भाग ८७
रणजित "ठीक आहे .. मी दुसरीकडे नोकरी साठी अर्ज दिलेत .. सध्या मला पैशांची गरज आहे .. आपली शाळा बांधून पूर्ण झाली कि मग इकडे जागा शिल्लक असेल तर येईन इकडे "
स्वराज " आपल्याकडे आताही जागा शिल्लक आहे .. आणि तुझी गरज आहे निशी ला .. तू इकडे थांबशील का ?"
रणजित " हो मी समजू शकतो .. आई ला आता काम होत नाही .. तिला रिटायर करायचा विचार आहे .. पण त्या आधी मला चांगली नोकरी लागणे गरजेचे आहे "
स्वराज " तेवढ्यात निशी बाहेर आली "
निशी " रणजित .. सोमवार पासून तू आणि नंदा आपल्या शाळेचे अधिकृत शिक्षक आहेत .. सध्या पगार १००००/- असेल "
रणजित " निशी ताई .. सध्या शाळा बांधायला पैशांची गरज आहे . मला पगार घ्यायला नको वाटतंय ग तुझ्या कडून .. गेली १० वर्ष तू एकटीने शाळा चालवलीस कधी १ रुपया पण मिळावा अशी अपेक्षा पण नाही केलीस .. तू खरंच महान आहेस .. आम्ही तुझ्या इतके महान नाही "
निशी " रणजित .. तसे नसते .. माझ्यावर अजून कोणाची जवाबदारी नव्हती .. स्वतःचे पोट भरण्यासाठी पैसे मी मिळवू शकत होते त्यामुळे मला कधीच पैसे लागले नाहीत .. ते जाऊ दे .. तू घरातला करता धरता पुरुष आहेस .. तुला बहिणीची आणि आईची जवाबदारी आहे .. तू पैसे कसे मिळवायचे याचा विचार केलाच पाहिजेस .. तसेही आता २ महिने आपल्या शाळेत न पैसे घेता तू शिकवलेचस कि .. "
रणजित " माझ्या गावातली मुलं पण इथे येतात ह्याचे आंतरिक समाधान मिळाले मला "
निशी " असो .. तुझे अपॉइंटमेंट लेटर मी सोमवारी देईन .. तुझे कॉलेज सांभाळून तू शाळा चालू ठेव .. बाकीचे आपण नंतर बघू "
रणजित " ठीक आहे ताई .. तुझ्या शब्द बाहेर नाही मी .. तशी हि माझी पण या शाळेशी जास्त अटॅचमेंट आहे .. "
रणजित निघून चालला होता तर स्वराज त्याच्या मागे धावत बाहेर आला ..
स्वराज " रणजित .. एक मिनिट .. मला काही बोलायचे होते "
रणजित " बोला ना "
स्वराज " नंदा बद्दल नक्की काय ठरवलंय तू ? "
रणजित ने त्याला त्याचा काय प्रॉब्लेम आहे ते सगळे सांगितले
स्वराज " तुला पाहिजे तर तुझ्या बहिणीची जवाबदारी मी घेतो .. माझ्या ओळखीचे UK मध्ये बरेच लोक आहेत .. तू नंदा बरोबर लग्न करायला मोकळा आहेस "
रणजित " नाही तसे मी नाही करू शकत .. मामाची मुलगी चे नाव बदनाम होईल .. एव्हाना मामा ने नातेवाईकांना सांगितले असेल .. आणि अचानक मी दुसरीकडे लग्न केले तर तिच्या आयुष्याची वाट लागेल "
स्वराज " पण नंदा चे काय ? तिचे तुझ्यावर प्रेम आहे .. "
रणजित " प्रेम तर मी ... "
बोलता बोलता थांबला तो .. " मी पण करतो " असेच काहीसे बोलणार होता तो.
स्वराज " ठीक आहे मग हा विषय आता कायमचा बंद करूयात .बरोबर ना .."
रणजित काहीच बोलला नाही .. गप्प बसला आणि थोड्या वेळाने
रणजित " नंदा आणि माझे लग्न होणे शक्य नाही .. नंदा मोठ्या घरात लहानाची मोठी झालीय .. माझ्या घरी अजूनही जमीन सारवावी लागते .. घरी कामाला बाई नाहीये .. सगळी काम करावी लागतील .. आई म्हातारी आहे .. तिला कोणीतरी काम करणा रीच सुनेची अपेक्षा आहे .. एकवेळ नोकरी नाही केली तरी चालेल पण घरकाम करायची तयारी पाहिजे .. या सगळ्याला नंदा तयार होणार नाही .. आणि ती सुद्धा शिक्षिका होण्याच्या मार्गावर आहे .. निशी ताई तिचा आदर्श आहे .. माझ्याशी लग्न करून तिचे नुकसान आहे .. हा सगळा विचार करूनच मी पुढाकार घेत नाहीये .. "
स्वराज "ठीक आहे .. तू तेवढा समंजस आहेस. मला दोघांची काळजी वाटत होती म्हणून विचारले .. मी उद्या रात्री जर्मनी ला निघालोय .. सोमवार पासून जरा लक्ष ठेव ... माझा मोबाईल असेलच तुझ्याकडे .. काही वाटलं तर कॉल कर मला .. आणि कसलीही मदत लागली तर सांग .. निसंकोच पणे .. नंदा मला बहिणी सारखी आहे .. तिचे नक्कीच चांगले व्हावे अशी माझी ईच्छा आहे .."
रणजित " हो माझी पण हीच ईच्छा आहे "
रणजित निघून गेला आणि आत मध्ये आला तर नंदा आणि निशी बोलत होत्या
नंदा " निशी .. अग .. बिचारा परिस्थितीने ट्रॅप झालाय तो ..त्याचे सगळे छान व्हावे अशीच ईच्छा आहे माझि.. त्याचे लग्न आधीच ठरले होते हे मला माहित नव्हते नाहीतर मी .. " पुढचं तिला बोलवेच ना "
निशी " वेळेत त्याने सगळे सांगितले ते बरं झाले "
नंदा " हो ना .. मी उगाचच त्याच्यावर चीडचीड करत होते .. आता त्याच्या समोर जायला पण लाज वाटते मला "
निशी " असे नको ग म्हणू.. तू मोठ्या धीराची आहेस .. तुझ्यासाठी कोणीतरी अजून चांगला मुलगा असेल .. देवाची ईच्छा काही वेगळी असेल "
नंदा " निशी .. तुला एक सांगू का ? सध्या मला पैशांची गरज नाहीये .. मला पगार नाही दिलास तरी चालेल .. आपण फक्त त्यालाच पगार देऊ "
निशी " नक्की का ? तुला चालेल का ? कारण आता बघ मला उद्या पासून खूप काम आहेत .. सरकारी अनुदानाची प्रोसिजर करायचीय .. मला सारखे सारखे शहरात पळावे लागेल .. शाळा तुम्हां दोघांनाच सांभाळायची आहे .. मी सकाळची प्रार्थना आणि गणिताचा तास घेईन .. त्यांनतर १० वीचे ४ विद्यार्थी आहेत त्यांच्या अभ्यासाकडे लक्ष देईन .. त्यांचे परीक्षा फॉर्म भरून घेणे वगैरे या गोष्टी पण मला बघाव्या लागणार आहेत .. "
नंदा " तू काही काळजी करू नको .. माझे डी एड पूर्ण होई पर्यंत मला पगार नाही मिळाला तरी चालेल "
निशी " ठीक आहे .. सध्या आपल्याकडे एक लाख रुपये आहेत .. म्हणजे रणजित ला १० महिने तरी आपण पगारी ठेवू शकतो .. मग बघू पुढचे पुढे "
स्वराज " रणजित ला पगार मी देईल .. तू हे पैसे बांधकामासाठी वापर "
निशी " म्हणजे ?"
स्वराज " १0०००/- रुपये म्हणजे फार मोठी अमाऊंट नाहीये .. सध्या मी देतो "
निशी " स्वरू हा व्यवहार नाही ना पण .. तू किती असे तुझ्या खिशातले पैसे देणार ?"
स्वराज " एक काम कर या सगळ्याचा तू हिशोब ठेव .. शाळेचा रेग्युलर इनकम सुरु झाला कि हे पगाराचे पैसे तू मला परत दे .. मग तर झाले ?"
निशी " एक काम करू .. जर कोणत्या महिन्यात पगार द्यायला नाहीये असे झाले तर मी तुला सांगेन मग तेव्हा तू दे "
स्वराज " ठीक आहे "
इकडच्या सगळ्या कामाचा स्वराज ला पाहिजे होता तसा सेट अप अल्मोस्ट झाला होता .. निशी कडे थोडी कॅश देऊन स्वराज लॅपटॉप घेऊन कामाला बसला .. जर्मनीत गेल्या गेल्या त्याची इम्पॉर्टन्ट मिटिंग होती .. तोपर्यंत निशी ने सर्व झाडांना पाणी घातले .. किचन छान साफ करून रात्रीचे जेवण बनवले .. अंधोळ करून तुळशीत दिवा लावला .. देवांची छान पूजा करून स्तोत्र म्हटली .. घर धूप अगरबत्ती च्या वासाने सुगंधित झाले .. तिची आत -बाहेर चाललेली तो लांबूनच बघत होता ..आणि त्याचे काम करत होता .. एखाद दुसरा कॉल चालू होताच ..
साडी घातलेली केस बांधलेली .. संध्याकाळच्या वेळी स्तोत्र म्हणणारी निशी चे सात्त्विक रूप उजळून निघाले होते .. तिने भीमरूपी म्हणता म्हणता स्वराजला डोळ्यांनी खुणावले .. कि हात जोडून नमस्कार करायला ये .. तसा तो त्याच्या जागेवरून उठला आणि देवघरात आला .. तिचे स्तोत्र पूर्ण होई पर्यंत हात जोडून उभा राहिला .. देवांना नमस्कार करून .. तिने अंगारा लावला त्याच्या कपाळावर .. आणि मग तो पुन्हा बाहेर जाऊन काम करत बसला ..
दोघे एकत्र खाली पाटावर बसून जेवले ..
स्वराज "निशी .. खाण्या पिण्याचे हाल करू नकोस .. भाजी वगैरे सगळे आणत जा .. रोज रात्री झोपताना दूध पित जा "
निशी "हो .. "
स्वराज "ते उन्हा तान्हात फिरू नकोस .. आणि कुणीकडे जाशील तिकडे कार ने जा .. मी पेट्रोल फुल भरून ठेवलंय
निशी "कशाला अरे ? "
स्वराज "अरे इकडून शहरात जायला किती प्रॉब्लेम होतो माहितेय मला .. तुझ्याकडे तुझी कार असली म्हणजे तू केव्हा हि जा ये करू शकतेस "
निशी "पैसे जातात ना स्वरू "
स्वराज "हे सगळे गरजेचे खर्च आहेत .. गाडी हि असलीच पाहिजे आता जवळ "
निशी "स्वरू .. तू कधी कॉल करशील मला ?"
स्वराज "हे बघ .. पहिले दोन महिने मी खूप बिझी आहे .. मग मी राजेश ला बोलावून घेईन .. तो आला कि मला थोडा वेळ मिळेल .. तर सध्या मला कॉल करायला जमणार नाही पहिल्यासारखा .. तरी पण दिवसातून एक किमान कॉल करायचा प्रयत्न करेल मी .. तेही नाहीच जमले तर रविवारी नक्कीच करेल .. हे पहिले २ महिने खूप क्रिटिकल आहेत .. "
निशी "ठीक आहे.. मी कधी हि तुझा कॉल उचलू शकते .. अगदी रात्री अपरात्री सुद्धा .. तुला वेळ मिळाला कि आधी जेव .. आणि मग मला कॉल कर .. आणि एक डिसेम्बर मध्ये मुलांना ख्रिसमस ची सुट्टी लागते .. मला पण ५ दिवस सुट्टी मिळेल .. तू मला विझा चे डॉक्युमेंट्स आणि प्रोसिजर देऊन ठेव .. मी येईन तुला भेटायला "
स्वराज एकदम खुश झाला "रिअली .. नक्की येशील का ? प्लिज ये च तू .. मला आता ६ महिने हलता नाही येणार तिकडून "
निशी "म्हणूनच म्हटले कि मी येईन "
स्वराज ला लिटरली तिने एकटीने यायची तयारी दाखवली तर मनाला उभारी आली होती .. "मी तुला डायरेक्ट फ्लाईट चे तिकीट बुक करून देईल .. तिकडे एअरपोर्ट ला आणायला येईल .. "
निशी "मग काय ? झालेच कि ? बाकीचे मी सगळे मॅनेज करेल "
स्वराज "अरे वा रे माझि झाशीची राणी .. "
निशी हसतच "नवऱ्याला भेटायला मी कुठेही जाऊ शकते .. सोडणार नाही मी तुला एकट्याला "
स्वराज "थँक यु यार .. प्लिज नकोच सोडूस "आणि हसला तो
दुसऱ्या दिवशी स्वराज दुपारीच एअरपोर्ट ला निघणार होता .. निशी ची खूपच गडबड चालू होती .. त्याला बरोबर बांधून द्यायला खाऊ म्हणून लाडू , चिवडा बनवत होती .. थोड्या शंकरपाळ्या पण बनवणार होती .. आणि हा हरिभाऊंना भेटून त्यांचे गिफ्ट देऊन आला .. राधाक्काचे गिफ्ट देऊन आला .. नंदाला भेटून बोलून आला कि सध्या शाळेवर आणि अभ्यासावर लक्ष दे .. तुझे फ्युचर ब्राईट आहे .. रणजित ला सध्या स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी वेळ दे .. काही गोष्टी वेळ आल्या शिवाय पुढे सरकत नाहीत .. रणजित खूप स्वाभिमानी आहे आणि आपल्यामुळे दुसऱ्या कोणाचे नुकसान होऊ नये असेच त्याला वाटतेय .. बेसिकली माणूस जो पर्यन्त आर्थिक दृष्टया स्थिर नसतो तोपर्यंत प्रेम सेकंडरी असते ..
नंदा "मी आलरेडी त्याला मोकळे केलंय .. अर्थात त्याने कधी मला असे संकेत दिलेच नव्हते .. हे सगळे माझ्या मनाचे खेळ होते .. "असे बोलली आणि डोळ्यांतून अश्रू आले तिच्या
स्वराज ला खूप वाईट वाटत होते .. नंदाचे त्याच्यावर प्रेम आहे आणि त्याचेही आहे पण रणजित ला माहित असून यावर तोडगा काढायचा नाहीये आणि अशा गोष्टी जबरदस्ती नाही करू शकत ..
बाहेरची कामं उरकून स्वराज घरात आला तर
निशी ने निशी शिफॉन ची साडी घातली होती .. केसांना कसे बसे वर बांधून सैलसर अंबाडा बांधला होता .. कमरेला पदर खोचला होता .. निशी गॅस वर शंकरपाळ्या तळत होती ..

🎭 Series Post

View all