निशिगंधा भाग 48

Story Of A Girl Who Wants To Run School
निशिगंधा भाग ४८
क्रमश: भाग ४७

निशी " हो का .... मला तुझ्या सारखं बनवशिल .. तू किती छान प्रेम करतोस .. मला येत नाही तसे वागता .. "
स्वराज " ते काय आहे ना मॅडम .. मी जरा जास्तच प्रेम करतो .. तू अजून तेवढं करत नाहीस .. तू जेव्हा माझ्या एवढं प्रेम करशील ना तेव्हा माझ्या सारखं प्रेम आपोआप करशील "
निशी " तू किती करतो माझ्या साठी .. मी काहीच करत नाही ना तुझ्या साठी "
स्वराज " तू टेन्शन नको घेऊ .. मी मला पाहिजे ते बरोबर सगळे करून घेईल तुझ्या कडून " आणि हसला
निशी " मी UK ला आले ना कि आपण खूप मज्जा करू .. इकडे मला असे वाटतं .. कि मी तुझ्या बरोबर असताना मी एक शिक्षिका आहे हे विसरणार तर नाही ना .. मग मी स्वतःला लिमिट्स मध्ये ठेवून वागते .. शिवाय मी आधी एकटी असल्यामुळे मला असे लिमिट्स मधेच वागण्याची सवय लागलीय .. सॉरी .. पण तिकडे तसे नसणार आहे .. मग मी बघच तुला दाखवेन कि मी काय काय करू शकते ते "
स्वराज " आय एम वेटिंग.. माय डार्लिंग टू सी यु इन दयाट अवतार "
--------------
मग शाळा .. प्रार्थना ...मुलं .. तिचे शिकवणे .. मुलांचे प्रश्न .. उत्तरे .. सगळे त्याने रेकॉर्ड केले .. त्याने सर्व मुलांना आणलेले चॉकलेट्स वाटले .. मग सर्व मुलांना घेऊन ते दोघे ट्रिप ला गेल्या सारखे त्यांच्या शेतात गेले .. मुलं डबल लाईन करून एका मागे एक चालत शेतात गेले .. निशी ने तिथेच एक ट्रॅकटर होता त्यावर बसली आणि अख्ख्या शेतात ती ने फिरवला .. मुलं पण शेतात खेळू लागली ..लंगडी .. पकडा पकडी असे खेळ सुरु झाले .. सगळे आनंदी चेहरे स्वराज त्याच्या कॅमकॉडर मध्ये रेकॉर्ड करत होता ..
थोड्या वेळ खेळल्यावर निशी ने सर्वांना खाली बसवले .. आणि शिकवू लागली .. मुलं सगळी कान देऊन ऐकत होती .. मन लावून ऐकत होती आणि तितक्याच तन्मयतेने ती शिकवत होती .. शिकवता शिकवता ती मागे पुढे चालायची आणि चालताना तिचा हात तिच्याच वेणीशी खेळत असायचा .. ते पाहून स्वराज साहेब खुश होत होते. सगळे रेकॉर्ड केले त्याने ...
मग मुलांना घरी सोडले .. आणि हे दोघे तिकडेच शेतात थांबले .. आज त्यांच्या शेतात त्यांच्या जावई आला होता .. मन दाटून आले होते तिचे .. मनातल्या मनात आई बाबांशी बोलत होती " बाबा .. बघा स्वराज आलाय .. आपल्या शेतात .. बाबा .. आम्हा दोघांना आशीर्वाद दया .. "
जरी तोंडाने बोलत नसली तरी तिच्या डोळ्यांतून तिची मनाची स्थिती त्याला जाणवत होती
स्वराज " आर यु ऑल राईट .. डोन्ट वरी .. मी समजू शकतो तू काय विचार करतेय ?"
निशी " थँक यु म्हणायचंय मला तुला .. पण कसे बोलू असे झालंय .. तू खूप केलंय स्वराज .. हे शेत आपले आहे .. माझे आई बाबा ह्या शेतात राबलेत .. त्यातून त्यांनी सोनं पिकवलंय .. मी तर या जन्मात परत मिळवू शकले नसते .. तू किती पैसे खर्च करतोस माझ्यासाठी .. ते ही माहित असताना कि यातून फायदा शून्य आहे "
स्वराज " कोण म्हटले फायदा नाहीये .. मी तुला म्हटले ना .. मी एक नंबर चा बिझनेसमॅन आहे .. फायदा असल्याशिवाय कोणतीच गोष्ट करत नाही "
निशी " गप रे .. काय पण उगाच "
स्वराज " अरे .. बायकोच्या डोळ्यांत इतकी ख़ुशी दिसणे हि करोडोच्या डील पेक्षा मोठी डील आहे "
निशी ने डोळे पुसले .. " स्वरू .. लव्ह यु "
स्वराज " मी टू .. चल तुला एक सरप्राईझ "
त्याने निशी ला एका झाडा जवळ नेले .. आणि झाडाला दोरी बांधून एक झोपाळा तयार केला .. तिला त्यावर बसवले .. आणि झोके देऊ लागला..
निशी " स्वरू .. कितीतरी दिवसांनी नाही .. वर्षांनी मी झोपाळ्यावर बसलेय .. "
स्वराज " जस्ट एन्जॉय .. डिअर .. तू ना खूप विचार करतेस "
निशी हसतेय का रडतेय तीच तिला माहित पण एक्सट्रीम आनंदात होती एवढं मात्र नक्की ..तिच्या चेहऱ्यावरचे हे अनमोल भाव स्वराज ने त्याच्या कॅमेरा मध्ये रेकॉर्ड करून अजरामर करून टाकले मग मस्त चालत चालत घरी आले .. वाटेत येताना पांढरी आणि पिवळी शेवन्ती ची फुले दिसली ती त्याने तिच्या वेणीत घातली .. आज त्याने लहान पणी बघितलेली स्वप्न जणू सत्यातच उतरवली होती
खूप खुश होते दोघे जण ..
घरी आल्यावर
उद्या दसरा म्हणून निशी ची खूप गडबड चालू होती .. घराला फुलांनी सजवण्यासाठी खूप सारी फुल समोर घेऊन बसली होती आणि हार बनवत होती .. तिच्या मदतीला नंदा आली आणि .. हरी भाऊ पण येऊन जाऊन होते .. उद्याच्या कार्यक्रमाची चर्चा करून निघून जायचे .. रणजित आला त्याची स्वराज शी ओळख करून दिली .. रणजित पण निशी सांगेल ते काम उरकत होता .. उद्या त्यांच्या गावातली पण मुलं नवीन ऍडमिशन साठी येणार होती .. NGO चे करमरकर सरांचा फोन झाला होता .. त्याच्या बरोबर अजून दोन अधिकारी घेऊन ते येणार होते .. एकंदरीत निशी ची आज खूपच धावपळ चालू होती .. स्वराज ला जमेल ती मदत तो करतच होता .. पण आज तिच्या सगळी कामं कॅमेरा मध्ये उतरवत होता ..
स्वराज " निशू .. बस झाले काम आता .. थोडे चिल मर यार .. सकाळी उठल्या पासून काम आणि काम चालू आहेस .. मी रेकॉर्ड करून थकलो पण तुझी कामं संपत नाहीयेत ..
नंदा " जीजू .. बघा ना .. किती काम करते ती .. जरा म्हणून कंटाळा येत नाही तिला "
स्वराज " हो ना .. नंदा .. एक काम कर .. जरा सगळ्यांना चहा कर .. निशी नीड्स ब्रेक नाऊ "
रणजित " मी निघतो .. घरी .. उद्या सकाळी भेटू निशी ताई "
स्वराज " अरे थांब .. बघू नंदा ला चहा तरी करता येतो कि नाही ते .. थांब .. आज आता जेवूनच जा .. आता हा हार झाला कि आपण दोघे लावूनच टाकू शाळेला आणि घराला मग या दोघी मस्त जेवण करतील .. आणि मग जा "

रणजित " नाही थांबलो असतो जेवायला पण घरी आई एकटी असते .. मी गेल्या शिवाय जेवत नाही ती "
स्वराज " ठीक आहे .. मग चहा घेऊन जा .. "
नंदा आत मध्ये गेली आणि चहा बनवू लागली .. हल्ली रणजित ला ती पूर्णतः दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करायची .. आणि त्यामुळेच कि काय रणजित अस्वथ होता .. ..
स्वराज " निशी .. तू तिकडे असल्यावर शाळेचं काय प्लॅनिंग केलंय ?"
निशी " ते सकाळी १० वाजे पर्यंत नंदा शिकवेल आणि ती तिच्या कॉलेज ला जाईल .. आणि मग १० ते १२ रणजित शिकवेल .. असे दोघे आलटून पालटून करणार आहेत .. रणजित चा एक मित्र पण आहे तो पण इंटरेस्टेड आहे .. तो हि येईल कधी कधी शिकवायला .. शिवाय नंदा ची मैत्रीण तिला जमले तर ती पण शिकवायला येईल .. शिवाय राधाक्का किंवा हरिभाऊ स्वतः मुलांवर लक्ष ठेवायला इथे येऊन बसणार आहेत .. आणि संध्याकाळी घंटा वाजवायचे काम नंदा किंवा तिचा भाऊ नरेश करणार आहे "
स्वराज " अरे वाह !! सॉलिड प्लॅन आहे .. बरेच एकमेकांना बॅक अप ठेवले आहेस ते छान झाले "
निशी " हो मग .. मी काहीच मागे पेंडिंग ठेवून येणार नाहीये .. "
रणजित " निशी ताई .. काही काळजी करू नकोस .. शाळा आम्ही सगळे व्यवस्थित सांभाळू .. फक्त ते प्रार्थना तुझ्या आवाजातच छान वाटते .. बाकी कोणाच्या आवाजा पेक्षा .. खाली मान घालून किंचितसा हसू लागला .
निशी " असे काही नसते रे .. ती पण शिकेल हळू हळू .. मला माहितेय .. शी कॅन "
नंदा चहा घेऊन बाहेर आली तसा तो हसायचा बंद झाला … तिने आतूनच ऐकले होते
नंदा " हा तर असा बोलतोय कि ह्याचा आवाज किशोर कुमार सारखाच आहे "
तस रणजित ने तिच्याकडे रागाने बघितले .. आणि स्वराज आणि निशी हसू लागले
स्वराज " निशी .. अरे हि पण सेम तुझ्या सारखाच मस्त चहा करते ग .. सही .. व्हेरी गुड नंदा "
निशी " छान झालाय ग चहा "
स्वराज " नंदा .. तुला पण बघायचा का तिकडचा नवरा .. म्हणजे माझ्या ओळखीचे बरेच इंडियन आहेत तिकडे?"
नंदा " नको हो जीजू .. सगळेच काय तुमच्या सारखेच असतील का ? मला इकडचेच भूत पाहिजे .. "
तसे सगळे हसले
स्वराज " डायरेक्ट भूत "
नंदा " म्हणजे काय ? माझ्याशी लग्न करायचं म्हणजे भूत च पाहिजे .. सुरक्या फुरक्या चे काम नाही ते "
निशी " काय ग नंदा .. आज एकदम वेगळंच बोलतेय "
स्वराज " बोलू दे ग .. तिला .. निदान तिच्या मनात काय आहे हे तरी कळेल ना ..”
निशी " स्वरू .. तू माझा प्लॅन चौपट करू नकोस .. नंदा तिकडे आली तर मला इकडे यावे लागेल "
स्वराज " म्हणजे ?"
निशी " मी गेल्यावर रणजित आणि नंदा या शाळेचे कर्ता धर्ता असतील "
स्वराज " ओके .... ऐसा है क्या ?? ओके .. मग रणजित .. चहा आवडला का ? काही बोलला नाहीस ..?"
नंदा " काय काय लोकांचा असतो असा स्वभाव .. एकदम परके होऊन जातात क्षणात .. आणि परक्या लोकांना मी केलेला चहा आवडला कि नाही हे ऐकायचं नाहीये मला "
रणजित तरीही शांतच .. आज ती खूपच बोलत होती .. होता नव्हता तेवढा सगळा राग बाहेर आला होता
दोघांनी माळा घराला आणि शाळेला लावल्या आणि रणजित घरी जायला निघाला .. नंदा तिकडेच बाजूला काम करत होती ... स्वराज आणि निशी आत होते ..
रणजित " तू चिडलीय का माझ्यावर ?"
नंदा " कशा बद्दल ? म्हणजे असे काही वागलाय का तू ? चिडायला "
रणजित काहीच बोलला नाही
नंदा " परक्या लोकांवर मी चिडत नसते "
रणजित " मग का असे टोमणे मारतेय मला .. मला काळजात भोकं पडतायत तुझ्या बोलण्याने "
नंदा " ठीक आहे .. नाही बोलणार आता .. मी तरी कशाला माझे तोंड उघडले काय माहित .. "
रणजित " तुला आता कसे सांगू मला काही कळत नाहीये "
नंदा " कशा बद्दल बोलतोय मला कळत नाहीये .. मी जाते आता .. मला काही इंटरेस्ट नाहीये परक्या लोकांशी बोलायला "
आणि नंदा तिथून निघाली
रणजित ला तिला " थांब " असे बोलायचे होते पण नाही बोलू शकला ... हे स्वराज ने आतून पाहिले
नंदा निघून गेली .. रणजित पण घरी गेला

🎭 Series Post

View all