निशिगंधा भाग ४

story of a girl who wants to open school in village

निशिगंधा भाग ४

क्रमश: भाग ३

स्वराज ला तिला ती रुखी सुखी भाकरी खाताना बघवलेच नाही .. लगेचच त्याने त्याच्या मोबाईल वरून त्याच्या वडिलांना फोन केला

डॅड " स्वराज .. व्हॉट हॅपन्ड .. आर यु क्राईग ?"

स्वराज " डॅड ... डॅड .. हे कसले काम सांगितले तुम्ही मला .. माझ्याच्याने नाही होणार हे ?"

डॅड " यु ह्याव टू डू  इट इफ यु वॉन्ट टू गेट मॅरीड टू  क्रिस्टिना "

स्वराज " डॅड ... हि मुलगी आल्रेडी खूप त्रासात आहे .. तिचा अजून त्रास वाढवणे मला योग्य नाही वाटत .. काय कमी आहे आपल्याला ? का हे काम तुम्ही करायला सांगताय ... आय कॅन नॉट डू धिस .. आय एम कमिंग बॅक "

डॅड " देन .. सॉरी माय सन  .. आय विल नॉट अल्लाव  यु टू गेट मॅरीड विथ क्रिस्टीना .. "

स्वराज " डॅड ... तुम्ही इकडे असतात तर असे बोलला नसतात .. द व्हिलेज गर्ल इज  ऑल अलोन .. शी इज फायटिंग फॉर हर ब्रेड अँड बटर .. देन अल्सो रनिंग स्कूल फॉर चिल्ड्रेन .. व्यिई  शुड डोनेट सम मनी इंस्टेंड ऑफ दयाट यु आर अस्किंग मी टू मेक हर होमलेस .. यु गेव्ह मी रॉंग इन्फॉर्मेशन .. शी इस नॉट अरोग्यन्ट .. शी इज हेल्पफुल इन नेचर "

डॅड " सी मय सन.. द कॉस्ट ऑफ दयाट प्रॉपर्टी इज १ करोड इनइंडियन रुपीज .. आय कॅन नॉट लिव्ह इट "

स्वराज " बट .. ती कुठे जाईल मग ? तिच या जगात कोण नाहीये "

डॅड " डोन्ट बी इमोशनल फुल फॉर दयाट व्हिलेज गर्ल .. थिंक अबाउट युअर फ्युचर .. "

स्वराज " डॅड ... व्हाय डोन्ट यु थिंक अबाऊट हर .. शी इस युअर फ्रेंड्स डॉटर "

डॅड " डोन्ट टीच मी .. जस्ट डू इट " आणि फोन कट झाला

संध्याकाळी ६ वाजता ती लाकडाच्या वखारीतून निघाली .. पुन्हा तिच्या सायकल वरून .. आता थोडी थकली होती.. उजाडलेला दिवस मावळला होता पण तिची कामं संपली नव्हती .. .. बहुदा तिला आजच्या कामाचे पैसे मिळाले असावेत .. तशीच बाजारात गेली .. दोन चार भाज्या विकत घेतल्या .. थोडे वाण  सामान विकत घेतले .. आणि घरी आली.

स्वराज ती काय काय करतेय ते सगळे बघत होता मागून पण तेही तिला कळणार नाही असे

घरात आल्यावर सर्व फुल झाडांना तिने आवडीने .. गोंजारून पाणी घातले .... मग आत मध्ये गेली ... सातच्या दरम्यान बाहेर आली तर केस धुतले होते .. घरातला ड्रेस घातला  होता आणि ओल्या केसांना टॉवेल मध्ये गुंडाळले होते .. कपाळावर पूजेचा टीका होता आणि हातात दिवा घेऊन बाहेर आली आणि तुळशी पाशी दिवा ठेवला .. आणि आत निघून गेली ..

स्वराज  खूप विचारात पडला होता .. काय करावे .. कसे यातून मार्ग काढावा .. डॅड नि सांगितलेलं काम जर नाही केले तर नक्कीच डॅड मला क्रिस्टिना बरोबर लग्न करून देणार नाहीत .. उद्या  लगेच हिला खरं न सांगता आधी थोडी मैत्री करू का ? म्हणजे तिला काही मदत करता येईल का ते बघावे ..

सरपंचाच्या घरात अंगणात बाहेर बाजवर आडवा पडून वर आकाशातल्या चांदण्यांना बघता बघता विचार करत बसला होता ..

 तेवढयात हरी भाऊ आले

हरिभाऊ " काय मग स्वराज साहेब ? झाले का काम ? जे होते ते ?"

स्वराज " नाही आज नाही झाले ? आज तिला वेळ नव्हता "

हरिभाऊ " निशिगंधा कामात असते ते बरच आहे .. एकटा जीव स्वतःला कामात थकवतो तेव्हा कुठे रात्री झोपत असेल ती .. नाहीतर घर खायला उठायचं "

स्वराज " तिने लग्न का केले नाही अजून ?"

हरिभाऊ " आत काय सांगू ? थोड्या दिवसांपूर्वीच बिचारीची ठरलेलं लग्न मोडलंय .. पोरगी मोठी धीराची आहे .. जरा पण बिथरली नाही .. सगळे दुःख पोटात साठवून ठेवते "

हरी भाऊंनी बोल बोलता तिच्या लग्नचा किस्सा सगळं तसाच्या तसा त्याला सांगितला

स्वराज एकदम शांतच झाला .. म्हणजे आता लग्न हा विषय नक्कीच तिने सध्यातरी डोक्यातून काढला असेल

हरिभाऊ " काय पोरीच्या नशिबात लिहलंय काय माहित ? आता हि शाळा काढणे म्हणजे काय सोपे काम आहे का ? त्याला जागा पाहिजे , पैसे पाहिजे .. सरकारची परमिशन पाहिजे .. बऱ्याच गोष्टी लागतात .. शिवाय एका शिक्षिकेचे काम आहे का ते ? अश्या अजून शिक्षिका पाहिजेत .. एवढ्यावर नुसतं भागत नाही .. गावातल्या सगळ्या पोरांना त्यांच्या आई बापाने  शाळेत पाठवले पाहिजे .. " हरिभाऊ बोलत बोलतच आत मध्ये गेले  आणि स्वराज पुन्हा आकाशात तारे आणि चांदण्या मोजत पडला ..

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून तो मॉर्निंग वॉक ला गेला तसा  त्याला पुन्हा सुमधुर प्रार्थना ऐकायला आली .. किती सुरेल आवाज आहे . अशी प्रार्थना ऐकल्यावर का नाही देव प्रसन्न होणार ?

दुपारी बारा वाजता स्वराज तिच्या घरी आला .. आज तिने त्याला अपॉईंटमेन्ट दिली होती ना लंच साठी

खरंतर तिच्यासाठी काहीतरी गिफ्ट घेऊन जायचं होते तिला पण गावात काही तशी सोय नव्हती म्हणून त्याने सकाळी फिरायला गेलेला तेव्हा येताना त्याला पिवळी आणि पांढऱ्या शेवंतीची फुले दिसली होती .. तीच त्याने शेतातून  काढली आणि  त्याचा एक  छोटासा गुच्छ तयार केला आणि बरोबर १२ ला तिच्या दारा समोर हजर ..

खरं तर ती पण त्याची वाट बघत होती .. कोणीतरी तिच्याकडे म्हणून  पाहुणा येणार होता आज पहिल्यांदा ..

तिने त्याला प्रसन्न चेहऱ्याने घरात घेतले .. तिथल्याच चेअर वर बसायला सांगितले  .. त्याच्या लक्षात आले कि सगळ्या साड्या पण क्रिमीश . व्हायटीश नेसते .. पण छान दिसते .. कशी सडपातळ बांधा .. पण व्यवस्थित राहते .. त्यात लांब सडक वेणी आणि भुरभरणाऱ्या  पुढच्या केसांच्या बटा .. .. तिला आत मध्ये जाताना बघताना त्याच्या मनात येत होते

आतून ती पाणी घेऊन  आली आणि समोर खुर्चीतगप्पा मारायला बसली

स्वराज " सो .. झालं स्कूल आजचं ?"

निशी " हो .. "

स्वराज " तू मला ओळखलस का ? काही आठवलं का ?"

निशी " नाही .. काहीच नीट आठवत नाही "

स्वराज ने त्याचे वॉलेट बाहेर काढलं .. आणि त्यातून एक फोटो बाहेर काढला आणि तिच्या हातात दिला ... हे पाहून काही आठवतंय का बघ ?"

निशी ने तो फोटो पहिला आणि  टचकन पाणी  आले तिच्या डोळ्यातून

स्वराज ने तिच्या गहिऱ्या डोळ्यांत पाहिले

स्वराज " हॅलो ... नसेल आठवत तर सोडून दे पण रडू नकोस बाई .. आय कॅन नॉट हँडल इट "

तशी निशी जराशी हसली " सॉरी .. ते आई बाबांचा फोटो बघितला आणि डोळे भरून आले .. बाबा किती तरुण आहेत ना या फोटोत .. आणि आई .. " बोलताना पुन्हा डोळ्यातून एक अश्रू आलाच " आई तर किती सूंदर दिसतेय .. या फोटोत "

स्वराज ने त्याचा रुमाल काढून तिला दिला .. डोळे पुसायला .. तिने डोळ्यानेच सांगितले " नको "

स्वराज मनात " रुमालाची ऑफर रिजेक्टेड " आणि पुन्हा स्वतःच्या खिशात ठेवून घेतला

स्वराज " आई बाबांचा फोटो बघितल्या नंतर अजून काही दिसतंय का या फोटोत ..?"

निशी " हो .. हे बाबांचे मित्र  आणि ह्या त्यांच्या मिसेस   .. मी खूप लहान असताना त्यांच्या घरी गावाला गेलेले आहे .. आम्ही राहिलो पण होतो त्यांच्याकडे चार पाच दिवस .. कसली तरी जत्रा होती म्हणून गेलेलो "

स्वराज " ओके ... आणि मग अजून काही आठवतंय का ? किंवा काही दिसतंय का ह्या फोटोत "

निशी पुन्हा फोटोत डोळे घालून बघू लागली तर एका  मुलगी परकर पोलका घातलेला .. दोन वेण्या घातलेल्या .. कपाळावर नाजूक चंद्रकोर लावलेली .. हातात .. जत्रेत घेतलेल्या हिरव्या बांगड्या घातलेल्या .. आणि त्याच छोटुश्या हातात जत्रेत घेतलेली कागदी भिंगरी होती .. आणि किती तो आनंद होता त्या भिंगरीकडे बघतानाचा ,, जसे कि बाबांनी आकाशातला चंद्रच हातात दिल्या सारखे वाटत होते तिला ..

स्वराज " हॅलो ... मी आहे इथे .. काही आठवलं का ?"

निशी तेवढयात तिचे लक्ष फोटोतल्या अजून एका कडे गेले .. एक ८ वर्षांचा मुलगा .. त्याने धोतर घातलंय .. आणि वरती सदरा घातलाय .. आणि त्याच्याही हातात तशीच भिंगरी आहे पण तो एक पांढऱ्या शेवंतीचे फुल त्या ५ वर्षांच्या छोट्या मुलीच्या केसांत अडकवतोय .. असे दिसले

निशी " म्हणजे तू .. तू .. हा ... हा.. स्वराज आहेस .. " आणि पुन्हा डोळ्यातून अश्रू टपकला

स्वराज " अरे अरे .. रडायचं काय त्यात ?"

निशी " सॉरी .. मी तुला ओळखले नाही .. "

निशिगंधा च्या डोळ्यांत खूप आनंद दिसत होता .. कोणीतरी या जगात आहे कि जो माझ्या  आई बाबांना ओळखतो आणि मलाही ओळखतो .. काय करू नि काय नाही करू असे झाले होते तिला

निशी " अरे .. तू मला आधी का नाही सांगितलंस .. तू तिकडे का थांबलास .. आपल्या घरी थांबायला पाहिजे होतास ना . असा परक्या सारखा का बाहेर राहिलास .. काकांना कळले तर काकां काय म्हणतील ?

स्वराज " अग हो .. तेच म्हंटले आधी तू मला ओळखतेस कि नाही असे झाले होते मला .. नाहीतर हाकलून द्यायचीस .. म्हणून जरा सावकाशच आलो .. "

निशी " बर , चल तुला भूक लागली असेल ना .. जेवायला वाढते "

स्वराज " नाही .. मला खूप गप्पा मारायच्यात तुझ्याशी .. किती वर्षांनी आपण भेटतोय "

निशी " चल , तुला आपले घर दाखवते .. आणि लिटरली तिने त्याला मागे लागूनच  उठवले .. आणि तो हि आता थोडा औपचारिक पण विसरला .. ओळख पटल्यावर  तो औपचारिक पणा गायबच झाला

निशी " हे बघ , मी लावलेली झाड .. हे ना गुलाबाचं आहे .. हि बघ त्याला छान कळी आलीय .. उद्या परवा मस्त फुलेल .. हे सोनचाफा .. तिने एक सोनचाफ्याचे फुल तोडले आणि त्याला दिले .. आणि त्याला सांगितले " सुगंध गे .. बघ कसा आहे .. छान आहे ना .. हे ... पुढचे काही मिनिटे सौदर्याचा अनोखा नजारा स्वराज पाहत होता .. एक म्हणजे हि रंगी बेरंगी .. सुगंधित  फुले आणि त्यांची तारीफ करताना न थकणारे तिचे बोलके डोळे .. कशा कशा कडे बघू असे झाले त्याला ..

🎭 Series Post

View all