निशिगंधा भाग 84

Story Of A Girl Who Wants To Run School
निशिगंधा भाग ८४
क्रमश : भाग ८३

स्वराज ने तिला एका रेस्टोरंट ला नेले .. छोटेसे पण एकदम मस्त रेस्टोरंट होते .. पुढे एक मुलगा गिटार घेऊन इंग्लिश सूर लावत होता .. सगळे यंग कपल्स टाळ्या वाजवून .. कोणी कोणी डान्स चा ठेका धरून त्याला साथ देत होते .... खूप मस्ती चालली होती .. स्वराज ने डॅड ला मेसेज केला आणि तिकडेच बोलावून घेतले ..
स्वराज ने आधी तिचा कोट काढला स्वतःच्या हाताने .. मग चेअर मागे घेतली ती बसे पर्यंत थांबला मागे .. आणि मग समोरच्या चेअर वर स्वतःचा कोट काढून शर्ट चे स्लीव्स फोल्ड करून बसला ..
स्वराज " मग मॅडम काय खाणार ?"
निशी " सांगितले ना .. व्हेज मध्ये काहीपण "
स्वराज ने मेनू कार्ड बघितला आणि नूडल्स, पास्ता आणि दोन कॉफी ऑर्डर केल्या .. तेवढ्यात मॉम आणि डॅड त्या दोघांच्या समोर येऊन उभे राहिले ..
डॅड ने पण स्वराज सारखेच मॉम चे जॅकेट काढले हाताने .. मग चेअर मागे घेतली .. तिला बसवले .. मग स्वतः चा कोट काढून बसले "
डॅड " काय रे इतक्या अर्जेंट का बोलावलेस दोघांना ?"
स्वराज " डॅड .. आज आपण दोघांनीही लन्च केला नाहीये .. जय अर्थी निशी ला भूक लागली तेव्हा मला कळले कि मला पण भूक लागलीय .. मग आठवले कि तुम्ही पण नाही खाल्ले .. म्हूणन दोघांना बोलावले "
मॉम " थँक यु माय सन ... इव्हन आय वॉज फिलिंग हंग्री "
स्वराज " मॉम .. प्लिज गिव्ह युअर ऑर्डर .. वुई ह्याव आल्रेडी ऑर्डर ड नूडल्स अँड पास्ता .. "
मॉम " जस्ट मेक इट डबल ..टुडे आय विल इट दयाट "
स्वराज " मॉम .. यु ऑल्वेज गेट टायर्ड टू सिलेक्ट मेनू "
सुधीर " अरे कर ना .. ऑर्डर .. तुला तर माहितेय ना ती काय खाते ते "
स्वराज " हो डॅड .. करतो ..” स्वराज ने वेटर ला सांगून मॉम च्या आवडीचा व्हेजिटेबल सलाड , मशरूम पास्ता आणि एक रेड वाईन ऑर्डर केली .. डॅड साठी एक व्हेजिटेबल रोल आणि कॉफी ऑर्डर केली ..
मेनू येत होता तर सगळे छान गप्पा मारत होते .. मध्ये मध्ये मागून तो मुलगा कोणते तरी रॉक सॉंग म्हणत होता आणि बाकीचे सगळे जोरात ओरडत होते ..
ऑर्डर ची वाट बघत होते तर एक जण केक घेऊन आला .. त्यावर लिहिले होते " हैप्पी ऍनिव्हर्सरी मॉम अँड डॅड "
सुधीर " अरे ... सॉरी करिन .. आय टोटली फरगॉट .. इट्स अवर ऍनिव्हर्सरी टुडे "
मॉम " सुधीर .. सिरिअसली .. ओन्ली ऑन अवर अनिव्हर्सरी आय टुक हॉलिडे .. देन अल्सो यु डोन्ट रिमेंबर .. आय व्हेरी अपसेट नाऊ " आणि मॉम ने नाराजी चा स्वर काढला आणि सुधीर ला खूपच गिल्ट आले होते
सुधीर " सॉरी .. सॉरी .. एक्सट्रीमली सॉरी "
मॉम " इटस ओके हनी "
निशी या सगळ्यात काहीच बोलत नव्हती .. नुसते त्यांचे प्रेम बघत होती .. आणि स्वराज त्यांची फाईट मस्त एन्जॉय करत होता
निशी " डॅड .. तुम्ही मला परवा बोललेले ना .. कि आमची अनिव्हर्सरी जवळ आलीय .. मग आज कसे काय विसरले ?"
सुधीर " बघ ना .. त्या दिवशी लक्षात होते .. पण नेमका आज विसरलो .. आणि हा नालायक .. त्याच्या लक्षात असते तरी मला रिमाइंड करत नाही "
स्वराज " ओ… माझे काय ? त्यांची अनिव्हर्सरी त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे कि नाही .. "
मॉम " ऍबसुटली माय सन .. आय ओन्ली सेड स्वराज नॉट टू रिमाइंड यु "
स्वराज "ओके गाईज .. लेट्स कट द केक "
मग दोघांनी मिळून केक कट केला .. या दोघांना भरावला .. मग त्यांचा मेनू आला .. मस्त हसत खेळत छान गप्पा मारत होते .. फोटोज घेत होते .. मस्त फॅमिली टाईम घालवत होते ..
मधेच डॅड उठले .. तसे सगळ्यांना वाटले कि डॅड वॉशरूम ला गेले
पाच एक मिनिटांनी तो गिटार वाला मुलगा बोलू लागला
धिस सॉन्ग इज फॉर ब्युटीफुल लेडी ऑन द अर्थ .. मिसेस करिन .. टूडे मिस्टर सुधीर अँड करिन इज ह्यविंग मॅरेज ऍनिव्हर्सरी .. लेट्स विष देम
हैप्पी मॅरेज अनिव्हर्सरी " करिन अँड सुधीर " अख्ख्या रेस्टोरंट मधली लोक टाळ्या वाजवून दोघांना विष करत होती .. तो गिटार वाला मुलगा स्वतः चालता चालता बोलत पुढे आला .. आणि करिन ला हाताला धरून सुधीर च्या शेजारी नेऊन उभे केले त्याने ..
इकडे स्वराज आणि निशी बसल्या जागी उभे राहिले आणि आनंदाने जोरात टाळ्या वाजवू लागले ..
स्वराज " डॅड . पण ना ग्रेट .. कसली भारी आयडिया काढली त्यांनी मॉम ला खुश करायची "
निशी " हो ना .. सहीच मस्त .. स्वरू .. दे आर रिअली क्युट टुगेदर "
स्वराज " येस .. मला हे लहानपणीच जाणवले होते .. "
निशी ने त्याचा हात खांद्यापासून धरला आणि त्याच्या खांद्यावर डोके टेकले .. एकदम इमोशनल झाली होती ती .. कधी कधी आनंदाने पण डोळे भरून येतात ना तसे दोघांचेही डोळे भरले होते
सिंगर ला डॅड ने एक गाणे म्हणायला सांगितले होते पण सिंगर इंग्लिश असल्यामुळे डॅड ने सांगितले सॉंग त्याला येई ना ..
शेवटी स्वराज पुढे गेला .. त्याला काही मदत करता येते का ते बघायला .. स्वराज ने त्याला एक दोन लाईन्स गाऊन पण दाखवल्या .. पण गाणे हिंदी असल्यामुळे त्याला काही जमेना ..
शेवटी स्वराज ने निशी ला पुढे बोलावले
स्वराज माईक वर बोलू लागला
" हे गाईज .. थँक यु फॉर विशिंग माय मॉम अँड डॅड ऑन देअर ऍनिव्हर्सरी .. डॅड वॉन्ट टू डेडिकेट वन ऑफ द रोमँटिक सॉंग टू हिज वाईफ .. सो फॉर हिम आय विल सिंग दयाट सॉंग .. प्लिज बेअर मी फॉर सम टाईम "
एक अजनबी, हसीना से, यूँ मुलाकात, हो गई
फिर क्या हुआ, ये ना पूछो, कुछ ऐसी बात, हो गई
एक अजनबी ...

वो अचानक आ गई, यूँ नज़र के सामने
जैसे निकल आया घटा से चाँद
चेहरे पे ज़ुल्फ़ें, बिखरी हुई थीं
दिन में रात हो गई
एक अजनबी ...

जान-ए-मन जान-ए-जिगर, होता मैं शायर अगर
कहता ग़ज़ल तेरी अदाओं पर
मैं ने ये कहा तो, मुझसे ख़फ़ा वो
जान-ए-हयात हो गई
एक अजनबी ...
खूबसूरत बात ये, चार पल का साथ ये
सारी उमर मुझको रहेगा याद
मैं अकेला था मगर, बन गई वो हमसफ़र
वो मेरे साथ हो गई
एक अजनबी ...
मॉम ला बऱ्या पैकी हिंदी आणि इंग्लिश कळत होते .. हसीना म्हणजे ब्युटीफुल लेडी .. मुलकात म्हणजे " मीट " त्यावरून गाणे कळले आणि ती ब्लश करू लागली .. आणि निशी तिच्या समोर तिला माहित नसलेला किशोर कुमार ला गाताना ऐकून फ्लॅट झाली होती .. बऱ्यापैकी सुरात गात होता तो ..
गाणे म्हणून झाल्यावर सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या .. मॉम चक्क लाजून डॅड च्या मिठीत गेली .. आणि सुधीर ने पण दोन्ही हाताने कव्हर करत मिठीत घेतले ..
सुधीर " हैप्पी ऍनिव्हर्सरी करिन "
करिन " हैप्पी ऍनिव्हर्सरी सुधीर .. आय वॉज नोइंग दयाट आय विल गेट माय ऍनिव्हर्सरी गिफ्ट बाय टूडे .. बट यु नो ..यु ऑल्वेज गिव्ह मी स्पेशल सरप्राईझ अँड आय फरगेट दयाट आय एम मॅड ऍट यु "
सुधीर : येस आय नो .. अँड थँक यु फॉर फरगिविंग मी "
करिन " लेट्स गो "
स्वराज ने तोपर्यंत हॉटेल चे बिल पे केले .. आणि सगळे निघाले
स्वराज " डॅड .. मूवी ला जायचं का ?"
डॅड " नको .. तुम्ही दोघे जा .. आता आम्हा दोघांना जरा एकत्र टाईम घालवायचाय "
स्वराज " ओके .. डॅड .. मला पण " आणि हसायला लागला
निशी " स्वरू .. गप ना .. काही पण बोलतो "
मॉम " तो नाही .. हा काही पण बोलतो "
मॉम ने चक्क मोठ्या प्रयासाने मराठी बो लले होते
निशी अँड स्वराज एकदम " wow !! मॉम .. "
सुधीर " तिला इंडियात न्यायचीय ना .. म्हणून ती प्रॅक्टिस करतेय "
मॉम " येस .. स्लोली आय विल लर्न टू स्पिक "
सगळे हसत सेपरेट झाले .. स्वराज निशी ला घेऊन मूवी ला आला ..
स्वराज " कोणाचा आहे माहितेय का मूवी ?"
निशी " उम्म्म .. नाही माहित .. ह्या चार पैकी कोणता बघणार आहोत आपण "
स्वराज " हा .. "
निशी " ओके .. स्वरू .. मला कळेल का ?"
स्वराज " न कळायला काय झाले ? तुझ्या त्या फेव्हरेट हिरो चा आहे "
निशी " ए .. मी सिनेमा बघतच नाही .. माझा कोणी फेव्हरेट नाहीये "
स्वराज " इट्स टॉम क्रूझ यार "
निशी " ओह !! तो आहे होय .. म्हणजे कळला नाही तरी बघायला मज्जा येईल "
स्वराज " ए .. मी घरी नेईल हा तुला .. मला जास्त डिवचलंस तर "
निशी " अरे चिडतोस काय च? तूच माझा टॉम आहेस आणि तूच माझा क्रूझ आहेस .. आणि आता हा टॉम छान सिंगर पण आहे .. "
स्वराज " कसे वाटले गाणे तुला ?"
निशी " खरं सांगू .. आत रात्री चिकू पिकू ला अंगाई तूच गायचीस "
स्वराज ने लाडात येऊन एक पंच मारला तिच्या नाकावर " ठीक आहे .. आय विल डू दयाट .. पण .. त्या बदल्यात मला रोज काहीतरी मिळाले पाहिजे ना "
निशी ला त्याचा इशारा कळला होता .. हसतच " तुला देईल ना .. मी रोज एक .. "
स्वराज " एक च्या पुढे काय ते बोल कि .. "
निशी " ते माझे सिक्रेट आहे .. "
स्वराज " अरे नाही यार .. असे नाही करायचे "
निशी " अरे .. चल आत मुव्ही सुरु होईल .. माझा टॉम क्रूझ येईल "
स्वराज " मस्ती खोर .. तू एवढी मस्ती करते ना .. आपले चिकू पिकू पण असेच मस्तीखोर होतील हा मग "
निशी " हा मग .. "
स्वराज " मग मी रट्टे देणार सर्वांना " आणि हसायला लागला
निशी " मग आम्ही जोर जोरात रडणार ... आणि मग डॅडू ला वाईट वाटेल .. पण झोपणार आम्ही डॅडू च्या च कुशीत "
स्वराज " चिकू पिकू माझ्या कुशीत पण मी तुझ्या कुशीत झोपेल .. ठीक आहे " आणि दोघे हसले ..
निशी " स्वरू . तू .. तू ठीक आहेस का आज ? थोडा नर्वस वाटतोय "
स्वराज " कसे काय ग कळते तुला ?
निशी " तुझे डोळे आज काहीतरी वेगळे बोलतायत "
स्वराज एकदम सिरिअस झाला
निशी " बोल ना स्वरू .. काय टेन्शन आहे प्लिज सांग ना "
स्वराज " निशी .. मी आज आपली तिकिट्स बुक केली आहेत .. इट्स टाईम टू सेपरेट "

🎭 Series Post

View all