निशिगंधा भाग ६

story of a girl who wants to run school in village

निशिगंधा भाग ६

क्रमश: भाग ५

निशिगंधाने ने सर्व ऐकले आणि एकदम शांतच झाली

स्वराज " तू येशील का माझ्या बरोबर UK ला ?"

निशी " सॉरी स्वराज , मी या पैकी काहीही करू नाही शकत .. एक तर मला लग्नच करायचं नाहीये .. दुसरी गोष्ट अशी कि माझे स्वप्न फार वेगळे आहे .. या गावात  एक चांगली दुमजली शाळा सुरु झाली पाहिजे .. मुलांना  निदान बेसिक एडुकेशन तरी मिळाले पाहिजे ..  हे स्वप्न आधी माझ्या बाबांचं होतें आणि आता हेच माझ्या आयुष्यचं अंतिम ध्येय आहे .. "

स्वराज " मला वाटलंच होते .. हे काम वाटते तितके सोपे नाहीये .. नाहीतर बाबांनी क्रिस्टीनाशी लग्न करण्यासाठी हि अट घातलीच नसती "

निशी " मी पाहिजे तर तुझ्या बाबांशी फोन वर बोलते .. त्यांना सांगेन कि माझी काहीही काळजी करू नका .. मी इकडे आहे तशी खूप खुश आहे .. म्हणजे मग ते तुझे लग्न लावून देतील "

स्वराज " असे झाले असते तर किती बरे झाले असते ना .. पण बाबा ऐकणाऱ्यातले नाहीत .. असो चल आता खूप उशीर झालाय मी निघतो .. हरी भाऊ वाट बघत असतील "

निशी " अरे थांब आता जेवूनच जा ना .. "

स्वराज  " राहू दे आता तुला तर किती त्रास देऊ "

निशी " स्वराज .. लगेच असा तोंड पाडून नको घेऊस .. तुझे लग्न क्रिस्टिना शीच होईल .. मी देवा जवळ तशी प्रार्थना करेल "

स्वराज "माझ्या बरोबर गावाला येशील का ? आमचे घर मी गेल्या कित्येक वर्षात बघितले नाहीये .. तू लहान पणी आली होतीस ना .. "

निशी " हो.. नक्की येईन .. या शनिवारी जाऊ आपण "

स्वराज " निशी , चल ना UK ला आपण खूप मज्जा करू .. समजा बाबांनी ठरवलेला मुलगा नाही आवडला तर तुला जो आवडेल त्याच्याशी लग्न लावून देईल मी .. तू फक्त चल "

निशी " लग्नच करायचं झाले असते तर इथे काय मुलं नाहीयेत का ? सांग बरं .. तुझे ठीक आहे तू लहान पणा पासून तिकडे राहिलास .. मी असे अचानक उठून असे परदेशात जाणे मला जमणार नाही .. मी तिकडे राहूच शकत नाही .. माझ्या राहणीमानात खूप फरक आहे .. माझ्या विचारात खूप फरक आहे .. "

स्वराज " तुझ्या वडिलांनी तुझी जवाबदारी माझ्या वडिलांवर टाकली आहे .. त्यामुळे तुझे चांगल्या मुलाशी लग्न लावून देणे हे बाबांचे कर्तव्य आहे आणि ते त्यांना पूर्ण करायला मदत कर "

निशी " ठीक आहे , जर मला कोणी माझा साथीदार सापडला तर मी नक्कीच तुला कॉल करून सांगेन "

स्वराज "कधी ? माझ्या कडे जास्त वेळ नाहीये .. मी जास्तीत जास्त एक महिना इकडे थांबू शकतो .. स्पष्टच सांगतो .. तुझे लग्न झाल्या शिवाय माझे लग्न लावणार नाहीत बाबा ... "

निशी " अरे आपण समजावू ना काकांना "

स्वराज  " बर .. ठीक आहे .. आता मी जातो .. उशीर झालाय "

निशी " ऐक ना स्वराज , मला क्रिस्टीना चा फोटो दाखव ना "

स्वराज " अरे फोटो काय ? तुला अक्खी तिला भेटवतो .. तू चल तिकडे "

निशी ने नाक मुरडले एकदा डावीकडे आणि एकदा उजवीकडे

स्वराज " सो फनी .. परत कर एकदा .. थांब तुझा फोटो काढतो असं करताना .. असे काहीतरी पहिल्यांदाच बघतोय "

निशी "गप रे .. दाखव ना फोटो .. पटकन दाखव .. बघू तर दे तुझी चॉईस "

आणि ती त्याचा मोबाईल त्याच्या हातातून ओढू लागली

स्वराज " बरं .. दाखवतो पण आज नाही .. तू आधी माझ्या बरोबर तिकडे माझ्या गावी चल .. तिकडून आलो कि किंवा तिकडे गेलो कि दाखवेन "

निशी " ते काय फोटो दाखवायला मुहूर्त आहे का ?"

स्वराज " हो ... मुहूर्तच आहे .. आणि त्याने तिच्या डोक्यात एक टपली मारली

निशी " हे बघ उद्या मी सिटीत जाणार आहे .. उद्या तर शक्यच नाही .. तू आलास ना तेव्हा पासून माझे जे राहिलय जाणे ते राहिलच आहे .. तर उद्या मी शहरात जातेय "

स्वराज " मग मी येऊ का बरोबर तुझ्या .. आय मिन तुला चालत असेल तर .. ते गाडीच्या इन्शुरन्स चे काम आहे आणि त्या बदल्यात मला दुसरी गाडी आणायची आहे  रेंट वर.."

निशी " ठीक आहे .. मग उद्या दुपारी रेडी रहा .. माझे काम १ तासाचे आहे ते झाले कि आपण तुझ्या कामाला जाऊ "

तेवढयात हरी भाऊंचा नोकर आला

नोकर " येऊ का निशी ताई .. ते पाहुण  अजून  घरी आले नाहीत.. तुम्हांसींनी माहित आहे का कुठं गेले ते "

स्वराज " हे काय इथेच आहे मी .. चला निघूया घरी "

निशी " स्वराज .. हे घर मोठे आहे .. खूप साऱ्या खोल्या आहेत .. तू असा किती दिवस हरी काकांच्या घरी राहणार .. तुला चालत असेल तर मी एक खोली साफ करून ठेवते .. तू इकडे येऊ शकतोस .. जर तुला कंफर्टेबल वाटतं असेल तर "

स्वराज " बघतो .. तुला चालेल का ? मी इकडे आलो तर ?"

निशी " मला काय प्रॉब्लेम असेल .. तसेही ह्या घराचा मालक तूच आहेस ... नाही का ?"

स्वराज " हो का .. आता मी मालक झालो का ?"

निशी " कागदो पत्री तर आहेसच .. तू केव्हाही येऊ शकतोस .. "

स्वराज " बरं चल उद्या दुपारी भेटू "

तिला बाय करून स्वराज हरी भाऊंकडे गेला

निशी ने दुपारचे  जेवण राहिले होते ते खाऊन घेतले आणि बंद खोल्यातली एक खोली साफ करू लागली .. तसा तिचा वरचे वर हात असायचाच पण आता स्वराज रहायला येईल म्हणून ती अजून स्वच्छ करू लागली

निशी खूप खुश होती .. जसे कि एखाद्या सासर वाशिणीला कोणीतरी आपल्या माहेरून येतंय अशी बातमी कळल्यावर आनंद होतो ना अगदी तसच काहीस वाटत होते .. तिच्या भूतकाळात ,, लहानपणात कोणीतरी होते त्यातलंच अचानक कोणीतरी समोर आल्यामुळे एक वेगळाच आनंद आणि मनाला कोणीतरी माझे आहे असे वाले फिलिंग येऊ लागले .. आता पर्यंत आपण या जगात एकटेच आहोत असे तिने समजावले होते आणि आता त्यावर तिचा विश्वास बसायला पण लागला होता ..

दुसऱ्या दिवशी दुपारी ..  काळी  त्याला सोनेरी काठाची साडी नेसून .. मस्त लांब वेणी आणि त्यात एक छोटुसे सोनचाफयाचे फुल केसांत घालून हातात पर्स घेऊन निशी हरी भाऊंच्या घरी हजर

स्वराज ब्लू जीन्स आणि काळे पोलो टी शर्ट .. डोळ्याला गॉगल .. त्याचे लेदर चे शूज घालून तयार .. तो इतका हँडसम दिसत होता कि एक मिनिट निशी त्याच्या कडे बघतच बसली ..

स्वराज " मी हरी भाऊंची जीप घेतोय .. म्हणजे पटकन जाऊन येऊ "

निशी " अरे ती जीप आहे .. तू ज्या स्पीड ने कार चालवतो ना त्या स्पीड ने गाडीचे रूफ उडून जाईल "

स्वराज " नाही मी हळू चालवेन .. आता कळलंय मला इकडचे रस्ते कसे आहेत ते "

निशी " त्या पेक्षा गाडी मी चालवते .. कारण तुझे माहित नाही पण मला नक्कीच जगायचंय .. माझि बरीच काम बाकी आहेत अजून "

स्वराज " मला तर लग्न पण करायचंय .. "

तसे दोघे हसू लागले ..

लांबून हरी भाऊ आणि राधाक्का त्यांच्या कडे बघत होते ..

राधाक्का " निशी , आज एकदम सूंदर दिसतंय .. साडी नवीन घेतली का ?"

निशी " नाही ग राधाक्का .. आईची आहे .. तुला तर माहितेय ना मी सगळ्या आईच्या साड्या  नेसते .. एक साडी खराब झाली ना त्या दिवशी .. रक्ताचे डाग जातच नाहीयेत .. म्हणून पेटीतून काढली हि बाहेर .. तसेही आज माझी  एका NGO बरोबर मिटिंग आहे .. म्हटले इम्प्रेशन चांगले पडेल "

हरी भाऊ " अग , हो मी ते अर्ज पाठवलाय .. शाळेला जागा मिळण्या बाबत"

निशी " बरं .. ठीक आहे "

हरी भाऊंची जीप निशी अगदी सराईत पणे चालवत होती .. आणि त्या खड्ड्यांच्या  , वेड्या वाकड्या  वळणदार रस्त्यामधून मोठ्या चपळाईने गाडी चालवत होती .. आणि तिच्या या स्किल ला बघून स्वराज एकदम इम्प्रेस झाला

स्वराज " अरे वा ! तू तर छान गाडी चालवते "

निशी " थँक यु .."

बोल बोलता दोघे शहरात पोहचले .. एक ठिकाणी गाडी पार्क करून दोघे लायब्ररी च्या दिशेने चालत जाऊ लागले ..

चालता चालता दोघे खूप बोलत होते .. स्वराज जरा बचकत होता चालताना .. एवढी गर्दी , गाड्यांचे हॉर्न बघून आणि हवे मधला गरम पणा ने तो त्रस्त झाला होता .. चेहरा नुसता लालेलाल झाला होता .. सवयच नाही इतक्या कडक  उन्हाची

स्वराज " इट्स सो हॉट हिअर .." गाडीत पण AC नव्हता .. त्याने त्याची अवस्था बेकार झाली होती आणि निशा एवढया कडक उन्हात सुद्धा कुल होती .. चापचपून नेसलेली साडी .. चेहऱ्यावर एक बारीकसे स्मित होते .. वेणीतले पुढचे बारीक केस बाहेर येऊन ते तिच्या गालावर रेंगाळत होते .. काही मानेवर चिकटले होते ..

ते लायब्ररी मध्ये आले .. आणि त्याला खूप बरे वाटले कारण तिथे  बसायला जागा होती आणि आतमध्ये निदान पंखे होते ... ती कुठे जातेय हे हि न बघता त्याने पंख्याखाली जागा पटकावली आणि टी शर्ट च्या आत हवा घेऊ लागला ..

निशी तिथल्याच रिसेप्शन वरच्या मुली जवळ छान मोकळ्या गप्पा मारताना दिसत होती .. त्याने लांबूनच बघून अंदाज लावाला तिची मैत्रीण असावी

पाच एक मिनिटांनी स्वराज लायब्ररीचे निरीक्षण करू लागला .. कोण कोणते सेक्शन आहेत .. कोण कोण ती पुस्तके आहेत .. वगैरे वगैरे .. ते तेवढ्यात त्याला दिसले वाचका मध्ये बसलेला एक मुलगा निशिगंधा कडे आवासून बघत होता ..

स्वराज ला थोड हसायलाच यायला लागले .. कसा स्टेअर करतोय हा ... ते हि निशी सारख्या काकूबाईकडे .. साडी .. ते फुल . ते लांब शेपटी सारखे केस .. आय मिन शी इज ओल्ड फॅशन्ड .. तरीही हा तिला बघतोय .. आणि मुख्य म्हणजे हा मुलगा पण दिसायला स्मार्ट आहे .. शहरातला असावा असा आहे .. त्याला जर हि आवडली असेल तर " विचारू का ? तिच्याशी लग्न करशील का म्हणून ?" हिचे लग्न झालं कि माझा मार्ग मोकळा

आणि असा विचार येताच स्वराज साहेब त्याच्या समोर जाऊन बसले.

🎭 Series Post

View all