निशिगंधा भाग 86

Story Of A Girl Who Wants To Run School
निशिगंधा भाग ८६
क्रमश : भाग ८५
दिवस भर वाटेल ते अगदी कसलीही पर्वा न करता दोघांनी खूप सारी मज्जा केली आणि रात्री घरी आले ..
दोघेही खूप छान मूड मध्ये घरी आले .. आणि आता मनाने .. सेपरेट होण्यासाठी तयार झाले होते .. दोघांचे पॅकिंग सुरु झाले .. स्वराज ने तिला खूप सारी चॉकलेट्स घेऊन दिली .. स्टेशनरी घेऊन दिली .. शालोपयोगी वस्तू घेऊन दिल्या .. हरी भाऊंना , नंदा , रणजित राधाक्का ला गिफ्ट घेतले .. इकडच्या शाळेत जाऊन आली .. रेनाटे ला स्पेशली भेटून थँक यु म्हटले .. सगळ्या मुलांनी आणि स्कुल ने तिला सेंड ऑफ दिला .. रेनाटे ने तिच्या हातात एक अपॉइंटमेंट लेटर दिले.. आणि सांगितले कि तुला जेव्हा पण जमेल तेव्हा तू आमच्याच स्कुल मध्ये जॉईन हो .. आम्ही सगळे वाट बघतोय .. पण आता यावेळी येशील तेव्हा पर्मनंट म्हणून ये .. निशी ने मनापासून धन्यवाद दिला .. आणि विचारून घेतले कि कि आता इथून पुढे इंडीआयतल्या शाळेशी कनेक्ट मध्ये राहायला आवडेल कि नाही .. तेव्हा रेनाटे ने सांगितले कि आठवड्यातून दोनदा असे करू शकतो .. एक दिवस तू तिकडून शिकव आणि एक दिवस इकडच्या मॅडम शिकवतील ते मुलं शिकतील .. हे सुद्धा तिला खूप झाले होते .. खुश होऊन ती निघाली ..
घरी मॉम डॅड ला खूप वाईट वाटत होते .. निशी ची इतकी सवय झाली होती .. थोडे थोडे शांतच होते .. पण स्वराज त्यांना उलट समजावून सांगत होता .. निशी ची शाळा आता लवकरच बांधायला सुरुवात होणार आहे .. सुरुवात झाली म्हणजे कधी ना कधी पूर्ण होईलच मग ती येईल तेव्हा कायमचीच येईल ..एकदा स्वराज ला आणि निशी ला खास राजेश च्या आईने घरी बोलावले होते .. स्वराज स्वतः खास राजेश च्याआई ला भेटायला तिला घरी घेऊन आला .. एकदा स्वराज च्या मित्रांना पण भेटायला बोलावले आणि अशा प्रकारे पुढील दोन दिवसात निशी चा सेंड ऑफ सगळीकडून झाला आणि ती पुन्हा भारतात येण्यसाठी सज्ज झाली
उद्या त्यांची फ्लाईट होती..
स्वराज " निशी .. पॅकिंग झाली ?"
निशी " हो झाली .. आता माझे सगळे कपडे मी इथेच ठेवणार आहे .. जाताना येताना घातली होती ती जीन्स घालेन आणि आपण तिथे गेल्यावर कुठंतरी ड्रेस चेंज करू .. मी साडी नसेल आणि मग गावी जाऊ "
स्वराज " ओके .. डन .. माझी आपण पॅकिंग झालीय .. हा माझा जर्मनीचा ऍड्रेस आणि तिथला कॉन्टॅक्ट नंबर मी तुला लवकरच कळवेन "
निशी " हो ठीक आहे .. स्वरू .. काळजी घेशील हा स्वतःची .. सारखे बाहेर खाऊ नको .. आणि एकटा आहेस म्हणून सारख्या पार्ट्या पण नाही करायच्या .. म्हणजे मित्रांच्यात जा पण ड्रिंक्स कमी घे .. "
स्वराज " हो ग बाई ..आता खरं तर मला वेळच मिळणार नाहीये .. मरणाचे काम आहे .. मी थोड्या दिवसांनी राजेश नाहीतर क्रिस्टीनाला बोलावून घेणार आहे म्हणजे मला मदत होईल "
निशी "ठीक आहे . हे बरं पडेल .. आणि तू मला कॉल किती वाजता करशील ?"
स्वराज " ते मी तिकडे गेल्यावर ठरवेन .. मला जर्मनीत एका ठिकाणी बसून काम नाहीये .. कदाचित सारखा ड्राईव्ह करायला लागणार आहे "

निशी " मग ड्राइवर ठेव .. तिकडे "
स्वराज " हमम.. ठीक आहे बघतो "
निशी " ते इंडीआयतुन आणलेलं झाड खाली गार्डन ला लावून टाकू का ? कारण त्याला ऊन पाणी मिळाले तर चांगले राहील .. आणि आता त्या कुंडीत जागा नाही पुरणार "
स्वराज " नाही .. ते मी जर्मनीत घेऊन जातोय .. त्या झाडाला बघितल ना कि मला शांती मिळते .. तू माझ्या बरोबर असल्याचा फील येतो "
निशी " स्वरू .. तुला पाणी घालायला जमणार आहे का तिकडे ? "
स्वराज " निशी .. मला ठरवू दे ना मला जे पाहिजे ते " त्याची चिडचिड होत होती .. दोघे आता सेपरेट होणार म्हणून दुःख दाखवताही येत नव्हते आणि होतंय ते थांबवता हि येत नव्हते .. आणि त्यामुळे ती काही त्याला पटणार नाही असे बोलली कि चिडत होता .. आणि ती बिचारी गप्प होत होती ..
निशी " मी डोक्याला तेल लावून देऊ का ?"
स्वराज " नकोय मला .. यार .. तू जा ना खाली .. का डोकं खातेय माझे "
निशी चे डोळे पाण्याने भरले .. आणि खाली निघून गेली .. नाराज झाली मनातून .. आता उद्या इथून जाणार आणि हा आता जाता जाता भांडतोय तेही कारण नसताना .. तिला राग नाही पण वाईट वाटत होते .. त्याची चीड चीड नको होयला म्हणून नक्की काय करू असे झाले होते तिला ?
सुधीर ने जिना उतरताना तिला डोळे पुसताना पाहीले
सुधीर " निशी .. काय झाले ? तू का रडतेय ?"
निशी ने डोळे पुसले आणि हसतच " काही नाही डॅड .. आता जातेय ना मी मला इकडची खूप आठवण येईल .. मला खूप वाईट वाटतंय .. मी सगळ्यांना सोडून जातेय “
सुधीर " हमम ... करिन आणि मला पण खूप वाईट वाटतंय .. निशी तू आल्या मुळे खूप आनंदात दिवस गेले .. किती तरी वर्षांनी दिवाळी साजरी झाली .. घर लखलखले .. तू खरी लक्ष्मी आहेस या घरची .. सून असावी तर अशी असावी .. आनंद .. सुख ,समाधान घेउन आलीस तू . "
निशी " डॅड ... थँक यु .. मी किती भाग्यवान आहे मला तुमच्या सारखे मॉम डॅड भेटले ..देवांनी माझि झोळी स्वराज च्या रूपाने भरली आणि माझ्या एकाकी जीवनाला एक वेगळीच कलाटणी मिळाली .. डॅड मला तुम्हांला थँक यु म्हणायचंय .. तुम्ही स्वरू ला नसती पाठवली तर... तो तर मला विसरूच गेला होता .."
सुधीर " निशी .. मला तुला सांगायचंय इनफॅक्ट काही दाखवायचय "
निशी " काय डॅड .. ?"
सुधीर ने खालच्या स्टोअर रूम मध्ये नेले .. तिथे स्वराज च्या आईचा फोटो होता .. आणि त्या फोटो ला ताजा हार घातला होता .. म्हणजे ह्या फोटो ला रोज नवीन हात घातला जातो हे नक्कीच हे तिच्या लक्षांत आले
निशी " काकू .. आय मिन आईचा फोटो इकडे का आहे ?"
सुधीर " भारतातील सगळ्या आठवणी मी इकडे लपवून ठेवल्या आहेत .. "
निशी " लपवून ???"
सुधीर " हो लपवूनच म्हणावे लागले .. आम्ही इकडे आलो तेव्हा सुद्धा स्वराज आई च्या आठवणीने रडायचा ... तुझी पण आठवण काढायचा .. करिन चे आणि माझे लग्न झाल्यावर पण त्याच्या मानसिक स्थितीत फरक पडत नव्हता .. एकटा एकटा राहायचा .. हसणे विसरून गेला होता जणू .. त्याच्या आईच्या आठवणीने तो नवीन जगाकडे पाहतच नव्हता .. आईच्या फोटो पाशी बसून रडत राहायचा .. मला कामावर जायला लागायचे पण स्वराज ची काळजी लागून राहायची .. मग करिन ने मला सांगितले कि आपण दुबई सोडून UK ला जाऊ .. तिकडे बिझनेस करू .. आपले घर छान सेट करू .. जुन्या आठवणी कुठेतरी लपवून ठेवू .. म्हणजे कदाचित तो त्याच्या दुःखातून बाहेर पडेल .. आणि मग आम्ही इकडे आलो .. UK मध्ये मी भारतातल्या सगळ्या आठवणी त्याच्या पासून मुद्दामून लांब ठेवल्या .. त्याला एक डॉग घेऊन दिला करिन ने .. मग हळू हळू तो त्या दुःखातून बाहेर पडला .. तसे वय लहानच होते .. हळू हळू भूतकाळ विसरायला लावला मी .. पुढे कधीच तुझे नाव सुद्धा मी घेतले नाही .. पण प्रकाश ने मला लिहलेली चिठ्ठी मला नेहमी तुझी आठवण करून द्यायची .. मी हरी भाऊ च्या कॉन्टॅक्ट मध्ये होतोच .. तुझी खुशाली काढून घेत होतो .. आणि योग्य वेळ आल्यावर मी त्याला पाठवली .. पण ह्या वेळी मला त्याला भूतकाळात त्याला पाठवताना भीती वाटत होती कारण तो पूर्णतः UK मधला झाला होता .. तुला मी सुद्धा बऱ्याच वर्षांत पाहिली नव्हती .. त्यामुळे स्वराज ला तू आवडशील कि नाही याची मलाही खात्री नव्हती .. आणि म्हणून मी राजेश चा ऑप्शन तयार ठेवला होता .. जर नाहीच स्वराज ला त्याचे बालपण आठवले तर मी त्याला मुद्दामून आठवायला लावणार नव्हतो .. खर तर खूप काळजीत होतो .. तुझे राजेश शी लग्न झाले असते तर तुझे नक्कीच काही नुकसान नसते झाले .. कारण राजेश खरंच चांगला मुलगा आहे .. अगदी स्वराज इतके नाही पण तुझ्याशी प्रामाणिक पणे संसार नक्कीच केला असता त्याने .. पण मला काळजी होती ती स्वराज ची .. तू नसती त्याला आठवलीस तर त्याला जोडीदार शोधणे मोठ्या मुश्किलीचे काम होते .. आणि तुझे लग्न झाल्यावर तू त्याला आठवली असतीस तर असे काही वेगळेच विचार मनात यायचे .. पण देवाची कृपा आणि नारळात पाणी तसेच झाले बघ .. स्वराज ला त्याचे लहानपणीचे प्रेम आठवले आणि तो लग्नाला इतका उतावळा झाला कि येताना लग्न करूनच आला .." डॅड हसतच बोलले
निशी ने हात जोडून आईच्या फोटो ला नमस्कार केला ... डोळे भरून आले तिचे .. स्वरजची आई आणि तिच्या पण लहान पणीच्या खूप आठवणी होत्या .. खाली बसून रडलीच ती " काकू ... आज तुम्ही पाहिजे होतात .. आज .. स्वरू आणि मी किती खुश आहोत .. तुम्ही पाहिजे होतात .. आज आई बाबा पण पाहिजे होते .. आज आई बाबा असते तर किती खुश झाले असते "
सुधीर " निशी .. तुझा गुन्हेगार स्वराज नाहीये .. मी आहे .. तुला तो मधली काही वर्ष विसरला कारण मी त्याला विसरायला भाग पाडली होती .. सॉरी बेटा "
निशी " प्लिज डॅड .. सॉरी नका ना बोलू .. तुम्ही ते केलेत ते योग्यच केलंत .. स्वराज खूप इमोशनल आहे .. आजहि खूप चिडचिड करतोय .. त्याला त्याचे दुःख व्यक्त करता येत नाही मग चिडत बसतो "
सुधीर " हो ना बेटा .. लहानपणी पण असाच वागायचा .... "
निशी "डॅड .. करिन मॉम शी लग्न करण्याचा निर्णय तुम्ही घेतलात ते खूप चांगले झाले .. स्वराज ला आई ची गरज होतीच .. आणि करिन मॉम ने त्याची ती कमतरता पूर्ण केली .. "
सुधीर " खरं आहे .. करिन च्या येण्याने मला सुद्धा साथीदार लाभला .. नाहीतर मी पण स्वराज सारखाच आहे ग .. आजही रोज सकाळी उठलो कि या रूम मध्ये येतो .. हिच्या फोटोला हार घालतो .. माझ्या मनात करिन चे स्थान नक्कीच आहे पण हिचे स्थान मी जराही हलवले नाहीये .. आणि हे सर्व करिन ला पण माहितेय .. "
निशी " डॅड .. खरंच करिन मॉम ग्रेट आहेत .. किती प्रेम करतात सर्वांवर .. मला सुद्धा लगेच स्वीकारले त्यांनी "
सुधीर " हमम ... “सुधीर ने एक फोटो आल्बम दिला निशी ला आणि तिकडून निघून गेले बाहेर ..
निशी ने तो फोटो अलबम उघडला .. आणि त्यांचा लहान पणीही चा एकत्र घालवलेला सगळा काळ तिच्या डोळ्यांसमोर आला .. आई बाबा .. जत्रा .. शेत .. लहानपणी चा स्वराज , सुधीर .. स्वराज ची आई .. लहान पणीची निशी.. पक्या .. खेळताना , नदीवर पोहताना , झोपाळ्यावर.. असे अनेक फोटो होते त्यात .. आई बाबा हसताना .. दिसत होते .. आयुष्यातले सोनेरी दिवस जे कि माणसाला कधीच विसरावे असे वाटत नाही .. असे सगळे फोटो होते .. डोळ्यांत पाणी घेऊ निशी .. एकेका फोटो वर मायेन हात फिरवत होती ..
खूप वेळ त्या स्टोअर रुम मध्ये एकटीच बसली होती .. मन आधीच भरून आले होते तिचे .. खूप रडून घेतलं तिने एकटीने ..

🎭 Series Post

View all