निशिगंधा भाग 49

Story Of A Girl Who Wants To Run School
निशिगंधा भाग ४९
क्रमश: भाग ५०
आजचा दिवस खूप छान होता कारण आज दसरा होता .. आज नवीन मुलांचे ऍडमिशन होणार होते .. निशी ला तर या विचाराने रात्री झोप नाही लागली .. रात्रभर तिच्या डोक्यात उदया काय काय करायचे याचे प्लॅनिंग चालू होते .. स्वराज मात्र गाढ झोपला कारण खूप दमला होता तो ..
दुसऱ्या दिवशी पहाटे पहाटेच उठली .. छान मोठा रांगोळीचा गालीछा तिने काढला .. घरातल्या देवांची छान मनोभावे पूजा केली . छान क्रिमीश पांढरी साडी त्याला गोल्डन काठ अशी साडी घातली .. छान लांब सैलसर वेणी .. आणि त्या वेणीत सोन चाफा विराजमान होता ..
स्वराज अजूनही गाढ झोपेत होता .. आणि तिने पण त्याला झोपून दिले ..
घरातल्या देवाला पुरणाचा नेवैद्य बनवून ठेवला .. पुरण पोळ्या जरा जास्तच बनवल्या कारण आज बरेच जण येणार होते ..
स्वराज साठी नाश्ता बनवत होतीच मागून स्वराज च्या हाताचा विळखा तिच्या भोवती पडला ..
स्वराज " गुड मॉर्निंग ... "
निशी " गुड मॉर्निंग ... झाली झोप .. "
स्वराज " हो .. खूप झोपलो ना .. उठवायचंस ना .. सणाच्या दिवशी उशिरा उठलो "
निशी " अरे असू दे रे .. तुझा आराम होत नाही .. बरं चल आवरून घे .. अंधोळ कर .. नवीन ड्रेस आणलाय तुला तो घाल .. देवाला नमस्कार कर आणि मग खा "
स्वराज " ओके .. आलोच १० मिनिटात "
निशी " स्वरू .. हैप्पी दसरा "
स्वराज " हैप्पी दसरा बायको .. आज आपला पहिला सण आहे ना .. आणि लकीली मी आहे इकडे "
निशी " हमम ... मी आता तेच म्हणणार होते .. "
स्वराज " मग आज काय गिफ्ट पाहिजे माझ्या राणीला .. सांग .. मी शहरात जाऊन घेऊन येतो .."
निशी " आता .. मला जे काही पाहिजे ते UK मध्ये .. इकडे नको .. पेंडिंग ठेवू आपण एक गिफ्ट "
स्वराज " अरे वाह !! आर यु एक्ससायटेड ?"
निशी " म्हणजे काय ?कधी एकदा सुधीर काकांना ... आय मिन डॅड ला भेटेल .. मॉम ला भेटेल असे झालंय "
स्वराज " हो का ? आणि माझ्यासाठी काहीच वाटत नाही ना "
निशी " नाही .. " आणि हसायला लागली
स्वराज जो अंघोळीला चालला होता तो मागे आला .. तिला उचलून घेऊन जाऊ लागला ..
स्वराज " माझा इतका कमी इफेक्ट होतोय म्हणजे मी नक्कीच काहीतरी ऍक्शन करावी लागेल आता "
निशी "स्वरू .. सोड .. सोड .. सॉरी .. सॉरी .. "
स्वराज " आता का ? आता का ? डॅमरट " आणि हसायला लागला
स्वराज " आता सांग .. माझ्या साठी काय वाटतं ?"
निशी " आधी खाली सोड .. मग सांगते "
स्वराज ने तिला उतरवले
निशी " तुझ्या बद्दल काय वाटणार ? तुझ्या मुळे आणि तुझ्याच साठी येतेय ना तिकडे .. तू जिकडे तिकडे मी असेल ना .. मग .. "
स्वराज " असे नाही ग .. जसे तू म्हणालीस ना किती कधी एकदा डॅड .. मॉम ला भेटतेय .. तसे तिकडे UK ला गेल्यावर माझ्या बरोबर काय करावेसे वाटतंय.. किंवा असे काही एक्ससाईटमेन्ट कसली आहे .. "
निशी " खरं सांगू .. मला ना तुझ्या स्टोअर रूम मध्ये जायचंय .... तिकडे आपल्या लहानपणीच्या आठवणींच्या खजिना बघायचाय "
स्वराज " मी सांगू .. मी किती एक्ससाईट आहे ?.. कधी एकदा तुला आपल्या रूम मध्ये नेईल .. कधी तुला ऑफिस मध्ये नेईल .. कधी तुला माझ्या फ्रेंड्स ला भेटवेन .. कधी .. तुझा हात हातात घेऊन लंडन ब्रिज वर जाईल .. असे झालंय मला "
निशी " आणि मला या सगळ्याची भीती वाटतेय "
स्वराज " भीती ?"
निशी " हो ना .. मी कधीच परदेशात गेले नाहीये .. मला भीती वाटते मी रस्त्यात हरवले तर .. मला तिकडचं काहीच माहित नाहीये .. तिकडची लोकं एकदम नवीन असणार .. कोणचं माझ्या ओळखीचं नसणार .. त्यात मी अशी गावातली .. लांब काळे केस .. लोक तुला हसणार नाहीत ना माझ्या मुळे "
स्वराज " ए हॅलो .. असे काहीच होणार नाहीये .. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना .. उलट लोक मला म्हणतील युअर वाइफ इज ब्युटीफुल . शी इज कॉन्फिडन्ट .. शी इज डुईंग ग्रेट जॉब "
निशी " स्वरू .. मी आज जरा स्पष्ट बोलू का ? हे जे मी तुला बोलतेय ना ते प्रॅक्टिकली खरं आहे .. आणि तू जे बोलतोय ते फक्त आपल्या दोघांचा विचार करून बोलतोय "
स्वराज " लग्न आपण दोघांनी केलंय .. मग आपल्या दोघांचा च विचार करायला पाहिजे ना .. बाकीचा कशाला तू विचार करतेस .. अन नेसेसरी "
निशी " मला फक्त एवढंच सांगायचंय कि आपण असेही आपल्या कानावर येऊ शकते याची मानसिक तयारी ठेवू या "
स्वराज " जरी असे कोणी बोलले तर त्याचा परिणाम आपल्या नात्यावर होईल असे वाटतंय का तुला ?"
निशी " असे नाही .. पण होऊ हि शकतो .. कोण असे बोलतोय त्यावर असते ते .. म्हणजे उद्या समजा मॉम च असे बोलल्या तर कदाचित त्याचा परिमाण नक्कीच होईल "
स्वराज " मी एक सांगू का ? मी जितका मनाने तुझा झालोय ना तितकी तू अजून माझि झालेली नाहीयेस .. म्हणून या सगळ्या असल्या गोष्टींचा विचार तू करतेस .. "
निशी " असे नाहीये रे स्वरू .. तू चिडू नको ना प्लिज .. सॉरी तुला दुखवायचं नव्हतं मला .. मला मनात जी भीती वाटते ती मी तुला बोलून दाखवली .. जरा माझ्या बाजूने विचार करून बघ ना "
स्वराज " अग राणी ... फक्त आणि फक्त तू आहेस माझ्या मनात .. २४ तास .. खाताना .. पिताना .. झोपताना .. तू असतेस माझ्या बरोबर .. हे असले फालतू विचार येतच नाहीत माझ्या मनात "
निशी " मी कदाचित चुकीची असेल .. सॉरी .. आता तू चिडू नको ना प्लिज .. सॉरी .. इतका छान दिवस असा नको जायला प्लिज " आणि तिने चक्क दोन्ही कान पकडले "
स्वराज " लॉजिकली यु शुड .. कारण तू फक्त माझा विचार कर एवढी साधी अपेक्षा करतोय मी तुझ्या कडून .. तेही तुझ्या शाळेच्या विचारा नंतर .. तेही जर होत नसेल तर... " तो पुढे काही बोलणार तर निशी ने त्याला किस केले ..
निशी "सॉरी .. एक्सट्रीमली सॉरी "
तसा तो हसला " आता UK ला यायला खरी तयार आहेस म्हणावे लागेल "
निशी " एक सांगू का स्वराज .. तू जे बोलतोस ना तसेच मी पण २४ तास तुझ्या विचारात असते .. जगात लोक आपल्या बद्दल काय बोलतात त्याचा विचार करायची खरंच गरज नाहीये .. हे मला पण पटलंय .. सॉरी .. खरंच सॉरी .. तरी पण मी हरवणार नाही ना .. ???"
स्वराज " हरवली तरी मी शोधेन तुला .. एवढा विश्वास ठेव माझ्यावर .. रामाने दसऱ्या च्या दिवशी लंकेतून सीता मातेला ला घेऊन आला म्हणून याला विजया दशमी पण म्हणतात आणि सेलीब्रेट करतात .. तर आज विजया दशमी च्या निमित्ताने मी तुला सांगतो " जगाच्या कोपऱ्यात कुठेही तू असलीस ना तरी मी तुला शोधून काढेन .. "
निशी त्याच्या छातीवर डोकें ठेवून बोलत होती
निशी " मला तुझ्या बरोबर खूप एन्जॉय करायचंय .. मला तुझी बायको म्हणून जगायचंय ..बाबांची मुलगी .. गावातली शिक्षिका हा रोल बाजूला सारून .. मला फक्त माझ्या लहान पणीचा स्वरू जो कि माझा सुख दुःखाचा साथी होता .. जो मला उंच उंच झोका देत होता .. जो माझ्याशी खेळताना माझ्यावर राज्य येऊ नये म्हणून मुद्दामून आऊट होयचा .. माझ्या डोळयांत आलेला अश्रू परतवण्या साठी काहीही करायची तयारी असलेला स्वरू बरोबर एक जीव होयचंय .. "
बोलता बोलता ती त्याच्या मिठीत होती .. आणि त्यानेही दोन्ही हाताने तिला कवेत घेतले "
स्वराज " दयाटस व्हॉट आय वॉन्ट फ्रॉम यु .. जस्ट फील फ्री .. नो मोअर हाईड अँड सिक .. नो सिक्रेट्स .. ओन्ली अस .. टुगेदर ऑर सेपरेट .. एक्सटर्नल थिंग्स शूड नॉट मेक एनी इफेक्ट ऑन अवर रिलेशन .. बरोबर ना "
निशी " बरोबर .. " चेहरा वर करून त्याच्या डोळ्यांत विश्वासाने बघत ती बोलली.

स्वराज " ठीक आहे चल .. मी आवरुन घेतो "
स्वराज अंघोळ पूजा करून घरातून खाऊन पियुन बाहेर राउंड मारायला म्हणून निघून गेला ..
निशी मात्र घरातच होती .. नंदा .. आलीच होती .. ती ने पण छान साडी घातली होती .. तेव्हड्यात करमरकर काका आले .. स्कूल बॅग्स ,वहया , पुस्तके घेऊन .. निशी ने युनिफॉर्म आणि शूज अरेंज केले होते ..
रणजित पण आज एक दम खटाखट तयार होऊन आला होता .. कुर्ता आणि त्यावर जॅकेट घातल्या मुळे अजूनच रुबाबदार दिसत होता ..
हरी भाऊ आणि राधाक्का आलेच होते ..
तेवढ्यात सरपंच पाटील दोन जीप भरून मुलांना घेऊन आले.. सर्व मुलांचे गुलाबाचे फुल देण्यात आले ..
निशी च्या डोळ्यांत लिटरली पाणी तरळत होते .. आनंदाश्रू .. आज तिच्या घरात खूप सारी मुलं शिक्षण घेण्यासाठी उत्सुक म्हणून आली होती .. घरात मुलांचा किलबिलाट बघून तिला भरून आले होते ..
निशी कामात खूपच बिझी होती .. मुलाचे नाव .. वय लिहून घेत होती .. त्यांना वह्या .. पुस्तके .. शूज , युनिफॉर्म देत होती .. तिला वर बघायला पण वेळ नव्हता .. स्वराज केव्हाचा आला होता आणि निशी चे फोटो काढत होता .. व्हिडीओ घेत होता .. घरात एवढी लोक होती कि तिला त्याच्याकडे बघायला वेळ नव्हता .. पण एवढ्या लोंकांत सुद्धा त्याची नजर मात्र तिच्यावर स्थिरावली होती .. आणि तिच्या सगळ्या अदा तो कॅमेरा मध्ये कैद करत होता ..
स्वराज ने जीन्स आणि टी शर्ट घातले होते .. एकदम रुबाबदार दिसत होता .. आणि हा मुलगा (स्वराज )निशी कडे एक टक बघतोय आणि तिचे फोटो काढतोय हे करमरकर साहेबांना काही फारसे रुचले नाही .. ते त्यांच्या जागेवरून उठले आणि रागात चालत चालत स्वराज जवळ आले ..

🎭 Series Post

View all