निशिगंधा भाग 56

In This Part Lets See Where Will Swaraj Takes Out For First time In uk ...
निशिगंधा भाग ५६
क्रमश : भाग ५५
स्वराज " गुड मॉर्निंग.. "
निशी " गुड मॉर्निंग "
स्वराज " हे काय तुझे आवरलं पण .. किती वाजता उठलीस ?"
निशी " मी पाच वाजता उठलेय .. नाश्ता रेडी आहे "
स्वराज " अरे वाह !! ."
निशी " तू खाली ये मी चहा टाकते .. "
स्वराज " ठीक आहे… नाश्ता झाल्यावर आपण दोघे बाहेर जाऊ फिरायला .. "
निशी खाली गेली किचन मध्ये .. हा अंघोळ करून खटाखट तयार होऊन जिना उतरत होता .. राउंड नेक चा टी शर्ट .. क्रिम पॅन्ट .. नुकताच अंघोळ केल्यामुळे एकदम फ्रेश दिसत होता .. स्टेप्स उतरताना त्याच्या डोक्यावरचे सेट केलेले केस पण उड्या मारत होते .. हाय… एकदम कातिल दिसत होता आणि निशी त्याला बघण्यात इतकी गुंग झाली कि समोर असताना पण दूध उतू गेले ..
इकडे स्वराज जवळ येऊन .. तिला मिठीत घेऊन गालावर किशी देऊन फ्रिज मधून बॉटल घेऊन .. ती गार बॉटल तिच्या गालावर टेकवली . तशी दचकली
स्वराज " मी इतका हँडसम दिसतोय का ? आज ?"
निशी " हो .. खूपच " आणि त्याच्या मिठीतुन बाहेर आली ..
स्वराज " अरे वाह !! माझ्या तोंडावर माझी तारीफ ऐकायला मिळाली म्हणजे आज माझा दिवस सफल झाला म्हणायचा .. "बरं चल आवर .. लांब जायचंय आपल्याला "
निशी " स्वरू .. मी कोणता ड्रेस घालू ?"
स्वराज " तू ना .. तुला पाहिजे तो घाल आज .. आज तू माझि तारीफ केलीस ना .. चल आज तुला तुझ्या चॉईस चे कपडे घालायला दिले "
निशी "अरे वाह !! थँक यु "
त्याला माहित होते .. हि साडीच घालणार आहे ..इनफॅक्ट आज तिने साडीच घालावी असे त्याचे हि मत होते म्हणून तर राजा एवढा उदार झाला होता ..
दोघांनी एकमेकांना पराठा भरवला .. निशी ने बनवलेला चहा नाश्ता म्हणजे स्वराज साठी मोठी मेजवानीच असायची ..

स्वराज खालीच लॅपटॉप वर काम करत होता .. आणि ती वरती जाऊन त्यांच्या लग्नातली बनारसी साडी घालून .. मस्त सैलसर वेणी बांधून .. फक्त एक चेंज तिने केला होता तो म्हणजे पदर सिंगल पदर घेतला होता ..
स्वराज च्या समोर निशी उभी राहिली .. " मी तयार आहे "
तिला असे वाटत होते कि तो म्हणेल साडी का घातलीस .. साडीच घालायची होती तर डिझाईनर घालायची होतीस .. हि ट्रॅडीशनल साडी का घातलीस .. पण तो काहीच तसे बोलला नाही ..
स्वराज "खूप सुंदर दिसतेय सोनू तू .. अरे नाही यार …बाहेर जाताना असे इतके सुंदर नाही दिसायचं .. मग माझा मुड नाही होत बाहेर जायचा .. सग ळा बेत कॅन्सल करावासा वाटतो
निशी "सॉरी .. तू नाराज नाहीस ना .. मी साडी घातली म्हणून "
स्वराज " अरे .. अजिबात नाही .. मी सांगितले ना तुला ..आज तुला तुझ्या चॉईस चे कपडे घालायला सांगितले हे शेवटचं .. इथून पुढे महिनाभर मी सांगेल ते घालायचेत ना म्हणून "आणि हसायला लागला
निशी " ठीक आहे .. तू छान च ड्रेस घालायला सांगशील मला माहितेय .. शेवटी किती झाले तरी मी तुझी बायको आहे ?"
स्वराज " तू माझी बायको आहेस हे तू विसरू नकोस म्हणजे झाले .. " आणि पुन्हा हसला
निशी " नाही विसरणार .. "
स्वराज " मग .. आज गजरा नकोय का .. तुला नेहमी एक तरी फुल लागतं ना केसांत ?" आणि बोलतच तो बॅक यार्ड मध्ये गेला आणि तिथल्या मोगर्या सारख एक फुल .. ज्याला खूप छान सुगंध येत होता ते त्याने तिच्या केसांत घातले "
निशी " थँक यु .. खूप छान सुगंध आहे रे "
स्वराज " हमम .. ओके .. चलो देन ..निघूया "
स्वराज च्या ब्लॅक कार मध्ये दोघेजण बसले .. स्वराज ने स्वतः सीट बेल्ट लावून दिला
स्वराज " सीट बेल्ट इकडे कम्पलसरी आहे .. काढू नकोस ... "
निशी " ओके .. " निशी त्याच्या कडे एकटक बघत होती
स्वराज " काय बघतेय अशी ?
निशी " तू या टी शर्ट मध्ये छान दिसतोय .. "
स्वराज ने तिच्या गालाला .. चिमटीत पकडले " तुला आवडलो ना मग झाले .. हे जास्त महत्वाचे .. चला म्हणजे लुक्स च्या परीक्षेत पास झालोय म्हणायचं मी "
निशी " १० ऑन १० "
स्वराज " ओहो ... पैकीच्या पैकी .."
निशी "म्हणजे काय ? तू आहेसच इतका हँडसम "
स्वराज " आज तू फुल माझ्या प्रेयसीच्या अवतारात आहेस .. खूप छान वाटतंय मला .. आज तू एकदम मोकळी वागतेय .. निदान मनात जे आहे ते बोलतेय तरी "
निशी " आता मी तुझी बायको कम प्रेमिका आहे .."
स्वराज " वाह .. ग्रेट .. कालचे आपले बोलणे फारच मनावर घेतलेलं दिसतंय मॅडम "
निशी " मग काय ? आत इथून पुढे तू बघचं .. एक महिना तुला मी प्रेमिका बनून छळणार आहे .. "
स्वराज " आजचा सूर्य नक्की इस्ट लाच उगवलाय ना .. हे काय ऐकतोय काय मी ? असा माझा छळ तू कधी करशील याचीच मी वाट बघतोय "
निशी " आज पासूनच .. माझे सगळे नखरे उचलायचे .. "
स्वराज " मी तुलाच उचलतो ना "
निशी ने बोलता बोलता त्याचा हात पकडला आणि त्याच्या दंडावर स्वतःचे डोके ठेवले .. आणि एकदम शांत झाली
स्वराज " काय झाले शोना .. एकदम शांत का झालीस ?"
निशी " स्वरू .. " तिच्या डोळ्यांतून एक अश्रू ओघळला
स्वराज " काय झालं .. पिल्लू .. का अश्रू .. आता तर किती खुश होतीस ?"
निशी " स्वरू . जे मी तुझ्याशी आता बोलतेय ते नक्की नॉर्मल आहे ना .. ?पण तरी माझे मन मला सांगतय कि जास्त शेफारु नकोस .. इतके नखरे करायची गरज नाहीये .. आपल्या लायकीत रहायचं ... हे हे .. सर्व बोलताना माझं मन मला मी खूप जास्त बोलतेय असे सांगतंय .. मी चुकितेंय का ?माझं मन चुकतंय?.. मला काहीच कळत नाहीये .."
स्वराज " मनाला सांग .. मी एक परी आहे .. मी लहान होते तेव्हा मी माझ्या बाबांची परी होते आणि आता मी माझ्या नवऱ्याची परी आहे .. मला जे जे पाहिजे आणि जसे पाहिजे तसेच मी वागेन .. ठीक आहे "
स्वराज ने तोच हात तिच्या खांद्यावरून टाकून तिच्या खांद्याला रब केलं ..
स्वराज " निशी .. मनाला आनंदी ठेवायची तुझी सवयच गेलीय .. नेहमी मन मारून तू जगत आलीस म्हणून असे होतंय .. आणि मला तुझ्या मनाला आनंदी करायचंय .. त्याला आज पासून सांग .. इट्स टाईम टू चेंज "
निशी " माझे काही चुकलं तर स्वरू .. तू मला दूर लोटू नकोस .. मी .. नाही जगू शकणार तुझ्या शिवाय "
स्वराज " काही पण काय बोलते .. निशी .. मी का तुला दूर लोटेन "
निशी " जेवढा समजूतदार पणाचा मुखवटा लावून मी फिरते ना .. तेवढी समज नाहीये मला . या जगाची ... या लोकांची .. कोणाचीच नाहीये .. मी फक्त दाखवते मी खंबीर आहे .. मी खंबीर असल्याचे नाटक करते .. मी दाखवते मी एकटी जगू शकते .. मी आतून घाबरलेली होते एकटे पणाला .. तू जर आला नसतास तर अशी घाबरत घाबरत मी कशी जगले असते .. माझे स्वप्न जे कि आता सत्यात उतरायला सुरुवात झालीय ते कधीच पूर्ण नसते झाले .. स्वरू थँक यु तू आलास .. थँक यु तू माझ्याशी लग्न करायचा निर्णय घेतलास .. तू माझ्या आयुष्यातला मसीहा आहेस .. देवदूत आहेस .. देवाने तुला माझ्या साठी पाठवलंय .. आज मला देवाला हात जोडून थँक यु म्हणावे वाटतंय "
स्वराज " निशी .. लग्नाच्या गाठी स्वर्गात देव बांधतो ह्यावर माझा आता विश्वास बसलाय .. तसे नसते तर आज आपण नक्कीच एकत्र नसतो .. कुठून कुठे आपण दुरावलो होतो .. मी तर विसरून गेलो होतो तुला तरी पण तुझ्याशीच लग्न केले मी ... अजब योगायोग .. आहे .. खरं आहे .. आपण दोघांनी लिटरली हात जोडून देवाचे आभार मानले पाहिजेत .. आपल्याला एकत्र आणल्या बद्दल "
अशाच गप्पा मारत स्वराज ने एक दीड तास ड्राईव्ह करत तिला एका ठिकाणी आणले .. गाडी पार्क केली .. आणि इकडून येऊन दार उघडले .. तश्या निशी मॅडम खाली उतरल्या .. आणि समोर बघतायत तर ... मोठा कळस .. मंदिराचा कळस तिला दिसला .. बाजूला एक बोर्ड होता " टुवर्डस बालाजी टेम्पल "
काल पासून निशी देव देव करत होती म्हणून स्वराज ने आज तिला मंदिरात न्यायाचाच प्लॅन केला होता .. म्हणून तर तिला साडी नेसायला परवानगी दिली होती त्याने .. आणि तिला न सांगता जणू संकल्प पोहचत होते .. तिला हि देवाला नमस्कार करायची .. देवाचे आभार मानायची ईच्छा झाली ..
निशी " स्वरू .. टेम्पल आहे इकडे .. चल चल .. आपण टेम्पल मध्ये जाऊ "
स्वराज " अरे डार्लिंग .. तिकडेच आलोय आपण .. तुला काल देवांची किती आठवण येत होती .. म्हणून म्हटले आता मंदिरातच जाऊ "
निशी खूप आनंदी झाली होती .. आणि भरा भर पाऊले टाकत .. मंदिरा कडे दोघे निघाले ..
तिकडेच बाहेर काऊंटर होता .. तिथे देवाचे सर्व सामान मिळत होते .. हे सगळे पाहून ती काय च्या काय खुश झाली .. इकडे UK मध्ये हे पण सगळे मिळते .. हे तिच्या विचारांच्या पलीकडे होते ..
निशी ने कापड .. नारळ .. फुल .. अगरबत्ती सगळे घेतले .. मंदिर खूप मोठे होते २५ एक पायऱ्या होत्या .. दोन मोठे हत्तींचे स्टॅचू दोन्ही साईडला विराज मान होते ... पायर्यांवर रांगोळी काढली होती .. काही ठिकाणी नक्षी काढली होती म्हणजे पर्मनंट रांगोळी .. निशी ते सर्व बघून एकदम खुश होत होती ..
आत मध्ये गेल्यावर दर्शनाला रांग होती .. दोघे रांगेत उभे राहिले ... बरेच इंडियन लोक दिसत होते .. काही काही तर हिंदी .. कन्नडी , तामिळ आपापसात बोलत होते .. जे लोक तिकडे स्थायिक आहेत ते लोक दर्शनाला दर रविवार जातात ..
तेवढ्यात एक पुजारी आला आणि स्वराज ला म्हणाला

🎭 Series Post

View all