निशिगंधा भाग 52

Story Of A Girl Who Wants To Run School
निशिगंधा भाग ५२
क्रमश: भाग ५१
आता तिला मरणाची भूक लागली होती आणि स्वराज अजून गाढ झोपेत होता ..
"उठवू का ? नको जाऊ दे झोपू दे .. " असा विचार करत बसून राहिली ..
तिथेच कॅफी मेकर होता .. एक कॉफी करून प्यायली आणि गप्प बसली .. कॉफी च्या वासाने स्वराज उठला .. उठल्या उठल्या घड्याळात पहिले तर दुपारचे बारा वाजत आले होते .. त्यालाही भूक लागली होती
लगेचच रेस्टोरंट ला कॉल करून लंच ऑर्डर करून टाकला .. आणि फ्रेश होयला गेला ..
निशी " झाली का झोप ?"
बोले पर्यंत त्याने तिला मागून मिठीत घेतले ..
स्वराज "कसली मस्त दिसतेय तू .. निशी .. यु लूक फॅब इन जीन्स .. अख्ख आयुष्य सगळ्या पोरींना जीन्स मध्ये बघितलंय मी पण तू काही वेगळीच दिसतेस .. सिम्पल .. सिम्पल आणि हि गालावरची हलकीशी डिम्पल .. डोळ्यांत काजळ घातलंस ना कि माझ्या मनात वादळ उठतं "आणि हसायला लागला .. “अरे वाह ! मी तर कवी झालो तुझ्या सौदर्यांत फारच ताकद आहे.. “
त्याचे श्वास तिला माने वर जाणवत होते आणि तिला शहारे येत होते अंगावर .. आपोआप तिने डोळे मिटले ... त्याचा स्पर्श .. हवा हवासा वाटत होता.
त्याने तिच्या मानेवर त्याचे ओठ टेकवले तशी ती पटकन पुढे सरकली. पण त्याने तिला पटकन मागे ओढली आणि त्याच्या घट्ट मिठीत घेतली .. तिच्या मानेवर त्याचा होणारा प्रेमळ स्पर्श दोघांनाही बेभान करत होता.
https://www.youtube.com/watch?v=EwXxMBL1ZIM&ab_channel=SagarikaMusic-Marathi
(स्टोरी वाचताना गाणे नक्की ऐका .. मस्त फील येईल)
गालावर खळी डोळ्यात धुंदी
ओठावर खुले लाली गुलाबाची
कधी कुठे कसा तुला सांग भेटू
वाट पाहतो मी एका इशारयाची

जाऊ नको दूर तू
अशी ये समोर तू
माझा रंग तू घे
तुझा रंग मला दे

I Love you…
I Love you …
I Love you

कोणता हा मौसम मस्त रंगाचा
तुझ्या सवे माझ्या जीवनी आला
सुने सुने होते किती मन माझे
आज तेच वाटे धुंद मधुशाला

जगण्याची मज आता कळते मजा
नाही मी कोणाचा आहे तुझा
सांगतो मी खरे खरे
तुझ्या साठी जीव झुरे
मन माझे थरारे
कधी तुझ्या पुढे पुढे
कधी तुझ्या मागे मागे
करतो मी इशारे

जाऊ नको दूर तू
जाऊ नको दूर तू
अशी ये समोर तू
माझा रंग तू घे
तुझा रंग मला दे

तुझ्या पापण्यांच्या सावली खाली
मला जिंदगी घेउनी आली
तुझ्या चाहुलीची धुन आनंदी
अंतरास माझ्या छेडुनी गेली

जगण्याची मज आता येई नशा
तू माझे जीवन तू माझी दिशा
आता तरी माझ्या वरी
कर तुझी जादूगिरी हुरहुर का जिवाला
बोल आता काही तरी
भेट आता कुठे तरी कसला हा अबोला
हे जाऊ नको दूर तू
जाऊ नको दूर तू अशी ये समोर तू
माझा रंग तू घे तुझा रंग मला दे

निशी गालातच हसली " कसा वाटला साडी टू जीन्स चा मेक ओव्हर "
स्वराज " सुपर .. कातिल… मार डाला "
दोघांनी रूम मधेच लन्च केला .. लंच नंतर
स्वराज ने तिला बेड वर बसवले आणि स्वतः तिच्या बाजूला बसला
स्वराज " कम !! सीट हिअर .. आय वाना टॉक "
निशी चे दोन्ही हात हातात घेतले
स्वराज " खूप छान दिसतेय तू या गेट अप मध्ये .. आणि तू स्वतःहून .. मी न सांगता हे घातलस .. म्हणून थँक यु .. "
निशी " थँक यु काय ?"
स्वराज " ऐक तर ... हे मला काही सांगायचंय .. मी नेहमी तुला जीन्स .. किंवा वेस्टर्न कपडे घालण्या बद्दल बोलत असतो .. .कारण तू स्वतःला एका शेल मध्ये रिस्ट्रिक्ट करून घेतले होतेस .. टेक युअर टाईम .. लूक आय डोन्ट वॉन्ट टू फोर्स एनी थिंग ऑन यु .. "
निशी " स्वरू .. असे नाहीये .. मी फोर्स फुली नाही वागत आहे असे .. "
स्वराज " पण माझ्या मुळे स्वराज ला ऑकवर्ड होऊ नये असेच वागेन असे तू नंदा जवळ बोलताना मी ऐकले .. तुला जे आवडेल . रुचेल , जमेल आणि पटेल तसे वागायला तू मोकळी आहेस .. काल पर्यंत तू एक प्रकारे बाबांची लेक .. बाबांचे नाव खराब नको होयला म्हणून टिपिकल वागलीस .. आता स्वराज च्या बंधनात नको अडकूस .. आता तू .. निशी .. म्हणून फ्रीली जग .. फक्त मला तुझ्या बरोबर घे म्हणजे झाले .. " आणि हसायला लागला
निशी " स्वरू काय रे .. तुझ्या शिवाय मी शून्य आहे .. असे नको ना बोलू .. "
स्वराज " हेच नकोय मला .. असे काही नसते ... तू स्वतः एक सेपरेट आयडेंटिटी आहेस .. आणि तू तुझ्यासाठी जग .. तू आनंदी असशील तेव्हा आणि तेव्हाच मी आंनदी असेल . "
निशी " स्वरू .. किती प्रेम करतोस ना तू माझ्यावर .. खरंच .. मी किती भाग्यवान आहे असे वाटतंय ..मला .. "
स्वराज " तसा तर मी पण भाग्यवान आहे .. तू माझी बायको आहेस "
निशी त्याच्या मिठीत गेली .. त्याने पण तिला मिठीत घेतले .. तिच्या कपाळावर किस करत.. तिच्या ओठांवरून हळूच अंगठा फिरवला .. तशी ती शहारली ..
स्वराज तिच्या काना जवळ " एवढी सुंदर दिसायला लागलीस .. तर माझे कसे होयचे .. "
निशी " उम्म .. चल आवर पटकन .. फ्लाईट ची वेळ जवळ आलीय "
स्वराज " एक किस होईल इतका वेळ तर नक्कीच आहे " आणि हसू लागला
मग काय इतक्या जवळ ती असल्यावर हि संधी कोण सोडेल .. UK ला जायची जोरदार तयारी इथूनच सुरु झाली होती .. बायको वरचा हक्क दाखवायला कुठेही कमी न पडता मनसोक्त किस झाल्यावरच तो जायच्या तयारीला लागला ..
निशी मात्र अजूनही लाजाळूच झाडं होऊन जायची त्याच्या तशा स्पर्शाने .. मोहरून जायची ..
--------------------------
बॅग्स पुन्हा पॅक केल्या .. दोघेही तयार होऊन निघाले एअर पोर्ट ला
एकेक प्रोसिजर करून एअर पोर्ट ला बोर्डिंग च्या इथे आले ..
स्वराज " रेडी मग .. आता आपण फ्लाईट मध्ये बसू थोड्याच वेळात .. भीती वाटतेय ?
निशी त्याच्या कडे बघून " थोडीशी भीती वाटतेय .. सारखी धड धड होतेय .. अनामिक ओढ लागल्या सारखं झालंय .. पोटात गोळे पण येत आहेत "
स्वराज हसायला लागला " काय काय होतंय .." तिच्या निरागस पणावर त्याला हसू येत होते "
स्वराज " डोन्ट वरी जान !! मी आहे ना .. रिलॅक्स !! "
निशी " हमम .. "
स्वराज मात्र मनातून खूप खुश होता .. फायनली त्याची बायको त्याच्या बरोबर त्याच्या घरी चालली होती .. तिला तिकडे गेल्यावर काय काय दाखवू .. कुठे कुठे नेऊ .. तिच्या बरोबर काय काय करू ? असा विचार करून मनात उखळ्या फुटत होत्या ..
इकडे सुधीर रावांना पण सून घरी येणार म्हणून खूप आनंद होत होता .. करीन आणि सुधीर दोघांनी ,मिळून त्यांच्या रिसेप्शन च्या पार्टी ची तयारी सुरु केली ..करिन ने दोघां साठी ड्रेस डिझायनर शी बोलून घेतले .. मेनूफिक्स झाला .. आता फक्त स्वराज आला कि डेट फिक्स करायची बाकी ठेवली होती ..
-----
स्वराज अगदी तिची पर्स पण हातात घेत होता .. तिला हात धरून फ्लाईट मध्ये बसायला गेले .. विंडो सीट जवळ तिला बसवून हा तिच्या शेजारी बसला .. सारखी सारखी तिची चौकशी करत होता " तू ठीक आहे ... तू कम्फरटेबल आहेस ? तुला काही हवय ? "
स्वराज " सोनु.. थंडी वाजतेय का ? AC सेट करू का ?"
निशी हसतच " सोनू .. नवीन नाव "
स्वराज " आता तुला डार्लिंग , हनी आवडत नाही मग तू तुझ्या बाबांची सोनुली .. मग आत माझी सोनू झालीस "
निशी " स्वरू ..केवढी काळजी घेशील .. "
स्वराज " मग माझि एकुलती एक बायको आहेस तू .. तुझी नाही तर कोणाची काळजी घेणार मी ?"
निशी " आय एम टोटली ओव्हरवेल्म "
स्वराज " अरे प्लिज डोन्ट बी फॉर्मल .. आता तुझे सगळे लाड पुरवायचेत मला .. माझ्या लाडोबा चे सगळे राहिलेलं लाड करायचेत ."
निशी त्याच्या कुशीत शिरली .. मस्त दोघे एका शालीत एकमेकांना कुशीत घेऊन झोपले .. फ्लाईट मध्ये जेवण आले ते सुद्धा तयाने तिला भरवले .. "
निशी मनातच " बाबा .. बघितलेत .. माझा नवरा कसे माझे लाड करतोय "
-------------------------
तब्बल १० तांसाच्या प्रवासा नंतर दोघे UK मध्ये पोहचले.
एअर पोर्ट वरच निशी ला सगळे फॉरेनर दिसायला लागले .. रंग , सोनेरी केस .. निळे डोळे .. स्टाईल .. निशी बघत होती .. सगळेच वेगळे वाटत होते तिला .छोटो छोटी मुलं पण किती क्युट दिसत होती ..चक चकित .. काचे सारखे सगळे स्वच्छ .. सगळेच नवीन होते तिला ..
स्वराज लगेज चे बघत होता आणि हि आजू बाजूच बघत होती .. पण त्याच्या मागे मागे होतीच .बाहेर आल्यावर टॅक्सी ने ते दोघे घरी आले .. एका मोठ्या टुमदार बंगल्या समोर कार थांबली ..
स्वराज " हिअर कमस अवर होम "
निशी " बापरे !! किती मोठे आहे .. आणि किती छान आहे ..
निशी पाहत होतो प्रशस्थ एंट्रन्स .. पार्किंग मध्ये चक चकित ब्लॅक कार उभी होती .. काही मस्त शोभेची झाडे लावली होती आणि त्या झाडांमुळे घराची शोभा वाढत होती .
स्वराज ने दार उघडले त्याच्या कडे कीज होत्या ..
निशी ला वाटले कि आत मध्ये मॉम आणि डॅड असतील . कदाचित पहिल्यांदा घरात जाणार म्हणजे ओवाळून घेतील .. पण प्रत्यक्षांत कोणच घरात नव्हते .. मॉम अँड डॅड दोघेही ऑफिस ला गेले होते ..
तेवढ्यात बॅक यार्ड मधून एक मुलगी आली
स्वराज " हॅलो जुलीन .. हाऊ आर यु ?"
जुलीन " आय एम फाईन .. थँक यु सर "
स्वराज " मीट निशिगंधा .. शी इज माय वाईफ "
जुलीन " वेलकम मॅम .. यु आर व्हेरी प्रीटी "
निशी " थँक यु .. यु आर अल्सो ब्युटीफुल "
स्वराज " कॅन यु प्लिज मेक सम सँडविचेस फॉर असं .. विथ इंडियन टी .. "
जुलीन " शुअर सर .."
आणि ती हसतच आत गेली आणि पाण्याची बाटली स्वराज च्या हातात देऊन गेली
स्वराज ने सामान घरात आधी मग त्याच्या रूम मध्ये घेतले .. तोपर्यंत निशी खाली सोफ्यावर बसून राहिली .. सगळीकडे नजर फिरवत होती .. एखाद्या ख्रिश्चन कुटुंबाकडे यावे अशी घराची रचना .. सामानाची ठेवाठेवी होती .. पण सगळे काचे सारखे चकचकीत . टापटिपीत ठेवले होते ..
सामान वर ठेवून स्वराज खाली आला ते त्याचे कपडे चेंज करूनच आला खाकी कलरचा बर्म्युडा आणि त्यावर एक टी शर्ट घालून आला .. निशी ला सगळेच फार वेगळे वाटत होते .. इव्हन स्वराज ला असा बर्म्युडा वर पहिल्यांदाच बघत होती ..
स्वराज तिच्या समोर आला आणि डायरेक्ट तिला दोन्ही हातात उचलूनच वरती नेऊ लागला
निशी " थांब ना .. अरे ती मुलगी आहे ना ती बघेल ना .. सोड ना "
स्वराज " बघू दे .. मला काही फरक नाही पडत .. ती तशीही किचन मध्ये आहे "
निशी ऑकवर्ड होऊन त्याच्या हातात होती
स्वराज " डोन्ट टेक टेन्शन यार .. काय तू .. जरा मोकळी हो ना .. वेलकम टू अवर रूम "
त्याच्या रूम मध्ये आल्यावर त्याने तिला खाली सोडली .. रुम मध्ये समोरच निशी चा ताज महाल च्या इथं काढलेला सिंगल फोटो होता .. व्हाईट ड्रेस मध्ये खूप छान दिसत होती ती .. मस्त फोटो होता .. स्वराज ने तिला हाताने धरून उलटे फिरवले तर बेड च्या मागे त्या दोघांचा फोटो होता .. जो त्याने तिला दाखवला होता ..

🎭 Series Post

View all