निशिगंधा भाग 54

Story Of A Girl Who Wants To Run School


निशिगंधा भाग ५४
क्रमश : भाग ५३
डोळ्याने असे रागीट लुक्स देऊन ती त्या रूम मध्ये गेली .. आणि तिला साजेसा स्विम सूट शोधू लागली .. बराच वेळ बाहेर आली नाही .. म्हणून इंपेशण्ट बनून स्वराज पाण्यातून बाहेर आला .. बाथ रोब गुंडाळून त्या रूम मध्ये गेला ..
स्वराज " काय होतंय ? काय होतेय का पसंती ? अजून किती वेळ .. ?"
निशी " हे असले कपडे मी घालू आणि रागाने तिने दोन बिकिनी खाली फेकल्या .. "
स्वराज ला तिचा राग बघून जाम हसायला येत होते .
स्वराज " अरे ए फेकते काय माझ्या अंगावर ?"
निशी " मुळात हे एवढे असले कपडे इथे का आहेत ? आणि कोणाचे आहेत ?"
स्वराज " अरे सगळे नवीन आहे .. डिझायनर आहेत .. आणि त्याने तिने खाली फेकलेल्या पैकी एक उचलला आणि तिथे लावून टाकला "
निशी चे डोळे भरून आले होते
स्वराज " अरे रडके .. रडायचं काय त्यात ? थांब मी तुला आवडेल असा कॉशुम काढून देतो " आणि त्याने तिथेच असलेल्या पैकी एक निज (ढोपरा) पर्यंत होईल असा ड्रेस काढून दिला
स्वराज " हा घे .. .. हा बघ हा पण आहे फुल आहे .. बघत नाही नि उगाच माझ्या वर चिडते .. "
निशी " पण हे आहेत कोणाचे ?"
स्वराज " अग माझी बायको ... तुझे आहेत .. रोज एक तू घाल ठीक आहे "
निशी " मी असले कपडे घालते का ? काय पण .. उगाच .. खरं सांग ? तुझ्या गर्ल फ्रेंड विसरून गेल्या का इथे ?"
स्वराज " बावळट .. मार खाशील हा .. काय पण तोंडाला येईल ते बोलशील तर "
निशी "मग कोणाचे आहेत ?मॉम चे तर नक्कीच नसतील हे असले घालत नसतील त्या ?"
स्वराज " कशा वरून ? तू बघितलंय का मॉम ला ?"
निशी " फोटोत बघितलंय "
स्वराज " अरे मॉम ची कधी कधी स्विमिंग पूल पार्टी असते .. तिच्या सगळ्या फ्रेंड्स येतात .. आणि पाण्यात पार्टी करतात.. मग त्यांना लागतील म्हणून मॉम ने कलेक्शन करून ठेवलेय "
निशी " असली कोण पार्टी करत .. काही पण सांगतो मला ? "
स्वराज " तुझा विश्वास नाही ना माझ्या वर ?"
निशी " नक्की ना…मला खूप राग आला .. तू मला स्विमिंग ड्रेस घालायला लावतोय म्हणून "
स्वराज " अरे .. बाबा ... पाणी खराब होते बाकीचे कपडे घातले तर .. आणि स्विमिंग करायला स्विमिंग कॉशुम असले तर कंफर्टेबल होते "
निशी " हमम .. ठीक आहे .. जा आता मी चेंज करून येते "
स्वराज " जाऊदे मरूदे .. तुला नको असेल तर राहू दे .. जा वरती जा .. मी येते थोड्या वेळाने .. " आणि रागाने तो बाहेर निघून गेला
निशी " तेच तर सांगत होते ना मी मगाशी .. आज नको म्हणून "
स्वराज " तू ना रिजिड आहेस .. प्रत्येक वेळी मला रामायण लावायला लावतेस .. वैताग देतेस "
निशी " थांब ना आता येते ना चेंज करून ?"
स्वराज " नको .. जा आता वर .. मी माझे झाले कि येईन .. मग आपण जेवू "
निशी " काय चाललंय स्वराज ... येऊन एक दिवस नाही झाला तर भांडतोय का तू माझ्या बरोबर .. आणि म्हणे काय वाटले तर मला सांग .. मी आहे .. काही काळजी करू नको "
स्वराज " तुझा प्रॉब्लेमच मी आहे .. मग मी कसा सोडवणार ? एक तर माझ्या वर विश्वास नाही ? खरं खरं सांगितले तुला मी माझ्या गर्ल फ्रेंड होत्या म्हणून .. फसवायचं असतं .. तर सांगितले असते एकही नव्हती म्हणून”
निशी " तू कसा असशील माझा प्रॉब्लेम ? काय पण बोलतो ? "
स्वराज " माझ्या समोर हा ड्रेस घालायला पण लाज वाटते ना तूला .. म्हणजे आहेच ना मी प्रॉब्लेम ? आणि नाही ये का प्रॉब्लेम .. ठीक आहे मग घाल हि बिकिनी घाल "
निशी " हेच तर मनात आहे तुझ्या ... मला काही कळत नाही का ?"
स्वराज " तुझ्या तर आता ?उचलून पाण्यात फेकून देईल हा .. किती वच वच करते .. "
निशी रागा रागात तिथल्याच चेंजिंग रूम मध्ये गेली आणि चेन्ज करून आली
निशी " सॉरी .. ते गर्ल फ्रेंड च असेल असे नव्हतं बोलायला पाहिजे होते मी .. सॉरी "
स्वराज काही च बोलला नाही .. दोघे पाण्या जवळ आले
स्वराज ने बाथरोब काढला आणि पाण्यात उडी घेतली आणि स्विम करू लागला ..
निशी मात्र अजूनही बाहेरच उभी होती
स्वराज " मी या काठाला पोहतो .. तू त्या काठाला पोह .. ते सुद्धा तुला पाहिजे असेल तर नाहीतर घरात गेलीस तरी चालेल "
निशी ला खरंतर रडायलाच येत होते .. तो भांडला .. चिडला .. जरा पण समजून घेत नाहीये .. आणि आता सॉरी बोलले तरी राग धरून बसलाय .. आता घरात गेले तरी फुगेल .. काय करू ते तिला कळेना
स्वराज " तू आता कोणाची वाट बघत आहेस ?"
निशी " कोणाची नाही .. मी जातेय वरती " आणि ती मागे फिरली आणि त्यांच्या रूम कडे जायला वळली ..
दोन मिनिटे काय झाले ते तिला कळलेच नाही .. जेव्हा समजलं तेव्हा ती पाण्याखाली होती ..
स्वराज ने पटकन बाहेर येऊन तिला उचलून घेऊन पाण्यात उडी मारली होती .. जोरात पाण्यात पडल्याचा आवाज आला .. आणि अल्मोस्ट दोघे पाण्याच्या तळाशी गेले होते .. आधी हात पाय हलवत .. वर खाली होत .. थोडासा श्वास घेऊन तिने डोळे उघडले तर स्वराज आणि ती पाण्याखाली होते
स्वराज ने अजूनही तिचा हात धरून ठेवला होता .. आणि तिच्याकडे बघत होता ..
दोन एक मिनिटाने दोघेही वरती आले .. थोडे अचानक झाल्यामुळे तिला श्वास लागला होता .. पण तो काठावर जाऊन बसला होता आणि त्याचा ऑरेंज ज्यूस घेत होता
निशी " काय हे ? तेही असे अचानक ? हे काय वागणे आहे का ?""
स्वराज " तुला सगळे अचानक च लागते .. जसे लग्न अचानक झाले .. तरच तुला सहन होते .. तसेच आहे हे .. उद्या पोरं पण अशीच होतील आपल्याला अचानक .. तू कधीच कोणत्याच गोष्टीला तयार नसतेस .. "
निशी काहीच बोलली नाही बहुदा पटलं होते तिला .. नवीन बदल स्वीकारत जरी असली तरी बदल तिला आवडत नाहीत .. तिच्या ठरलेल्या पाऊल वाटेनेच तिला चालायचं असते .. हे त्याने अगदी बरोबर ओळखले होते.
निशी " आता स्विमिंग करायचीय का नुसतंच भांडायचंय तुला ?"
स्वराज " मी भांडतोय ? मी भांडतोय ? तू आहेस भांडखोर "
निशी " चल मी या काठावरून येते .. तू त्या काठावरून ये .. कोण आधी पोहचत ते बघू ?"
स्वराज मनात " बघा .. मगाशी पाण्यात उतरायचं नव्हतं गधडीला .. आणि आता कॉम्पिटिशन लावतेय "
निशी तोपर्यंत त्या काठावर येऊन रेडी थांबली
स्वराज " जिंकेल त्याला काय मिळेल ?"
निशी " धपाटा .. ते पण हरेल त्याला "
\"स्वराज " मग जाऊ दे .. मला नाही कॉम्पिटिशन करायची .. कारण मी काय तुला मारू शकणार नाही "
निशी " ओव्हर कॉन्फिडन्स अच्छा नहीं होता "
स्वराज " ह्या पूल मध्ये गेले १५ वर्ष मी पोहतोय .. कळलं ना "
निशी " मी नदीत . तळ्यात , धबधब्यात पोहून लहानाची मोठी झालीय .. आणि विहिरीत उड्या मारल्यात "
स्वराज " ठीक आहे .. पण मी जिंकलो तर मला किस पाहिजे "
निशी " आणि हरलास तर मी धपाटा देईन .. तो खायची पण तयारी ठेव "
स्वराज " ठीक आहे .. सेम आप्ल्याइज टू यु "
निशी " नाही .. मी जिंकले तर किस मिळणार नाहीये .. हे लक्षात असू द्या "
स्वराज " रेडी .." आणि तो पण पाण्यात उतरला
दोघे दोन विरुद्ध काठाला होते आणि पहिला पोहचेल विरुद्ध काठाला तो जिंकेल असे ठरले
स्वराज " वन .. टू .. थ्री .. स्टार्ट "
दोघे पाण्यात पोहायला लागले .. स्वराज तर पट पट पोहत होता .. त्याला ग्यारेंटि होती कि तो पोहचेल पहिला .. फास्ट फास्ट पोहत तो त्या काठाला पोहचला आणि पटकन टर्न करून मागे बघितले तर .. निशी आल्रेडी पोहचली होती आणि त्याचे ऑरेंज ज्यूस पित होती
स्वराज " अरे ए .. शक्यच नाही .. तू काहीतरी चीटिंग केलीय "
निशी " मी चीटिंग करत नसते .. आता एक धपाटा खावा लागेल तुला "
स्वराज " आता मी इथेच थांबतो आणि घड्याळ सेट करतो .. टायमिंग लावतो .. कळेल तू किती वेळात पोहंचलीस ते आणि नंतर मी माझ्यासाठी पण टाईमिंग लावतो "
निशी " ठीक आहे "
स्वराज ने टायमर सेट केला .. आणि तिला स्टार्ट करायला सांगितले ... ति जे एकदा पाण्याखाली गेली ती पाण्याखालून त्या काठाला पोहचली .. एकदा पण डोकं वर नव्हतं काढलं तिने . ती या काठाला २ .६२ मिनिटाला पोहचली .. तेव्हाच स्वराज ला कळले होते कि तो हरलाय .. त्याचा टाईम त्याला माहित होता कमीत कमी ३ मिनिटे त्याला लागायची ..
स्वराज " ठीक आहे .. गुड .. यु आर फास्टर .. आता उलटे स्विम करत जा .. मी पुन्हा टायमर सेट करतो .. बघु किती वेळ लागतो ते .. ती उलटी म्हणजे चेहरा वरती .. पाण्यावर तरंगत .. पाय म्हणजे असे हलत होते कि जणू एखादा मासाच पाण्यात फिरतोय असे वाटले त्याला .. २. ८० मिनिट्स .. हे पण त्याला बिट करणे शक्य नव्हते .. मनातच हसायला लागला ..(मनातच) " च्यायला .. आता .. किस राहिला बाजूला .. मास्तरीण बाई धपाटा नक्की देईल"
निशी " ओके नाऊ इट्स युअर टर्न "
स्वराज " नको .. तूच जिंकलीय .. तू काय मला जिंकून देणार आहेस .. मला किस न देण्यासाठी तू ३ मिनिटात अख्खा समुद्र पार करशील मला माहितेय "
निशी खो खो हसायला लागली .. " हरला रे हरला . आता धपाटा .. खावा लागेल " चल ये इकडे .."
स्वराज "मी कशाला येऊ .. तू ये .. माझ्या जवळ .. "
निशी ने पुन्हा पाण्यात सूर मारला आणि पाण्यातून खालून स्वराज च्या जवळ आली आणि उभी राहिली ....
स्वराज ने कमरेत हात घालून तिला जवळ ओढले .. " तुला किस करण्यासाठी मला कोणतीही रेस जिंकायची गरज नाहीये .. एम आय राईट ?”

🎭 Series Post

View all