निशिगंधा भाग 61

Story Of A Girl Who Wants To Run School
निशिगंधा भाग ६१

क्रमश : भाग ६०
निशी घरात एकटीच होती .. थोड्या वेळाने जुलीन आली तिच्या सोबतीला .. मॉम अँड डॅड पण दोघेही निशी ने केलेला नाश्ता आणि डबा घेऊन गेले . जुलीन आल्यावर निशी स्वराज च्या स्टडी मधले बुक घेऊन वाचत बसली .. पुस्तक वाचून कंटाळा आला म्हणून पुन्हा स्वराज च्या स्टडी रूम मध्ये गेली .. आणि तिथल्याच चेअर वर टाईम पास म्हणून बसली .. सहज ड्रॉवर उघडला तर त्यात खूप सारे फोटो अल्बम होते .. तिला तर खूपच आनंद झाला .. स्वराजचे सर्व फोटोज तिला मिळाले होते .. स्वराज .. इथल्या शाळेत जाताना .. बॅडमिंटन ची रॅकेट घेऊन क्लास ला जाताना .. सायकल चालवताना .. डॅड .. मॉम आणि स्वराज एकत्र गेम पार्क मध्ये गेम्स खेळताना .. कोणीतरी एक इंग्लिश मुलगी तिच्या खांद्यावर हात टाकून काढलेला फोटो .. मग ब्लेझर घालून युनिव्हर्सिटी त जाताना चा फोटो .. मित्रां बरोबर मज्जा मस्ती करतानाचा फोटो .. सगळे फोटोज ती अगदी निरखून बघत होती .. बाकी आजू बाजूचे तिला दिसतच नव्हतं .. फक्त आणि फक्त स्वराज दिसत होता .. आणि जो काळ कदाचित स्वराज तिला विसरला होता तो काळ ती त्या फोटो तुन बघत होती .. तिला एक प्रकारची आंतरिक ख़ुशी होत होती .. कुमार वयातला स्वराज .. नवीन मिशी फुटायला लागताना चा स्वराज.. क्रिकेट चा ड्रेस घालून बॅट हातात घेतलेला स्वराज .. इतका क्युट दिसत होता .. लिटरली काही काही फोटोंवर आपोआप तिने ओठ टेकवले .. इतका क्युट दिसत होता तो ..
त्याचे फोटो बघुन तो आपल्या जवळ आता नाहीये याची बेचैनी आली तिला एकदम
तेरे बिना जिया जाए ना - २
बिन तेरे तेरे बिन साजना
साँस में साँस आए ना
तेरे बिना ...

जब भी ख़यालों में तू आए
मेरे बदन से ख़ुश्बू आए
महके बदन में रहा न जाए
रहा जाए ना
तेरे बिना ...

रेशमी रातें रोज़ न होंगी
ये सौगातें रोज़ न होंगी
ज़िंदगी तुझ बिन रास न आए
रास आए ना
तेरे बिना ...
--------------------------------------------
साधारण संध्याकाळचे ४ वाजले होते …स्वराज त्याच्या मिटींग्स उरकून घरी आला तर निशी बेड वर झोपली होती .. तिचे केस जे तिने सकाळ पासूनच मोकळे सोडले होते ते त्याच्या फोटो अल्बम वर आले होते .. रात्री उशिरा झोपल्यामुळे आणि सकाळी लवकर उठल्यामुळे गाढ झोप लागली होती तिला .. स्वराज फ्रेश होऊन आला आणि हळूच फोटो अल्बम बाजूला काढून ठेवले .. आणि तिचे डोके स्वतःच्या दंडावर ठेवून घेतले आणि तिला कुशीत घेऊन झोपला ..
तिला पण झोपेत असताना तो जवळ आलाय हे कळले आणि ती अजून त्याच्या कुशीत शिरत झोपून गेली .. आणि तिला असे करताना बघून थोडासा हसला तो .. आणि तिच्या कपाळावर ओठ ठेवून तो पण झोपला ..
तेरे बिना जिया जायेना .. अशी दोघांची मनस्थिती झाली होती ..
-------------------
रात्री डिनर करताना चौघे एकत्र गप्पा मारत जेवायला बसले होते ..
डॅड " स्वराज .. उद्या मंदिरातून पुजारी येणार आहेत .. पूजेसाठी .. तुम्ही दोघे तयार आहेत ना ?"
स्वराज " हो .. आम्ही तयार आहे "
निशी " मी सर्वांना ट्रॅडिशनल ड्रेस आणलेत .. ते घालूया सगळे "
करिन " निशी . आय विल वेअर इंडियन साडी विच स्वराज ब्रॉट फॉर मी "
निशी " नो .. मॉम आय ह्याव ब्रॉट सेम टू सेम सारी फॉर असं .. इफ यु लाईक व्यिई बोथ विल वेअर द सेम .. ओन्ली कलर इज डिफरेन्ट "
करिन " ओके देन .. टूमारो विल बी ऍन इंडियन ट्रॅडिशनल ड्रेस डे "
स्वराज "डॅड .. तिने आपल्या दोघांना पण धोतर कुर्ता आणि फेटा आणलाय”
सुधीर "अरे वाह !! कितीही तरी वर्षांनी मी धोतर घालेन "
सुधीर " निशी .. मी पूजेचे सामान आणलंय सगळे .. ड्राइवर ला पाठवलं होते आणायला .. एकदा चेक करून घे काही राहिलं असेल तर "
स्वराज " डॅड आणि वेडिंग रिसेप्शन च काय प्लॅनिंग आहे "
करिन " यु जस्ट टेल मी सुटेबल डेट .. रेस्ट आय विल मॅनेज "
स्वराज " डे आफ्टर टूमारो विल बी ओके .. हो ना निशी "
निशी ने मान हलवून उत्तर दिले
सुधीर " मग तुम्ही कुणीकडे जाताय हनिमून ला .. आजच तुझा लिव्ह अप्लिकेशन पाहिला मी"
तशी निशी एकदम डायनिंग टेबल वरून उठली .. आणि लाजून आत पळाली "
स्वराज " आय ह्याव समथिंग इन माय माईंड..ते काय आहे ना निशी ला जास्त लांब नाही नेणार आहे मी घरापासून .. UK मधेच खूप छान आहे फिरवण्या सारखे .. दोन दिवस लंडन .. दोन दिवस स्कॉटलंड .. आणि दोन दिवस डरडल डोअर "
करिन " व्हेन यु विल गो फॉर हनिमून ?"
स्वराज " आफ्टर रिसेप्शन .. डायरेक्ट फ्रॉम हॉल .. "
करिन " ओके .. आय विल अरेंज बॅनर फॉर युअर वेहिकल as "जस्ट मॅरिड "
सुधीर " ठीक आहे "
निशी आत मध्ये किचन मध्ये एकटीच लाजत होती .. हा निर्लज्ज सगळा प्लॅन डिस्कस करत बसला होता..
-------
स्वराज ने निशाला पूजेचे सामान काढून दिले ... तिने ते सगळे लावून ठेवले .. चौरंग , तांब्याची भांडी , पळी ,पेला , सत्य नारायणाचा फोटो .. नारळ , सुपार्या , हळकुंड .. सगळे जे जे पाहिजे ते सामान होते त्यात .. रांगोळी आणि रंग पण होते ..
निशी ने सामान एकत्र बाजूला काढून ठेवले आणि झोपायला गेली .. जरा कुठे २ तीन तास झोपली असेल .. पहाटेच ३वाजता उठून बसली .. सकाळीही लवकर उठून अंघोळ करून .. प्रसादाचा शिरा बनवला .. महा प्रसादाचं जेवण बनवू लागली .. पुरण पोळ्या केल्या .. उकड बटाटयाची भाजी केली .. वरण भात नंतर करायला ठेवले .. आणि भजी तळायची बाकी ठेवली ..
किचन काम उरकून निशी ने बॅक यार्ड मधल्या झाडांची फुले काढून दाराला लावायला हार केले .. काही फुलं पूजे साठी ठेवली .. दारात मोठी रांगोळी काढली ..
स्वराज सकाळी ७ वाजता उठला तर हि बाहेर अंगणात रांगोळी काढत होती .. एक क्षण स्वराज ला त्याच्या आईचीच आठवण झाली .. त्याची आई सकाळी तुळशी भोवती अशीच ओल्या केसांना कापड बांधून रांगोळी काढायची .. .. एक केसांची बट सारखी पुढे येत होती आणि निशी ला ती त्रास देत होती .. दोन्ही हात रंगाचे आहेत म्हणून ती उलट्या हाताने मागे करत होती पण अवखळ मुला सारखी ती बट पुन्हा पुन्हा डोळ्यांसमोर येत होती आणि त्याचा त्रास तिच्या प्रसन्न चेहऱ्यावर थोडीशी आठी आणत होता .. त्यात पण मैं वारी जावा .. असे झाले होते स्वराज ला . एवढं सुपर क्युट कोणी दिसतं का ? असा विचार करतच तो तिच्या सगळ्या अदा मोबाईल मध्ये कैद करत होता .. त्याची भविष्याची तरतूद जोरात करत होता तो ..
एवढ्यात निशि चे लक्ष गेले
निशी " स्वरू .. कशी आलीय रांगोळी ?"
स्वराज " अल्टिमेट .. सगळे काम एकटीनेच करतेस तू .. मला पण घे ना तुझ्या बरोबर "
निशी " झालीच आहे .. काढून आता .. दिवाळीत आपण दोघे एकत्र रांगोळी काढू "
स्वराज " ओके .. अरे तू कधी उठलीय .. हे हार कधी केलेस ?"
निशी " ३ वाजता उठलीय मी .. सगळा स्वयंपाक अल्मोस्ट तयार आहे .. पूजेचा प्रसाद तयार आहे .. मॉम उठल्यावर मी आधी मॉम ला तयार करेन .. मग मी तयार होईल "
स्वराज " आणि मी ? मी आहे कि नाही आज तुझ्या हिशोबात ?"
निशी " अरे असे काय करतोय .. आपण दोघे तर बसणार ना पूजेला "
स्वराज " ते धोतर मला येत नाही नेसायला .. तुलाच नेसवावे लागेल "
निशी " हो चालेल कि त्यात काय ? दोन मिनिटाचे काम आहे ..पण फेटा ना डॅड कडून बांधून घे ... त्यांना येतो .. तो मला नाही येत "
स्वराज " ठीक आहे .. बरं चल आता थोडा आराम कर .. आताशे ६वाजत आहेत .. पुजारी १० वाजता येणार आहे .. थोडा वेळ आराम कर "
निशी " नको ना स्वरू आता.. झाली माझी अंघोळ "
स्वराज " आय सेड कम "
निशी ने रांगोळीची बॅग उचलली आणि एक साईडला ठेवली आणि हात धुवून त्याच्या मागे निघाली .. आणि खरंच त्याने तिला थोडा वेळ झोपायला लावले .. केवढा तो उत्साह पूजेचा.. "
-----------------------
निशी ने आधी मॉम ला नऊ वारी साडी नेसवली .. त्यावर मॅचिंग दागिने घालायला दिले .. चंद्रकोर लावली .. हातात हिरव्या बांगड्या घालायला दिल्या .. नाकात नथ .. केसांचा छान बन घातला .. आणि रेडी केली .. करीन मॉम म्हणजे आधीच गोरी गोरी पान आणि निळ्या डोळ्यांची .. नऊवारी साडी मध्ये अतिशय सुंदर आणि नाजूक दिसत होती .. सुधीर राव तर बघतच बसले ..
सुधीर " करिन .... यु आर लुकिंग ब्युटीफुल .. "
निशी " मॉम सिरिअसली .. यु आर लुकिंग पाटलीन बाई "
करिन " व्हॉट इज दयाट ?"
स्वराज " दयाट मिन्स रिस्पेक्टफुल वूमन इन व्हिलेज "
करिन " ओह .. थँक यु निशी .. यु मेड मी ब्युटीफुल "
सुधीर रावांनी करिन साठी मंगळसूत्र आणलेलं पण तिला कधी दिलंच नव्हतं .. आज बहुदा तशी संधी चालून आली होती
सुधीर " जस्ट अ सेकण्ड !! आय ह्याव समथिंग फॉर यु करिन " असे म्हणत त्यांनी त्यांच्या कपाटातून सोन्याचे मंगळसूत्र काढले आणि करिन च्या हातात दिले.
करिन " व्हॉट इज धिस .. इज इट लॉन्ग नेकलेस?? सेम निशी इज अल्सो वेअरिंग "
सुधीर " वेल !! धिस इज कॉल्ड मंगळसूत्र .. इन इंडियन मॅरेज द ग्रूम विअर्स या मंगळसूत्र अराउंड द ब्राइड्स नेक ऍट द वेडिंग”
करिन " ओह !! दयाटस व्हाय निशी इज वेअरिंग धिस "
निशी " डॅड .. तुम्हीचं घालून द्या ना आज .. आजचा दिवस छान आहे "
स्वराज " हा डॅड .. मी फोटो काढतो .. तुम्ही पण धोतर कुर्ता आणि फेट्या मध्ये नवरदेव च दिसत आहे "
सुधीर " शहाण्या !! माझी खेचतो "
निशी " नाही डॅड .. खरं बोलतोय तो "
करिन " सुधीर .. आय एम वेटिंग .. घाल ना "
तसे सगळे हसायला लागले ..
सुधीर ने मॉम च्या गळ्यात मंगळसूत्र घातले .. स्वराज च्या डोळ्यांत पाणी आले ले त्याने परतवले पण निशी ने ते बघितले
--------------------
मग निशी ने स्वराज ला धोतर नेसवून दिले .. कुर्ता , घातला .. एकदम मस्त राजबिंडा दिसत होता ... तो ..
स्वराज " काय बघते ग अशी तू माझ्या कडे ?"
निशी " तू दिसतोयच एवढा भारी .. तुलाच बघत बसावे वाटतंय "
स्वराज " मग ठीक आहे .. बघ बघ .. मी तुझाच आहे .. नुसतं बघून काय उपयोग पण मला काहीतरी मिळाले पाहिजे ना .. मला बघण्याची फीज "
निशी " चल .. तुला बघण्याची फीज मी तुला कधीच देणार नाही .. तू फ्री आहेस .. टॅक्स फ्री माझ्या साठी "
स्वराज " टॅक्स फ्री काहीच नसत मॅडम " आणि तिला मिठीत ओढू लागला तो
निशी " स्वरू ! कॉन्सन्ट्रेट .. आज पूजा आहे .. आज फक्त देवाची आठवण काढायची असते "
स्वराज " ओके .. "
त्याला तयार करून तो खाली फेटा बांधायला खाली डॅड कडे गेला .. तोपर्यंत निशी ने स्वतःची साडी नेसली .. मस्त अंबाडा घातला .. त्यात फुलं घातली .. चंद्रकोर .. हातात हिरव्या बांगड्या .. नाकात नाजूक नथ.. गळ्यात मंगळसूत्र.. मस्त दोन खांद्यावर पदर घेऊन सुनबाई तयार ..
स्वराज फेटा बांधून तिला दाखवायला वरती आला .. तर तिला बघतच राहिला .. अतिशय सुंदर दिसत होती ती .. सैलसर अंबाडा .. त्यावर खोवलेले फुल .. त्यांचा सुगंध .. निशी च्या हातातल्या खळखळ वाजणाऱ्या हिरव्या बांगड्या .. नाजूक चंद्रकोर .. तिच्या मोदक सारख्या नाकात नाजूक नथ अगदी शोभून दिसत होती .. घरंदाज दिसत होती ती ..

🎭 Series Post

View all