निशिगंधा भाग 79

Story Of A Girl Who Wants To Run School
निशिगंधा भाग ७९
क्रमश : भाग ७८
निशी " आज मी त्याला डॅड ला सांगून बोलावून घेतलंय .. आज तो माझा गेस्ट आहे .. त्यामुळे खाली तर मला जावेच लागेल.
स्वराज " मी सोडणारच नाही तुला ..खाली .. वाट बघून बघून जाईल तो "
निशी हसायला लागली
स्वराज " हसू नकोस .. तुला हे किडे करायला कोणी सांगितले .. मला हे अजिबात आवडलेले नाहीये आणि मी खूप म्हणजे खूप सिरिअस आहे .." तो खूपच नाराज आणि सिरिअस होऊन बोलत होता... तितकाच क्युट तिला वाटतं होता .. त्याचे लहान मुला सारखे दोन्ही गाल हातात घेऊन आढावे असे तिला वाटत होते.
निशी " अरे बाबा .. मी कशाला तुला त्रास देईन सांग बर तू.. तू त्याला काय हाक मारतोस .. "
स्वराज " मी त्या साल्याच नावच घेत नाही .. "
निशी हसतच " आत काय म्हणालास ..?"
स्वराज " काय ? साला "
निशी " मग आपण साला कोणाला म्हणतो ?"
स्वराज " साल्याला साला म्हणतो .. अजून कोणाला ?"
निशी " आठव नीट ?"
स्वराज " मला कुठे कोण साला आहे ? बायकोच्या भावाला अजून कोणाला म्हणतात "
निशी " कळलं ? तो इथे का आहे ते ?"
स्वराज " का ?"
निशी " कारण तो साला आहे "
स्वराज " म्हणजे ?"
निशी " आज भाऊबीज आहे .. मी त्याला ओवाळणार आहे "
स्वराज एकदम हसला " असे आहे होय .. तर तो साला असा साला झाला काय आता ? मग काय बुवा आता रिस्पेक्ट द्यावा लागेल माझ्या एकुलत्या एक साल्याला "
निशी " ते आता तू ठरव .. रिस्पेक्ट द्यायचा का नाही ते ? पण त्याने मला रिसेप्शन च्या दिवशीच ताई हाक मारली होती .. "
स्वराज " साला मैं तो जिजा बन गया " आणि हसायला लागला
स्वराज " चल एक किस देऊन टाक .. एव्हढा स्ट्रेस आला होता मला .. माझा स्ट्रेस रिलीफ करून टाक"
निशी " स्वरू .. तू ना किती किती क्युट आहेस .. काय सांगू ?" आणि दोन्ही हाताने त्याचे गाल तिने ओढले .. स्वराज जीजूंचा स्ट्रेस रिलीफ होई पर्यंत साले साहेबांना वेट करायला लागला ना
दोघे हातात हात घालून दोघे खाली आले .. निशि ने त्याला ओवाळले .. मग स्वराज आणि राजेश दोघे एका डायनिंग टेबल वर जेवायला बसले आणि निशी ने स्वतःच्या हाताने केले जेवण दोघांना आग्रह करून वाढले .. स्वराज त्याच्याशी छान गप्पा मारत होता .. आणि हे बघून निशीला हसायला येत होते ..आत मध्ये जाऊन ती एकटीच हसायची .. आणि तिला हसताना स्वराज बघत होता तिच्याकडे ..
राजेश ने निशी ला खूप सारे स्टेशनरी मटेरियल दिले जे कि ती तिच्या शाळेत वापरू शकते .. जे कि तिच्यासाठी खूप अमूल्य होते.
राजेश निघून गेला .. जुलीन निघून गेली आणि मॉम डॅड अजून आले नव्हते
स्वराज जे निशी च्या मागे लागला .. " शहाणे मला उचकवत होतीस का ? आता नसतो त्याचाशी बोललो तर मग चीडून बसली असतील .. यु हैव टू पे फॉर इट .. आणि ती पुढे पळत होती आणि तो तिच्या मागे पळत होता .. ती त्याला चुकवत होती आणि तो तिला पकडण्या साठी तिच्या मागे लागला होता ..
दोघेही हसत हसत पळत होते आणि ती त्याच्या हाताला लागत नव्हती .. अशी त्यांची पकडा पकडी घरात चालली होती आणि घर निखळ हास्याने दुमदुमले होते .. पळत पळत निशी बाहेर जिथे स्विमिंम्ग पूल आहे तिथे आली .. आणि आयतीच स्वरजच्या तावडीत सापडली कारण एक साईडला पाणी आणि एक साईडला स्वराज .. तिचा रस्ता बंद झाला होता ...
स्वराज ला वाटले आता कुठे जाईल .. म्हणून तिला पकडायला म्हणून जोरात पुढे गेला .. तर घरातल्या स्लीपर्स पाण्याच्या थेंबावर पडल्यामुळे घसरल्या आणि साहेब डायरेक्ट पाण्यात .. आणि निशी पाण्या बाहेरून जोर जोरात हसत होती ..
स्वराज " ओह शीट !! मैं तेरे प्यार में इतना गीर गया कि भिग गया .. आणि टी शर्ट काढून फेकून दिले तिच्या अंगावर आणि उलटा पोहू लागला .. "
त्याच्या ओल्या टी शर्ट मुळे तिची साडी भिजली
निशी " काय रे स्वरू .. मला कशाला भिजवलेस ?"
स्वराज " जा चेंज करून ये .. मॉम डॅड लेट येणार आहेत .. आपण मस्त स्वामिंग करू .. "
निशी " ओके .. "
स्वराज " लगेच तयार .. आज मूड एकदम चांगला दिसतोय "
निशी " येस .. माय डिअर हजबंड .. गिव्ह मी ५ मिनिट्स "
स्वराज "ओके ... आय एम वेटिंग .. कम फास्ट "
निशी चेंजिंग रूम मध्ये जाऊन आली .. आणि स्वराज चे डोळे फुटायचे बाकी होते .. हृदय हातात येऊन पडायचे बाकी होते ४०० वोल्ट चा झटका निशीने त्याला दिला होता .. त्याला नजरेला एक सेकंद दिसली असेंल दुसऱ्या सेकंदाला ती पाण्याखाली होती आणि पाण्याखालूनच पोहत त्याच्या समोर पाण्यात उभी राहिली .. आणि हसतच त्याचे उघडे तोंड हाताने बंद केले तिने ..
स्वराज ने शुद्धीत आल्या सारखे करून डायरेक्ट तिच्या खांद्यावरच डोके ठेवलं .. डु यु वॉन्ट टू किल मी ? "
निशी " गप रे "
स्वराज " कसे काय ? पण एवढा मोठा चेंज "
निशी " तुझ्यासाठी .. UK ला बीच वर जायचं राहिलं .. मी जेव्हा नेक्स्ट टाइम येईल तेव्हा आपण नक्की जाऊ तिकडे .. पण तिकडे राहिलेली मज्जा इकडे करूच शकतो ना .. आत मी गेले कि परत कधी भेटणार आपण .. मला जे आहेत ते दिवस तुझ्या सोबत तुला पाहिजेत तसे घालवायचेत "
स्वराज " थँक यु .. तुला एक सांगू एवढ्या पोरींना मी बिकिनी मध्ये पाहिले असेल .. इकडे तर वन इयर बेबी ला बीच वर बिकिनी घालतात त्यामुळे बिकिनी घालणे काही फार मोठे नसते .. पण तुला बिकिनी वर बघून माझ्या हार्ट बिट स्किप झा ल्या "
निशी " चल .. स्विमिंग करायचय ना "
स्वराज " चल.. "
दोघे हातात हात घेऊन वेगवेगळ्या स्टाईल ने पाण्यात विहार करत होते .. बराच वेळ पाण्यात खेळले .. अंडर वॉटर , ओव्हर वॉटर .. खूप मज्जा मस्ती केली दोघांनी .. जगाला विसरून रासलीला चालली होती त्यांची .. तेवढयात मॉम आणि डॅड ची येण्याची चाहूल लागली .. मग तिथूनच दोघे बाथरोब लावून वरती पळाले ..
डॅड " निशी .. स्वराज .. "
स्वराज " डॅड .. मी जरा बिझी आहे .. उद्या बोलूया का ?"
डॅड आणि मॉम दोघेही हसले " ओके "
निशी हळू हळू स्वराज बरोबर असताना कंफर्ट झोन मध्ये येत होती .. त्याला खुश करण्यासाठी बिकिनी घालायला तिला एक्सट्रा एफोर्टस घ्यावे लागले नाहीत ..
रात्री जेवण झाल्यावर दोघे गॅलरीतल्या झोक्यावर एकमेकांवर रेलून गप्पा मारत बसले होते ..
स्वराज " निशी .. थँक यु .. आय एम व्हेरी मंच हैप्पी विथ यु .. इंडिया आणि UK मधला फरकच तू नाहीसा करून टाकलास .. कार चालवायला शिकलीस . इकडच्या शाळेत एक प्रकारे जॉब च करतेय .. इकडे घालतात तसे कपडे घालायला लागलीस आणि मुख्य म्हणजे छान वावरू लागलीस .. माझ्या मित्र मैत्रिणी सोबत मिक्स झालीस .. आणि आता एकदम बिकिनी घातलीस .. मी शॉक झालोय .. "
निशी " स्वरू .. तुझ्या रंगात रंगली मी .. बाकी काही नाही . "
स्वराज " हि बिकिनी तीच आहे ना जी मी पहिल्या दिवशी भांडताना तुला बोललो कि माझा तुला प्रॉब्लेम नाहीये ना मग हि घालून ये "
निशी हसायला लागली .. " स्वरू .. मी आज सिद्ध केलं कि तु माझा प्रॉब्लेम नाहीयेस "
स्वराज " एवढ्या छोट्या गोष्टी सुद्धा लक्षांत ठेवते ना तू .. "
निशी " फक्त तुझ्या बाबतीतल्या .. "
स्वराज " निशू .. यार एक प्रॉब्लेम झालाय ?"
निशी " काय ? काय झालंय ? म्हणून तू चिड चीड करत होतास का आज संध्याकाळी ?"
स्वराज " हो ना .. अग पुढल्या आठवड्यात मला जर्मनी ला जावे लागतंय ?"
निशी " पुन्हा ?"
स्वराज " हो ना आणि या वेळी कदाचित सलग ६ महिने तिकडे राहावे लागेल "
निशी " हो का ? मग आता ?"
स्वराज " आता .. तुला एक आठवडा आधीच सोडतो इंडिया मध्ये आणि मग मी जाईल जर्मनी ला "
निशी " स्वरू .. इतक्या लवकर आपण सेपरेट होणार ... "
स्वराज " हो ना .. म्हणूनच मी जरा चीड चीड करत होतो “
निशी " ठीक आहे नो वरिज .. जो मिळाला तो वेळ आपण खूप छान घालवला "
स्वराज " हे बघ .. मी तुझ्या साठी शाळेचे कन्स्टक्शन प्लँन्स विथ डिझाइन्स काढून ठेवले आहेत ते बघून घेशील .. इंडिया मध्ये माझा एक मित्र आहे तो बिल्डर आहे .. फार मो ठा नाही पण माणूस म्हणून खूप चान्गला आहे आणि प्रामाणिक आहे .. शिवाय समजा पैसे अडले म्हणून काम अडवणार नाही ..
.. सध्या तू पण तिकडे जाणे गरजेचे आहे .. बिल्डर ला हा प्लॅन देऊन शाळेचे बांधकाम सुरु होणे गरजेचं आहे.. शाळा बांधून झाली कि आपण प्रॉपर उदघाटन करू आणि शाळा गावाच्या हवाली करू आणि मग तू मी आणि आपले चिकू पिकू ... आणि काय होते ग पुढे मला अजून आठवले नाही "
निशी " चिकू पिकू .. मिकी आणि माऊ " आणि हसू लागली
स्वराज " ओके .. भारी आहे .. मी आता विसरणार नाही "
निशी "ठीक आहे .. मग तू मला कधी भेटायला येशील? "
स्वराज " डिसेम्बर ते मे पर्यंत मी जर्मनीत असेल .. आणि तिकडून सटकलो कि डायरेक्ट तिकडे येईन .. तू असशील तशी उचलून तुला आपल्या घरी आणेल मग "
निशी " म्हणजे आता ६ महिने आपले नीट बोलणे पण नाही होणार.. कारण तू कामात जास्तच बिझी असशील "
स्वराज " अरे शनिवार रविवार फ्रीच असले ना "
निशी " ठीक आहे "
स्वराज " नाराज नाहीस ना तू ?"
निशी " नाही रे अजिबात नाही .. आता माझे पण लक्ष लागलय तिकडची शाळा कधी एकदा बांधून होईल त्या कडे .. तुझा ड्रीम प्रोजेक्ट तुला मिळाला कि आपण ग्रँड पार्टी करू "
स्वराज " नक्कीच .. म्हणजे काय ? आय एम जस्ट वेटिंग फॉर दयाट मोमेंट "
निशी " स्वरू .. उद्या आपला पहिला पाडवा आहे .. तुला मी काय गिफ्ट देऊ ?"

🎭 Series Post

View all