निशिगंधा भाग 44

Story Of A Girl Who Wants To Run School
निशिगंधा भाग ४४
क्रमश: भाग ४३
नमस्कार !! मी सौ निशिगंधा स्वराज ********.. मी अमुक अमुक या गावात लहानाची मोठी झालीय .. माझ्या वडिलांचे नाव श्री प्रकाश होते आणि तेही एक शिक्षक होते .. सध्या शाळा आमच्या घरात चालू आहे ... माझ्या वडिलांनी २० वर्षांपूर्वी सुरु केली होती ती मी अजूनही चालू ठेवली आहे ..माझ्या वडिलांचे एक स्वप्न होते कि गावात एक मोठी शाळा असली पाहिजे .. शिक्षण अतिशय महत्वाचे आहे .. घरातील शाळेला मोठे स्वरूप देण्यासाठी आमच्या गावचे सरपंच जे कि मला माझ्या वडिलांसमान आहेत श्री हरिभाऊ हे हि माझ्या बरोबर या कार्यात मदत करत आहेत .. तसेच माझे पती स्वराज तेही शाळेसाठी निधी गोळा करण्यास मला मदत करत आहेत .. मोठी शाळा हॉस्पिटल च्या मागे असलेल्या जागेत बांधायचे ठरवत आहोत .. पण शाळे ची शोभा वाढते ते मुलांनी .. आपल्या गावातील मुलांनी सुद्धा आमच्या शाळेत मुलांना पाठवावे यासाठी मी आपल्या गावचे सरपंच श्री पाटील यांच्याशी बोलले आणि त्यांना हि आपल्या गावातील मुलांना शिक्षण मिळावे असेच वाटते .. तसेच आपल्या गावातले होनहार मुलगा श्री रणजित हे हिआमच्या शाळेत मुलांना शिकवायला येतात .तेही विना शुल्क .. तर येत्या दसऱ्याला नवीन मुलांचे ऍडमिशन घेऊन सर्व नवीन मुलांना दप्तर , वह्या पुस्तके आणि युनिफॉर्म आणि शूज आम्ही देणार आहोत .. हा सर्व खर्च सध्या एका NGO ने उचलला आहे .. शिवाय एक दिवस आमच्या गावातून मुलांना ने आण केली जाईल आणि एक दिवस तुमच्या कडून एक दिवस आमच्या कडून ने आण केली जाईल असे आपल्या गावंचे सरपंच पाटलांनी शब्द दिलाय . मुला मुलींना शिक्षण देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभे राहायला मदत करू .. यातून नक्कीच गावाचा उत्कर्ष होईल ."
हे ऐकल्यावर सर्वांनी जोर जोर जोरात टाळ्या वाजवल्या .. आलेल्या सर्व पालकांना जेमतेम ते पटले होते ..
निशी " थोड्याच दिवसात शाळेची नवीन इमारत बांधली जाईल .. मी आणि हरिभाऊ स्वतः जातीने लक्ष घालत आहोंत .. मुलांना सर्व अद्ययावत सोयी कशा मिळतील या कडे लक्ष असेल आमचे .. गावतली मुलं शहरातल्या मुलांपुढे मागे नाही पडली पाहिजेत .. शिक्षणाने जग जिंकता येते .. मुलां बरोबर मुलींनीही शिक्षण घेतले पाहिजे .. एक मुलगी अनेक पिढ्या घडवत असते .. नवर्याच्या मागे भक्कम उभी राहून संसारात मदत करू शकते .. शिवाय स्वतः स्वाभिमानाने जगू शकते .. चूल मूल तर आहेच प्रतेय्क स्त्री चे हे कर्तव्य आहेच पण त्याही पेक्षा ती खूप काही करू शकते .. आपल्या गावातल्या मुलींना उंच आकाशात भरारी घ्यायला मदत करू .. स्वतःच्या पायावर उभी करू त्यांना ..
पुढील काही वर्षातच तुम्हांला फरक जाणवेल .. मीच बघा आज एक स्त्री असून स्वतःच्या पायावर उभी आहे .. हि माझी मैत्रीण नंदा .. ती पण डी एड करतेय .. शिवाय माझ्या याबरोबर शाळेत मुलांना शिकवतेय ..
हे ऐकून पण सगळ्यांनी पुन्हा कडाडून टाळ्या वाजवल्या ..
निशी " तर सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे .. आपल्या पाल्याला नक्की शाळेत पाठवा .. एवढे बोलते आणि माझे बोलणे संपवते .. " असे बोलून निशीने दोन्ही हाताने नमस्कार केला आणि तिच्या जागेवर येऊन बसली.
आत्मविश्वास, जिद्द , तिच्या प्रत्येक हालचालीत दिसत होती .. तिच्या शब्दात आज १०० हत्तींचे बळ होते .. समोर बसलेल्या १०० एक पालकांना तिने सहज रित्या शिक्षणाचे महत्व पटवून सांगून .. तिच्या शाळेत मुलांना पाठ्वण्यासाठी तयार केले होते.
त्या गावचे सरपंच पाटील त्यांच्या काय मनात आले काय माहित पण ते पुढे आले म्हणाले " माझ्या तिन्ही नाती आणि नातू सगळे दसऱ्या पासून निशीच्या शाळेत जाणार आहेत .. तुम्ही तुमच्या मुला मुलींना नक्की शाळेत पाठवा .. निशी खूप चांगले काम करत आहे .. तिच्या वडिलांना मी स्वतः ओळखत होतो . अत्यंत हुशार आणि चांगला माणूस होता तो .. आणि मुलांच्या शिक्षणा साठी ची कळकळ त्यांना पण होती .. आज निशिगंधा चा नवरा परदेशात आहे .. मी स्वतः माहिती काढलीय .. निशिगंधाचे सासरे म्हणजे सुधीर ते आपल्या ********* गावचे सुपुत्र आहेत ते सध्या UK मध्ये मोठे बिझनेस मॅन आहेत त्यांच्या मुलाशी निशी चे लग्न झालेय .. तिचा नवरा खरोखर तिला या कामात मदत करतोय .. मला स्वतः सुधीर चा फोन आला होता ..
हे ऐकल्यावर निशी च्या डोळ्यांत पाणी आले .. पाटील ला बाहेरच्या बाहेर स्वराज ने कसे मॅनेज केले होते हे तिला सांगितले पण नाही उलट आज पाटील एवढा पुढाकार घेऊन मदत करत होते
गावातली लोक अवाक झाली होती .. आणि मनोमन ठरवत होती कि आपल्या मुलांना शाळेत पाठवू आणि टाळ्या वाजवताच होती
मग हरिभाऊ पुढे आले नि बोलले " हे बघा .. नुसते पाठवू नका .. त्यांच्या कडून अभ्यास पण करून घ्यायचा आहे.. निशिगंधा आमच्या गावात संध्याकाळी एक मोठी घंटा वाजवते .. मग सगळी मुलं घरात जातात आणि अभ्यासाला बसतात .. मी हि जवाबदारी रणजित वर सोपवणार आहे .. त्याने हि घंटा वाजवावी .. आणि सर्व पालकांनी मुलांना अभ्यासाला बसवायचं .. चूक का बरोबर ते नंतर .. आधी मुलांनी जवाबदारीने अभ्यास केला पाहिजे
आज निशी मात्र मनोमन खुश होती .. आज माहेर तर माहेर पण सासर चे हि नाव पुढे आले होते .. मागच्या वेळीस पाटील तिला काहीतरी बोलले म्हणून नाराज होती हे कळल्यावर स्वराज ने सुधीर ला कॉल करायला सांगून सगळं मॅटर चा सोडवला ..
स्वराज ची साथ हि या कामात अतिशय महत्वाची आहे हे तिला पदोपदी जाणवत होते आणि तितकी ती त्याच्यावर एक प्रकारे फिदा होत होती .. हा कसला आणि कोणता ऋणानुबंध होता कि काहीही अपेक्षा नसताना तो मदत करत होता .. त्याची परतफेड फक्त आणि फक्त निरपेक्ष प्रेमाने च होणार होती ..
सभा आटपून सगळे घरी निघाले .. आता नंदा रणजित कडे डुंकूनही बघत नव्हती .. तिला कळून चुकले होते कि आपल्या मनात जे काही आहे ते व्यर्थ आहे .. आपण हा विषय सोडून दयायला पाहिजे आणि निशी सारखे स्वतःच्या शिक्षणा कडे लक्ष दिले पाहिजे .. तिने जाताना त्याच्याकडे बघितले पण नाही हे हि निशीच्या डोळ्यातून चुकले नाही .. निशी ला जे नंदा ला समजवायचे होते ते तिला आपोआप समजले होते...
हरी भाऊंच्या गाडीतून ते सगळे पुन्हा त्यांच्या गावात आले
निशी " नंदा .. रात्री झोपायला ये .. मग बोलू आपण "
नंदा मान डोलावून होकार देऊन तिच्या घरी गेली ..
निशी घरात गेली अंघोळ करून दिवा बत्ती .. स्तोत्र म्हणून झाली आणि सर्वात आधी तिने स्वराज ला आनंदातच कॉल केला ..
निशी " स्वरू .. आय.. लव्ह यु ... उम्म हा ..उम्म्हा .. एक किशी दोन किशी .. देत च होती "
स्वराज " अरे आज काय लॉटरी लागली कि काय ? आज न मागता च.. काय आहे काय ?
निशी " यु नो व्हॉट .. आय जस्ट लव्ह यु .. "

स्वराज " लव्ह यु टू माय डार्लिंग .. पण आज काय स्पेशल आहे का ?"
निशी " आज पुन्हा त्या पलीकडच्या गावात गेलो होतो .. त्या पाटलांना भेटले होते .. त्यांच्या गावातली सगळी मुलं आपल्या शाळेत पाठवायला तयार आहेत "
स्वराज " अरे वाह!! द्याट्स रिअली ग्रेट .. आणि खरंच याचे श्रेय सगळे तुला आहे जान "
निशी " आज मी या साठी खुश नाहीये .. तु डॅड ला काही बोलला होतास का ते मला जे काही बोलले त्या बद्दल ?
स्वराज " हा म्हणजे ? डॅड ला विचारले होते कि तुम्ही ओळखता का त्यांना .. त्यांनी माझ्या बायकोला आज रडवले ..म्हणून "
निशी " डॅड नि त्यांना कॉल करून सांगितले .. आणि यावेळी ते खूप तारीफ करत होते बाबांची , तुझी आणि डॅड ची पण .. शिवाय स्वतः त्यांच्या मुलींना शाळेत पाठवणार आहेत .. हे सगळे तुझ्यामुळे आहे .. तू झ्या मुळे हा आनंद मला मिळलाय .. थँक यु "
स्वराज " थँक यु काय ?"
निशी " अरे .. थँक यु नाहीतर काय बोलू .. माझ्या प्रयत्नाला तुझा जो हात आहे ना तो दिसत नसला ना तरी तो खूप मोठा आहे .. "
स्वराज " बायको .. आय जस्ट वॉन्ट यु टू बी हैप्पी "
निशी " म्हणूनच म्हटले .. यु आर ग्रेट .. स्वरू .. ये ना .. ये ना .. लवकर ये ना .. मी खूप मिस करतेय तुला .. लवकर ये ना .. आता झाले ना दोन महिने .. विझा ची प्रोसिजर पण झालीय .. येईल आता तो पण .. स्वरू ये ना .. प्लिज .. आय वॉन्ट यु हिअर .. मला खूप खूप आठवण येतेय”
स्वराज " होय ... झाले आता माझे सध्याचे जर्मनीतले काम झालेय .. मी उद्याच UK ला निघणार आहे .. तोपर्यंत तुझा विझा आला कि मग निघेन “
निशी " स्वरू ... विझा नाही आला तरी ये ना .. आता अडीच महिने होऊन गेले .. मला तुला बघायचंय .. ये ना .. प्लिज .. आता नाही राहवत आहे ..
स्वराज ".मी काही विसरतोय का ?"
निशी " नाही असे काही नाही .... बस .. मला आता तुला भेटायचंय .. तू म्हणाला होतास . कि तू सांग मी १० तासांत तुझ्या समोर असेल "
जरा रडवेली नाराज होऊन ती बोलत होती
स्वराज " हो पण मी आता UK मध्ये नाहीये ना . मी उद्या UK ला जाईल .. मग दोन महत्वाच्या मिटींग्स आहेत मला .. "
त्याने बोलता बोलता तिच्या पासपोर्ट ची कॉपी ओपन केली .. तर त्याच्या लक्षांत आले कि मॅडम चा उद्या बर्थ डे आहे ..
स्वराज " हि अशी तू नाराज होऊन .. असे बोलायला लागलीस ना तर मी सरळ उचलून इकडे आणेल .. मी तुला पाहिजे म्हणून तुला तिकडे सोडून आलोय .. उगाच नाही काय ? माझ्यासाठी तू जास्त महत्वाची आहेस "
निशी " ए नाही हा .. आता दोन वर्ष तू दिलीय मला "
स्वराज " हो.. पण असे रडत बसलीस तर मी काढून पण घेऊ शकतो .. तू खुश असावी म्हणून हा खटाटोप .. नाहीतर एव्हाना तू माझ्या बरोबर असतीस आता "
निशी " तुझा हा खटाटोप माझ्या साठी खूप महत्वाचा आहे .. "
स्वराज " माहितेय मला .. म्हणूनच तू तिकडे आहेस "
निशी " बरं .. ठीक आहे .. ठेवते आता "
स्वराज " आधी मला एक स्माईल पाहायचीय तुझी "
निशी " अशी कशी उगाचच स्माईल करू "
स्वराज " असे इमॅजिन कर कि दार वाजतेय आणि तू दार उघडतेय आणि समोर मी आहे "

🎭 Series Post

View all