निशिगंधा भाग 60

Story Of A Girl Who Wants To Run School
निशिगंधा भाग ६०
क्रमश : भाग ५९
स्वराज " आज भटजी ची चोकशी करतो .. नाहीतर ऑनलाईन बघतो .. दोन दिवसात पूजा .. लगेच नेक्स्ट डे रिसेप्शन .. मग फक्त तू आणि मी .. आय एम टेकिंग १० डेज हॉलिडे .. तेवढे पुरतील ना ?" आणि हसायला लागला
निशी ने नजर खाली केली आणि मनातच आवंढा गिळला " १० डेज "
स्वराज " घाबरलीस काय ?"
निशी " नाही .. मी कशाला घाबरू ? आणि तुला तर मुळीच नाही घाबरत मी " आणि हसायला लागली " यु आर सच अ स्वीट .. क्युट बॉय .. आय जस्ट लव्ह यु .. असेच तुला बघत बसावे दिवस भर असे वाटते मला "
स्वराज " ठीक आहे " मी लवकरच येतो मिटिंग आटपून .. नाहीतर जाऊ दे .. क्रिस्टीना ला पाठवू का मिटिंग ला ..."
निशी "नाही नको तू आल्यावर फक्त माझा .. ठीक आहे "
स्वराज " मेरी जान !! मी नसल्यावर पण मी फक्त तुझाच आहे ... "
निशी " हो .. हे हि खरंच आहे .. आज मी डबा केलाय तुझ्या साठी .. नेशील ऑफिस ला "
स्वराज एकदम खुश झाला " काय ? अरे वाह ... आज मला टिफिन मिळणार.. ग्रेट .. मग तर आज ऑफिस ला गेलेच पाहिजे .. तो हरामखोर राजेश आहे ना त्याची आई त्याला रोज टिफिन देते .. माझ्या समोर समोर टिफिन घेऊन मिरवत असतो तो .. आज त्याच्या समोर मी टिफिन नाचवेन "
स्वराज ने तिच्या या गालावर किशी .. त्या गालावर किशी देऊन मोकळा
निशी मात्र विचार करू लागली .. कधी कधी एकदम लहान मुलांसारखा वागतो …काल रात्री बाथरूम पसारा करून ठेवला होता ... आणि आता.. टिफिन देणार आहे तर कसला खुश झालाय.. माझा क्युट बॉय आहे..
--------------------
स्वराज नाश्ता करून .. टिफिन घेऊन.. सोबत पाण्याची बॉटल .. चहाचा थर्मास .. घेऊन आज एकदम खटाखट तयार होऊन .. जाताना निशी ला मिठीत घेऊन .. किस करून मोठ्या थाटात ऑफिस गेला .. ख़ुशी झलक रही थी .. चेहरे पर
कितीही माणूस चंद्रावर पोहचू दे .. पण खरा .. निखळ आनंद हा साध्या साध्या गोष्टीतच मिळतो.
स्वराज ऑफिस ला गेल्यावर .. त्याला जेव्हा ब्रेक होता तेव्हा त्याने निशी ला कॉल केला..
स्वराज “माझ्या स्टडी मध्ये एक लॅपटॉप आहे .. तो ऑन कर आणि इंडियात झूम कॉल कर .. मी येताना सांगायचे विसरलो .. शाळा बघता येईल तुला .. "
निशी " नको .. नंतर करेन कधी तरी ?"

स्वराज " अग ते नवीन ऍडमिशन घेतलेल्या मुलांशी ऑनलाईन बोलून घे ना .. तुझं इकडून पण त्यांच्यावर लक्ष आहे हे कळळ्यावर अभ्यास करतील ते "
निशी " नक्की का ? नाहीतर तुला वाटेल कि हि इकडे आली तरी शाळा डोक्यातून जात नाहीये तिच्या ?"
स्वराज " ते तर तू चंद्रावर गेलीस तरी शाळा तुझ्या डोक्यातून जाणार नाही ..." आणि हसायला लागला
निशी " नाहीये असे काही .. मी तुला बोलले का मला आठवण येतेय म्हणून "
स्वराज " तुला एक सांगू .. तुझ्या डोक्यातून शाळा फक्त एकच जण काढू शकतो ?"
निशी " कोण ?"
स्वराज " चिकू "
निशी " चिकू ... कोण चिकू ?"
स्वराज " तू विसरलीस का चिकू , पिकू , आणि समथिंग समथिंग अशी चार नावं तू घेतली होतीस "
निशी तशी हसायला लागली " चार घेतली हे पक्के लक्षांत ठेवलेस "
स्वराज " हा माझ्या साठी तेवढेच महत्वाचे आहे ना .. प्लांनिंग करायला पाहिजे ना "
निशी " मिटिंग संपली असेल तर घरी ये .. "
स्वराज " नाही ना ... ब्रेक आहे म्हणून तुला मिस करत होतो "
निशी " स्वरू .. मी पण मिस करतेय तुला .. "
स्वराज " माझे लक्षच नाहीये ऑफिस मध्ये .. दोन वेळा मी प्रेझेन्टेशन ला ब्लँक झालो .. क्रिस्टिना म्हणत होती .. व्हाट्स रॉंग विथ यु ?" काय उत्तर देऊ तिला .. "
निशी हसायलाच लागली ..
स्वराज " असे करू नये .. शहाण्या माणसाला पागल करू नये ग "
निशी " ए मी काय केलंय आता ?"
स्वराज " मी हल्ली एकटा कुठे असतो .. तूच असतेस कायम बरोबर आणि मला डिस्ट्रक्ट करतेस आय एम इन लव्ह .. आफत झालीय माझ्या हृदयाची , मनाची .. जिकडे तिकडे तूच दिसतेय .. आठवतेय .. काय करू ? " "
Ho.. aaj kal tanha main kahan hoon
Saath chalta koyi
Uski hamein aadat hone ki
Aadat ho gayi
Woh jo mila hai jab se
Uski sohbat ho gayi
Ik zara masoom se dil ki aafat ho gayi
Sun le zara, sun le zara
Dil ne kaha itna bas mujhe pata hai
I am in love, I am in love
Tu hi bata jaane kya mujhe hua hai
Oas boondon mein tu hai
Aankhein moondun main tu hai
Dishaon das tu hai
Tu hi hai bas tu hai
Dil ka shehar tu hai Achchi khabar tu hai
Fursat ki hansi tu hai
Jo bhi thi kami tu hai
Oas boondon mein tu hai
Aankhein moondun main tu hai
Dishaon das tu hai
Tu hi hai bas tu hai
Dil ka shehar tu hai
Achchi khabar tu hai
Fursat ki hansi tu hai
Jo bhi thi kami tu hai
Tu hai mera, tu hai mera
Kuchh main jaanoon na
Itna bas mujhe pata hai
I am in love, I am in love
Tu hi bata jaane kya mujhe hua hai
Baadal pe chalta hoon main
Girta sambhalta hoon main
Khwahishein karta hoon main
Khone se darta hoon main
Jaga na soya hoon main
Musafir khoya hoon main
Kuchh sirfira sa hoon main
Buddhu zara sa hoon main
Baadal pe chalta hoon main
Girta sambhalta hoon main
Khwahishein karta hoon main
Khone se darta hoon main
Jaga na soya hoon main
Musafir khoya hoon main
Kuchh sirfira sa hoon main
Buddhu zara sa hoon main
Dil kya kare, dil kya kare
Tere bina itna bas mujhe pata hai
I am in love, I am in love
Tu hi bata jaane kya mujhe hua hai
(गाणे खूप छान आहे . नक्की ऐका) हिंदी लिरिक्स सापडले नाहीत
निशी " माय डिअर हजबंड असे करू नका .. मन लावून काम करा .. आणि पटकन घरी या .. तुमची बायको तुमची वाट बघत आहे "
स्वराज एकदम एक्ससाईट झाला " ओह रिअली !! येतोच आता लवकर .. उम्म्म हा .. असे तो मोबाईल वर करत असतानाच नेमके डॅड आणि क्रिस्टिना केबीन मध्ये आले
क्रिस्टिना एक मिनिट त्याच्याकडे बघतच बसली .. हे असे काही स्वराज पण करत असेल याची किंचितही आयडिया नव्हती तिला ..
स्वराज "डॅड .. तुम्ही इथे ? "
डॅड " सॉरी .. नेक्स्ट टाईम डोअर नॉक करून येईन .."
स्वराज " हा .. म्हणजे .... नाही म्हणजे .. मला असे नव्हते म्हणायचे ?"
क्रिस्टिना " अंकल .. स्वराज लूक्स क्रेझी टुडे .. डोन्ट यु थिंक "
डॅड " नो .. अक्टच्युअली .. हि इज इन लव्ह .. अँड मिसिंग हिज वाईफ "
स्वराज " निशी फोन ठेवतो .. बाय .. भेटू संध्याकाळी .. तू झूम कॉल करून घे " आणि त्याने फोन कट केला ..
निशी ला पण खूप हसायला येत होते .. बिचारा .. आता ऑफिस मधे चिडवतील सगळे त्याला
-----------------
निशी ने झूम लिंक पाठवली तशी रणजित ने लिंक जॉईन केली .. आणि लॅपटॉप प्रोजेक्टर ला कनेक्ट केला
रणजित आणि नंदा दोघेही शाळेतच होते ..
निशी ला सर्व मुलं दिसतील असे त्यांना बसवली ..
निशी भरल्या डोळ्यांनी शाळा पाहत होती .. १०० एक मुलं .. आज घरात होती .. अंगण भरले होते ..पडवी भरली होती .. काही काही जण .. झाड लावली होती तिकडेच होती ..
निशी " कसे आहेत सगळे ? कसे वाटतंय शाळेत ?\"
सगळी " मुलं " खूप छान वाटतंय .. रणजित सरांनी आज खूप छान एकलव्याची स्टोरी सांगितली .. नंदा टीचर नि आज खूप छान प्रार्थना सांगितली .. आणि मराठी .शिकवले "
निशी " अरे वाह !! "
राधाक्का भरल्या डोळ्यांनी " निशी .. कशी आहेस ग ? कसे आहे तिकडे ? "
निशी " राधाक्का खूप छान आहे .. मी संध्याकाळी तुला सेपरेट कॉल करते .. आता मुलांशी बोलून घेते
राधाक्का " हो ग हो .. बोल "
निशी " हे बघा .. मुलांनो .. रोजच्या रोज घरी दिलेला अभ्यास करायचा .. जे नाही येणार ते दुसऱ्या दिवशी विचारायचं ... वह्या मी आल्यावर स्वतः चेक करणार आहे आल्यावर .. अक्षर चांगले काढायचे .. ठीक आहे "
मुलं " हो टीचर "
निशी " नंदा टीचर आणि रणजित सरांना त्रास देऊ नका जास्त .. त्यांचा अभ्यास सांभाळून ते तुम्हांला शिकवायला येणार आहेत "
मुलं " हो टीचर "
\"निशी :" मला जमेल तेव्हा मी असाच कॉल करत जाईल .. ठीक आहे "
मुलं " हो टीचर "
निशी " सर्वांनी शाळा आळीपाळीने स्वछ करा .. आपली शाळा स्वच्छ ठेवायचे काम आपले आहे .. मी असले कि मी स्वतः साफ करते .. आपली शाळा स्वछ करायला लाजायचं नाही .. जिथे स्वछता असते तिथे लक्ष्मी आणि सरस्वती दोन्ही एकत्र राहतात .. कळलं "
मुलं " हो टीचर "
निशी " मी इकडून खूप काही घेऊन येणार आहे शाळे साठी .. खूप छान पुस्तके .. स्टेशनरी "
मुलं " टीचर स्वराज काकांनी आणलेली चॉकलेट्स पण आणा "
निशी " हो हो नक्की आणेल.. पण सर्वांनी अभ्यास मन लावून करायचा .. रोज न चुकवता शाळेत यायचं ... ठीक आहे "
मुलं " हो ... "
नंदा चा आवाज जाड झालेला ना " निशी टीचर .. तुम्ही कशा आहेत ?"
नंदा " मी ठीक आहे .. मी तुझ्या मोबाईल वर नंतर कॉल करेल .. "
निशी " रणजित सर .. काही प्रॉब्लेम आला तर ताबडतोब हरिभाऊंना कळवा आणि स्वराज च्या मोबाईल वर रिंग द्या आम्ही कॉल करू "
रणजित " निशी मॅडम .. नका काळजी करू "
निशी " बरं .. मग ठेवते आता .. बाय "
सगळी मुलं " बाय .. बाय टीचर "
निशी जवळ नाही आणि अशी व स्क्रीन वर पाहून नंदा ला रडू आवरेना .. ती आत मधल्या खोलीत गेली आणि तिच्या आठवणीने रडू लागली
रणजित मुलांना शिकवत होता
रणजित ने एक गणित कॉपी करायला लावले आणि तो हि आत आला
रणजित " काही प्रॉब्लेम आहे का ?"
नंदा डोळे पुसून " तुला काय करायचंय ? "
रणजित " नीट बोलताच येत नाही का तुला ?"
नंदा " अपरिचित लोकांशी मी बोलत नसते "
रणजित " ठीक आहे .. एवढा अपरिचित आहे का मी ?"
नंदा " हो .. मग काय ? ओळख विसरलास तू ? आणि आता मी पण "
राधाक्का " काय रे पोरांनो .. काय झालय नक्की "
रणजित " नाही काही नाही .. " आणि निघून गेला बाहेर शिकवायला
राधाक्का " नंदा काय झालंय ? नक्की ?"
नंदा " कुठे काय ? निशी ची आठवण आली म्हणून अश्रू आले तर याला काय प्रॉब्लेम आहे ?"
राधाक्का " असे होय .. तू रडतेस तर काळजी वाटली असेल त्याला ?"
नंदा " कोणी सांगितलीय माझि काळजी घ्यायला ? मी समर्थ आहे "
राधाक्का " बर बर .. जा तू शिकव मुलांना .. नको बोलूस त्याच्याशी .. ठीक आहे "
नंदा डोळे पुसून पुन्हा बाहेर आली आणि तिला जो वर्ग दिला होता त्याला शिकवू लागली..
रणजित ला रागाने लुक्स देऊन ती पुन्हा शिकवू लागली.

🎭 Series Post

View all