निशिगंधा भाग 45

Story Of A Girl Who Wants To Run School


निशिगंधा भाग ४५
क्रमश: भाग ४४
निशीं ने स्माईल नाही एकदम एक्ससाईट होऊन आनंदाने उडीच मारली .. " कसले भारी इमॅजिन करायला लावतोय .. नुसत्या विचाराने च छान वाटतंय "
स्वराज " मग .. बी पॉसिटीव्ह यार .. हि दोन वर्ष अशी निघून जातील .."
निशी " कुठे जातात .. बघ ना आताशे अडीच महिनेच झालेत .. मला तर हे अडीच महिनेच खूप वाटतायतय .. "
स्वराज " हो ना .. यार खरं आहे हे .. कधी तू इकडे येशील . मी खूप स्वप्न बघतोय . "
तेवढयात त्याच्या केबिन चे दार वाजले
स्वराज " ऐक ना .. कोणीतरी येतंय .. मी रात्री कॉल करतो काय "
निशी " हो .. हो .. "
स्वराज " ठेवू मग "
निशी " उम्म्म हा ..” चक्क किशी पाठवली तिने
स्वराज " ह्या सगळ्या मी रेकॉर्ड मध्ये ठेवल्यात .. मी आलो कि सगळ्या माझ्या मला पाहिजेत .. चल बाय ठेवतो"
--------------------------
रात्री नंदा झोपायला आली ती डायरेक्ट तिच्या गळ्यात पडून रडायलाच लागली
नंदा " निशी .. मला खूप वाईट वाटतंय ग .. किती वाईट आहे ग तो .. मी असले काय नसेल काय त्याला काहीच फरक नाही पडत .. मी उगाचच त्याचा दिवस रात्र विचार करत होते .."
निशी " हमम .. ते आली माझ्या पण लक्षात .. पण तुझ्या बद्दल च्या भावना तो खोल कुठेतरी दडवून ठेवत आहे असे वाटतंय मला .. मी .. एकदा विचारू का ?"

नंदा " नको ग .. आज किती अपमान केला त्याने माझा .. चक्क दुर्लक्ष करत होता .. त्याला मी नसेल आवडत तर कशाला उगाच विषय वाढवायचा ... वेळेत शहाणी झाले मी .. "
निशी " तसे तर त्याने या आधी कधी असे संकेत दिले नाहीत .. तू नाराज नको होऊस .. माणूस चांगला आहे तो आणि आपल्याला आपल्या शाळे साठी त्याची गरज आहे ... खूप मदत होतेय त्याची .. उदया स्वराज आले कि मी UK ला एक महिना जाणार आहे .. तेव्हा तुमच्या दोघांवर मी शाळेची जवाबदारी टाकणार आहे "
नंदा " नको ग .. मी .. आता कसे सांगू तुला ? तू नसताना त्याच्या बरोबर काम करणे मला शक्य नाही होणार "
निशी " हे बघ नंदा .. तू सध्या या गोष्टीकडे लक्ष नको देउस .. वेळ आली कि आपोआप सगळ्या गोष्टी होतात .. तुझ्या हातावर चहा पडल्यावर तो काळजीने उठला होता ... मी स्वतः पाहिले पण थांबला .. म्हणजे काहीतरी आहे जे त्याच्या डोक्यात आहे .. तू सध्या चांगल्या मार्कांनी पास होण्याकडे लक्ष दे .. तो स्वतःहून तुझ्याशी एक दिवस बोलेल बघ .. "
नंदा अजूनही मुसमुसत होती .. एक प्रकारे भावनांचा विरसच झाला होता तिचा .. निशी ने तिला खूप समजावले होते .. आणि आता तिला पण स्वतःच्या पायावर उभे राहून काहीतरी बनावे असेच वाटू लागले होते. उद्या रणजित समोर आला तरी मला सुद्धा काही फरक पडत नाही असेच त्याला भासवायचे तिने मनातून ठरवले आणि दोघी झोपून गेल्या ..
निशी ला माहित होते निघताना नंदा ने त्याच्या कडे दुर्लक्ष केल्यावर तो हि जरासा अस्वथ झाला होता .. कधी कधी जशास तसे वागवल्याशिवाय अक्कल येत नाही .. नाही का .. आणि हे पटवण्यात निशीला यश आले होते ..
----
दुसऱ्या दिवशी सकाळी निशी शी शाळा सुरु झाली .. तिची शाळेतली मुलं एकेक जण येऊ लागली .. आणि प्रत्येकाच्या हातात एक लाल गुलाबाचे फुल होते .. एकेक जण तिला हातात फुल देत होते .. आणि " हैप्पी बर्थ डे टीचर " असे म्हणत होते .. खूप सारी गुलाबाची फुले जमली .. तिने एक मोठा फ्लॉवर पॉट मोकळा केला आणि त्यात ती सर्व फुले एकत्र ठेवली ..
निशी " अरे पण हि फुलं कोणी दिली ? कुठून आणलीत ?"
सर्व जण " स्वराज काका ने खास पाठवलीत तुमच्यासाठी?"
निशी " ए .. काही पण काय ? खरं सांगा .. तुम्हांला कोणी सांगितले आज माझा बर्थ डे आहे म्हणून"
सर्व जण " स्वराज काका ने "
निशि " काही पण .. स्वराज काका इकडे कुठे आहे ?\"
सर्व जण " ते आम्हांला माहित नाही .. पण फुलं नक्की त्यानेच दिलीत "
निशी " बरं .. ठीक आहे .. चला शाळा सुरु करू .. “आणि तिने प्रार्थनेला सुरुवात केली ..
प्रार्थना झाल्यावर १ तास वगैरे झाला असेल तर हरी भाऊ आणि राधाक्का आले सकाळ सकाळी ..
हरिभाऊ " वाढ दिवसाच्या शुभेच्छा निशी बेटा "
राधाक्का " वाढ दिवसाच्या शुभेच्छा "
निशी ने वाकून दोघांना नमस्कार केला .. आनंदाने डोळे भरून आले तिचे ..
निशी " धन्यवाद काका .. आणि राधाक्का .. पण या वर्षी तुम्हांला कसे कळले ? मी तर कधीच करत नाही ना वाढ दिवस साजरा "
हरिभाऊ " अग ते तुझे मॅरेज सर्टिफिकेट पहिले ना तेव्हा तारीख पहिली होती मी "
निशी " ओके .. थांबा मी चहा टाकते "
तिने मुलांना गणिते सोडवायला दिली आणि आत मध्ये गेली
तेवढ्यात राधाक्काने तिच्याच देव घरातून आरतीचे ताट करून आणले आणि तिला खुर्चीत बसवून .. तिला ओवाळले .. तिला साडी गिफ्ट आणली होती ती दिली "
निशी " हे काय ? राधाक्का ? गिफ्ट नको . "
राधाक्का " असू दे ग .. बघ छान मोरपिशी रंगाची साडी आहे .. तुला आवडेल .. "
निशी च्या डोळ्यांत आनंदाश्रूच तरळत होते
मग राधाक्का आणि हरिभाऊ चहा घेऊन निघायच्या तयारीत होते ..
हरी भाऊ " औक्षवंत हो .. आणि अशीच खुश रहा बाळा "
निशी " थँक यु काका .. यावर्षीचा वाढ दिवस नेहमी पेक्षा वेगळा आहे "
हरी भाऊ " काल रात्री स्वराज चा फोन आला होता .. त्यानेच मला सांगितले कि आज निशी चा वाढ दिवस आहे तर राधाक्का ला तिला औक्षण करायला सांगा ."
निशी मनातच " तिकडे आहे पण कसे काय मॅनेज करतोय ? मुलांना पण फुले त्यानेच दिली असे मुलं सांगतात "
राधाक्का " अरे वाह !! एवढी गुलाबाची फुले "
निशी " हो ना .. सगळ्या मुलांनी आणलीत "
हरी भाऊ " तरीच आज सकाळी फुलांची गाडी गावात आली होती .. कोणाकडे आली होती काय माहित? पण फुले तर जिकडे पोहचायला पाहिजेत तिकडे पोहचली " आणि हसायला लागले
निशी " हे पण काम स्वराज चे असेल का ? "
राधाक्का " मग कोणाचे असणार ? इतक्या वर्षांत तुझे किती वाढ दिवस येऊन गेले .. असे कधी झालंय का ?"
निशी तशी जराशी लाजली .. आणि आनंदाने तिने त्याला फोन लावायला हातात फोन घेतला
तेवढयात विठ्ठल काका आले .. विठ्ठल काका आले म्हणून हरी भाऊ पण थांबले त्यांच्याशी गप्पा मारायला
विठ्ठल काका " वाढदिवसाच्या शुभेच्छा बेटा !! "
निशी एकदम आश्यर्य चकितच झाली
निशी ने जाऊन त्यांना आपण पाया पडली
निशी " धन्यवाद काका ... तुम्हांला कसे कळले ?"
विठ्ठल काका " ते जाऊ दे ग .. मी एका महत्वाच्या काम साठी आलोय "
असे बोलतच त्यांनी त्यांच्या काळ्या बॅगेतून काही कागद दिले .. " हे घे .. तुझे बर्थ दे गिफ्ट "
निशी " नाही नको .. आशीर्वाद द्या काका "
विठ्ठल काका " अरे बाळा .. आशीर्वाद तर आहेतच .. हे घे .. तुझेच आहे .. तुला देऊन टाकतो "
निशीने कागद उघडून बघितले तर त्यांच्या शेताचे कागद होते .. त्यांचे शेत जे विठ्ठल काकांच्या ताब्यात होते ते त्यांनी निशी स्वराज ****** या नावे करून तिला दिले होते "
निशी " हे कसे काय ? काका ? तुमचे पैसे ?"
विठ्ठल काका " पैसे मला मिळाले ... तुमचे शेत आता तुझ्या नावाचे आहे आणि तू तिथे काहीहि करू शकतेस अगदी तुझी शाळाही बंधू शकतेस ?"
निशी " हरी काका .. हे बघा .. विठ्ठल काका काय म्हणतायत ?" पुन्हा डोळे पाणावले होते तिचे
विठ्ठल काका " गेल्या आठवड्यात स्वराज चा कॉल आला होता .. मला म्हणाला .. निशी च्या शेताची जागा मला परत हवीय .. तुमचे जे काही पैसे असतील ते तुम्हांला मिळतील .. आजच्या बाजार भावाने जेवढे पैसे होतात ते सर्व मला मिळाले "
निशी रडतच देवा समोर जाऊन बसली .. नमस्कार केला .. समोरच ठेवलेली साखरेची वाटी घेऊन बाहेर आली आणि सर्वांना साखर वाटली तिने .. "
निशी मनातच " ओह .. स्वरू .. काय काय करतोय तू .. आपली जागा ... आपले शेत .. या शेतात .. आई आणि बाबांनी त्यांचा घाम गाळून शेत पिकवलेल आहे .. आज पुन्हा आपल्याकडे आले .. एवढे मोठे गिफ्ट .. कशी परतफेड करणार आहे मी याची .. "
हरिभाऊ " तसेही हॉस्पिटल च्या मागचा प्लॉट शाळे साठी लांब झाला असता .. हि जागा मोक्याची आहे .. मुलांना जायला यायला जवळ पडेल .. शिवाय .. मोठी इमारत बांधता येईल .. ग्राउंड पण करता येईल .. निशी शाळेच्या जागेचा प्रश्नच सोडवला स्वराज ने " हरी भाऊंच्या पण डोळ्यांत पाणी साचले ..
विठ्ठल काका पण चहा घेऊन निघून गेले . हरी भाऊ आणि राधाक्का निघून गेले .. निशी ने मुलांना आज जरा लवकर घरी सोडली ..
कधी एकदा स्वराज शी बोलते असे झाले होते तिला .. आणि ती कंटिन्यूअस कॉल करत होती त्याच्या मोबाईल वर तर क्रिस्टिना ने कॉल उचलला .. कॉल फॉरवर्ड केला होता त्याने .. क्रिस्टिना ने तिला सांगितले कि स्वराज इज इन मिटिंग टिल इव्हीनिंग .. आय विल आस्क हिम टू कॉल यु "
शेवटी फोन ठेवून दिला .. त्याच्या कॉल ची वाट बघण्याशिवाय पर्याय नव्हता .. आज छान काही तरी जेवणाचा मेनू करावा आणि नेवैद्य ठेवावा असे तिला वाटले आणि ती किचन मध्ये जाऊन कामाला लागली
छान शेवयांची खीर .. उकड बटाटयाची भाजी , पुरी.. वरण भात .. असा मेनू आज तिने केला .. जरा जास्तीचा केला कारण संध्याकळी नंदा येणार होती जेवायला . छान नेवैद्य बनवून देवाला नेवैद्य दाखवला .. पण एकटीला जेवायला बसायला कंटाळा आला तशीच घरा बाहेर पडली . आणि त्यांच्या शेतात गेली .. या आधी किती तरी वेळा ती शेतात चालत गेली असेल .. आज मन भरून आले होते .. भर भर चालत शेतात गेली .. आणि शेतातली माती तिने आज स्वतःच्या मस्तकाला लावली .. मन ..डोळे भरून आले होते तिचे .. आज बाबांची खूप आठवण येत होती .. तिच्या डोळ्यांसमोर तिचे बालपण आले .. बाबा .. नांगर घेऊन शेतात काम करताना तिला दिसले .. आई शेतात पेरणी करताना दिसली ..स्वतःला परकर पोलक्यात शेतात बागडताना तिने उघड्या डोळ्यांनी पहिले ..

🎭 Series Post

View all