निशिगंधा भाग 53

Story Of A Girl Who Wants To Run School
निशिगंधा भाग ५३
क्रमश: भाग ५२
निशी " स्वरू .. किती प्रेम करतोस तू माझ्या वर "
स्वराज " म्हणजे काय? हम तो तेरे आशिक है सदियों पुराने .. चाहे तू माने ..चाहे ना माने "
निशी चक्क लाजलीच
स्वराज " बरं .. हे बघ .. हे तुझे वॊर्डरब .. त्यात तुझ्या बॅग्स ठेवल्यात .. शिवाय हे सगळे क्लोथ्स मी आणून ठेवलेत .. तुझ्यासाठी .. हिअर आर सम जुलरी .. मेकअप इससेन्शिअल , एव्हरी थिंग जे तुला लागू शकेल असे आणलेलं आहे .. अजून काही पाहिजे असेल तर सांगशील .. हे बाथरूम .. गॅलरी …हि स्टडी रूम जी त्याच्या रूम च्या आत मध्ये होती स्टडी रूम मध्ये टेबल वर दोघांचा लग्नतला सेल्फी होता जो त्याने त्याच्या मोबाईल ने काढला होता.. रूम खूप प्रशस्थ होती .. बाजूला बसायला सोफा होता .. गॅलरी मध्ये फुल झाडे होती आणि त्यांना खूप छान रंगी बेरंगी फुले आली होती .. एका हार्ट शेप च्या कुंडी मध्ये निशी कडून आणलेले ते रोपटे त्याने लावलेले तिला दिसले .. निशी सगळे निरखून पाहत होती .. किती टापटिपीत आहे सगळे . गॅलरी तुन खाली वाकून बघितले तर स्विमिंग पूल दिसला तीला .. घरातच स्विमिंग पुल तो हि एवढा मोठा .. आश्यर्यच वाटले तिला .. घरातच छोटोशी केलेली जिम .. बऱ्याचदा तो जिम करताना तिला कॉल करायचा .. त्यामुळे ती रूम तिला ओळखीची वाटली .. असे सगळे त्याने तिला दाखवले .. आणि ती सगळे समजून घेण्याचं प्रयत्न करत होती ..
स्वराज " तू जा अंघोळ कर .. मग आपण नाश्ता करू आणि जरावेळ अराम करू .. "
निशी " मॉम डॅड ... "
स्वराज " अग मी इथे आहे मग मॉम डॅड ला ऑफिस मध्ये खूप कामाचा लोड असतो .. ते येतील संध्याकाळी "
निशी अंघोळीला गेली ..
पाच एक मिनिटांनी
निशी आतून " स्वरू ... पाणी खूप गार येतंय शॉवर ला .. "
स्वराज " राईट साईडला फिरव .. एकदम गरम येईल हा .. बी केअरफूल "
निशी " ठीक आहे "
स्वराज " नाही जमले तर सांग .. मी आत येतो सेट करून देऊ का पाणी ?"
आतून काही तरी पडण्याचा आवाज आला .. बहुदा शॉवर भीतीने सटकला असावा हातातून
स्वराज " ओके ... ओके रिलॅक्स .. मी नाही येत आहे ग आत .. काय घाबरते .. "
निशी मनात " तुझा काही भरवसा नाही मला "
१५ मिनिटांनी निशी अंघोळ करून आली .. खूप सारे प्रश्न होते .. ओले कपडे कुठे ठेवू .. कुठे धुवू , कुठे वाळत घालू .. स्वराज ला सुद्धा विचारायला तिला नको वाटतं होता ..

तिच्या नंतर स्वराज गेला अंघोळीला
अंघोळ करून बाहेर आल्यावर त्याने आधी तिचे कपडे आणि मग त्याचे कपडे वॉशिंग मशीन ला लावले ..ती सगळे बघून घेत होतो
मग दोघे खाली येऊन डायिनंग वर बसले आणि सँडविचेस आणि टी घेतला दोघांनी
आणि रूम मध्ये आले
स्वराज " निशी .. थोडी घाबरली आहेस का तू ? तू कम्फरटेबल आहेस असे वाटतं नाहीये मला .. "
निशी " हा ते सगळं नवीन आहे ना .. मी अशी कधीच कुणीकडे गेली नाही आणि आले ते डायरेक्ट बाहेरच्या देशांत "
स्वराज " हे तुझे घर आहे .. असा विचार कर ना त्या पेक्षा "
बोलता बोलता त्याने तिच्या तिच्या डोक्यावरून काळजीने हात फिरवला ..
स्वराज " डोन्ट टेक टेन्शन .. होईल तुला पण सवय हळू हळू इथली .. थोडा वेळ दे स्वतःला .. डोन्ट ओव्हर थिंक .. ठीक आहे "
निशी " थॅन्क यु स्वराज .. तू किती समजून घेतोय मला ... थँक यु "
स्वराज ने तिला मिठीत घेतले .. " काही काळजी करू नकोस .. काही तुला पाहिजे .. वाटलं तर मला सांगशील .. ठीक आहे .. ओके .." तिच्या कपाळावर किस केले त्याने .. हळू हळू होईल तुला सवय .. ह्या आपल्या घराची .. इथल्या वातावरणाची .. मग आपल्या या रूम ची आणि मग झाली तर माझी " आणि हसला
निशी त्याच्या छातीवर डोकं ठेवून उभी राहिली त्याने तिने दोन्ही हातांनी कव्हर केले … तिने पण मान हलवून होकार दिला ..
https://www.youtube.com/watch?v=kd1Gpd5b9-c&ab_channel=TipsOfficial
धीरे धीरे प्यार को बढ़ाना है
हद से गुज़र जाना है
मुझे बस तुझसे दिल लगाना है
हद से गुज़र जाना है

ऐसी ज़िन्दगी होगी, हर तरफ़ खुशी होगी
इतन प्यार दूंगा तुझे, ऐ मेरे सनम
अब न कोई ग़म होगा, ना ये प्यार कम होगा
साथी मेरे मुझको तेरे सर की है क़सम
इक दूसरे को आज़माना है
हद से ...

मैं अकेला क्या करता, ऐसे ही आँहे भरता
तेरे प्यार के लिये, तड़पता उम्र भर
जाने क्या मैं कर जाती, यूँ तड़प के मर जाती
बिन तेरे भला कैसे, कटता ये सफ़र
तेरे लिये मर के भी दिखाना है
हद से ...

तेरा चाँद सा मुखड़ा, तू जिगर का है टुकड़ा
तू हमारे सपनों की झील का कंवल
जान से तू है प्यारा, आंखो का तू है तारा
बिन तेरे जियेंगे अब हम न एक पल
सब कुछ तुझपे ही लुटाना है
हद से ...
बराच वेळ मिठीत घेऊन .. डोक्यावर हाताने मसाज करून तीला रिलॅक्स केले त्याने .. आणि त्याच्या उबदार मिठीत ती उभ्या उभ्या झोपली .. जेट lag असल्यामुळे तिला सारखी झोप येणारच होती हे त्याला माहित होते ..
तिला प्रॉपर बेड वर झोपवून .. स्वराज ने पहिला इंडिया मध्ये हरी भाऊंना कॉल करून सांगितले कि आम्ही सुखरूप पोहचलो .. निशी झोपलीय .. उद्या बोलेल तुमच्याशी .. मग लॅपटॉप ओपन करून त्याचे काम करू लागला .. निशी चे बरेच व्हिडीओ त्याला लॅपटॉप मध्ये कॉपी करून ठेवायचे होते .. कॉपी करता करता पुन्हा सगळे तिचे व्हिडीओ बघितले त्याने आणि निशी वर त्याचे प्रेम उफाळून आले .. आणि काम अर्धवट टाकून तिला कुशीत घेऊन झोपला.
हनिमून चे नक्की काय प्लॅन करावे .. निशी ला नक्की काय आवडेल .. कुणीकडे न्यावे असे काही तरी जे कि तिला खूप आवडेल .. तिला फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये नाही आवडणार .. इकडे घरातच ती इतकी वेळ घेतेय तर हनिमून ला पण गेल्यावर तसेच करेल .. काहीतरी स्पेशल असे करायचं असा विचार करत बसला.
आनंद तर इतका होता त्याला पण अजून निशी ला थोडा वेळ द्यायला लागणार आहे हे त्याला प्रकर्षाने जाणवले होते .. आल्रेडी लग्न होऊन ३ महिने अल्मोस्ट झाले होते .. पण त्याचा वेटिंग पिरियड अजून संपला नव्हता .. असा मनात विचार करतच हसत होता ..
स्वराज (मनात ) " मला पूर्ण वेडा करून टाकलंय या पोरीने .. एवढ्या माझ्या जवळ आहे पण अजूनही माझी झाली नाही .. आणि मी चक्क वाट बघतोय "
याडं लागलं गं याडं लागलं गं
रंगलं तुझ्यात याडं लागलं गं
वास ह्यो ऊसांत येई कस्तुरीचा
चाखलंया वारं ग्वाडं लागलं गं
चांद भासतो… दिसाचं मावळाया लागलं
आस लागली… मनात कालवाया लागलं
सांगवंना, बोलवंना,
मन झुरतया दुरून
पळतंया कळतंया,
वळतयं मागं फिरून
सजलं गं, धजलं गं,
लाज काजला सारलं
येंधळं हे गोंधळलं
लाडं लाडं गेलं हरून

याडं लागलं गं याडं लागलं गं
रंगलं तुझ्यात याडं लागलं गं
वास ह्यो ऊसांत येई कस्तुरीचा
चाखलंया वारं ग्वाडं लागलं गं

भाळलं असं
उरांत पळवाया लागलं
ओढ लागली
मनात चाळवाया लागलं
सुलगंना, उलगंना,
जाळ आतल्या आतला
दुखनं हे देखनं गं
एकलच हाय साथीला

याडं लागलं गं याडं लागलं गं
रंगलं तुझ्यात याडं लागलं गं
वास ह्यो ऊसांत येई कस्तुरीचा
चाखलंया वारं ग्वाडं लागलं गं

काजळीला उजळलं
पाजळुन ह्या वातीला
चांदणीला आवतान
धाडतुया रोज रातीला
झोप लागना
सपान जागवाया लागलं
पाखरू कसं
आभाळ पांघराया लागलं

याडं लागलं गं याडं लागलं गं
रंगलं तुझ्यात याडं लागलं गं
वास ह्यो ऊसांत येई कस्तुरीचा
चाखलंया वारं ग्वाडं लागलं गं
------------------
बऱ्याच वेळाने निशी ला जाग आली तेव्हा बेडरूम मध्ये ती एकटीच होती .. एकदम दचकूनच उठली ती .. एक सेकण्ड लागला कळायला तिला आपण कुणीकडे आहोत ते ... स्वराज ला तिच्या आजू बाजूला न पाहून तिला एकदम बेचैनी आली .. आणि ती चेक करू लागली
निशी " स्वरू .. स्वरू .. कुणीकडे आहेस तू "
खाली बघितले तर खाली किचन मध्ये कोणी नव्हतं .. इकडे गॅलरी मधून बघितले तर स्वराज स्विमिंग पूल मध्ये उतरला होता आणि पूल साईडला पाण्यात उभा होता .. पुढे लॅपटॉप ओपन करून काहीतरी का करत होता .. बाजूला एक सॉफ्ट ड्रिंक चा ग्लास भरला होता.
स्वराज त्याच्या कामात मग्न होता .. निशी ने त्याला खाली पहिले आणि त्याला पाहून शांती आली तिला ... फ्रेश होऊन खाली गेली ..
मनातून खूप अस्वथ होती .. अजून मॉम डॅड आले नव्हते .. नवी नवरी चे स्वागत जसे होयला पाहिजे तसे झाले नव्हते .. तिला घरात लक्ष्मी च्या पाउलांनी घेतले नव्हते .. शिवाय घरात कुणीकडे देव घर दिसे ना .. तिला संध्याकाळी रोज दिवा बत्ती स्तोत्र म्हणायची सवय होती .. सगळे अपोझिट होते .. हे असे आयुष्य कसे काढायचं .. माझ्या साठी घरात कोणी कशाला बदलेल .. आणि त्यांनी बदलावे अशी मी अपेक्षा करणे चुकीचे ठरेल .. स्वराज तिकडे आला कि मी राहते तसाच राहतो .. त्याला हि हा मेजर बदल आहे पण तो दाखवतही नाही .. उलट आहे त्यात आनंदी राहतो .. एवढी श्रीमंती आहे तरी दाखवत नाही .. खरं तर मी नाही आहे त्याच्या लायकीची ... त्याला कोणीतरी प्रिन्सेस च भेटायला पाहिजे होती. मधेच असे वाटतं होते कि स्वरू माझा आहे .. त्याला मी आणि मला तो लहानपणा पासून आवडतो ... सुधीर काकांनी तर मला लहान पणीच सुन म्हणून मागितली होती . सगळे बाबांच्या आणि काकांच्या मना प्रमाणे होतंय .. स्वरू जस तिकडे आहे त्या परिस्थिती त आनंदात राहतो .. तसेच मला पण इकडे आनंदत राहायला पाहिजे ..
चालत येत होती स्वराज जवळ .. तिने नाईट ड्रेस घातला होता ... त्यावर छोटे छोटे स्टारस प्रिंट केले होते आणि कॉलर चे शर्ट आणि पॅन्ट घातली होती .. तिचे मऊ रेशमी काळेभोर लांब सडक केस वर पासून खाल पर्यन्त मोकळे डोळे होते .. अशी क्युट दिसत होती .. पण ह्या क्युटश्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती ..
स्वराज " हॅलो माय प्रिन्सेस "
एक नाही दोन नाही ... लक्षच नव्हते तिचे
स्वराज " हॅलो स्वीटू "
निशी "अ .... "
स्वराज " काय ग ? काय झालंय ? कुठे हरवलीस ?"
निशी " स्वरू .. डॅड मॉम अजून का आले नाहीत .. ? त्यांना मी आवडले असेल ना ?"
स्वराज " अरे ए .. काय चाललंय तुझे ? अग दोघेही आऊट ऑफ सिटी गेलेत .. आज येणार होते पण मिटिंग वाढलीय आता ते उद्या रात्री निघतील .. उगाच नको तो विचार नको करुस . या सगळ्या मिटिंग २ महिने आधी पासून ठरलेल्या असतात .. आपण किती अचानक आलोय माहितेय ना तुला "
निशी " हमम .. "
स्वराज " चल ये आपण स्विमिंग करू .. ये पाण्यात ये तुला बरं वाटेल "
निशी " नको आता .. कुठे ? आणि ती जुलीन बघेन ना आपल्याला "
स्वराज " मला माहितेय तू काहीतरी कारण सांगशील म्हणून मी जुलीन कडून आज रात्रीचं जेवण बनवून घेतले आणि उद्या आणि परवा तिला सुट्टी दिलीय " आणि खट्याळ हसला " म्हणजे आता कोणीही नाहीये फक्त तू आणि मी .. सो आता तू नक्कीच पाण्यात उतरू शकतेस "
निशी " नको ना आज "
स्वराज " का ? ये ना .. प्लिज .. मज्जा येईल तुला "
निशी " मी बसते इथे .. तू कसा स्विम करतोस ते बघते .. मी नंतर कधीतरी पाण्यात उतरेन "
स्वराज " ये ना .. निशी .. आपले ठरलं होते ना .. यूके मध्ये आल्यावर सगळे मला पाहिजे तंस .. मग "
शेवटी निशी " ठीक आहे .. "
स्वराज " ते बघ समोरच्या रूम मध्ये स्विमिंग कॉशुम आहेत .. त्यातला घाल तुला पहिजे तो "
निशी " मी यावरच येते ना ... मला तसल्या ड्रेस ची सवय नाहीये "
स्वराज " आय सेड गो ... आय एम वेटिंग "

🎭 Series Post

View all